समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
सांगितलेल्या वरील सर्व शक्यता
जेम्स वांड यांनी सांगितलेल्या सर्व शक्यता घडू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये असे पण बाहुबली प्रकार जोरदार आहे, त्यांना यातले काहीशे जरी मिळाले तरी काय अनर्थ घडेल विचार करा.
आता वेगवेगळे मंत्री पुढे येऊन सांगत आहेत की त्यांच्या खात्याअंतर्गत अग्निविरांना सामावून घेणार ४ वर्षानंतर. एकंदरीत हे सगळे वरातीमागून घोडे आहेत.
एअर चीफ मार्शलनी सांगितले २४ जून पासून अग्नीवीर भरती सुरु होईल. किती ती घाई, सगळीकडे आंदोलनं होतायत आणि हे आपला अजेन्डा रेटत आहेत.
जे वा, चांगले मुद्दे.
जे वा, चांगले मुद्दे.
James wand nice post.
James wand nice post.
जे वा, मुद्देसूद
जे वा, मुद्देसूद
लेखक महाशय कुठंत?
अग्निपथ योजनेबद्दलची पहिली
अग्निपथ योजनेबद्दलची पहिली बातमी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आली.
इथे म्हटलंय की तीन वर्षांनंतर कॉ र्पो रेट सेक्टर या प्रशिक्षित, शिस्तबद्ध तरुणांना सामावून घेण्यासाठी उत्सुक असेल.
चार वर्षांनी बाहेर आलेले
चार वर्षांनी बाहेर आलेले आणि दुर्दैवाने बेरोज्गार राहिलेले अग्नीवीर गुन्हेगारी क्षेत्रात काम करतील, स्वतःच कायदा हाती घेउन भाण्डणांचा निकाल लावतील ही शक्यता आहे असे म्हणत विरोधक स्वतः सरकारी मालमत्तेला म्हणजेच जनतेच्या मालमत्तेला आगी लावणे वगैरे करत आण्दोलन का करताहेत? स्वतःचे नुकसान न करता आंदोलन करायचे दुसरे मार्ग नाहीत का? ही वृत्ती आधीपासुनच समाजात अस्तित्वात आहे समजायचे का?? त्यात वाढ होइल ही भिती आहे का?
आपल्या सैन्याला सर्वसाधारणपणे जितका आदर, सन्मान मिळतो तो त्यांची वागणुक पाहुनही मिळत असेल. मग त्याच सैन्यातुन आलेली तरुण मुले काहितरी सन्स्कार घेऊनच येतील ना? ती गुन्हेगार होतील ही शक्यता जशी आहे तशीच परिस्थिती प्रतिकुल असली तरी ही मुले धीराने तोंड देतील ही शक्यताही आहे ना?
मायबोलीवर सोन्याबापु आयडीने पॅरा मिलिटरीमधल्या ट्रेनिंगदरम्यानचे त्यांचे अनुभव लिहिले होते. प्रतिसाद देणारे कडक सॅलुट ठोकत होते, सेन्टरमधल्या वातावरणाबद्दल, माणसे तिथे कशी घडवली जातात याबद्दल सद्गदीत होउन लिहित होते. आणि आता त्याच मायबोलीवर चार वर्षे सैन्यात राहुन आलेले तरुण भडक माथ्याचे निघतील, सारासार विचार करणारच नाही असेही म्हणताहेत. नक्की काय खरे आहे?
विरोधक स्वतः सरकारी
विरोधक स्वतः सरकारी मालमत्तेला म्हणजेच जनतेच्या मालमत्तेला > अचानक सरकारचे विरोधक वाढले की काय? की सरकारच्या हो ला हो नाही म्हटलं की विरोधक अशी नवी व्याख्या उपजली आहे?
जेम्स वांड, function at() {
जेम्स वांड, function at() { [native code] }इशय छान पोस्ट, पण काही किरकोळ चुका, ३० मिलियन हा आकडा जास्त वाटतो, शिवाय अमेरिकेत व्हिएट्नाम च्या वेळी ड्राफ्ट होताच, ट्रम्प गेला नाही यावरूनही टीका झाली होती.
