Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानेंची कॅमेराशी स्वगतं/स्पर्धकांची अ‍ॅनॅलिसिस बघताना कधीकधी हिन्दीच्या मागच्या सिझनच्य ‘विशाल कोटियन’ ची आठवण येते , पण तो कोटियन फारच भारी प्लेयर होता, दररोज झोपण्या आधी त्या त्या दिवसात काय घडलं याचा आढावा/यातून माणसाची वृत्ति कशी असते हे नेमक्या शब्दात कॅमेरापुढे सांगून मग झोपायचा Happy
बिबॉ हाउसमधे इतर लोक अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडताना तो कॅमेरापुढे जाऊन लाइव्ह कॉमेंट्री सुरु करायचा , ‘इसको भी पता है ये मारेगा, उसे भी पता है वो नही मारेगा, फिरभी ‘आ मारके दिखा‘ करते रहेंगे‘ Biggrin

बिबॉ हाउसमधे इतर लोक अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडताना तो कॅमेरापुढे जाऊन लाइव्ह कॉमेंट्री सुरु करायचा , ‘इसको भी पता है ये मारेगा, उसे भी पता है वो नही मारेगा, फिरभी ‘आ मारके दिखा‘ करते रहेंगे‘ >>> हाहाहा.

वॉव मानेंनी आमंत्रणच दिलय विकेन्डच्या डावाला, मी आत्ता जस्ट तो सीन पाहिला !
मेजर पंगा घेतलाय मांजरेकरांशी, इतर लोकांना कामाची गरज आहे, इ.एम.आय भरायचे आहेत म्हणून विकेंडला ते याची हांजीहांजी करतात, तुला नाही आवडत आमचा खेळ तर बदल चॅनल .
आम्ही काय जय उत्कर्ष आहोत का तुझं ऐकून खेळ बदलायला, ठेवायचं तर ठेव , नाहीतर घालव “ असं स्पष्ट म्हंटले माने !

डीजे सीन कुठे बघितला. मेन प्रोग्रॅम आत्ता बघते आहेस का.

माझं एवढं कसं का मिस्ड, मी विचार करतेय.

एपिसोड वुटवर घालतील तेव्हा बघेन.

अन्जु,
मेन एपिसोड मधे आहे तो सीन, योगेश तेजस्विनीशी फ्लर्ट करत होता त्या नंतरचा सीन !
विकास-माने बसले होते बोलत त्यावेळी बोलले माने !

एपिसोड बघतेय, अर्रेर्र्…….तो जो कोण सिरीयल मधला पाहुणा आलाय, भाग्य दिले तू मला मधला ????
तो मनी हाइस्टच्या प्रोफेसरचा मराठी क्लोन आहे Rofl Rofl Rofl Rofl

2E5D80C1-F896-4C09-9375-3553E62F4FDC.jpeg51759C2A-50D3-40FC-8E27-B32A9AD1429A.jpeg

विवेक सांगळे नाव त्याचं. चांगला अभिनय करतो.

तो येईल पुढे बिग बॉसमधे. मागे एका अलका कुबलच्या सिरीयल मधे त्यातल्या पहील्या हिरॉईनने तो शिव्या देतो वगैरे आरोप केलेले. त्यामुळे येईलच तो स्पर्धक म्हणून.

मागच्यावर्षीच अलका कुबल, ती हिरॉईन प्राजक्ता आणि हा येऊ शकतात स्पर्धक म्हणून ह्या शो मधे त्यांच्यातील भांडणामुळे, अशी मिडीयात बातमी होती.

ओह अच्छा हा का तो Biggrin
‘आई माझी काळुबाई ‘ नावाची सिरीय्स्ल कोणी पाहिली नसेल पण हे गॉसिप सगळीकडे पसरले होते !

