Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखी ने पैसे घेणं,रडणं,आई ने स्वप्नात येऊन सांगितलं म्हणे,सगळं सगळं किती किती खोट्ट.. >>> ते फिक्स असतं ना तिचं, मी बघितलं नाही पण लोकं लिहीत होते की ती पैशाची bag घेऊन जाते. तिला खरंतर नऊ लाख काहीच नाही पण शेवटपर्यन्त तिने मस्त अॅक्टिंग केली.

अन्जू...वूट वोटिंग म्हणजे ज्यात मेकर्स,चँनेल आणि कदाचित स्पॉन्सर्स यांनी हस्तक्षेप करून त्यांना हवा तसा लावलेला क्रम जो आपल्यासमोर कधीच येत नाही. >>> खरं आहे, थॅंक्स.

अक्षय केळकर, आडनावबंधु विनर झाला, वोटस जे काही थोडेफार दिले ते त्यालाच दिले होते, त्यामुळे ते वाया गेले नाहीत याचा आनंद झाला.

अभिनंदन अक्षय.

तेजु असती तर मी तुला वोटिंग केलं नसतं मात्र.

अक्षयने कंटेंट खूप दिलेला, तो कसाही असो, शेवटी 5 होते तेव्हा मला त्यातल्यात्यात तोच बरा वाटत होता, त्यामुळे वोटिंग त्यालाच केलं होतं.

मराठीत पहिल्यांदा कलर्सचा फेस जिंकला . त्याच्या बऱ्याच गोष्टी आवडल्या नव्हत्या त्या मी लिहिलेल्या इथे, आत्ता मात्र पाच जणांत तोच जिंकावा असं वाटत होतं.

बाकी यावेळी कोणीच विनर मटेरियल वाटत नव्हतं, तेजु आणि देशमुख गेल्यावर.

खरतर या सिझनच्या विनरची उत्सुकताच नव्हती.आधी सांगितल्याप्रमाणे कोणालाही उचलून दिली तरी चालेल असा सिझन झाला.अगदीच होपलेस.
कलर्सचे क्रिएटिव्ह हेड म्हणून निखिल सांनेंना परत आणाच आता.नाहीतर काही खर नाही चँनेलच.
पुढचा सिझन चांगला असो ही सदिच्छा.
बाकी या सिझनबद्दल काही बोलण्यासारखच नाही.
पब्लिक वोटिंग च तर वाभाड काढल.

आज अपूर्वाने साडी घातली होती तरी नेकलेस घातला नव्हता...तिला वाटले असेल तिला पु.ना. गाडगीळचा नेकलेस मिळेल... आणि अशाप्रकारे गर्वाचं घर खाली झालं..

बेकार सीझन संपला एकदाचा. अक्षय ला फारसा सपोर्ट पण दिसला नाही सोमिवर वगैरे. कसे ठरवले काय माहित.
अपूर्वाला बहुधा गर्विष्ठपणामुळे फटका बसला.
मला पण वाटले होते की तिने नेकलेस घातलेला नाही तर/कारण तिला पू ना गाडगिळांचा मिळणार Happy

मला असं वाटतं की प्रसाद, तेजा, देशमुख हे बिग बॉस ओटीटी मराठी सिझन येणार आहे, त्यात असतील, त्यांना तिथे पब्लिक सपोर्ट हवाच असणार, तो ह्या लोकांमुळे मिळेल. त्यामुळे इथून त्यांना लवकर एविक्ट केलं असावं.

आत्ता शेवटी पाच होते त्यांना तिथे अजिबात घ्यायचे नाहीत. मानेंनी शेवटी ते आरोहचं बिग बॉसशी अ‍ॅग्रिमेंट असेल, काढलं नसतं तर त्यांना विनर केलं असतं कदाचित.

म मांनी सांगून सांगून अक्षय positive झाला याचा त्याला फटका बसेल वाटलेले पण मेकर्सनी त्याला गिफ्ट दिलं त्याचं. चांगला वाग आणि तुझ्या कष्टाळू आईबाबांना सुखी कर हेच माझं सांगणं त्याला (मी ओळखत नाही त्याला).

