अग्निपथ

Submitted by रणजित चितळे on 17 June, 2022 - 02:56

समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.

सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.

आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हिंसाचार होता कामा नये. पण केंद्र सरकार आंदोलकांची बाजु (नेह्मीप्रमाणे) न समजुन घेता आपलेच घोडे दामटते आहे त्यामुळे परिस्थीती हाताबाहेर जाताना दिसते आहे.भाजप सरकार असेलेल्या राज्यांत देखिल मोठ्या प्रमाणात हिंसाचार होताना दिसतो आहे. नवल म्हणजे महाराष्ट्रात मात्र ह्याविरोधात काही घडताना दिसत नाहीये. सैनिकी जिल्हे म्हणुन ओळखले जाणारे भाग देखिल शांत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकले आहे का कोणी?

विरोधात लिहीले तर चालले, काँग्रेसचा उल्लेख आल्या आल्या फिल्मी आयडी अंदाधुंद फायरिंगसाठी हजर झाला. Lol
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बिहारमधेच शीखांचे हत्याकांड घडले होते. काँग्रेस अशा हिंसाचारात तरबेज आहे. दिल्ली, बिहार आणि ४० शहरात १७००० शिखांची हत्या झाली, तेव्हां फौजेतून शीख तरूण पळून आले होते. त्यांना भगौडा म्हटले होते. पण सैन्यातून शीख तरूण मोठ्या संख्येने बाहेर पडू लागल्याने शीखविरोधी विखारी प्रचार बंद करावा लागला आणि नंतर शिखांशी जुळवून घ्यावे लागले होते.
येऊ द्या फिल्मी यावर पण एक कमेण्ट.

भुंगा म्हणजे मिलिंद पाध्ये हेच फिल्मी आहेत का ? बागेत फिरताना कंधार दोषी प्रकरण घडवलेले ? गप्पा मारता मारता कॉफी हाऊस उघडले होते पठ्ठ्याने Wink
बागेत फिरण्यावरून मित्राला धोका ? Proud

भ्रमर यांचा उल्लेख अनवधानाने झाला. ते मिलिंद आहेत पण माईणकर Wink

इथे इतके प्रतिसाद पडले पण माहिती काहीही नाही. म्हणुन शेवटी गुगलले. खालील माहिती मिलाली.

१. पहिल्या वर्षी हातात पगार २१,०००: दुसर्या २३,०००; तिसर्या २५,००० व शेवटच्या वर्षी २८,००० असेल.
२. शेवटच्या वर्षी २५ टक्क्यापर्यन्त लोक मिलिटरीत सामावुन घेतले जातील, नेहमीची प्रोसेस पार पाडुन.
३. उरलेल्या लोकांना इतर पॅरा मिलिटरी व राज्य सरकारच्या सुरक्षा दलात नोकरीत प्राधान्य मिळेल. राज्य सरकारांनी असे प्राधान्य द्यायला संमती दिलेली आहे.
४. सगळ्यानाच हातात रु. ११.७० लाख मिळतिल, ४ वर्षे झाल्यावर.
५. या चार वर्षात युद्ध वगैरे झाले तर हे लोक युद्धावर लढायला पुढे असतील. तसे ट्रेनिन्ग मिळेल.

काही देशात काही वर्षे सक्तीची मिलिटरी करावी लागते. अग्निपथ हा त्याचाच एक प्रकार आहे असे माझे मत झाले. सक्ती करता येणार नाही त्यामुळे हा मार्ग काढला असावा. पदवी शिक्षण घेऊन वयाच्या २१ साव्यावर्षी अग्निवीर बनायचे. चार वर्षानन्तर आवड असेल तर प्रयत्न करुन एक्तर मिलिटरीतच किन्वा इतर सुरक्षा दलात नोकरी बघायची, नाहितर खासगी नोकरी बघायची. २१साव्या वर्षी खासगी नोकरी बघितली तरी चार वर्षात तितकाच अनुभव गाठिशी असेल. खासगी नोकरीत दरवर्षी हुकमी दहा टक्के पगारवाढ मिळत नाही. इथे चार वर्षे मिळेल.

आता यात काय काय वाईट आहे हे कोणी निट सान्गेल का?

