मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जेफ्री आर्चर लिखीत ' द क्लिफ्टन क्रोनिकल्स ' चे मराठी अनुवादित ६ भाग वाचले . क्लिफ्टन आणि बारींगटन अशा दोन कुटुबाभोवती कथा फिरते . तेव्हाच्या अमेरिकन आणि ब्रिटिश काळाचे वर्णन आहे . पूर्ण वाचल्यावर मला आपल्या इथले ' तुंबाडचे खोत ' ची आठवण झाली. दोन्ही पुस्तकांमध्ये तीन - चार पिढ्यांचा लेखाजोखा लिहिला आहे .

जेफ्री आर्चर लिखीत ' द क्लिफ्टन क्रोनिकल्स ' चे मराठी अनुवादित >>>>> किंडल अनलिमिटेड वर चार उपलब्ध आहेत ते चार वाचून झाले..

वर्णिता..छान पुस्तक परिचय.. लगेच किंडलवर शोधले..सापडले पण अनलिमिटेड वर नाहीए,आलं कि वाचणार.

जेफ्री आर्चर लिखीत ' द क्लिफ्टन क्रोनिकल्स ' मालिका २०११-१६ आहे म्हणजे वाचायला पाहिजे. '७०-'८० घ्या काळाअगोदरची कंटाळवाणी असतात.

वर्णि ता छान परिचय. बुखेन वाल्ड व आउशवि त्झ मधून वाचला हे ग्रेट. मी मध्यंतरी एक युटयुब व्हिडीओ बघितलेला त्यात सहा लोकांच्या वस्तू दाखवल्या व ते ही जिवंत होते म्हातारे. एका बाइकडे एक ब्लांकेट होते ( पण ते मानवी केसांचे बनव लेले. !!!) आउशवित्झ मध्ये थंडीपासून बचावायला तिने वापरलेले. एक केक डिश, एकाचे पोस्टकार्ड जम वलेले फोल्डर असे होते. त्यातील एक बाई म्हणे मी सतरा वर्शाची असताना सुटले तिथून व पुढे तिचा वंश विस्तार भरपूर झाला. मुले नातवंडे पतवंडे. अगदी भरपूर. एखाद्या वंश विनाशाचे गोल कधीही पूर्ण होत नाहीत. पण हे जिनोसायडल म्यानि आक लोकांना कसे समजणार. काही फुले कोमेजली तरी भरपूर वेली वृक्ष वाढतातच. लोक तो सल घेउन किंवा अधिक चेवा ने जगतात. आय होप दे फाइन्ड ह्यापि नेस. दे रिअली डिझर्व .

धन्यवाद सर्वांना Happy

तिचा वंश विस्तार भरपूर झाला. मुले नातवंडे पतवंडे. अगदी भरपूर. एखाद्या वंश विनाशाचे गोल कधीही पूर्ण होत नाहीत >>> बरोबर. अर्थात इथे छळछावणीत हे ही भविष्यात होऊ नये म्हणून 'ब्रोमाईड' हे रसायन कॉफीत घातलं जात होतं. लेखक आणि त्याच्या मित्राने कॉफीची चव का बदलली म्हणून हे शोधून कॉफी बंद केली प्यायची.

23 एप्रिल
आज जागतिक पुस्तक दिन.
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा.

पुस्तकवाचन हल्ली मागे पडत चाललंय फार. आजच्या मुहुर्तावर परत सुरु करायला हवं.

अशोक शहाणे लिखीत नपेक्षा पुस्तक वाचले.
मराठी साहित्यिक,नाटककार,कवी,राजकारणी यांचा आढावा घेतला आहे. बऱ्याच जणांना त्यांच्या चौथऱ्यावरून खाली ओढले आहे.
बंगाली, तसेच परदेशी ( इंग्रजी,फ्रेंच रशियन इत्यादी)साहित्यकृती यांचाही आढावा आहे.
आणि शेवटी दगडांच्या देशाबद्दल.
भारीच पुस्तक.

आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवसानिमित्त डोंबिवलीत पुस्तक जत्रा झाली. एकाला एक पुस्तक फुकट. सकाळी (पहाटे पाच) ते दहापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक वाचकांनी भेट दिली.
१) https://youtu.be/F4L-UrQp2dw
२) https://youtu.be/KqG23-DmXSE
३) https://youtu.be/XglXeI6fp64

मला तिथे एक राजस्थानचे पुस्तक मिळाले. APA - INSIGHT GUIDES RAJASTHAN. (ISBN isbn 9624210624 )

सत्तर ऐंशीच्या दशकाच्या अगोदर होशी पर्यटक अशी पुस्तकं वाचून वेळ काढून स्थळे पाहात असत. नंतर सहल आयोजकांचे राज्य आलं. फक्त किती दिवस आणि कोणता भाग सांगितलं की ते संपूर्ण सहल आयोजन करून देऊ लागले आणि पर्यटकांच्याकडे रीसर्चला वेळ नसल्याने या माहितीपर फोटोंनी भरलेल्या पुस्तकांचं महत्त्व संपलं.

तर एकूण माझं काम झालं. नको असलेली पुस्तकं रस्त्यावर स्वस्तात मिळू लागली.

१) A doll's house -
Ibsen

याचं तीन अंकी नाटक काही थिएटरांत यूकेत वर्षोनुवर्षे चालतं असं वाचलं होतं. उत्सुकता होती की काय आहे ते आता वाचलं.
थोडक्यात - नवीन नाट्यकलाकारांना काम करायची संधी, बायकांचं रडगाणे . . परदेशी स्टाईल, शेवटी भाषण, आणि कुणाला मखरात बसवलं तर कधीतरी मखर काढून घ्यावं लागतं हा संदेश.

२)
मराठी ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास.
डॉ. वृंदा कौजलगीकर.
प्रकाशन २०२०
पाने ३५०

१९६० ते १९९५ या काळात प्रकाशित झालेल्या ग्रामीण कादंबऱ्यांवर समीक्षा आहे वाटलं. पण तसं नाही. लेखिकेचा पीएचडीचा प्रबंध या विषयावर होता.
तर सुरुवातीला काही पाने ग्रामीण कादंबरी म्हणजे काय,ती ग्रामीण मराठी बोलीभाषेतच लिहिलेली असावी काय, व्याख्या,घटक, पार्श्वभूमी, यावर विविध साहित्यिकांची मते जमवली आहेत. नंतर वरील काळात येणाऱ्या ( सर्वच लेखक आणि कादंबऱ्या घेणं अशक्य म्हणून) कादंबऱ्यांसाठी एक्सेल शीट छाप वर्गीकरण आणि मूल्यमापन. लेखक/आशय/तंत्र/मुख्य पात्रे/नायक कोणत्या प्रकारचा - विद्यार्थी,शेतकरी,राजकारणी वगैरे हे उरलेल्या ३०० पानांत. झाली पीएचडी.

(इतरत्र कधीही याबद्दल फारसं वाचलेलं नसल्यामुळे) मला इब्सेन आणि डॉल्स हाऊस म्हटल्यावर पुलंचा लखू रिसबूडच आठवतो Lol नोरा जेव्हा घर सोडून गेली तेव्हा ज्या ह्या झाल्या, दे वेअर ऑफुल.. Happy
म्हणजे एका अर्थाने माझाच लखू रिसबूड होतो!

कादंबऱ्यांसाठी एक्सेल शीट छाप वर्गीकरण आणि मूल्यमापन. लेखक/आशय/तंत्र/मुख्य पात्रे/नायक कोणत्या प्रकारचा
>>> यावरून सखाराम गटणेचं 'समालोचन' आठवलं Lol

वर्णिता, पुस्तक परिचय आवडला.

