दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@हेमंत
दूध अतिशय मोठ्या वेगाने घुसळून त्यातले फॅटचे रेणू (fat molecules) विभागले जातात असे म्हणायचे आहे. फॅट म्हणजे खडीसाखर समजली तर त्याची बारीक साखर करणे, असा काहीसा प्रकार.

<< रेडिओ वर लागणर्‍या आपली आवड ची सिग्नेचर ट्यून काय होती? >>
Polydor ची ट्यून. डोक्यात अगदी फिट्ट बसली आहे, पण खूप शोधूनही मिळाली नाही.

१) पीडीएफ फाईलमध्ये एकच पान असेल तर ओसीआर वापरून टेक्स्ट वेगळे मिळवणे, चित्र वेगळे पाठवणे.
२ )पीडीएफ फाईलमध्ये अधिक पाने असतील तर ती ब्रेक करणारे ॲप वापरून दोन तीन पाठवणे. ती नंतर जोडता येतात.
३)मोबाईलवर Microsoft office 365 app आहे त्यातले image to pdf feature वापरून पीडीएफ बनवणे. यामध्ये हवी असली तरी फुल साईज पीडीएफ होतच नाही,100-300KB ची लहानच होते. ती करणे

दूध मधूनच च दुधाचे रेणू कसे वेगळे करतात त्या प्रोसेस विषयी...

मुळात दुधाचा असा 'कोणताही रेणू नाही' कारण दूध हे काही chemical composition नाही. दुधाचा विशिष्ट असा chemical formula नाही (जसा मिठाचा NaCl आहे, पाण्याचा H2O आहे). दूध हे विविध घटकांचे मिश्रण (mixture) आहे, ज्यात काही प्रमाणात पाणी (मुळात असलेले, भैय्याने घातलेले नव्हे!), लॅक्टोज प्रकारची शर्करा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ इ. घटक असतात. दूध देणाऱ्या प्राण्याचा प्रकार (गाय, म्हैस, शेळी, उंट इ.), त्यांची जात (भारतीय / विदेशी), त्यांना खाऊ घातले जाणारे पदार्थ यांनुसार दुधातील घटक कमी-जास्त होतात.

एका पाठ्यपुस्तकात गोल्डन ओरिओल या पक्ष्याबद्दलचे ललित होते. त्याला हिंदीत हलदी बसंत म्हणतात असा उल्लेख होता.
तो धडा / त्याचे लेखक कोण माहिती आहे का ?>>
जुन्या बालभारतीच्या १० वी च्या पुस्तकात धडा होता एवढेच आठवते.

पक्ष्याबद्दलचे ललित होते. त्याला हिंदीत हलदी बसंत म्हणतात असा उल्लेख होता............ बहुतेक इरावती कर्वे यांचा लेख असावा.
त्यापक्ष्याला इतकं छान नाव असताना आपण मात्र हळद्या म्हणतो अशा तऱ्हेचे वाक्य आहे.
मेधा यांनी विचारल्यावर लिहिणार होते.खात्री नव्हती(नाही).

एकाच नावाचे जास्तीत जास्त हिंदी सिनेमे कोणते असावेत ? मला गुमराह वाटतो, सुनील दत्त, राजकुमार, राहूल रॉय आणी अक्षय कुमार यांचे. देवदास तीन असावेत. अंदाजही दोन असावेत.

हा प्रश्न सुचायचे कारणही फारेंडच ! कार मध्ये रेडिओवर 'आप आये तो खयाले दिले नशाद आया' हे गाणे ऐकले व डबल डेकर उर्दू शब्द आठवला. मग कुतुहलाने तो सिनेमा कोणता हे पाहिले तर गुमराह.

बहुतेक इरावती कर्वे यांचा लेख असावा. >> धन्यवाद देवकी. तुमची पोस्ट वाचल्यावर घरातली पुस्तके वाचली. भोवरा नावाच्या संग्रहात भ्रमंती नावाने लेख आहे . त्यात या पक्ष्याचा उल्लेख आहे.
नवरात्रातल्या रोजच्या रंगांवर आधारित ( मागितले तेवढेच ) संदर्भ शोधून देण्याची ऑर्डर आहे . गुरुवारचा रंग पिवळा आहे ( म्हणे ). त्या आधी या संदर्भ हवा होता. धन्यवाद. मी आतापर्यंत रुतुचक्र, दुर्गाबाईंची इतर पुस्तके आणि व्यकंटेश माडगूळकरांची पुस्तके सर्व चाळली होती.