अर्थतज्ज्ञांना नोटबंदी समजली नाही....
व्यापाऱ्यांना जीएसटी समजला नाही.....
बॅंकांना एनपीए कसा राईटऑफ झाला समजला नाही....
शेतकऱ्यांना कृषी कायदे समजले नाहीत....
मुसलमानांना एनआरसी समजले नाही....
ना कोई घुसा है ना कोई घुसेगा म्हणत चिन कसा आत घुसला समजल नाही....
तरुणांना अग्निपथ योजना समजली नाही ..
To be continued .......

साधना,

चुकीची जागा, चुकीची वेळ, चुकीचा प्रश्न!

(थोडक्यात, मायबोलीवर हे नेहमीप्रमाणेच) Light 1

Lol

बेफिकिर, हो ते आहेच. मला आता अन्धभक्त, चाळिस पैसे आणि अजुन काय काय ऐकुन घ्यावे लागेल देव जाणे. जाऊदे.

पण सिरियसली, मला इथेच पहिल्यांदा ह्या योजनेविषयी कळले. गुगलले तेव्हा कळले की देशभर जाळपोळ सुरु आहे. (मी बातम्या हा विषय हद्दपार केला आहे, त्यामुळे बाहेर काय सुरु आहे कळत नाही).. मला वाटले सगळ्यानाच पकडुन ‘सैन्यात शिरा’ खिलवताहेत म्हणुन जाळपोळ सुरु आहे की काय…. Happy Happy

म्हणुन शोधाशोध केली तर कुठेही कारणे सापडेनात… म्हणुन परत माबोवर आले.

साधना
अजून थोडे गुगगळले तर काय आक्षेप आहेत हेही कळेल

नाहीच मिळाले तर सांगा, टाकतो इथे

भडजींनी बघितलं, सगळे म्हणताहेत सैन्यात शिरा म्हणून ते पण अग्निवीर झाले. पण शिरा काही मिळाला नाही,
"कुठाय शिरा?"
"अहो भडजी, सैन्यात शिरा म्हणजे सैन्यात घुसा!"
"बापरे, घुसा! आणि उंदीर. पळा मग."
अस नको व्हायला.
-------------------चि वि जोशींची क्षमा मागून.

अजुन म्हैस गोठ्यात आलेली नाही तोवर तुप कुठे चोळायच यावरुन दंगे-जाळपोळ चालु झाल्यात.
एक प्रसिद्ध न्युज चॅनेल म्हणतय, बिहारात कोचिंग सेंटर वाल्यांवर गदा येणार म्हणुन फितवुन हे लोण तिथुन पसरवलय जाळपोळिचं. (जसं काय सगळे कोचिंग बंद करुन अग्निवीर व्हायला जातील. (सरकारवर इतका विश्वास्?????विश्वास नही होता?)

चितळे साहेबांनी लेख दुरुस्त करायला हवा आहे. नेमकी योजना काय, फायदे काय, धोके काय यावर तटस्थपणे लिहायला हवे.

=====

टीव्हीवर जी आंदोलक पोरे जाळपोळ, सिग्नलखांब तोड वगैरे करताना दिसत आहेत त्यांना एरवी कोणी स्वतःच्या चहाच्या टपरीवर ग्लास नुसते बुचकळून काढायच्या कामावरही ठेवले नसते. ज्यांना तसेही भवितव्य नाही त्यांच्यापैकी 'काहींना' (ज्यांचे किमान शिक्षण झाले आहे त्यांना) एक चांगली संधी आहे. तेवीसनंतर काय, पंचवीस नंतर काय, सव्हीस नंतर काय हे विचारणाऱयांना 'तोपर्यंत काय' हे स्वतःचे स्वतःलासुद्धा माहीत नाही, 'किंबहुना' (:हाहा:) माहीत आहे. Frustrated आत्मे, डोकी भडकवलेली निलाजरी पोरे!

=====

आत्मोन्नतीसाठी (स्वतःच्या भौतिक विकासासाठी) स्वतःचा जन्म प्रगत देशात घालवणारे गेली कैक वर्षे इथल्यांना शिकवत आहेत की हा देश कसा चालवायला हवा. Lol

त्यांच्या पालकांची इथे कितीवेळा आणि काय काय काळजी घ्यावी लागते ते अनेकदा जवळून अनुभवलेले आहे आणि काळजी घेतलीही आहे.