बाकी त्या नेकलेसची योग्य जागा तेजूचा गळा होती हे मात्र मला राहून राहून वाटतंय. मला आज स्टेजवर ती का नाही हे वाटत होतं.

अक्षयला winner करण्याचं आधीच ठरले असेल बहुतेक कारण तो पब्लिक व्होटिंग नुसार winner नक्कीच झाला नसेल...डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी एक फेसबुक पोस्ट वाचली होती त्यात लिहिले होते की केळकर हा colors चे head दीपक राजाध्यक्ष आणि अजून एक नाव होतं ,त्यांचा नातेवाईक आहे म्हणून त्याला जिंकवतील.... अगदी खात्रीने सांगितले होते त्या पोस्ट मध्ये...नंतर मी खूप शोधली ती पोस्ट,पण पुन्हा दिसली नाही...खरंतर लास्ट 5 मध्ये मलाही अक्षयच योग्य वाटत होता अशी पोस्ट मी याआधी इथे पण केली आहे... पण अक्षय ज्याला nominate करायचा,तोच घराबाहेर जायचा...ticket to finale मध्ये अक्षयच्या बॉक्सची स्पेशल arrangement, म्हणजे त्याची slide फिट्ट बसवणे...जिथून धान्य पडत होते तिथे लाकूड अडकवलेले असणे हे पाहून वाटलं की फेसबुक वरची ती पोस्ट खरी असेल...पण अक्षयची AV पाहिल्यावर पुन्हा वाटलं की याला अजिबातच winner करणार नाहीत आणि आठवडाभर अक्षयच्या चेहर्‍यावर पण ते दिसत होतं...पण फायनली आज तो जिंकला...पण मला अपूर्वा आणि माने जिंकले नाहीत याचा आनंद झाला कारण अपूर्वाला ईतका गर्व आणि माज आहे की तिला जिंकवून बिग बॉसने तिच्या गर्वाला खतपाणी नाही घातले ते बरेच झाले...माने तर अतिशय बनेल ,नाटकी आणि मी कसा ग्रेट याच मोडमध्ये असतो..त्याची झलक त्याने स्टेज वर पण दाखवली..त्यामुळे अक्षय जिंकला तरी बरं वाटलं आणि याची कारणं माझ्या 2 जानेवारीच्या पोस्ट मध्ये आहेच..
बाकी देशमुखचं आजचं roast खूपच आवडलं...त्यावर यशश्रीची reaction बघितली का? Lol ..प्रसाद आणि आरोहचं स्किट पण भारी जमलं होतं...मजा आली...

देशमुखचं आजचं roast खूपच आवडलं. >>> धमाल होतं आणि ही का नाही फायनल पाच मध्ये, असं वाटलं. रमा आणि मामा बेस्ट होतं. गमतीचा भाग म्हणजे शेवटी रमाने जिंकवले आणि मामानी हरवले .

.प्रसाद आणि आरोहचं स्किट पण भारी जमलं होतं...मजा आली... >>> हो हो, काही पंचेस भारी होते .

बऱ्याच youtubers ना धान्य टास्क बघून अक्षय जिंकला असं वाटलं आणि ते अनफेअर वाटलं पण जेव्हा अपूर्वा जिंकली तेव्हा बिग बॉस फेअर खेळले असं वाटलं त्यांना वाटलं. अपूर्वाला चढवून उतरवले बहुतेक .

स्नेहलता नॉमीनेट झाली तेव्हा मला वाटलं अक्षयला कधी कधी बिग बॉस नावं सांगतात का हिला काढायचे आहे नॉमीनेट कर.

रोहित रुचिरा नव्हते आलेले, मला वाईट वाटतं त्यांच्यासाठी. जे आधीपासूनच कपल आहेत त्यांनी अशा शो त येऊ नये .

शेवटी सगळेच व्हिलन वाटणारे होते त्यामुळे म मां चे ऐकून माज आणि aggression कमी केलेला (कदाचित बिग बॉस टिप्स पण देत असतील) अक्षय जिंकला हे मलातरी बरं वाटलं.

