Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे अति जोड्या लावल्या तर बोअर होईल अजून.

अक्षय तेजस्विनी आत्तातरी मस्करी सुरू होती, पुढे मुद्दाम करतील का ते माहिती नाही.

त्रिशूल समृद्धी फार ऑड वाटते मात्र.

प्रसाद अमृता चांगले फ्रेंडस असावेत.

अक्षय -तेजु नाही लावणार जोडी,अपूर्वा नाही होऊन देणार.काल छान डोक चालवून अधिकार मिळाल्यावर तेजू आणि अम्रता धोंगडेला एकमेकींशी बोलायच नाही ,अस ठरवल.
मानेंनी लगेच डोक चालवल की अपूर्वा शार्प आहे.त्या दोघींपासून हिला भीती आहे म्हणून ग्रुप तोडत आहे वगैरे वगैरे.

अपुर्वाने कॅप्टन्सी जिंकली असली तरी तेजस्विनीने सिंपथी मिळवलीय Happy
अपूर्वाने उलट त्या दोघींची दोस्ती जास्त हिट्ट आणि घट्ट केली Wink

मला तेजस्विनी-अमृता या दोघींची मैत्री आहे हेच माहित नव्हतं Proud
तसेही या न बोलणे शिक्षेला अर्थ नाही, थर्ड पर्सनला सांगूच शकतात एकमेकींच्या समोरच !
फ्लॅट चालाय सिझन !

हो ना, त्यांची काही फ्रेन्डशिप आहे हेच मला माहित नव्हते, दिसले नव्हते. तसेही एकमेकीशी बोलायचे नाही त्यात काय विशेष? ग्रुप सोबत बसून किंवा तिसर्‍यामार्फत बोलू शकतीलच की. कळलेच नाही या दोघी रडल्या कशाला!
अपूर्वा हुषार आहे. पण जरा अ‍ॅरोगन्स आहेच, आणि तिथे तिला सहज रुल करता येते आहे, सगळेच दबतायत तिला. स्वतःलाच राणी वगैरे म्हणते आहे Happy थोडे पॉझिटिव वागणे दाखवले तर जिंकण्याचे पोटेन्शियल आहे. ते तिने विकास ला मदत करून वगैरे दाखवायला सुरुवात ही केली आहे. बघू काही जमते का पुढे.
तेजस्विनी पॉजिटिव वाटली तरी काही आयडिआ , स्ट्रॅटेजी वगैरे सुचताना दिसत नाहीत टास्क्स मधे तिला . सरळधोपट खेळते. त्यामुळे काही मजा नाही.
काल योगेश चे वागणे पहाता बाहेर पडू शकतो लवकरच. मेघा पण फार अनॉयिंग वाटातेय. उगीच जोरजोरात आरडा ओरडा, हातवारे वगैरे.
बाकी जे काय दिसतंय त्यात एकूण गर्ल्सच डॉमिनेट करत आहेत, मेन या सीझन ला सपोर्टिंग कलाकार असल्यासारखे दिसताहेत Happy

मी ही अवाक झाले, ह्या दोघींची कधी मैत्री होती.

अक्षयने काल तेजुला बऱ्यापैकी अडवलं की (किंवा तेजुने अडवलं त्याला, पण फोकस होता दोघांवर), अक्षय दिसला नाही असं मांजरेकर का म्हणतायेत.

अक्षय, प्रसाद, समृद्धी आणि रुचिरा कडून अपेक्षा आहेत म्हणतायेत.

विकास पण दिसला की बऱ्याच गोष्टीत. त्याचं नाव नाही घेतलं.

धोंगडेचं बाथरूममधलं म्हणणं बरोबर होतं, पण बाकी जेव्हा बघितले तिला, ती भांडताना जास्त दिसली मला.

मेघा evict झाली अशा न्युज आहेत, बरं झालं, अति आरडाओरडा करत होती.

