आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा दुसऱ्या धाग्यांवर दिसल्या.
--
मराठी कुडी+१
काही दिवसांपूर्वी अप्पा कांचनला म्हणाले - तुला हाताला धरून घराबाहेर काढेन.
काल अनिरुद्ध संजनाला म्हणाला.
मग आईलाच घराबाहेर काढल़ं.

घर शेवटी पुरुषाचंच असा संदेश जातो.

कांचनने अप्पांना सांगितलं - अरुंधतीच्या बाबत मी चुकले असं मला वाटत नाही. तरी ही बाई तिला पोटाशी धरून बसली.

मुळात अरु टाइप लोक्स एकदम लो सेल्फ एस्टीम वाले आहेत. त्यांना बेसिक थेरपी हवी. वेठ बिगार मजूर मानसिकता आहे ही.

नित्याची बायको गंभीर आजारी आहे तरी हा इथेच आजोबाचे कवतिक ऐकत बसला आहे. >>>+१ वरून अशूला सांगतो कि दवाखान्यात दाखल आहे चाचण्या चालू आहेत पण निदान काही होत नाही. बहुतेक तो घरात नसतो याचाच तिला मनस्ताप होत असेल.
घर शेवटी पुरुषाचंच असा संदेश जातो.>> नाही हो. ते काहीही बोलले तरी अरूला वाटले तेव्हा ती घराबाहेर पडली. आजी इतके बोलली कि अप्पा घर सोडून गेले. आता सगळे बोंबलायला लागले कि संजना त्यांना घराबाहेर काढेल. सबका नंबर आनेवाला है इस घर में!

कालच्या भागात घरात फक्त अरू आणि अप्पा यांचा संवाद सुरू होता. तर प्रत्येक वाक्याच्या आधी किंवा नंतर अरू ‘अप्पा’ म्हणत होती. ते अप्पा, अप्पा, अप्पा डोक्यात गेलं.

मधे एका एपिसोड मधे शेखर आला होता आणि कान्चनला एकवुन गेला ते भारी होत, त्याचा एक डॉयलॉग भारी होता कान्चनला" डोक काय फक्त आन्बाडा बाधायला दिलय का?"
काही म्हणा शेखर शिवाय तडका नाही सिरियलला.

हा काय वेडेपणा आहे. घर सगळ्यांच असल पाहिजे ना. रोज एक माणूस दुसर्या माणसाला काढायला निघालाय. >>>
डोक काय फक्त आन्बाडा बाधायला दिलय का >> Lol

टर्शरी कॅरेक्टर वाचून टोटल फुटलो.

नित्याची बायको गंभीर आजारी आहे >>> त्या उपकथानकाचे पुढे काही दाखवले आहे का? की फक्त त्या एपिसोडमधे त्याची इमेज भारी करायला ते वापरले आहे? आणि हे सगळे लोक मोबाईल फोनपूर्व जमान्यात असल्यासारखे का वागतात? तो अनिरूध्द दिल्लीला असतो तर त्याला इथल्या घडामोडी परत येइपर्यंत माहीत नाहीत. या नित्याला बायको आजारी आहे तर पुन्हा दवाखान्यात जाइपर्यंत पत्ता नाही की नक्की काय डायग्नोसिस आहे.

बाय द वे, त्या प्रकाशन समारंभात अरूंधती इतर २-३ गायकांसारखीच फक्त एक गायिका होती ना? मग हा "तिचा इव्हेंट" कसा काय? तो तर एका अल्बम चा इव्हेण्ट आहे. त्यात संगीतकार व इतर लोक तितकेच महत्त्वाचे असतील.

एक पत्रकार विचारतो तुम्ही हा अल्बम भारतात पब्लिश करायचा हे का ठरवलेत? नाहीतर कोठे करणार मग.