बाकी बेस्ट कॅप्टन वगैरे मला अति वाटलं, मी वोटिंग केलं नव्हतं . कदाचित त्याने तो नॉमिनेशन टास्क फेअर खेळला म्हणून असेल, त्याचे पाच लाख आणि हिरा ब्रेसलेट किंवा दहा लाख मिळणार. अक्षय नुसता जिंकला नाही तर आत्तापर्यन्तच्या सीझनमध्ये गिफ्ट्स सर्वात जास्त त्याला मिळाली. पिअर्सचे अपूर्वाला मिळालं.

त्यात आत बरेचदा छोटे छोटे प्रमोशनल टास्कस असायचे तेव्हा अक्षय अपूर्वा टीमच जिंकायची. कधी पंधरा हजार, कधी वीस हजार असे तेव्हाही मिळायचे त्यांना.

यावेळी मला माने किंवा अपूर्वा जिंकतील असंच वाटत होतं, सो मि वर टॉप 2 वोटिंग ह्यांना होतं, असं सांगत होते. त्यामुळे कालपासून ह्या दोघांची नावं विनर म्हणून येत होती, ती बिग बॉसनेच पसरवली असावीत.

कालच्या फिनँलेमध्ये यशश्री,तेजू,स्नेहलता,त्रिशुल ,निखिल यांचे परफॉरमन्सेस नव्हते.रोहित रुचिराने काहीही झाल तरी यायला हवच होत,प्रोफँश्नँलिझम नावाची गोष्ट असतेच.
अक्षय विनर होऊनही त्याच सोमिवर फार अँप्रिशिएशन होत नाही,,कारणही तसच आहे,एकतर वोट्स कमी म्हणून त्याला फार नॉमिनेशन मध्ये आणल नाही,तो नॉमिनेट करत असलेल्याला बाहेर काढल,अँग्रेसिव्हपणा,ममांना दुरुत्तर यावरून ममांकडून टिप्स देऊन सज्जन बनवल आणि मग तो स्वत:च सांगायला लागला की सज्जन लोकच जिंकतात,अपूर्वाच्या ममामांना कदाचित वेल प्लँन करून त्याच्याविरोधात गरज नसताना तिला टिप्स दिल्या आणि मामा कसे चुकीचे हे दाखवल.
वोट्समध्ये दादा असलेल्यांना बाहेर काढल,तेजूलाही काढलच.
कॉम्पिटिशन त्याच्याच ग्रुपमधल्यांबरोबर राहिल याची काळजी घेतली.
यावेळी तसेही कोणी डिझर्हिंग नसल्याने कलर्सचाच फेस जिंकवूया हे बिबॉसच आधीच ठरल असाव.म्हणून त्यालाच विनर केल.
पुढच्या सिझनच एकंदरीत कठीण आहे.

आता परत ओटीटी कशाला ? बून्द से गयी सो हौदसे नही आती Happy
त्यात परत तेच वरण भात लोकं आणली तर ओटीटीचा काय उपयोग, तिथे सेन्सॉरची कात्री नसते त्यामुळे थोडे जास्तं बिन्धास्त, इमेजची चिन्ता नसणारे , काँट्रोव्हर्शिअल, अ‍ॅडल्ट कन्टेन्ट देऊ शकणारे लोक आणतात, या सिझनचे कोणी एलिजिबल नाही !