अपूर्वाचा मी पणा आणि प्रसादसाठी निगेटिव्ह बोलणं हे तिच्या विरोधात जाणार पण ती दुसरी येण्याची शक्यता आहे कारण सध्यातरी ती कंटेंट सर्वात जास्त देतेय.

विनिंग मटेरीयल अजुनही कोणी वाटत नाहीये, प्रसादला सपोर्ट असला तरी फार काही स्पार्क आहे त्याच्यात हे मलातरी दिसलं नाहीये.

बाय द वे ह्याला टी आर पी फारसा नाहीये म्हणतात पण ह्या प्रोग्रॅमला अ‍ॅडस खूप मिळतायेत, तेवढ्या शिव सिझनलाही नव्हत्या. मागच्यावर्षी मी चॅनेल्स सर्वच काढून टाकलेली त्यामुळे मला ते सांगता येणार नाही. यावर्षी टी व्हीवर बघून अ‍ॅडसचं मी लिहू शकते.

प्रसादला तरी कुठे सपोर्ट आहे ?
सध्या तरी कोणाचीच चर्चा दिसत नाहीये .
त्यातल्या त्यात माने, अपूर्वा इ. थोडाफार बझ क्रिएट करतात.

प्रसादला तरी कुठे सपोर्ट आहे ? >>> नसेल तर बरंच आहे. युट्युबवर काही बघितलं आणि खालच्या कमेंटस वाचल्या की प्रसाद, प्रसाद आणि अ दे करतात बरेच जण.

कालची चावडी म्हणजे फक्त "तू दिसत नाहीस" आणि "तू दिस" एव्हढेच होते Happy
उजवीकडे बघून शिक आणि डावीकडच्याच्या कानात सांग असले सल्ले Wink
यावेळचे बिगबॉस फारच मवाळ दिसतायत..... मालमत्तेचे नुकसान करुनही त्या योगेशला किती प्रेमाने समजावत होते; बिगबॉसना शायरी वगैरे करताना पहील्यांदाच बघितले Wink
आतले लोक आता मांजरेकरांना पण हलक्यात घ्यायला लागले आहेत असे वाटते. ते बोलत असताना स्वताचेच आपले आपले वाद काय सुरु करतात, एक विचारले की दुसरीच उत्तरे देत बसतात (थोडक्यात गुंडालायला बघतात) आणि चक्क माझ्यावऱ सरसकट टीका करताना तुम्ही हे अकाउंट केले, ते अकाउंट केले का वगैरे विचारतात Uhoh
मांजरेकर सर, You need to pull up your socks now!!

मांजरेकर सर, You need to pull up your socks now!!......एक नंबर.++++++
टीआरपी याचा चांगलाच वाढला आहे .तीनच्या घारात गेला आहे,अशी न्युज आहे.पहिल्या वीकमध्ये सपाटून मार खाल्ला होता,पण नंतर हळूहळू वाढायला लागला.
तिकडे हिंदीचा आता घसरायला सुरूवात झाली आहे.

मला वाटते की ममांची अपूर्वाशी काहीतरी खुन्नस असावी, आधी काहीतरी हिस्ट्री असेल म्हणून असेल आणि / किंवा त्या पहिल्या चावडी वर तिने उलट उत्तरे दिली म्हणून असेल. ती ही नेहमी "सर" न म्हणाता नेहमी अगदी ठासून "मांजरेकर" असे म्हणते. ती त्यांना फारसा रिस्पेक्ट देत नाही असे दिसते तिच्या बॉडी लँग्वेज मधे. आणि तेही मागच्या दोन वेळ तिला बोलले ते पूर्ण निगेटिव होते, ती घरात निगेटिव वाटली तरी कन्टेन्ट देतेच आहे. पण त्यांच्या लेखी नथिंग पॉजिटिव, नो थट्टा मस्करी इव्हन , जसे मीराशी करायचे - तसे काहीच नाही.
आणि काल तर एकदमच मुद्दाम इग्नोर केल्यासारखे वाटले. खरे तर या आठवड्यात तिने बरेच काही केले होते. कुछ तो है.