भोवरा लेखसंग्रह खूप पूर्वी(शाळकरी वयात) वाचला होता.लक्षात फक्त कुंकू कोण तिघे लावतात ते आणि तितीक्षा हा शब्द इतकेच राहिले.त्याचा अर्थ सहनशक्ती म्हणून ज्याचे पुस्तक होते त्याने लिहिला होता.

पुढे नंतर ऑफिस मध्ये एका peon ने, खगोलशास्त्रातील अर्थ सांगितला होता.तो tyveli ही कळला नव्हता.आतातर आनंदच आहे

नागपुरला एकट्या राहणाऱ्या शेजारच्या काकू वय वर्षे 90 साठी दिवसभरासाठी बाई हवीये ब्युरो मधून कुठल्यातरी धाग्यावर कोणीतरी माहिती दिलीये ती कशी शोधू

एकाच नावाचे जास्तीत जास्त हिंदी सिनेमे कोणते असावेत ? मला गुमराह वाटतो, सुनील दत्त, राजकुमार, राहूल रॉय आणी अक्षय कुमार यांचे. देवदास तीन असावेत. अंदाजही दोन असावेत.
<<<<<<
अंदाज तीन आहेत.
1. राज कपूर, दिलीप कुमार आणि नर्गिस
2. शम्मी कपूर, हेमा मालिनी
3. अक्षयकुमार, लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रा

तलाश नावाचे दोन आहेत. दोन्हीत करीना कपूर आहे. सहसा एकाच नावाचे दोन सिनेमे अशी उदाहरणं भरपूर आहेत. एजंट विनोद, राझ(म्हणजे राझ सिरीज नव्हे, एक राजेश खन्ना असलेला राझ पण आहे), बनारसी बाबू, वगैरे.

तलाश - शर्मिला टागोर , राजेंद्रकुमार.
तेरे नैना तलाश करे जिसे,
पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला

शम्मी हेमाच्या अंदाजमध्ये काका सुद्धा आहे.

अंदाज- अनिल कपूर, करिश्मा कपूर आणि जुही चा पण एक आहे..>> हो हो मूळ तेलुगु व्हर्जन मधील गाणी फार प्रसिद्ध होती तेव्हा. जर व्हल्गर पण
मॅरि ड कपल सो ..

अंदाज- अनिल कपूर, करिश्मा कपूर आणि जुही चा पण एक आहे..<<<<
हां बरोबर!
मग माझा अंदाज असा आहे की हाच असावा टॉपर अशा नावांच्या लिस्टमध्ये. Proud

हेराफेरी पण जुना (अमिताभ विनोद खन्ना) आणि नवे.
हमराज जुनापण एक आहे आणि नवा अक्षय खन्ना बॉबी देओल आणि अमिषा पटेल.

मंजुताई, नागपुरला माझी एक मैत्रीण रहाते, तिला काही माहिती आहे का विचारते. ९० वय आणि एकट्या वाचुन कससंच झालं.

मंजूताई, तुम्ही फेसबुकावर असाल तर तिथे वृद्धांचे पालकत्व म्हणून ग्रुप आहे. तिथे चौकशी केलीत तर नागपूरला काय सोय होवू शकेल ते कळेल. वय ९० म्हणजे माझ्या बाबांच्या आसापसच आहे. काकूंची चांगली सोय होवो यासाठी शुभेच्छा!
मी गुगलवर सर्च केले असता मिळालेले रिझल्ट्स
https://www.justdial.com/Nagpur/Senior-Citizen-Care-Taker-Services/nct-1...

70ते 90 वर्षाची माणसं करोडो ची स्थावर मालमत्ता असून पण एकटी पडली आहेत.