एकंदरीत हा सिझन बिबॉ ने आणि प्रेक्षकांनी कसाबसा रेटला.
कोणीच विजेता होण्याच्या पात्रतेचे वाटले नाहीत.
अक्षय ला जिंकवण्यासाठी प्लॅन केला असं सगळीकडे म्हणत आहेत बाहेर. कमीत कमी वेळा नॉमिनेट झालेला सदस्य. इमेज सुधरवण्यासाठी त्याला खुप टीप्स मिळाल्या.
अपूर्वाच्या ममामांना कदाचित वेल प्लँन करून त्याच्याविरोधात गरज नसताना तिला टिप्स दिल्या आणि मामा कसे चुकीचे हे दाखवल. >> मागे पण मी हेच लिहिलं होतं की बहुतेक बिबॉ ने मुद्दाम अपुर्वा च्या मामा ना तसे बोलायला लावले. कारण बाकी कोणाचेच फॅमिली मेंबर ने कोणालाही अशा काही टीप्स दिल्या नव्हत्या. अक्षय ला पब्लिक चा सॉफ्ट कॉर्नर मिळावा म्हणुन उगीच त्याच्या विरुद्ध काहीतरी स्टेटमेंट केलं.
पण असो. अक्षय च्या आई आणि बहिणीसाठी ही ट्रॉफी पैसे ई गेले असं आपण आपलं समाधान करुन घेउ. त्या दोघी एकदम गोड होत्या. मला खुप आवडल्या होत्या.
कालचा एपिसोड फक्त शेवटी पाहिला. देश्मुख ने नक्की काय रोस्ट सेशन केलं ते आज बघेन आता.
माने जिंकले नाहीत यातच मला आनंद आहे. त्यांच्या चेहेर्‍यावरुन आणि गरागरा १८० अंशात फिरणार्‍या डोळ्यातुन ते खुप आतल्या गाठीचे वाटायचे मला. विकास ला त्रास दिला, नंतर राखी चा आधार घेउन फालतुपणा केला. फक्त भाषेवर हुकुमत या गुणामुळे फुल बोलबच्चन गिरी केली.

अपूर्वा, माने, राखी इतकेच काय धोंगडे जिंकली असती तरी ठिक होते. तो अक्षय कुठल्याही ऍंगलने विनर नाही वाटतय. त्याच्या स्वतच्या डोळ्यात भाव असे आहेत की मी कसा काय?
राखीने शेवटी पण धमाल केलीये. तीचा जो कोणी प्रोफेशनल सल्लागार आहे, ती फर्म कलर्स बरोबर सॉलिड कॉन्ट्रॅक्ट केले असणारे.

गरागरा १८० अंशात फिरणार्‍या डोळ्यातुन ते खुप आतल्या गाठीचे वाटायचे मला. >>>अगदीच...मलाही त्यांचं मान न हलवता आजुबाजूला पाहणं अज्जिबातच आवडत नव्हतं...

कसंही करुन यंदा त्यांना कलर्सचा फेस जिंकवायचा असेल. मागे पाच आणि दोनदा तीन नं वर कलर्स फेसेस होते ना.

मला या पाच जणांत अक्षय जिंकावा असंच वाटत होतं मात्र . तो जिंकेल असं मात्र वाटत नव्हतं.

तसंही हिंदीबरोबर मराठी आणला आणि फार कोणी ग्रेट आणले नाहीत त्यामुळे मेकर्सनी प्रेक्षकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ट्विस्ट ट्विस्ट करत शेवटून पहिल्याला जिंकवले.

अपूर्वा मी खरी, मी अशी तशी करत आई आणि मामा काही बोलले नव्हते म्हणाली तिथेच उघडी पडली. तसंही अक्षयने पाठीत खंजीर खुपसला असं काही आपल्याला तरी दाखवलं नाही, गेममध्ये मी तुलाही नॉमीनेट करेन हे त्याने वारंवार तोंडावर सांगितलं होतं. तसं त्याने केलं .

असो सगळ्या व्हिलन मध्ये जरातरी सुधार दाखवणारा अक्षयच बरा वाटला मला. यावर्षी सगळ्यात डिजरविंग त्यातल्यात्यात तेजु होती असं मला अजूनही वाटतं .

एखाद्या वेळेस अक्षयला हिंदीत कामं मिळत असताना, इथे आणून तुला टॉप 2 मध्ये नेऊ असंही सांगितलं असेल, आतले आपल्याला कुठे माहिती असतं.

बरं माज, अ‍ॅग्रेशन दाखवत होता तेव्हा प्रेक्षक म्हणायचे की हा host चे ऐकत नाही, शांत झाला तेव्हा फेक वागतो म्हणायचे त्याला, मग त्याने वागायचं कसं. मलाही उगाच शांत झाला असं वाटलेलं पण फायनली जिंकवला त्याला टीप्स देऊन का होईना.