मेघा घाटगे बाहेर गेली
आतपण सगळ्यांनाच वाटत होते की दिवाळी आहे म्हणून गम्मत करत असतील पण बिगबॉसने या आठवड्यात तरी ती सूट दिली नाही

मेघा गेली ते बरं झालं. तसं मेघा, माने, देशमुख फार काही करत नाहीत.

आज शेवटी (मेघा जाण्याआधी) सगळे सगळ्यांशी गोड गोड होते .

अपुर्वा ठसकेबाज आहे, ठासून ठासून बोलते. दिसायला छान आहे, नऊवारी शोभत होती. मला आता पहील्याइतकी निगेटीव्ह वाटत नाही पण तोरा खूप आहे तिला, तो आवडत नाही.

तेजस्वीनी छान दिसत होती. मला तिचा ड्रेस आवडला.

उद्या तेजु आणि अ धों ला बिग बॉस शिक्षा देणार आहेत बहुतेक. दोघी एकमेकींशी बोलत होत्या.

प्रसाद, अ दे लवस्टोरी व्हावी अशी म मांची इच्छा दिसतेय.

मराठे समृद्धी ला पण काल चिडवत होते.

मेधा गेली,ते पटल नाही.आवडत नव्हती,पण टास्क खेळत होती.देशमुखपेक्षा नक्की दिसत होती
त्या देशमुखला बाहेर काढा आता.काही म्हणजे काहीच करत नाही.मागच्या आठवड्यात निदान भांडायला यशश्रीतरी होती,पण आता तीही त्यांच्याच ग्रुपमध्ये गेली.
खरतर तो ग्रुप आहे का,हाच प्रश्न आहे.
आज अपूर्वा" मी सर बिर कुणाला घाबरत नाही"
ट्रॉफी घालवणार ही आता कितीही चांगली खेळली तरी
मागच्या वेळी मिनलने असच काहीस बोलून टॉप 3 मधली पोझिशन घालवली होती.

यावेळी मराठे जाण्याचे चान्सेस जास्त वाटतात. फार काही करत नाही (समृद्धीच्या मागे असतो), ती देशमुखपण फार काही करत नाही पण पॉझिटीव्ह ग्रुपमधे आहे ती. लोकांनी प्रसाद ग्रुप पॉझिटीव्ह ठरवून टाकलाय आता. माने एका खुर्चीवर बसून काड्या तरी लावतात त्यामुळे त्यांना ठेवतील.

देशमुख ग्रुप बदलायचं म्हणत होती, अक्षय आणि ती भाजी निवडत होते तेव्हा रोहित आणि अपूर्वा चिडवत होते त्यांना, (अपूर्वाचे पंचेस भारी असतात हा, तिची निगेटिव्ह बाजूच पब्लिक धरून बसलंय, तिच्याकडे इतर गुणही आहेत पण तिचा मी मी पणा मला आवडत नाही), प्रसादला ती अक्षयबरोबर बोलत होती याचा राग आला, त्यांचं खरंच अफेअर आहे का.

लोकप्रियतेत इथे तेजस्विनी एक नंबर, दोनवर समृद्धी (ही काही करत नाही पण यंग पब्लिकला आवडते, वावर छान आहे), तीनवर प्रसाद .

अपूर्वा खाली गेलिय, ती करते काही ना काही तरी नंबरात नाही.

अमृता काल सॉर्टेड वाटली म्हणजे प्रसाद देत नाही भाव तर मग तिने सांगून सवरुन ग्रूप बदलायचे ठरवले.... त्यासाठी तिने दिलेली कारणे पण पटली..... प्रसाद कितीही जवळचा असला तरी त्याच्यावर डिपेंड राहू/भरवसा ठेवू शकत नाही असे म्हणाली (आणि एकंदर प्रसादचे वागणे बघता योग्यच आहे ते)..... प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी एक दोन जीवाभावाचे (तात्पुरते का होईना) लोक लागतात..... अमृता धोंगडे-तेजू आणि योगेशचा एक कोअर ग्रूप तयार झालेला बघता आणि प्रसादचे वागणे बघता तिने अक्षयला हाताशी धरायचे ठरवले असेल तर फारसे काही चूक नाही पण अक्षय जर अपुर्वाच्या ताटाखालीच राहिला तर मग अमृताचे अवघड आहे!!
पण प्रसाद मात्र पुरता इनसिक्युअर झालाय आता