तो अनिरूध्द दिल्लीला असतो तर त्याला इथल्या घडामोडी परत येइपर्यंत माहीत नाहीत. >> त्याचा फोन कुणी उचलत नाही म्हणे

नितीनच्या बायकोच्या आजाराचे निदान होत नाहीये.
अनिरुद्धला संजना ने फोनवर काही सांगितलं नाही. अप्पा त्याचा फोन घेत नव्हते.
आशुतोषचे आधीचे अल्बम मेड इन अमेरिका होते. तो नुकताच अमेरिकेहून परत आलाय. तिथे म्युझिक शिवाय दुसरं काय करायचा माहीत नाही.
प्रकाशन समाऱंभाबद्दल हे प्रश्न इथे लिहिले होते. मग समारंभात संगीतकार, आणि दुसरा एक गायक व गायिका आणले. टायटल सॉंग अरुंधतीने गायलं आणि तिला लॉन्च केलं .

हाइट म्हणजे संगीतकार आणि गायिका थेट रेकॉर्डिंगला भेटले.

हाइट म्हणजे संगीतकार आणि गायिका थेट रेकॉर्डिंगला भेटले. >>> Lol

हो तो आशुतोष अमेरिकेहून आलाय वगैरेचा उल्लेख ऐकला होता आधी. 'सुखाचे चांदणे' छाप अल्बम भारतात का प्रकाशित केला असा प्रश्न कोणी पत्रकार विचारू शकतो हेच आश्चर्य वाटले मला. एकतर त्या गाण्यातही टीपिकल मराठी सिरीयल्स ची शीर्षकगीते असतात तसेच काहीतरी नेहमीचे शब्द फिरवले आहेत. काही नावीन्य वगैरे वाटले नाही. आणि अरूंधती आता घरोघरी लोकप्रिय होणार म्हणे.

दुसऱ्या धाग्यावरून: या सिरीलमध्ये प्रौढ वयातली लैंगिकता हाताळली गेली आहे का?

एकदा नवर्‍याला खरे बोलली तर >> >> >> पण ते खुप चुकीच बोलली. नाही पटल. व्हॉट डझ शी मीन, तुम्ही काय केल घरासाठी? आप्पान्ची तुलना अन्याशी केली हे तर टु मच होत.

नित्याची बायको गंभीर आजारी आहे तरी हा इथेच आजोबाचे कवतिक ऐकत बसला आहे >> >> >> नैतर काय? आणि वरुन आपण खायला मागवूया का, खुप भूक लागलीये. हे त्याच नेहमीच पालूपद चालूच होत. बायको हॉस्पिटल मध्ये आहे ह्याची त्याला काहीच पडलीय नाहीये का?

आज म्हातार्‍याने परत विनंती केली अरू शी लग्न करा म्हणून. हे सासरा विधवा सुनेचे लग्न लावून देतो हे फार घिसे पिटे आहे. >> >> >> अगदी अगदी

या सिरीलमध्ये प्रौढ वयातली लैंगिकता हाताळली गेली आहे का? >> >> >> अवो नाय वो, आपल्या मराठी सिरियल्स एवढया प्रगल्भ कुठे आहेत हे सगळ दाखवायला?

शेखर कांचनआई कांचनआई करत सुनाऊन गेला, तो सीन त्यांच्या fb पेजवर पाहिला, भारी होता, शेखरच्या अभिनयाची पावती देऊन आले लगेच तिथे.

: या सिरीलमध्ये प्रौढ वयातली लैंगिकता हाताळली गेली आहे का?>> तसे काही नाही व आणू पण नका कृपया. जनरल मजा चालू आहे फक्त.
हिरो बाल बुद्धी आहे व हिर्वईण आई मानसिकतेची आहे. अ‍ॅट द मोस्ट पदराने केस पुसणे होईल.

आजचा भाग एकदम टीपी आहे. आज्जा फक्त स्वतः आत जाताना अरूला आशूवर प्रेम कर अशी सूच्नाच देउन जातो. मग परत परत एक फ्लॅश बॅक.
अन्याने बाप् परत आल्यावर मिठी मारली. आता सर्व घटनेचे तेच तेच गुर्‍हाळ पोस्ट मॉर्टेम चालू आहे.