=====

आपल्याकडे एखादा तरुण मुलगा साधारण अठ्ठावीस, तीस वगैरे वर्षी बऱ्यापैकी सेटल होतो. प्रचंड बेकारी आहे. राष्ट्रीय विदूषक तर अजूनही त्यांचे करिअर काय असावे या गोंधळात आहेत. आणि आंदोलन कशावर तर म्हणे चोवीस नंतर काय! Rofl

जाळपोळ करण्याइतपत काय भयंकर आहे ते कळुदे.>>>
त्याच काय आहे लोकांना तीस चाळीस वर्षे देशाची सेवा करायची इच्छा आहे. पण मोदी सरकार म्हणतेय कि चार वर्षे बस झाली. मग राग येईल नाहीतर काय? पहा म्हणजे हे आयुष्यभर देशाची सेवा करणार आणि आम्हाला फक्त चारच वर्षे?
आम्हाला पण चान्स द्या न देवा.

लेखकांच म्हणन पटलं, पण प्रश्न असा आहे की सैनिकच का?
पगार, पेन्शन ही फक्त सैनिकांनाच भेटते का की सगळा त्याग सैनिकांनीच करायचा
विचार करा २२-२८ वर्षी जवान हा सैन्यातून बाहेर पडेल पण तेव्हा त्यांचे समकालीन लोक हे सेटल असतील ,१२ लाखांनी काही फरक पडत नाही जर ते वापरायचे कसे हे कळलं नही तर पुढील आयुष्य जगायचं कसं?
#banTOD

याच संदर्भात चर्चा सुरू असताना मित्राने लिहिलेली उत्तम पोस्ट

एक उदाहरण बघूया...

एक चांगला उमदा तरुण स्कीम वाचून देशप्रेमाने भारून ह्या स्कीम मधून सैन्यात गेला... वय वर्षे 22 समजू त्याचे....
पुढे चार वर्षे त्याने मन लावून ट्रेनिंग घेऊन देशसेवा केली...त्याला पहिल्या वर्षी महिना 21000 हजार, दुसर्‍या वर्षी 23000, तिसर्‍या वर्षी 25000 आणि चौथ्या वर्षी 28000 असा पगार मिळाला....

आता चौथ्या वर्षी त्याच्या समोरचे पर्याय...
1. अधिक मेहनत घेऊन उत्तम कामगिरीच्या जोरावर 25% मध्ये राहून पुढे सैन्यातच राहणे
2. 75% मध्ये आल्यास पुढे नोकरी किंवा शिक्षण शोधणे...
3. मिळालेल्या 12 लाखांचा विनियोग करणे

आता 1 ला पर्याय चांगला असला तरी उरलेल्या 75% लोकांपुढे आव्हाने किती आहेत बघा..
1. 26 व्या वर्षी उच्चशिक्षित नसणे आणि हातात जॉबही नसणे ह्यातून येणारा वैफल्यग्रस्तपणा
2. 26 वर्षी अचानक 28000 महिना मिळणारी नोकरी सोडून अत्यंत कमी पगारावर नोकरी स्विकारायची अगतिकता
3. एवढी 4 वर्षे मेहनत करून पण आपली लायकी पुढे सैन्यात कायम राहू नाही याचे frustation
4. 26 व्या वर्षी हातात नोकरी नाही, उच्च शिक्षण नाही, सैन्यात रहायच्या लायकीचे नाही अश्या अवस्थेत समाजात तोंड दाखवत फिरण्याची आणि आयुष्यात सेटल होण्यासाठी (लग्न, घर इ.) बेस्ट period च्या वेळेलाच बेरोजगारी
4. 26 व्या वर्षी अचानक मिळणारे 12 लाख पण हातात नसणारे नोकरी/धंदा यामुळे अचानक हातात आलेल्या पैशामुळे उद्भवणारा धोका..
असे अजूनही काही सांगता येतील..