अमृता धोंगडेने तू सेफ व्हायसाठी ग्रूप बदलतीयस असा आरोप करुन देशमुखचा निर्णय एकप्रकारे जस्टीफायच केला.... तेजू तश्यातही तिला समजावत होती ते आवडले

काल बिगबॉसने जोड्याच अश्या ठरवल्या होत्या की त्यांना हवे तेच लोक (अर्थात हेही नेहमीप्रमाणेच आहे) नॉमीनेट होतील Wink
अमृता किरणमुळे; त्रिशूल विकासामुळे आणि योगेश प्रसादमुळे नॉमीनेट झाला.
उघड नॉमीनेशन असल्यामुळे सुरुवातीला जाणाऱ्या जोड्या टोन सेट करतात पण त्याचबरोबर नॉमीनेट केलेल्यांच्या रडारवर येण्याचाही त्यांना धोका असतो.
सुरुवातीला जाणाऱ्यांनी उगाचच भारंभार सदस्यांची नावे घेऊन प्रत्येकावर चर्चा करत बसण्यापेक्षा (जी चूक किरण आणि अमृताने केली) एक दोनच नावे घेऊन फर्म स्टॅंड घेतला तर बाकीचे उगीच त्यांना टारगेट करण्याची शक्यता कमी असते Happy

उडत उडत बघितलं. प्रसाद प्रचंड डोक्यात जाणारा आहे. परसाद म्हटलं कोणी तर काय आकांडतांडव करण्यासारखं आहे?
बाकी अपूर्वा हल्ली आवडते. मांजरेकरांशी पंगा घेत असेल तर मग आणखीनच आवडेल ती.

हो मला पण अपूर्वा आवडते आहे. दुसरा ग्रुप खरं तर पॉजिटिव वगैरे काही नाहीये. ग्रुप असा नाहीच आहे अ‍ॅक्चुअली . कोणातच काही बाँडिंग नाहीये.
धोंगडे - तेजू ची मैत्री वगैरेसुद्धा जरा बळेच वाट्ते आहे मला.
ती टॉकरवडी अमृताला खरंच घरी पाठवायला पाहिजे.

मला तेजु आवडते, धोंगडे नाही फार आवडत. म मां तिचं कौतुक फार करतात असं वाटतं पण ती आरडाओरडा जास्त करते असं वाटतं मला.

अमृता देशमुखला काही करत नाही म्हंटल्यामुळे तिने गृप बदलून लव्ह ट्रायअँगल सुरु केला. अक्शय-प्रसाद खुन्नस अजुन वाढावी म्हणून मेकर्सने सांगितले असेल का ?
सध्या तेजु एकटी पॉझिटिव दिसतेय आणि बोलण्यात्/मुद्दे मांडण्यात अपूर्वा वाटते नं १.

आज मांजरेकरांवर अगदी अरेतुरेवर येऊन किरण माने यांनी केलेले आरोप पाहता,या आठवड्यात त्यांचाच नंबर लागेल अस दिसत आहे.
बाकी,कुठल्या जोडीला जज म्हणून ठेवल होत,काही स्पार्क तरी होता का?
बिबॉसने सांगितल ,यांनच निर्णय दिला.
कुठल्या टीमला जिंकवायच हे ही ठरलच असेल.
दुसरा ग्रुप तर नाहीच आहे.
माने आणि विकास त्यांच्यात नाहीच आहेत.
अम्रुताच प्रसादशी पटत नाही,हा कुठला ग्रुप.
पण ठीक आहे,असाही बिबॉस बघायला आवडला असता जिथे एकच अजूनतरी पक्का ग्रुप झाला आहे,पण टास्क मात्र रंगत नाहीत यांचे.कंटाळा येतो.
सिझन नक्की आठवत नाही,पण मेघा कि नेहा ,कुणीतरी हॉटेल टास्कच्यावेळी स्टार्स पळवले होते.
हँपनिंग काहीच नाही.बोअर होत.
अपूरवाने गेम बदलला आहे,अशीच खेळली तर बिगबॉस जिंकवेल,कारण सोमिवर अजूनही निगेटिव्ह इमेजच आहे.