आता रीक्षावाल्याचा मुलगा म्हणून जिंकला असं म्हणतायेत बरेच जण, पुढे मु मं शी ही संबंध जोडतील, हाहाहा कारण ते पुर्वी रीक्षा चालवायचे ना. एवढा मोठा वशिला असता तर सो मि वर एक नं वोटस नसते का त्याला.

या सगळ्यात मला कलर्सचा फेस म्हणून जिंकला असं वाटतं.

बाकी प्रसादला काढल्यावर trp प्रचंड खाली आलेला म्हणून फिनालेवर फार खर्च केला नाही बिग बॉसने .

प्रिमियर आणि एक दोन एपिसोडस बघितले त्यावरूनचे माझे बनलेले प्रथमदर्शनी मत:
प्रसाद जवादे ज्याप्रकारे घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करत होता आणि त्यांचे काम पाहिल्याचे आवर्जून सांगत होता (एरवी हे सेलिब्रेटी लोक अश्या बाबतीत जरा शिष्ठपणा करतात) ते बघता तो आवडत्यांच्या यादीत जाणार असे वाटत होते पण पहील्या एपिसोडमध्ये तो डोक्यात गेला; नॉमिनेट झाल्यावर त्याचा अगदीच सूर हरवल्यासारखा वाटत होता पण काल परत भलताच फॉर्मात आला गडी..... शेवटपर्यंत टिकण्याचे पोटेंशियल आहे..... त्याच्या सो कॉलड ॲरोगन्समध्येही एक खट्याळपणा आहे.... मुद्दे मांडताना गंडतोय तो पण इतरवेळा क्विक विटेड वाटला Happy
एंट्रीवरुन तो अक्षय पुढे जाऊन आवडेल असे वाटलेले पण एकंदर अजुनतरी फुसका बार वाटतोय.... काल त्या रोहितने त्याला ज्याप्रकारे लॉक करुन ठेवलेले ते बघता त्याचा शक्तीवाल्या टास्कमध्येही फारसा काही उपयोग नाही असे दिसतेय.
निखिल प्रिमियरला फारसा आवडला नव्हता..... एपिसोडभर फक्त आलेल्या पाहुण्यांना पाटी लावण्याची आठवण करुन देताना दिसला पण त्याने ज्या प्रकारे मेघा घाडगे चा मामा बनवला आणि कालपण त्या काउंटवाल्या मुद्द्यावरुन चक्क अपूर्वाला गप्प केले ते बघता डोकेबाज आहे आणि पुढेपर्यंत जाईल
योगेश एक उंची सोडली तर विशाल आणि शिवच्या साच्यातून काढल्यासारखा वाटतोय; थोडासा ग्रामीण बाजाचा; रांगडा पण भाऊक गडी पण त्याची ताकद आणि फायटर इमेज त्याच्याविरोधात जाऊ शकते कारण अश्यावेळी लोकांची सहानुभूती समोरच्याला मिळते.
विकास सावंत फार काळ टिकेल असे वाटत नाही शोमध्ये; जरा चुरस सुरु होताच हे आतले लोक वेगवेगळी कारणे देत त्याला नॉमिनेट करत राहतील असा अंदाज आहे.
त्रिशूल मराठे सरप्राईज पॅकेज ठरु शकतो पण आत्तातरी तो आवडत्या/नावडत्या कुठल्याच लिस्टमध्ये नाही आहे.
किरण माने यांच्याबद्दल साताऱ्यातल्या मित्रमंडळींकडून फार काही बरे ऐकलेले नाहीये; मध्ये एका कुठल्याश्या सिरीअलमध्ये बरीच कोंट्रोवर्सी पण झालेली म्हणे यांच्या सहकलाकारांशी एकूण वर्तणूकीवरुन तर ती इमेज बदलायची एक चांगली संधी त्यांच्याकडे आहे; बघू ते त्याचा किती लाभ घेवू शकतात ते!
तो रोहित शिंदे प्रिमियरला अज्जिबात आवडला नाही (डंब वाटला) आणि काय फिल्मी उत्तरे देत होता. त्याची आणि रुचिराची केमिस्ट्री फक्त डान्समध्ये दिसली आणि तो फेव्हऱिट थिंग्स वाला टास्क घेऊन मांजरेकरांनी त्या केमिस्ट्रीतली हवाच काढून घेतली Wink
रुचिरा मात्र त्यामानाने स्मार्ट उत्तरे देत होती मांजरेकरांना आणि काल तिने त्या केकचे प्रेझेंटेशनही अतिशय स्मार्टली दिले अपूर्वाला त्यामुळे ती आवडत्या स्पर्धकांच्या लिस्टमध्ये जाऊन बसली.
अमृता देशमुख आवडली; आत्तापर्यंत फारशी चमकली नसली तरी तिचा वावर सकारात्मक वाटला Happy
यशश्री प्रिमियरला फारशी आवडली नव्हती पण कालच्या एपिसोडमध्ये ती एकदम मजेशीर वाटली...... she is adding much needed fun element in otherwise annoying environment.
अपूर्वा पुऱ्या तयारीने आलेली दिसतेय (अगदी attitude दाखवणारे टीशर्ट वगैरे घेउन).... तिने दोन दिवस भरपूर कचकच केली पण असे लोक लागतात शेवटपर्यंत बिगबॉसला (जरी त्यांना जिंकवत नसले तरी)
तिने हाच टेंपो कायम ठेवला तर फिनालेपर्यंत जाईल.
मेघा घाटगे मागच्या सीझनच्या सुरेखाताईंचा वारसा चालवणार असे दिसतेय
बाकी महिला मंडळ (अमृता धोंगडे, समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारे) आतापर्यंतच्या एपिसोडमध्ये पुरेश्या प्रकाशझोतात आलेल्या नाहियेत त्यामुळे त्यांचाबदल विशेष अशी काही मते बनलेली नाहीत!!