काल माने जे काही बोलले त्यातील महत्वाचे मुद्दे

1.शनिवारी "इस प्यार को क्या नाम दुँ,हे अम्र्रुताला सांगून हिंट दिली.(हा मुद्दा करेक्ट आहे,ती सरळसरळ हिंट होती,पण प्रसादने प्रतिसाद दिला नाही.)
2.आपल्याला बोलतात,पण बाकीचे काय करतात,ते नाही दिसत का,ती सम्रुध्दी मला एक सांगते,वेगळीच वागते,त्यांना नाही बोलत.
3 यांना ईएम आय भरायचे असतात ना,म्हणून पैसे लागतात,मग घरात राहण्यासाठी हांजी,हांजी करतात.एखाद्या फिल्ममध्ये काम मिळाव म्हणून कोणी बोलत नाही.
4 पण मी त्याला(चक्क एकेरी उल्लेख)या शनिवारी विचारणार आहे.मी नही ऐकत,मला गरज नाही.
वगैरे....
आता हे एवढ बोलल्यावर मुळात माने घरात राहतात की नाही,हे कळेलच.पण बाहेर पडल्यावर माने हे प्रकरण चिघळत ठेवणार ,यात.शंका नाही जस परागने केल होत.ः
आता.शनिवारी ममां हा विषय खेचतात की शांतपणे हाताळतात ,बघू.
पण दुसरी बाजू जर ही असेल की गेल्या वर्षीपासून ममां ओपनली हिंट्स देतात किंवा एखाद्या ग्रुपलाच बोलतात,त्यामुळे असे आरोप त्यांच्यावरही झालेले आहेत.ते क्लिअर करण्यासाठी मानेच्या बोलण्याला फुटेज दिल गेल आहे का,म्हणजे चावडीवर बोलता येईल.कारण ते न दाखवण हे सर्वस्वी बिबॉसच्या हातात आहे.
एरवी ममांना सेपरेट ते दाखवून नंतरही मानेंना समज देता आली असती.
खर खोट माहीत नाही,पण मानेनी घरातून बाहेर पडल्यावर सुध्दा बिबॉस चालवण्याची तयारी केलेली आहे.
ममांनी फार ताणल नाही,तर फुसका बॉब्म निघेल मानेंचा फटाका .

या कारणासाठी मानेंना काढलं तर बिग बॉस आणि मांजरेकर यांच्यात अजिबात खिलाडूवृत्ती आणि टीका ऐकण्याची तयारी नाही असं म्हणावं लागेल.
मांजरेकर यंदा सदस्यांना आडनावाने जास्त हाक मारताहेत का? आधी बहुतेकांना नावानेच संबोधायचे. आता उलट आहे.

सुरुवातीचे काही कच्चे खेळाडू गेल्यानंतर आता आपला नंबर लागू शकतो याचा मानेंना अंदाज आहे..... तश्या त्यांना हिंट्सही मिळतायत त्यामुळे मग नामुष्की टाळण्यासाठी "आता मांजरेकरांवर टिका करा" आणि मग विक्टिम कार्ड खेळा....मी बोललो म्हणून मला काढले असा कांगावा करायला मोकळे ..... एकंदरीत किरण माने या माणसाबद्दल जे ऐकलेले त्याला साजेसेच आहे हे Wink
मागच्याच चावडीनंतरच्या पोस्टमध्ये लिहलेले की मांजरेकरांची वट कमी झालीय..... he need to pull his socks Wink आता मांजरेकर कसे रिॲक्ट होतायत हे बघणे इंटरेस्टींग असेल.
बिगबॉसची टीम जर हुशार असेल तर त्यांना बाहेर न काढता आतल्या आत चरफडत ठेवेल आणि जास्तीत जास्त चुका करायला भाग पाडेल!!

पाहिले कालचे. मानेने पंगा घेतला असला तरी तो दाखवायचा/ न दाखवायचा, किती दाखवायचा हे बिबॉ ठरवणार, त्यांनी ते दाखवले म्हणाजे त्यांना हवाच आहे ड्रामा.
लगेच काढतील की कसे ते कळेलच. पण मी त्यांच्या जागी असते तर नक्की त्यांना ठेवले असते ड्रामासाठी, आणि त्रिशूल किंवा अमृता देशमुख ला काढले असते.
मला ते एन्टरटेनमेन्ट टास्क्स फार बोअर होतात. त्यातून फक्त हे सो कॉल्ड कलाकार किती सुमार अ‍ॅक्टर्स आहेत तेवढे कळते!! Happy वाटते कोण का घेत असेल या लोकांना सिरियल्स मधे. लुक्सच्याबाबतीत पण आनंदच Happy ते कोण पाहुणे आले होते तेही कसले एकेक मिळमिळीत!
तरी काल त्यातल्या त्यात दोन्ही अमृता नी चांगली केली मिमिक्री. प्रसाद असह्य झाला. अपूर्वा ही एन्टरटेनेमेन्ट करते आहे.