अतिशय कष्टाने जीवन जगत आहेत.
कुटुंब व्यवस्थेला सुरुंग लागला त्याचा हा फक्त ट्रेलर आहे.
खरा सिनेमा अजून दहा वीस वर्षांनी बघायला मिळेल.
पोरांची लग्न नाहीत नाहीत .
ज्यांची झाली आहेत त्यांना मुल नाहीत.
मूल न होताच त्यांचा घटस्फोट पण झालेला आहे.
म्हातारी माणसं कडे सर्व काही आहे पण त्याचा उपभोग घेवु शकत नाही.
आणि Ai पूर्ण जोमात असणार आहे .
त्या मुळे नोकऱ्या नाहीत.
ज्या आहेत त्या टिकतील ह्याची शाश्वती नाही.
निसर्ग शेवटाची घटका मोजत आहे.
तो मृत झालेला असेल तेव्हा .
कोणतेच निसर्ग चक्र जीवंत पणाचे लक्षण दाखवणार नाही.

खरा सिनेमा दहा वीस वर्षात जगभर दिसणार आहे

ओ हेमंत किती नीगेटीव बोलताय.. सर्व जगात सर्व लोकां सोबत असंच आणि हेच होत आहे, चालू आहे अशी रडकी गाणी गात राहता नेहमी. तुमच्या औषधांच्या सर्व बाटल्यांना १ च लेबल असतं का हो निराशेचं?? म्हणून तुमच्या सारख्या म्हातार्‍यांना कंटाळतात लोक..
जरा अमांना बघा. कायम उत्साही

हेमंत सर कितीही निगेटिव्ह बोलत असले तरी त्यांच्या बोलण्यात थोडंफार तथ्य आहे परिस्तिथी कानाडोळा करून केवळ स्वप्नांच्या दुनियेत रममाण होण्यात अर्थ नाही त्यांनी रियालिटी मांडली आहे आणि जगात सगळं छान छान नसतं.
हा परिस्थिती बदलुही शकते खरा सिनेमा निगेटिव्ह असला तर तो बदलण्याची स्वप्न फक्त बघू नका ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा

आशु तुमच्यासाठी पॉझिटिव्ह प्रतिसाद
70 रि 80 पुढच्या लोकांसाठी आधार गट उभे राहतील एकटेपणा म्हाताऱ्या काय तरुणांनाही सतावणार नाही याची सोय होईल.
कुटूंब व्यवस्था केवळ रक्ताच्या नात्यात नसून ऑनलाईन ऑफलाईन मैत्रीतून वेगळी कुटूंब व्यवस्था निर्माण होईल अनाथांना कुटूंब म्हणजेच पालक मिळतील व दुदैवाने मुल नसणार्यांना मुलांची कमतरता भासणार नाही.कुटूंबाची संकल्पनाच विस्तारेल अधिक समृद्ध होईल.
मुलांची लग्न त्यांना हवी त्या वेळी आणि हव्या त्या जातीधर्मातील व्यक्तीशी करण्याचे स्वातंत्र्य आणि चॉईस असेल त्याने घटस्फोटाचे प्रमाण नगण्य होईल.त्याने कुटूंब व्यवस्था अधिक बळकट होईल.
Ai जोमात जरी असले तरी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने असंख्य स्टार्टअप सुरू होऊन नोकऱ्या रोजगार उपलब्ध होईल.
आताची तरुण पिढी आणि येणारी लहान पिढी इतकी जागरूक असेल की ती निसर्गाचे झालेले प्रदूषण हानी भरून काढून निसर्गाला नवीन संधी देईल पृथ्वीचे आयुर्माण वाढायला. निसर्ग शाश्वत आहे आणि शाश्वत राहील. हा खरा सिनेमा आहे.

जे विचारायला आलो त्यासाठी धागा नाही आणि नवीन धागा एका प्रश्नासाठी नको म्हणून इथे.
घरासाठी डिजिटल लॉक बुक करायचा विचार आहे. कुठल्या कंपनीचे घ्यावे ? कुठले मॉडेल घ्यावे ?
दोन तीन दिवसात प्रोसेस पूर्ण करणार असल्याने कृपया कळवावे ही विनंती.

अजून एक प्रश्न याला जोडून.

डिजीटल लॉकचे इंटरनेट अ‍ॅप वाले मॉडेल घेतले तर त्याला व्हिडीओ डोअर बेल कशी जोडावी (जुगाड) ? माझ्याकडे जुनी आहे तीत इंटरकॉम आहे. तिला बंद पडलेल्या फोनचे पार्ट्स काढून वायफाय कसे करायचे ? फोनमधला कॅमेरा काढून लावला तर ? कसा लावायचा ?

Pages