अर्थात पहील्या आठवड्यात बनलेली मते आणि बांधलेले आडाखे सीझन जसाजसा पुढे सरकू लागतो तसेतसे बहुतांशी बदलत जातात हा गेल्या काही सीझनचा अनुभव आहेच!

बाकी यावेळही बिग बॉसचे घर नेहमीसारखेच आधीच्या सीझनपेक्षा वरचढ आहे.
बिग बॉसच्या आवाजमध्ये प्रत्येक सीझनला व्हेरिएशन्स नकोत; त्या आवाजात एक कन्सिस्टंसी हवीच!
काय करायचे ते व्हेरिएशन फॉर्मेट मध्ये आणि टास्क मध्ये करा.... तिथे तोचतोचपणा नको

बाकी मांजरेकरांवर वीकेंडच्या चावडीनंतरच बोलू!!

Submitted by स्वरुप on 6 October, 2022 - 12:09

>> ही माझी या धाग्यावरची पहिली पोस्ट.... आज परत मागे जाऊन वाचताना मजा येतेय Happy

काल फिनाले होता हे चक्क विसरुन गेलेलो..... सहज चॅनेल बदलता बदलता कलर्सवर पोहचलो तेंव्हा आरोह आणि प्रसादचे स्कीट चालू होते!!
तिथून पुढे बघितले!!
प्रेक्षकात बसून धोंगडेचा "आपण Top 5 मध्ये होतो म्हणजे जिंकलोच आहे" हा आणि मानेंचा बाहेर आल्यावर अक्षय आणि अपूर्वाला उद्देशून "आपण आधीच एकत्र आलो असतो तर बाकीच्यांचे पत्ते आधीच कटले असते" आणि एकदा आलेला बाकी सगळ्यांना हरवल्याचा उल्लेख बघून सीझन बघायचा सोडल्यापासून फारसे काही बदलले नसल्याचे लक्षात आले Wink
माने स्टेजवरुन खाली आल्यावर जेंव्हा सगळ्यांना भेटत होते तेंव्हा अमृता देशमुखने त्यांना अगदीच कोल्ड शोल्डर दिल्याचे जाणवले..... अजुन कुणाला वाटले का तसे?