पुढील भागात संजना कागदो पत्री घर माझे आहे सांगते व अरु आता भविस्याचा विचार कर णार आहे अशी ग्वाही आशूला देते. सो दळण

पुढील भागात संजना कागदो पत्री घर माझे आहे सांगते >>>>> संजना ने काही मुद्दे बरोबर माण्डले. काही बाबतीत खर बोलली ती. उदा. ह्या घरात जराही प्रायव्हसी मिळत नाही. सतत दुसर्यान्च व्हॅलिडेशन लागत, प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्यान्ची परवानगी घ्यावी लागते. लोकान्ची मने जिन्कली तरच ते आपल्याला स्वीकारतात का? घरच्यान्ना अरुचा मध्येच पुळका येऊ लागतो, इतरवेळी तिला हिडिसफिडिस करतात वगैरे वगैरे.

संजनाचा लग्न करण्यामागे क्रायटेरिया एकच असतो- नवरा कमावता असणे. नवरा आर्थिकदृष्टया भक्कम नसला तर त्याला सोडून दयायच. प्रेम गेल खड्डयात. आधी शेखरला ह्याच कारणासाठी सोडल, आता अन्याला सोडून आशुतोषच्या मागे लागायची.

तिला घरातली माणसे नकोत, पण ते घर मात्र हवय.

संजना ने काही मुद्दे बरोबर माण्डले. काही बाबतीत खर बोलली ती. उदा. ह्या घरात जराही प्रायव्हसी मिळत नाही. सतत दुसर्यान्च व्हॅलिडेशन लागत, प्रत्येक गोष्टीसाठी दुसर्यान्ची परवानगी घ्यावी लागते. लोकान्ची मने जिन्कली तरच ते आपल्याला स्वीकारतात का? घरच्यान्ना अरुचा मध्येच पुळका येऊ लागतो, इतरवेळी तिला हिडिसफिडिस करतात वगैरे वगैरे.>> अगदि अगदि!

नित्याने व्हॉईस मेसेज पाठवला . कायतरी गडबड वाटते. त्याची बायको बरी आहे ना? ओव्हरएक्साईटेड वाटत होता.

आजच अरुच गाण तिच्या आवाजात होत की दुसर्या गायिकेच्या आवाजात?

अनिरुद्ध अचानक एवढा कसा बदलला? आधीच्या भागात अरुंधतीमुळे बाबा घर सोडून गेले असं त्याला वाटत होतं. आता तिच्यामुळे परत आले. तिनेही परत येत राहावं म्हणतोय. संजनाशी लग्न करून चूक केली. कांचननेही तिला सणावाराला, आम्हांला भेटायला येत जा सांगितलंय.

एकूण काय तर तेच दळण आणि तेच वळण.

आशुतोष इतकी वर्षे अमेरिकेत होता. त्याने तिथे दोन अल्बम काढले होते. पण तो अल्बम तिथे हिट झाल्याचं सांगायला त्याचं अमेरिकेत कोणी नाही! त्यासाठी नितीनची बहीण लागते.

आशुतोषची संवादफेक शाळेतली मुलं वक्तृत्वस्पर्धेत भाषण पाठ करून म्हणतात , तशी आहे. त्याला संवादही तसेच आहेत. सुविचार, तत्त्वज्ञानाचे काजूबेदाणे वाक्यावाक्यात पेरलेले.

अनिरुद्ध अचानक एवढा कसा बदलला? आधीच्या भागात अरुंधतीमुळे बाबा घर सोडून गेले असं त्याला वाटत होतं. आता तिच्यामुळे परत आले. तिनेही परत येत राहावं म्हणतोय. संजनाशी लग्न करून चूक केली. कांचननेही तिला सणावाराला, आम्हांला भेटायला येत जा सांगितलंय. >>>>>> कारण सन्जनाने फ्रॉड केला घर स्वत:च्या ताब्यात घेऊन. काही नाही, तिच्यापेक्षा अरु बरी अशी काही काळापुरती उपरती आली आहे आई आणि मुलाला. पुन्हा आशुतोष दिसला रे दिसला की येरे माझ्या मागल्या करतील ते.