जे वा,
जे वा,
चार वर्षांनी परत आलेली मुले कोणकोणत्या वळणाला जातील याबाबतचे अंदाज अगदी पटले. नुसती नोकरी लागू शकतेही असे कळल्यावरच जे काही ती मुले करत आहेत ते पाहून तर अगदीच पटले.
ती मुलं त्या नोकर्या
ती मुलं त्या नोकर्या मिळाव्या म्हणून मेहनत करत आलीत. किमान दोन वर्षे वाट बघताहेत की कधी भरती निघेल.
हस्तिदंती मनोर्यातून बघण्यापेक्षा जमिनीवर उतरा.
सरकारने कितीही नाही म्हटलं तरी बेकारी रेकॉर्ड स्तरावर आहे. इतकी की लोकांनी नोकर्या शो धणं सोडलंय.
हस्तिदंती मनोर्यातून
हस्तिदंती मनोर्यातून बघण्यापेक्षा जमिनीवर उतरा>>>

हस्तिदंती मनोर्यातून
हस्तिदंती मनोर्यातून बघण्यापेक्षा जमिनीवर उतरा>>> जे ना देखे रवी ....
बाकी राजकविना बाफ वर यावं लागलं ह्यावरून विषय किती झोंबला आहे हे समजून आलं
https://twitter.com/BJP4Delhi
https://twitter.com/BJP4Delhi/status/1538126225633292288
बेकारीबाबत कळवळा आहे तर! उगीच
बेकारीबाबत कळवळा आहे तर! उगीच केंद्र सरकारने कोरोना आणला भारतात! आधी हे पाप कोणीही केले नव्हते. असो! ट्रेन, बस, ट्रक जाळून, सिग्नलखांब तोडून आठवडाभर तरी पोट भरेल.
ज्यांना हा बेकारीचा कळवळा आहे त्यांना सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाबाबतही कळवळा आहे बाय डिफॉल्ट! ही मुले चार वर्षांनंतर घरी परतल्यावर एखाद्या विशिष्ट प्रसंगामुळे, वातावरणामुळे भयंकर पावले उचलू शकतील अशी 'सार्थ' भीतीही आहे. आज अग्निपथ योजना (जी मुळात compulsary नाहीच) आली नसती तरी त्यांनी अशीच जाळपोळ केली असती. नियमित सैन्यभरतीत या सगळ्यांनाच सामावून घेतले गेले असते कारण सगळेच पात्र ठरणार होते. ही योजना मागे घ्यायलाच हवी.
माईणकर किती आयडी काढून
माईणकर किती आयडी काढून लिहीताय
चूक झाली म्हणा 

आपल्या बाजूने लिहीणार्यांना पण विरोधात पाठवण्याचं जे फिल्मी कौशल्य आहे त्याला दाद द्यावीच लागेल. बेफिकीर, साधना, वत्सला आणि केकु यांच्या पोस्टींना जोरदार अनुमोदन.
दमले की सांगा
मग थोडासा उपकार करण्याचा विचार करीन
भाजप सत्तेत आहे याचे मुख्य
भाजप सत्तेत आहे याचे मुख्य कारण म्हणजे ते एकमेकांची ** मारत नाहीत. इथले येड** आयडी आपल्या पक्षाचा अजेण्डा घेऊन फिरत असतात. जरा उल्लेख झाला कि फिल्मी नाही तर ठेवणीतले आयडी घेऊन चढायला बघतात. या आयड्यांचं काय कुणी घोडं मारलंय हा एक मनोरंजक आणि संशोधनाचाच विषय आहे. नुसतं चढणे आणि तेच तेच पणतू पणतू करणे याच्या पलिकडे यांना स्वतःची अक्कल नाही. जसं भक्तांना चाळीस पैशाचं मटेरिअल येतं तसं यांना २० पैशाचं येत असतं.


घरात बायकोला ऊंबर्याबाहेर येऊ देणार नाहीत आणि मायबोली आणि फेसबुकवर स्त्री समानतेचं आभाळ हेपलत बसतात.
त्यापेक्षा सनातनी बरे नाहीत का ? ते एकदम क्लिअर आहेत. पण विद्युतदाहिनीचा वापर हेच जास्त संख्येने करतात. समाजातले पुरोगामी बदल यांच्याच घरात प्रॅक्टिकली बघायला मिळतात.
