भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातल्या मांजरांना प्लॅस्टिक बॅग धोकादायक वाटते. आत जात नाहीत. आमचे ध्यान बघा. असे वाटते की ऑनलाइन ऑर्डर करून मागवली आहे आत्ताच Biggrin

आम्हाला कंटाळला की कोकोनट देवघरासमोर जाऊन झोपी जातो....... देवा,तुलाच रे माझी काळजी!

अतुल.,
ऑनलाईन ऑर्डर आवडली. माऊ गोड आहे.

Hi go to Google search bar and type dog. Then tap the paw sign and have fun. A little game with doggos

Hi go to Google search bar and type dog. Then tap the paw sign and have fun. A little game with doggos

Hi go to Google search bar and type dog. Then tap the paw sign and have fun. A little game with doggos

Submitted by अश्विनीमामी on 24 July, 2023 - 14:32

मस्त आहे।

>> अतुल माऊचा फोटू दिसत नाहीये.

ओह! शक्यता आहे तशी कि काही ठिकाणी इमेज दिसणार नाही (अवांतर होईल म्हणून तपशीलात जाऊया नको). हरकत नाही पुढचा फोटो टाकताना काळजी घेईन Happy

हा धागा मी फॉलो करत नव्हतो. आता करेन.

अस्मिता,
देवापुढे कोकोनट Lol वाह!

एकसे बढकर एक फोटो

ओडिनची दृष्ट काढत जा हो अधेमध्ये.
हा असा बाहेर फिरायला जाउन शायनिंग मारणार मग काढायलाच हवी.
देवासमोर कोकोनट तर कहर आहे.
देवा आता तूच त्राता म्हणून तप सुरू जणू
रोक्सी रुबाबदार आणि त्याची उशी केलेला मुलगा तर क्या केहने. त्याला फार फार चांगला मित्र रॉकसी.
अतुल, माउ छान आहे.
पिशवीत घुसून बसलेय आरामात

रॉक्सी किती मोठा दिसतोय. गोड फोटो.
मनिमाऊ गोड. नाव काय आहे?
'देवासमोर नारळ' आवडलं अंजली.
धन्यवाद सर्वांना. Happy

ही आणखी एक शहाणी पोझ.
IMG-20230726-WA0000.jpg
मला निळा रंग आवडतो म्हणून मी त्याचं सगळं निळ्या रंगाचं घेते. आधी काळं हार्नेस होते, एकदम रुबाबदार ऑफिसर सारखा दिसायचा. वॉकला जाताना त्याला आम्ही FBI चं वेस्ट घाला म्हणायचो. ते लहान झाल्यावर हे निळं आणलं, आता ॲस्ट्रॉनॉटचं वेस्ट घाला म्हणतो. Lol कॉलरही निळी आहे त्यावर त्याचं नाव आणि माझा फोन नंबर कस्टम केला आहे.

मी भाजी चिरताना,इतकी उत्सुकता आहे.
IMG-20230726-WA0001.jpg

हे मला बघत खाऊच्या आशेने स्वयंपाकघरात. मी टाचा दुखू नयेत म्हणून आणलेली मॅट त्याला वाटते त्याला आरामात बसून मला बघता यावे व खायला मागावे याच्यासाठी आणली आहे. Happy
IMG-20230726-WA0003.jpg
तपकिरी डोळ्यांचे संमोहन..!

कसले गोड फोटो ! फारच क्यूट आहे कोकोनट!
डोळ्यांचे संमोहन >>> हे अगदी खरंय, अशा मोठ्या मोठ्या डोळ्यांनी ( पपी आईज) पाहिले की खाऊची वाट फार पहावीच लागत नाही त्यांना Happy

Happy
क्यूट!

परवा एक मित्राकडचा किस्सा . त्याचं माऊईच्या ब्रीडचंच भूभू आहे छोटं. त्यांच्याकडे पूजा होती तर ही फॅमिली गुरुजींना नमस्कार करत होती. तर याने पण नमस्कार केला Lol आणि पूजेसमोर पण यांच्यासारखं डोकं टेकलं. कसलं गोड!

सगळेच फोटो भारी
भटकी मांजरं कायम घरी कायम असायची,
त्यांची वेळ ठरलेली असायची, सकाळी आईने गॅस वर दुधाचे पातेले गरम करायला ठेवले की दरवाज्याबाहेरून मांजर ओरडायला सुरुवात करायचे. त्यांच्या ओरड्याने पोरांना जाग येऊ नये म्हणुन पहिलं त्यांन प्यायला द्यायचे मग आम्हाला

Pages