सुविचार, तत्त्वज्ञानाचे काजूबेदाणे वाक्यावाक्यात पेरलेले. >>> हाहाहा, भारी वाक्य. बघायला हवेत त्याचे संवाद.

आशुतोस हा साधारण पणे अभिजीत पेक्षा मोठा लग्न न झालेला घोड मुलगा आहे तसा वावर त असतो. बि झनेस येत नसावा म्हणून तो नित्यावर टाकला आहे.

आज पण भावीकांसाठी संजना दर्शन आहे. पन तिला घ्यायला पोलिस आले आहेत. अरू ने कंप्लेंट केली आहे - हे संजनाचे स्वप्नच ठरते.
ती उठते व जाम घाबरलेली आहे. शेखरने तिला फोन करुन वागणे सुधारायची धमकी दिली आहे.

आशू आरू ऑफिसात काम करत आहेत. आता लाइव्ह शोची लगबग चालू आहे. उसासे क्वीन आढे वेढे घेत हो करीन मी एक शो असे कबूल करते. आशू बावळट प्रेमिक असल्याने अरुंधती अरुंधती जसे मुले मम्मा म्म्मा करतात तसे करत शोज ची रुजुवात करत आहे. पण नित्याचा फोन येतो. त्याची बायको गंभीर आजारी आहे लंग्ज मध्ये पाणी झाले आहे. म्हणजे अन डिटेक्टेड लंग कॅन्सर असेल. बहुतेक. व्हेंटी लेटर वरच आहे. तर नित्या म्हणतो खू प भीती वाट्तेय यार!!!

नित्या अ‍ॅज युझवल वर्शा कडे लक्ष दिले नाही. लग्नाच्या वाढदि वसाला तिला बाहेर ने णार होता. अरु त्याला उसासत धीर देत आहे. तो पण म्हणतो मनातली भावना बोलुन दाख वली पाहिजे. ही फक्त त्याला फ्रेंड झोन करून ठेवले आहे तेच अधोरेखित करत आहे. तिला आशूच्या प्रेमाची गरज नाही असे ती विचार करत आहे.

अरु जिगर कुठे आहे विचारते. बहुतेक त्याला पण घरी ठेवुन घेइल.

सॉरी मध्येच कुत्रा फिरवणे घरची कामे भांडी/ धुणे वाळत टाकणे. स्वतंट्र स्त्रीला पन कामे असतंत.

तर अरु स्वतःशीच मला काही आशू बद्दल प्रेम नाही. फक्त मैत्री असते. नित्या वर्शा सारखे प्रेम नाही. मी फक्त आणि फक्त अनिरुद्ध वरच प्रेम केले आहे.( सीरीअल की डिमांड) माझे वयही नाही आनी गरज ही नाही म्हणे. म्हणजे हिचे अन्यावर प्रेम. त्याने चपले खाली ठेवले तेच हिला नॉर्मल आहे. सर्व गरजा एकंदरीत डिनाय केलेल्या दिसतात.

आजी बाहेर बसल्या आहेत. इशा घशात अडकेल इतका अशोभनीय लाडीक पणा करत आज्जुडी करत आजीच्या गळ्यात पडते. व बोबडे बोलत आहे. ( हिंदी सिनेमातील पूर्वीच्या थोराड नायिका गाउन घालुन पाइप ओढणार्‍या वडिलांच्या गळयत पप्पा करुन पडत व मै सहेलियोंके साथ कश्मीर जा रही हु म्हणते. त्या लेव्हल इरि टेशन!!!) मग तो बाबा म्हणतो बर लाडुली कश्मीरचा बंगला उघडून ठेवायला तार पाठव.

अप्पा येतो व फिरायला बाहेर जातो म्हातारीस नेत नाही. संजना येते व लाडीगोडी करत आहे. ओरडा आर्डा करून विमल ला बोलवते व आजीसाठी काही तरी कर खायला मी पण तेच खाईन म्हणते. आई तुम्ही प्लीज प्लीज चिडू नका म्हणते मला तुम्ही सगळे हवे आहात चांगली सून बनायचा प्रयत्न करत आहे म्हणते. आई संजनाचे कान पिरगळते. शेखर व पोलीस येतात.