आज काकु बोकया (कावेरी, राजवर्धन. भाग्य दिले तू मला सिरियलमधले आलेले) .

अ दे चमकली आज थोडीतरी. ग्रुप चेंज केल्याने दिसली मात्र. प्रसादची कॉमेंट्रि आवडली नाही जजेसना. गुलाबजाम चव दोघांची आवडली. अपूर्वा विरुद्ध अ धों मध्ये पहिल्या टास्क मध्ये अपूर्वाची टीम जिंकली. कडक बुंदी विशेषण लाडूवेळी प्रसाद अक्षयची जुंपलीच, देशमुखने अक्षयच्या बाजूने पंच छान मारला.

प्रसादला रिझल्ट ऐकून त्रास झाला. त्याने धोंगडेने अ‍ॅप्रन घातला नाही याचं देशमुखला दिलेलं उत्तर योग्य वाटलं मला पण त्याने काही फरक पडणार नव्हता, सुत्रसंचालनाचे मार्कस त्याने गमावले. मलाही देशमुख उजवी वाटली तिथे.

बाकी अ दे ने दुसऱ्या अमृताची अॅक्टिंग चांगली केली. धोंगडेने अपूर्वाची चांगली केली फक्त गबाळी वाटत होती त्यावेळी(फक्त इथेच वाटली, किचन टास्कमधे नाही, त्या टास्कमधे दोघी आपापल्या जागी योग्य होत्या) , प्रसादने माने अॅक्टिंग मस्त केली अक्षयची एवढी उठून नाही दिसली पण माने जबरी रंगवला त्याने, फक्त प्रसादने उभे केलेले माने सरांबद्दल असं बोलले असतील तर जाणार बाहेर. अपूर्वाने समृद्धीची छान केली. विकासने योगेशची छान केली फक्त तो वर का बघत होता, योगेश उंच असल्याने खाली बघून बोलतो ना.

एकंदरीत आज फन एपिसोड होता.

उद्या तिसरी अमृता येणार आहे (अमृता फडणवीस येणार आहेत) .

काय बोलले माने? Lol माने मला जेन्युअन वाटतात. आणि काही मनाला लावुन न घेता दिलखुलास वाटतात. तेच सगळ्यात जास्त मच्युअर्ड वाटतात.
अमृता फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची बायको? बिग बॉस शिवाय दुसरं काही वेळ घालवायला सापडलं नाही का त्याना? का येणार? का चक्रमपणा?

माने डायरेक्ट काय बोलले ते मी बघितलं नाही पण प्रसाद मानेंची अ‍ॅक्टींग करत होता त्यात त्याने माने यांची अ‍ॅक्टींग करताना सरांविरोधात विधान केलं, म्हणजे ते बोलत असावेत.

आज मांजरेकरांवर अगदी अरेतुरेवर येऊन किरण माने यांनी केलेले आरोप पाहता >>> हे मी बघितलं नाही पण अ‍ॅक्ट रायडर्स या युट्युबरचं आत्ता थोडं बघितलं, तिथे त्याने किरण माने यांनी आता येऊद्या त्याला मग विचारतो असं म मां बद्दल बोलल्याचं सांगितलं.

आत बाहेर करताना काही गोष्टी हुकतात माझ्या.

अन्जू, थॅक्यू!
अगदीच साधं बोलले की. की मलाच का दाखवतात इ. त्यात काय इतकं.

Pages