ड्रामा हवाच आहे त्यांना. अजूनही मी बघितलं नाहीच, पहाटेपर्यन्त वुटवर नवीन एपि आला नव्हता.

खरंतर म मां नी मानेना पण हिंटस दिल्या की, तुझी प्रतिमा उजळव, कशासाठी तू आला आहेस वगैरे.

ते host असल्याने फ्रेंडशिप असेल तरी अरे तुरे करू नये असं पर्सनल मत पण हे मागे रेशम पण करायची, अरे महेश, अरे महेश म्हणायची.

यावेळी उलट मानेना काढायचे नाहीत, त्यांना सहानुभुती मिळेल. त्यातून योगेशने तर प्रॉपर्टी तोडली, ती ही टास्कमध्ये नाही, त्याला ठेऊन यांना काढलं तर काही खरं नाही. मराठेला काढायला हवं यावेळी, काही करत नाही.

माने पुढे राजकारणात नक्की येणार, खुर्चीवर बसून डोकं चालवतात.

मानेंनी खेळापेक्षा याचाच जास्त अभ्यास केलेला दिसतो.म्हणून बघ्याची भूमिका घेणार आहे, अस सारख म्हणतात.
कारण सिझन 2 मध्ये सुद्धा किशोरी शहाणेला सिंपथी मिळवून देताना त्यांच्या कमेंट्समध्ये साधारण ममांच्या चावडीवर ताशेरे जास्त असायचे.
सिझन1 आणि 2 मधील काही कलाकारसुध्दा नंतर बा हेर येऊन ममांच्या विरोधात बोलले होते.माने येण्याआधी यांपैकीच कोणालातरी भेटून ,माहिती काढून आल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्या कलाकारांना जे घरात बोलता आल नाही,ते माने प्रत्यक्ष आत येऊन बोलत आहेत.

त्या मेघाने एलिमिनेशन नंतर बरेच काय काय खुलासे केलेत. योगेश खूप वाईट भाषेत बोलतो , हातवारे करतो वगैरे. एका भांडणात तिला एकदा म्हणाला की भिकारी कोणाला म्हणता, अमूक तमूक पैसे देऊन नाचायला बोलवेन तुम्हाला असे काहीतरी. अजून एक कमेन्ट तर त्याहून वाईट होती.
त्याचा रागावर ताबा नाही हे दिसतेच.

अर्धाच भाग बघितला. तेजु आणि सर्व भांडण होते तेव्हापासून. मग फडणवीस मॅडम आल्या आणि नंतर नाचगाणी होती, ती म्युट केली. फक्त विकास अपुर्वा डान्स एन्जॉय केला बाकी काहीच आवडलं नाही. नंतर अमृता फडणवीस स्तोत्र म्हणत होत्या ते फक्त ऐकलं, फार काही सुरेल वाटलं नाही. परत म्युट केला, त्यांचं गाणं ऐकलं नाही, मला कधी कधी त्यांचा आवाज आवडतो, कधी कधी अजिबातच आवडत नाही .

समृद्धी त्या मराठे बरोबर अगदी बघवत नाही, ती दिसायला छान आहे एवढंच, स्मिता टास्क खेळायची, स्वयंपाक छान करायची, हिच्यात बाकी काही गुण वाटत नाहीत.

प्रसादला अजिबातच आज नाचता येत नव्हतं आणि अक्षय तोंड किती उघडं ठेवतो (प्रसादने त्याची अ‍ॅक्टींग केली तेव्हा तेच हायलाईट केलेलं) , तो बेटर नाचला प्रसादपेक्षा पण फार काही नाही. दोघांचं डेरींग, अ मॅमना वर स्टेजवर नाचायला घेऊन गेले, धन्य आहेत. तेजस्वीनीचा एकटीचा डान्स हवा होता.

यावेळी खरंच मराठेला बाहेर काढा.