खंग्री मॅन एकदम जोरात संगीत देत आहे. संजनाची फाटली. तिला एकदम आपल्याला अटक होणार् वगैरे भीती वाटत आहे. पण वरून गप्प आहे.

पूढील भागातः आई व अन्या बोलत आहे. संजनाबरोबर मी राहू शकेन असे वाटत नाही असे अन्या म्हणतो. आशू परत परत आपली अरु वरची डिपेंडन्सी दाखवून देतो आहे. पायाशीच बसेल बहुतेक आरु प्रेमिकेच्या.

बि झनेस येत नसावा म्हणून तो नित्यावर टाकला आहे. >>>>>>> अगदी अगदी. त्याचे भोग नित्याच्या बायकोला भोगावे लागत आहे.

गरज ही नाही म्हणे. >>>>>>>>> नसेलही गरज तिची. पण अन्यावर अजूनही प्रेम आहे हे म्हणणे तर टु मच!

हे संजनाचे स्वप्नच ठरते. >>>>>>>> हिच्या स्वप्नातही ( तिचे कपडे सोडून) सगळयान्चे कपडे आज घातलेलेच होते! हे कस काय बुव्वा?

नित्या अ‍ॅज युझवल वर्शा कडे लक्ष दिले नाही. लग्नाच्या वाढदि वसाला तिला बाहेर ने णार होता. अरु त्याला उसासत धीर देत आहे. तो पण म्हणतो मनातली भावना बोलुन दाख वली पाहिजे.>> मला तर वाटत फक्त तेवढ्या एक वाक्य बोलता याव म्हणून नित्याच्या इमॅजनरी बायकोला आजारी पाडलय... एरवी बायकोच्या आजारपणाच निदानच होत नाहिये,नित्याला दुसर कोणी नाही जवळच अस तोच १० वेळा म्हणतो तर कशाला हा प्राणी अल्बमच एवढ टेशन घेइल तेही उसासे क्विनसाठी??
बाकी कान्चन-अन्याच्या मताचा लोलक अरुसाठी " आय हेट अरु ते आय लव्ह अरु " इतका व्हॅरी होतो पण अरु मात्र १०० लाथा खावुन परत परत त्याच सासुच्या चरणि लिन व्हायला जात असते.

लाथा खावुन परत परत त्याच सासुच्या चरणि लिन व्हायला जात असते.>>+१
अन्यावर अजूनही प्रेम आहे हे म्हणणे>> काय? अजूनही चान्स आहे तिला मग संजनाचा बदला घेऊ शकते ती.
एव्हढे करूनही नवरा आणि सासू तिच्या मनातून उतरले नाहीत. अशी लोकं तिला तिच्या आयुष्यातून जायला नको आहेत, कमाल आहे अरूची.

येतो. त्याची बायको गंभीर आजारी आहे लंग्ज मध्ये पाणी झाले आहे. म्हणजे अन डिटेक्टेड लंग कॅन्सर असेल. >>> अरेरे! का त्या कघीही न दाखवलेल्या व्यक्तीरेखेचा जीव घेतात? फक्त अरूला वेळ आहे तर आताच लग्न कर, मजा कर सांगता यावे म्हणून!

आज गोड आवाजाची सुलेह्खा ताई देववर विश्वास ठेव वगैरे पीळ मारते आहे. नित्या बिचारा रडत आहे. मागे गणेशाची मूर्ती. ती तरून आहे.
म्हणजे आशूने उडाण ट्प्प्पू पणा करायला वेळ हवा म्हणून नित्याने बिझनेस अंगावर घेतलेला आहे उसासे क्वीन कॉफी पाजते व डबा पण घेउन येइल. भिजकट प्रेमी तुम्ही बायका तुम्हा बायकांना करत नावे ठेवत आहे. आजी सुले खा पॉजिटिव पॉजिटिव चा जप करत आहे. नित्या वर्शाच कोणी नातेवाइक नाहीत वाट्ते. तेच तेच परत परत बोलतात. मग हे दांपत्य गेल्या वर नित्या देवाला हात जोडत आहे.