वावे Biggrin

वाचनालयात "अशीही एक झुंज" -मृदुला बेळे दिसलं. वर्णिता यांनी लिहिलेला परिचय वाचला होता म्हणून घेतलं. हे सगळं आपल्या पर्यंत कसं पोचलं नाही याचं नवल वाटलं. बहुतेक १९८८ साली कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एच आय व्ही एड्स हे शब्द कानावर पडल्याचं आठवतं. पण आफ्रिकेतील त्याच्या भयंकर थैमानाबद्दल, सिप्लाने दिलेल्या लढ्याबद्दल पिंक पेपर्स वाचत असूनही कधी वाचल्याचं आठवत नाही.
कदाचित मीच वाचलं नसेल. पण हे गाजलं नसावं. पुस्तकाचा शेवट ह हेपटायटस वरच्या औषधावर तोच खेळ पुन्हा, तोही अधिक भयंकर रूपात (देन दे केम फॉर मी) या वळ णावर थांबला आहे.
काही गोष्टी किंचित खटकल्या. सिप्लाने दिलेल्या लढ्यावर चित्रपट बनला हे प्रस्तावनेत आलं. पण लेखिका म्हणते मला हे जगासमोर आणायचं आहे. ही माहिती फार कमी लोकांपर्यंत पोचली होती , हे खरं; पण अगदीच कोणीच त्याबद्दल बोललं नव्हतं असं नाही. कुठे कुठे सनावळ्यांचे घोळ झालेत किंवा मागे पुढे झाल्याने गोंधळ होतो. एका प्रकरणात अचानक हमीद यांचा उल्लेख एकेरी झाला आहे. अर्थात या चुका अगदीच बारीकसारीक आहेत.
---
अक्षरकथा - संपादन डॉ मंगला आठलेकर. निवडक मराठी कथांच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघालेली पाहून बरं वाटलं. पण एक आवृत्ती किती प्रतींची ते कुठे कळतंय?
यातली गौरी देशपांडेंची कथा कारावासातील पत्रे वाचवली नाही. एवढ्या सगळ्या पात्रांचा माग कसा आणि कशाला ठेवायचा असं वाटलं. ठेवला नाही बिघडत नाही म्हटलं तरी काय सांगायचंय काही कळत नव्हतं. जी एंची प्रदक्षिणा टिपिकल जी ए कथा आहे. नुकतंच मभागौदि मध्ये जी एंच्या कथांवरचे दोन लेख वाचले असल्याने ही कथा अधिक भिडली. त्यातली सौंदर्यस्थळे नीट दिसली असं म्हणता येईल. सुरुवातीला जोवर कथानक - घटनांचे धक्के बसत नाहीत तोवर उपमा स्तिमित करत जातात. सानिया , आनंद जातेगावकर, भारत सासणे यांच्याही कथा आवडल्या. मंगला आठलेकरांची प्रस्तावना किंवा संपादकीय कथा वाचल्यानंतर वाचायला हवं होतं.

सध्या सतीश तांबेंचा काम तमाम @ वाघा बॉर्डर वाचतोय . १६०+ पानांत चारच कथा. त्यांच्या कथांत नेहमी असतं तेच आहे. एका कथेत दंगलीत एका मुस्लिम तरुणाच खू न होतो, त्यावरून दंगलीची अ‍ॅनॉटॉमी. मग तिची सद्य परिस्थितीशी अगदी नावं लिहून सांगड. एका कथेत भीमा कोरेगाव अर्बन नक्षल अटकांची पार्श्वभूमी आहे. तर एकीचं शीर्षक ' होय! मला कमळाबाईवर खटला भरायचाय.'
मूळ थीमशी सगळं कथन जुळवताना हलकासा धक्का देतात. दोन कथा वाचून झाल्यात आणि एक दिवाळी अंकात वाचली होती. प्रत्येकीत खून किंवा अपमृत्यू आहे.

हेम , बरे झाले सांगितलेत . आता ७व्या भागासाठी लायब्ररी मध्ये नंबर लावून ठेवते . सहावा वाचला तेव्हाच पूर्ण नाही असे वाटले होते .