कुठल्या पुरोगामी मुख्यमंत्र्याची बायको संधी मिळताच स्टेज शोज, युट्यूब चॅनेल वर गाणे करतेय ? सनातनी शिक्का मारलेले पुढे गेलेत
याचं आपलं उठता बसता महापुरूषांचा जप करणे आणि प्रत्यक्षात गावात लई माज आला का म्हणून गुरगुरत फिरणे बंद झालेले नाही अजून.
साधनाताई,
साधनाताई,
एका प्रश्नाचे उत्तर द्या जमल्यास .
दहावी बारावीच्या मुलांची काळजी होती तर ७० च्या दशकात ज्याप्रमाणे दहावी नापासांची पण थेट भरती होती तीच योजना का नाही आणली परत ? म्हणजे भरती कायमस्वरूपी पण वाटले तर शॉर्ट कमिशन घेऊन सोडू शकतो अशी. त्यांचे प्रशिक्षण चांगले असते. पगार पण पूर्ण मिळाला असता.
१. चितळे म्हणतात कि ड्रॉप आउट
१. चितळे म्हणतात कि ड्रॉप आउट झालेल्यांना संधी आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा असा कोणता विचार केला आहे का ? ड्रॉप आउट्स वरच विशेष प्रेम का ?
२. लष्करातल्या १,८०,००० पोस्ट्स गेल्या पाच सहा वर्षांपासून रिक्त आहेत. त्या भरल्या तरी बेरोजगारी कमी नाही का होत ?
३. पैशाचा मुद्दाच गैरलागू आहे. वर उधळपट्टीचे दाखले दिलेले आहेत. पैसे नसते तर या खर्चिक योजना का केल्यात ?
४. आठ तासाच्या ड्युटीमुळे तीन शिफ्ट्स मधे तीन कामगारांना नोकरी मिळत होती. आता बारा तासांची शिफ्ट केल्याने एका माणसाची नोकरी गेली. अग्निवीर योजनेचं कौतुक करताना यावर पण बोला कि.
५. नोटबंदी आणि कोरोना काळातली संचारबंदी यामुळे १५ कोटी रोजगार तर रेकॉर्डस प्रमाणे गेलेत. यापेक्षा जास्त रोजगार असंघटीत क्षेत्रात गेले आहेत. यांचे रोजगार जाणार नाही एव्हढी काळजी घेतली असती तरी बेरोजगारीवर अशी ढोलकी वाजवून अर्धवट स्कीम आणावी लागली नसती.
पळून गेलेल्या सनवताईंनी जरी उत्तरे दिली तरी चालतील. बाकि फिल्मी आपले नेहमीचे गरळ ओकून स्मायल्या टाकतीलच.
आणि आता त्याच मायबोलीवर चार
आणि आता त्याच मायबोलीवर चार वर्षे सैन्यात राहुन आलेले तरुण भडक माथ्याचे निघतील, सारासार विचार करणारच नाही असेही म्हणताहेत. नक्की काय खरे आहे? >>> पानसिंग तोमर नाव ऐकलेय ना ? कर्नल पुरोहित ? मोठी यादी आहे.
@ साधनाजी,
@ साधनाजी,
तुम्ही नमूद केलेले लेखन आवर्जून पूर्ण वाचले (सोन्याबापू - अकॅडमी) , लेखनाची शैली जरा फिल्मी वाटली पण ठीक आहे, एकंदरीत बरे लिहिले आहे म्हणतो.
आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो (त्याच्यासाठीच तर ती लेखमाला वाचली) , मला जे वाटले ते खालीलप्रमाणे :-
१. सोन्याबापू ह्यांनी "अधिकारी" ट्रेन होतात त्या संस्थेबद्दल लिहिलं आहे
२. सैनिक आणि अधिकारी ह्यांच्यात फरक असतो तो आपण लक्षात घ्यावा (अदर रँक, एनसीओ, जेसीओ, एस एस सी ऑफिसर्स, पी सी ऑफिसर्स) मोठा कारभार असतो
३. ऑफिसर व्हायला लागणारे शिक्षण - किमान १२वी नंतर एनडीए (ग्रॅज्युएशन), आय एम ए (पोस्ट ग्रॅड समकक्ष) - ऑफिसर्सना शिकवले जाणारे विषय - फक्त लेफ्ट राईट लेफ्ट नाही तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, लिंगविस्टिक स्कील, मटेरियल मॅनेजमेंट, त्यासोबत शस्त्र चालवणे, लीडरशिप क्वालिटीज, इत्यादी इत्यादीत सहसा ह्यामुळे जेव्हा ऑफिसर्स बाहेर पडतात तेव्हा त्यांना कॉर्पोरेट ऑफर्स (रिस्क अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट, सिक्युरिटी व्हर्टिकल्स) सहज मिळतात.