आरु आशू गाडीत आहेत. उसासे क्वीन आशू बाळाला समजावत आहे. नेहमीचा मोड. बालाला फार गिल्ती वातंतं आहे. त्याचा संवाद एकदम तुम्ही बायका. तुम्ही किती सेल्फलेस असता. असं काय करता तुम्ही. अरू पायतय्ल्या वाहाणेचे विचार बोलुन दाख् वते. मेडिकल चेक अप करुन घे. व्यायाम कर जेवन वेळेवर ताजे जेवावे, टेस्ट करून घे. तुला काय झाले तर माझे काय होईल अरु हा स्वार्थी प्रेमळ विचार आहे ह्या मागे.

मध्येच शेखर पोलिस मित्रा ला घेउन संजनाला अटक करायची बतावणी करतो हा एक विनोदी सीन आहे. ह्यात विमल पण येते व चार वाक्ये बोलते.

अरु ला एकदम प्रेमाची झुळूक बसल्याने बावरते. खंग्री मॅन सर्व विसरुन स्वतः च हे हे हे करत गायला लागलेला आहे. एसीतही महिरली आहे ती.

नित्या म्हण्जे एकूण आशू बाळाच्या पायातली वाहाण टाइप वागवले आहे. कितीव्बोल्तो हा. पका पका पका चालू आहे. एकूण हाताखालच्या लोकांना मनाला येइल तसे वागवणे हा ह्याचा स्वभाव आहे. नितीन ने संपूर्ण आयुश्य मला वाहिले आहे म्हणे. म्हणून ह्याला गिल्टी वाट्ते आहे आता.

अरु लगेच शान पट्टी माझा मुलगा डॉकटर आहे. तुम्ही चिड्चीड नका करू वगैरे समजूत घालते. आता आशू वर्शा बरी व्हायलाच हवी ह्या ध्ये याने पेटलेला आहे. माझी माणसे त्यांच्यात माझा जीव गुंतलेला आहे. नितीन ला खूप कामे सांगतो. ह्याव अन त्याव चालू आहे. पुस्तकी संवाद बोलतो बाळ.

घरी आई व अन्याचा संवाद चालू आहे. अन्या आपली चूक कबूल करतो. संजना ते बाहेरून ऐकते. व रडते. पण नेल पॉलिश व मॅनिक्युअरच

लक्षात राहते आहे. घर व अन्या हातात राहेल असे काहीतरी केले पाहिजे. मग तो आईचे पाय चेपत बसला आहे.

अरु घरी येते व तीन ही बाप्यांनी सांगितलेला प्रेमा चा सिग्नल तपासून बघते. तू आशूच्या प्रेमात पड असे नित्या, अप्पा व खुद्द आशू सांगत आहेत.
व तिला भाजीत पीठ मीठ घालताना आशूची आठवण येते आहे. इश्काची इंगळी कधी डसणार बरे ह्या धुवट जोडप्याला?! बाई बाई ग.
व्याख्या विख्ही वुख्हु.

<मला तर वाटत फक्त तेवढ्या एक वाक्य बोलता याव म्हणून नित्याच्या इमॅजनरी बायकोला आजारी पाडलय..>+१. पण डायरेक्ट व्हेंटिलेटरवर ठेवलं.
आणि बायको व्हेंटिलेटवर असताना हा अरुंधतीच्या आयुष्यात काय काय होऊ शकलं असतं याचा विचार करतोय?
आता तिला मारली नाही म्हणजे मिळवली.
अरुंधती म्हणते - आशुतोष सगळ्यांचं किती काय काय करतात.

कुठे? कधी? कसं? तेही नितीनच्या अशा अवस्थेत. बायको आजारी असताना सुद्धा त्याला आशुतोषच्या मागे पुढे नाचावं लागतंय.
तो अरुंधतीसाठी सुद्धा स्वतः काही करत नाही. नितीनला ऑर्डरी सोडत असतो.

या ट्रॅकचं लेखन पारच गंडलंय.

कालचे इशाचे संवाद भलतेच पकाऊ होते.

Pages