काम तमाम @ वाघा बॉर्डर या कथेत सतीश तांबेंनी टच्याआले आणि त्यांच्या टिपिकल वाचक्/चाहते /भक्तांवर बरंच काही लिहिलं आहे. त्यातलं काहीही न पटण्यासारखं वाटलं नाही.

१) The Namesake
- Zumpa Lahiri.
First Published 2003.
The Pulitzer prize winner writer for her book 'Interpriter of Maladies.
Pages 290.

भारतीय ते युरोपिअन ते अमेरिकन संस्कृतीचा प्रवास करणाऱ्या गांगूली कुटुंबातील अशोक आणि आशिमा यांच्या निखिल उर्फ गोगोल मुलाची जीवनकथा. नेहमीचाच मसाला. संस्कृतींचा जुळवून घेण्याचा लढा. भरपूर प्रेम प्रकरणं. अशा जीवनपट कादंबरीत शेवट कोणत्या घटनेला करायचा हे ठरवायचं आहे.

लेखिका काही वर्णने पाल्हाळीक करते तर कधी उरकते. निखिलच्या जन्माची कथा वीस पाने तर नंतरच्या सोनियाची एन्ट्री एका ओळीत.
गोगोलच्या पाच युरोपिअन गर्लफ्रेंडशी ओळख,सहवास किंवा बर्थडे डान्सपार्ट्या सविस्तर. मग मौशुमीचं प्रकरण, लग्न आणि तीच याला सोडून(dump) दुसऱ्याशी जमवते .

गोगोलचे वडील अशोकला पुस्तकं वाचण्याच्या आवडीतून त्यांनी आवडता रश्यन लेखक निकोलोय गोगोल यावरून मुलाचे लेखी सूचक नाव 'निखिल' आणि टोपणनाव 'गोगोल' ठेवलेले असते. या टोपणनावानेच मुलाला ओळखत असतात. तो भारताबाहेरच वाढतो आणि ते नाव पुढे त्याला नकोसे होते.
अशोकचा विसाव्या वर्षी एक रेल्वे अपघात झालेला असतो त्यावेळी तो निकोलायचेच पुस्तक वाचत असतो. अपघातानंतर शोध घेताना 'पुस्तक वाचत असलेला एक जखमी प्रवासी' सापडतो.
पुस्तकाच्या शेवटी मौशुमी सोडून गेल्यावर विमनस्कपणे 'निखिल' वडलांचे आवडते पुस्तक धूळ झटकून वाचायला उघडतो आणि वाचक 'The Namesake' मिटतात.
( अशोकचे पात्र लेखिकेच्या वडलांवर आणि नावात बदल हे तिच्या स्वतःच्या जीवनावर बेतलेले आहे.)
___________________

२) Interpreter of Maladies
- zumpa Lahiri
1999
The Namesake' पुस्तक वाचल्यावर साहजिकच zumpa Lahiri हिचा परिचय वाचला विकिपेजातून आणि पुरस्कार मिळालेला हा कथा संग्रह वाचायला घेतला. याच नावाची कथा या संग्रहात आहेच. ' Mr. Pirzada comes to dine' ही सुद्धा छान कथा आहे.

झुम्पाचा (निलंजना) जन्म १९६७ चा. बांगला देशची लढाई १९७१ ची. फाळणी १९४७ची तरीही निर्वासित यांच्या कथा किती छान लिहिल्या आहेत. इतर विषय भारतातून अमेरिकेत गेलेले लोक आणि त्यांचे प्रश्न.

माहितीपर पुस्तकं अधिक वाचतो. पण भावनिक गुंतागुंत 'human touch' असलेली ही पुस्तकं फारच आवडली.
लेखिका कथा फार चांगली सांगते (story teller) आणि तिचे इतर साहित्य लवकरच वाचून काढणार.

खूप काही सांगता येईल पण जमेल तसा परिचय देण्याचा कोरडा प्रयत्न केला आहे.

Pages