ऑन द अदर हँड,
शिपाई म्हणून भर्ती झालेल्या पोरांना रेजिमेंटल सेंटरला गेल्यावर पहिले तीन महिने बेसिक पीटी, नंतर सहा महिने ट्रेड नॉलेज इत्यादी शिकवतात, इसेन्स काय ? तर फक्त एकच , आपल्या वरीष्ठावर भरवसा ठेवा, तो पण तुमच्यासोबतच मरेल किंवा मारेल, वरिष्ठांच्या आदेशांवर शंका घ्यायची नाही, आणि कर्तव्यात कसूर ठेवायची नाही. ह्यात काय स्कील वापरून ती पोरे चार वर्षांनी मार्केटमध्ये उतरतील ?
डिटेल वळूया अग्निवीरकडे
ह्यांच्यातली जी पोरे आर्मी सर्विस कोअर, मेडिकल कोअर, सिग्नल्स कोअर, ई एम ई वगैरे व्होकेशनल ट्रेड असणाऱ्या कोअरला जातील त्यांना बाहेर पडल्यावर टर्नर फिटर वेल्डर इत्यादी जॉब्ज कदाचित मिळतीलही पण जी पोरे बहुसंख्य असणाऱ्या आर्मर्ड कोअर (रणगाडा दल) , आर्टिलरी (तोफखाना दल) , इन्फंट्री (पायदळ) अश्या स्ट्राईक कोअरला जातील त्यांचे काय ?
भारतीय सेनेत ९०-९५% भर्ती ही ग्रामीण भागातून होते, परिवार की इज्जत, बाईच्या जातीनं घरात राहावं, घुंगट, इत्यादी वातावरणातून ही भर्ती आलेली असते, चार वर्षानंतर ती तिथंच परत जाणार, पौरुषत्व (मेल स्ट्रेंग्थ) बेस्ड सोशल हायरारकी, तिथे बळाला असलेले महत्व आणि त्यावरून ठरणारी पत ह्या अनुषंगाने चार वर्षे मेहनत केलेली पोरे परत गेल्यावर काय होईल ते अंदाज चुकले माझे तर सर्वाधिक आनंदी मीच होईन.
तुमच्या माहितीकरिता सांगतो, जेसीओ किंवा एनसीओ पदावरून निवृत्त होताना पण ३०-२५-१५ वर्षे सर्विस केलेल्या लोकांचीही समुपदेशन सेशन्स घेतली जातात, तुम्ही आता सिविलला परत जाताय आता आर्मी तुमच्यासोबत नाही, स्वतः जबाबदारीने वागा वगैरे शिकवले जाते त्या रिटायरमेंट फेजमध्ये सुद्धा, इथं तर हे अग्निवीर आले आले म्हणत नाही का गेले गेले काम, शिकवणार काय समुपदेशन करणार काय अन इतक्या रगाड्यात नोकरी काय करवून घेणार ?
कधी आपण डोळे उघडे ठेवून हिमाचल , मेघालय, गोवा फिरलो तर आपण सहज बघू शकतो की इस्रायली लोक खूप असतात तिथे तरुणाई असते, जागोजागी हिब्रू बोर्ड्स, वळले जाणारे जॉईन्ट्स अन रिचवले जाणारे पाईन्ट्स असतात, कारण तपासता कळते की तीन वर्षे सतत धामधुमीत नोकरी, गोळीबार हिंसा, इत्यादींचा कंटाळा अन उबग येऊन ते लोक मनःशांती साठी भारतात येतात, जमा केलेला सगळा पगार इथे रिता करतात २-२ वर्षे असेच फिरतात अन मग कुठं परत जाऊन इस्राएल मध्ये नोकरी, पुढील शिक्षण इत्यादींचा विचार करतात, जर इस्राएल जिथे शिक्षण, नागरी जागरूकता, डेडीकेशन भारताच्या दसपट असेल तिथे पोरांना इतका पीटीएसडी फेस करावा लागतोय तर चार वर्षात काश्मीर वगैरे केलेल्या, अर्धशिक्षित, ग्रामीण परिवेशातील अग्निवीरांचे काय मेंटल हेल्थचे हाल होतील ? चार वर्षानंतर त्यांना कॅन्टीनची रम ते आर्मी हॉस्पिटलला इलाज सगळे दरवाजे बंद असणार आहेत, त्यामुळे त्यांचे जे काही साधक बाधक tantrum असतील ते सिविल मधेच डील करावे लागणार आहेत, माझ्यामते ही क्लिअर धोक्याची घंटा आहे
(स्वल्पविराम) वांडो.