काय फालतु चाल्लेत मराठी बिबॉ एपिसोड्स, शून्य टॅलेन्ट असलेल्या लोकांना सारखे काय विविध गुणदर्शन करायला लावतात ? एकाला नाचता येत नाही कि अ‍ॅक्टिंग येत नाही Uhoh

बघितलं एकदाचं माने व्याख्यान, भारीच. कालचे माने विकास सर्वच सीन्स बघितले वुट वर. आधीच्या काही सीन्स मधे मांजरेकरना सर म्हणत होते, त्या सीनमधे मात्र अरे तुरे केलं.

माने बिनधास्त आहे असं दिसतंय, काढलं तर काढूदे, ठेवलं तर ठेवा. प्रतिमा वगैरे सुधारायला आलेला वाटत नाहीये. खुर्चीसम्राट आहे, त्याला भक्त पण करेक्ट मिळालाय. जोडगोळीला सध्या तरी ठेवतील बहुतेक.

कॉन्ट्रोव्हर्सी असलेल्यांना ती करायलाच आणतात बिग बॉस .

बिबॉस आहे की डान्स रिअँलिटी शो चालू आहे तेच समजत नाही.
सारखे डान्स,मिमिक्री, दुसर्या बद्दल मत देण हे च चालू आहे,नॉमिनेशनमध्ये ,चावडीवर,घरात.तेच तेच.
कंटाळा आला.एक ग्रुप धड नाही. 14नको ,7 आठवड्यांच करा आणि संपवा.

आज कळेल, कसलं प्रमोशन ते. काल केलं असेल असं वाटत नाही, मी म्युट करुन ठेवलेला टीव्ही पण प्रमोशन काल कसलं दिसलं नाही.

थोडा अभ्यास करुन आलेल्या की काय किंवा टीमने सांगितलं असेल असं असं. रीक्षा बघून यशश्री आणि अक्षयशी जवळचे नातं आहे याचं म्हणाल्या. ती स्वत: रिक्षा चालवते आणि अक्षयचे बाबा चालवतात म्हणून म्हणाल्या बहुतेक.

अरे दोन तीन दिवस अज्जिबातच पोस्ट नाहीत इकडे.... लोकांनी बघायचे सोडले का?
मी आज बघितले गेले दोन तीन एपिसोडस..... कालचा शॉपिंग मॉलवाला टास्क नवा वाटला पण काहीच क्रिएटिव्हिटी नाही दाखवली खेळणाऱ्यांनी ..... संचालकालाही ओरडा बसेल बहुतेक फेव्हरीझम केल्यामुळे!!
बाकी अक्षय आणि अमृताच्या जवळीकीमुळे प्रसादची फार चिडचिड होतीय आणि त्या अक्षयला कसले चिडवतायत त्याचे ग्रूपवाले अमृतावरुन..... अपूर्वाने काय ॲप्ट गाणी म्हणलीयत अक्षयला चिडवताना Wink
अपुर्वाने खेळ बराच सुधारलाय, तिचा मीपणा जात नाही अजुन पण तरी बरीच सुसह्य वाटतीय सध्या!
अमृताने सूत्रसंचालन आणि अमृता धोंगडेची नक्कल मस्त केली Happy
प्रसादला हार पचवता येत नाही असे दिसतेय.... उठसुठ ब्लेमगेम सुरु करतो
योगेश आणि तेजूचे काहीतरी भलतेच सुरु आहे आणि त्यामुळे अमृता भयंकर इनसिक्युअर झालीय
माने आणि विकासमध्ये काही फरक पडत नाहिये
रोहीत, रुचिरा, यशश्री फारसे दिसलेच नाहीत या आठवड्यात!!

बहुतेक दिवाळी म्हणून काढणार नाहीत उद्या कुणाला Happy

कंटाळवाणे होत आहेत टास्क्स, अमृताने अनफेअर डिसिनन दिला सेकंड राउंड मधे .
तेजस्विनीची मॅनेक्वीन क्युट हिती, थिडी लिजा रे सारखी दिसत होती Happy
योगेशचे फ्लर्टिंग फार क्रीपी वाटते मला Uhoh

ममा चा ड्रेस डिझाईन कोण करतो ? बापरे किती भयानक ,,
चांगल्या ड्रेस chi ती हिरवी ओढणी घेऊन वाट लावली.

योगेशचे फ्लर्टिंग फार क्रीपी वाटते मला <<++१
तिलाही आवडत नाही असे वाटते.

Pages