मांजरेकर एकदा ब्रेकवर जायच्या आधी म्हंटले की आपल्याला कळेलच की "सीझन फोर'ची' विनर कोण असेल" त्यावरुन वाटलेले की बहुतेक अपुर्वा जिंकेल पण फायनली अक्षय जिंकला Happy
अपूर्वाने जरा फुकटचा माज आणि मीपणा कमी केला असता तर (बाकी सगळे डिझर्व्हिंग लोक बाहेर काढल्यावर) तिचे चांगले चान्सेस होते जिंकायचे!!
जेव्हढा बघितला त्यावरुन यावेळचा फिनाले मिळमिळीत आणि लो बजेट वाटला.... इथे पण मेकर्सनी पाट्या टाकलेल्या दिसतायत Wink

जेव्हढा बघितला त्यावरुन यावेळचा फिनाले मिळमिळीत आणि लो बजेट वाटला.... इथे पण मेकर्सनी पाट्या टाकलेल्या दिसतायत >>> हाहाहा, खरोखर.

राखीला सर्व माहिती होतं असं वाटतं, ती आल्यापासून अक्षयला तू आहेस नक्की पाचात, असं सांगत होती. अपूर्वाला तुझी ट्रॉफी गेली आता असं वाटतं का असं विचारल्यावर, अपूर्वा म्हणाली अजिबात नाही पण ट्रॉफी खरंच गेली तिची. शेवटी तिने प्रसाद पाचात नसेल सांगितलं आणि त्याच दिवशी प्रसाद गेला. काल तिने भाऊ बहीण पुढे जातील आणि माने या तुम्ही बाहेर म्हटलं, लगेच झालं.

देशमुख मात्र बाहेर सर्व बघूनही अक्षय जिंकेल यावर ठाम राहिली, ती आणि अक्षय खरंच चांगले फ्रेंडस झालेले आत .

म मांनी अनेकदा सांगितलं की अपूर्वा अक्षय दिसतायेत लीडर आणि तुम्ही followers आहात तरी यशश्री, समु, रोहित रुचिराने एकत्र तिसरा grp करायचे ठोस आणि ठाम प्रयत्न केले नाहीत.

अपूर्वा प्रसादला शेवटी मदत करून फिनालेला पोचवायचा बिग बॉसचा plan बहुतेक राखीतर्फे एक्झिक्युट करुन तिला हरबऱ्याच्या झाडावर चढवले आणि ती नंतर शेवटी गर्वाने फुलली, मग स्टेजवर तिचं गर्वाचे घर खाली केलं बिग बॉसने, विशाल फिनालेत जाऊन जिंकला तसं तिला वाटलेलं.

फिनाले पाहिला काल.
इथे पण राखीनेच गाजवला. राखीचे ९ लाख घेउन बाहेर पडण्याचा सीन च जवळजवळ तासभर चालला असेल. शेवटच्या मिनिटापर्यंत राखीने जीव लावुन मनोरंजन केले प्रेक्षकांचे .. माने ना म्हणाली घ्या की पैसे तुमच्यावर इतके कर्ज आहे.. हा हा हा... सगळ्यांना पैसे घ्या पैसे घ्या म्हणत होती. नंतर मग आईचा आत्मा आलेला आणि काय काय....
देश्मुख चे रोस्ट आवडले. खरच मस्त लिहिले होते. माने आणि यशश्री सोडुन बाकिच्यांनी स्पोर्टींगली घेतले. माने आणि यश ला आलेला राग चेहेर्‍यावर दिसला.
प्रसाद आणि आरोह चे स्किट ठीकठाक. ते पण देश्मुख कडुन लिहुन घ्यायला पाहिजे होते. अजुन छान झाले असते. आरोह चा गेटअप म्हातार्याचा पण आवाज तरुन होता. त्याच्यापेक्षा प्रसाद ने जास्त छान केले स्किट. गेटअप आणि आवाज दोन्ही मस्त. छान बेअरींग पकडले होते.
धोंगडे ला मनातुन माहित होतं की ती नाही जिंकणार असं ती बाहेर पडताना वाटलं. एरवी येता जाता रडते पण काल अजिबात रडु येत नाही म्हणाली. मग मनी बॅग का नाही घेतली तिने. ९ लाख खुप होते. कि बिबॉ ने सक्त ताकीद दिली होती की नाही घ्यायचे पैसे.हे पण स्क्रीप्टेड असेल का ? म्हणून राखीलाच घेउ दिले पैसे बाकीच्याना नाही.
बाकी डान्स वगैरे बोअर. ते अक्षय ला बेस्ट कॅप्ट्न चे पाच लाख मिळाले असं लोक म्हणतात ते कधी दाखवलं ? मला वूट वर नाही दिसलं.
असो. संपला एकदाचा बिबॉ. आता मी रोज रात्री टीव्ही बघणार नाही म्हणुन नवरा खुश आहे Wink