https://twitter.com/BJP4Delhi
https://twitter.com/BJP4Delhi/status/1538130786523566080
जेम्स वांड उत्तम पोस्ट. लिहीत
जेम्स वांड उत्तम पोस्ट. लिहीत जा.
स्वल्पविराम) वांडो.>>>
स्वल्पविराम) वांडो.>>>
अप्रतिम लिहिताय एकेक मुद्दे
थँक्स आशुचॅम्प , सुचेल तसे
थँक्स आशुचॅम्प , सुचेल तसे ऍडवत जाईनच
चार वर्षांनी परतणाऱ्या
चार वर्षांनी परतणाऱ्या सर्वांचे मानसिक आरोग्य अत्यंत धोकादायक असणार आहे हे आता शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेच आहे व हे सर्वांना मान्यही झालेले आढळत आहे. आजमितीला, 'ती चार वर्षांची नोकरी करायलाच लागेल' अशी क्रूर अट अजिबात नसताना या संभाव्य उमेदवारांचे मानसिक आरोग्य अतिशय उत्तम स्थितीत असून त्यामुळे सर्वत्र शांतता नांदत आहे. 'आपल्याला ज्या मुक्कामाला जायचेच नाही त्या मुक्कामाची वाटच न धरण्याची निवड करण्याचा अधिकार आपल्याचकडे आहे' व 'आपल्या बौद्धिक व प्रयत्न करण्याच्या क्षमतेनुसार आपण हवे ते करिअर करू शकतो' हे समजल्यामुळे मुळातच सुसंस्कृतपणे वागणारे युवक अधिकच ओढीने राष्ट्रभक्ती प्रदर्शित करत आहेत.
अर्रर्र ! फिल्मी या आयडीबद्दल
अर्रर्र ! फिल्मी या आयडीबद्दल लिहीलेलं उडालं होय ?
चार वर्षांनी परतणाऱ्या
चार वर्षांनी परतणाऱ्या सर्वांचे मानसिक आरोग्य अत्यंत धोकादायक असणार आहे हे आता शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेच आहे >>>
त्यांना गझला लिहायला शिकवून पोटापाण्याचा प्रश्न मिटवून टाकू. हाकानाका.
चार वर्षांनी परतणाऱ्या
चार वर्षांनी परतणाऱ्या सर्वांचे मानसिक आरोग्य अत्यंत धोकादायक असणार आहे हे आता शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेच आहे व हे सर्वांना मान्यही झालेले आढळत आहे.
हे कसे अन कधी झाले, कोण म्हणले ?
बेफिकीर चाचा
बेफिकीर चाचा
गुजरातेत २००२ मधे संत महतांनी सार्वजनिक मालमत्तेला चार चांद लावले होते बरं का. बाबरी मशीद पतनानंतर पण मुंबई, भिवंडी आणि देशभरात अभिमानास्पद चळवळ केली होती. १९९० च्या आधी मंडल विरोधात रेल्वे, बसेस मधे अग्निपथ आंदोलन करून दिवाळीची रोषणाई दाखवली होती.
विरोधक मुद्देसुद मत मांडू
विरोधक मुद्देसुद मत मांडू लागले की विचारायचे हे सिद्ध करा. तेच यांनी काही पण आकडे फेकले की ते अगदी खरे असतात कारण त्यांना प्रतिप्रश्न आवडत नाहीत. त्यांना पण माहीत नसते ही आकडेवारी आणि संबंधित माहिती कुठून आली. मग उगाच कांगावे करावे लागतात.
Pages