स्कीम कितीही चांगली असली तरी सैन्यासारख्या profession मध्ये असे सैनिकाला अर्धवट सोडून चालत नाही...देश कडवट सैनिक तयार करायला आर्थिक कमी पण भावनिक गुंतवणूक जास्त करतो तरच निष्ठावान आणि प्रसंगी जीव देणारे सैनिक तयार होतात...आता या अश्या फास्ट फूड टाईप रोजगाराच्या संधी सैन्यात सैनिकांच्या लेव्हलला उपलब्ध करून सुरक्षिततेचा खेळखंडोबा होऊ नये ही अपेक्षा..

बर्‍याच देशात रिझर्विस्ट संकल्पना आहे काही देशात ते mandetory पण आहे पण ही संकल्पना आणि अग्नीपथ स्कीम फार फरक वाटतो...
रिझर्विस्ट लोकांना त्याचे क्लिअर कल्पना असते आणि हातात असणारा निश्चित जॉब/धंदा सोडून ते रिझर्विस्ट म्हणुन काही आठवडे सेवा देता....
रिझर्विस्ट म्हणुन सेवा देणे वेगळे आणि चार वर्षे कंत्राटी नोकरी करणे वेगळे...

आता स्कीम जाहीर केलीच आहे तर ती योग्य पद्धतीने राबविताना या सर्वांचा विचार करतील ही अपेक्षा...

बेफिकीर जी तुमच्या कथा,लेखन खूप आवडायच्या पण तुमच मत ऐकल नी आजपासून Zero Respect , काही मत स्वतः साठी नाही तर दुसऱ्यांसाठी मांडायची असतात, असो तसंही तुमच्या मतमतांतराणे काही फरक पडत नाही पण तेच आपल Respect Down

डोकी भडकवलेली निलाजरी पोरे!
खलिस्तान हवे म्हणून आंदोलन करणारे शेतकरी
देशाचे तुकडे करणारी जेएनयू चे विद्यार्थी
नोटबंदी चा विरोध करणारे भ्रष्टाचारी

आंदोलन व्हायचा अवकाश, यांची लेबले लागायला सुरुवात होतात
नोटबंदी च्या वेळी तावातावाने सरकारची बाजू मांडणारे आज कुठे आहेत?

आणखी एक , त्यांची प्रतिक्रिया वाचायला मज्जा आली असती जे स्वतः सीमेवर आहे किंवा होते , विचारवंत लोकांची काम नाहीत ही

ना कोई घुस के आया ना हम कही गये असे असतानाही आपले जवान कसे मारले गेले हेही माहिती नाही त्याबद्दल पण सॉरी

साधना, कोरोना मुळे गेली दोन वर्षे नेहमीची सैन्यभरती झालेली नाही. त्याबद्दल काही ठोस निर्णय जाहीर न करता ही योजना आणली आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे जे तरूण सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांचा अपेक्षाभंग झाला असणार.
अग्निपथ मध्ये किती तरूण घेणार? त्यातल्या 25% तरूणांना दर वर्षी सामावून घेण्याची सैन्याची क्षमता आहे का? नेहमीची सैन्यभरती बंद होणार का? या योजनेत सैन्याचा काहीच फायदा मला होताना दिसत नाही.
हिंसाचाराचे समर्थन कधीच करणार नाही पण म्हणून विरोधी मत मांडणाऱ्या कोणालाही लगेच लेबलं लावण्याची घाई होते आहे. हे प्रत्येक वेळी घडते आहे. हे अत्यंत चुकीचे पायंडे पडत आहेत.

टीव्हीवर जी आंदोलक पोरे जाळपोळ, सिग्नलखांब तोड वगैरे करताना दिसत आहेत त्यांना एरवी कोणी स्वतःच्या चहाच्या टपरीवर ग्लास नुसते बुचकळून काढायच्या कामावरही ठेवले नसते.>>>
हा अगदी मीन प्रतिसाद झाला. मी असतो तर जाळपोळ, सिग्नलखांब तोड थांंबऊन आधी ह्याचा जाब विचारला असता. अग्निवीर जॉब गेला उडत.

लोकहो,

नेहमीची सैन्यभरती तशीच होत राहणार आहे / थांबली असली तर होणार आहे. ज्यांना नोकरी मिळण्याची, बरी नोकरी मिळण्याची, एकाच नोकरीत टिकून हमखास पगारवाढ मिळण्याची आज शाश्वती नाही त्यांना ही संधी आहे.

Wink

Pages