आता मी रोज रात्री टीव्ही बघणार नाही म्हणुन नवरा खुश आहे >>> हाहाहा, हे आवडलं. आमचा टीव्हीही बंद होता त्यावेळी, मग मला एकदम आठवलं, हॉटस्टारवर गुम है किसिके बघितली नाहीये बरेच दिवस, तशी बोअर आहे, मधे सोडून दिलेली अनेक महीने. आता वीस मिनिटांचा एपिसोड पाच मिनिटांत बघता येतो ओटीटीवर, उड्या मारत हवा तो सीन बघायचा, असे तीन एपिसोड पंधरा मिनिटांत संपवले, मास्टरशेफ बघायला हवं पण ते नऊ वाजता असतं.

ते अक्षय ला बेस्ट कॅप्ट्न चे पाच लाख मिळाले असं लोक म्हणतात ते कधी दाखवलं ? मला वूट वर नाही दिसलं. >>> ते दोघे अ स्टेजवर आले तेव्हा म मां नी आधी पिअर्सचं अपुर्वाला गिफ्ट हँपर दिलं, त्यानंतर बेस्ट कॅप्टन अक्षयला दिलं, बहुतेक कॅप्टन असून अपुर्वा आणि स्नेहलताला नॉमिनेट केलं म्हणून असेल, फेअर होता तो. त्या दोघींनी आपले मुद्दे नीट मांडलेच नव्हते. स्नेहलता गेली त्या विकमधे, बिग बॉसला काढायचीच होती. नशीब ती देशमुख बाहेर पडली तेव्हा प्रसादने तिला नॉमिनेट केलेलं, नाहीतर अक्षयला शिव्या दिल्या असत्या तिच्या फॅन्सनी आणि त्यामुळेच देशमुख फार लॉयल राहीली मैत्रीत, शेवटी तो जिंकावा असं सांगितलं तिने.

प्रसाद गेल्यावर बहुसंख्य fans नी कोणालाही ट्रॉफी मिळूदे आता, आम्हाला काही नाही, विनर प्रसाद म्हटलं आणि आता अक्षय जिंकला तर राग व्यक्त करतायेत. एका कोणीतरी ही कमेंट खाली लिहिली ती वाचलेली मला पटली.

देशमुख बाहेर पडल्यावर प्रसाद fans आनंद व्यक्त करत होते तेव्हा अॅक्ट रायडर्स म्हणाला होता की असा आनंद व्यक्त करू नका, उद्या प्रसादलाही काढू शकतात, तसं झालं.

https://www.youtube.com/watch?v=-4orNERny5Y

मला हा अक्षयचा vlog आवडला, हयात त्याची रमा आहे बहुतेक. बरेच जण त्याची रमा ती म्हणतात (त्याने सांगितलं होतं की ती singer आहे आणि ही singer आहे) . अर्थात हा vlog मी काळा घोडा फेस्टिवलसाठी बघितला, मुख्य प्रवेशद्वार कोणी केलं, कोणाचा सहभाग ही फार छान माहिती मिळाली. मला जाता येणार नाहीये काळा घोडाला त्यामुळे मी आवर्जून बघितला हा vlog .

Pages