Absurdle व Dordle ! वर्डलच्या २ पाउले पुढे...

Submitted by कुमार१ on 24 January, 2022 - 11:26

इथे काही दिवसांपूर्वीच माबोकर व्यत्यय यांनी काढलेला Wordle चा धागा लोकप्रिय झालाय (https://www.maayboli.com/node/80915)
तो खेळून अनुभवी झालेल्यांसाठी सादर आहे या खेळाची नवी आवृत्ती Absurdle !

नवोदितांनी प्रथम Wordle शिकून त्याचा आठवडाभर तरी सराव करावा. दैनिक Wordle खेळ इथे असतो : https://www.powerlanguage.co.uk/wordle/

Absurdle हा नवा खेळ Wordle च्याच धर्तीवर आहे. म्हणजे तीनरंगी चौकटींचा अर्थ पूर्वीप्रमाणेच. या खेळातील बदल/वैशिष्ट्ये अशी आहेत :
१. इथे निर्मात्याने गुपित ठेवलेला ओळखायचा शब्द पक्का नसतो. खेळाडूच्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर तो बदलत जातो. परंतु खेळाडूने आधी ओळखलेल्या अक्षरांवर त्याचा परिणाम होत नाही.
२. खेळाचे एकूण प्रयत्न तसे अमर्यादित ठेवले आहेत. वर्डलप्रमाणे पक्के ६ नाहीत.

३. अशा प्रकारे खेळत आपण एका ‘योग्य’ शब्दाशी पोचतो. आता आपल्याला वाटते की आपण जिंकलो; पण नाही !
४. खेळाची यंत्रणा लगेच बदलून नवा शब्द अपेक्षिते. अशा बदलत्या अपेक्षित शब्दांची संख्या बर्‍यापैकी असू शकते. उदाहरणार्थ मी खेळून पाहिलेला spool हा शब्द बघा :

Absurdal screen.jpg

५. तो मी ८ प्रयत्नात सोडवलाय. यात तुमच्या लक्षात येईल की तिसऱ्या ओळीतच मी एक अधिकृत इंग्लिश शब्द scoot शोधला होता. पण तो अपेक्षित नव्हता.
६. चौथ्या प्रयत्नात मी spoof हा शब्द ओळखला पण लगोलग त्यांची यंत्रणा बदलली आणि spoo* अशी रचना असलेले पण शेवटचे अक्षर भिन्न असलेले अजून काही शब्द त्यांनी खेळात सोडले.
७. शेवटी spool हा शब्द आला तेव्हा त्यांचा हा साठा संपला. म्हणून ते उत्तर बरोबर ठरले !
.....
हा खेळ एकत्रित स्वरुपात कायमस्वरूपी उपलब्ध आहे :
https://qntm.org/files/wordle/
याचा दैनंदिन प्रकार नसावा; मला तरी सापडला नाही. म्हणजेच, इथे अमुक एक कोडे क्रमांकचे उत्तर सर्वांसाठी एकच हा प्रकार नाही. प्रत्येक खेळाडूच्या चालीनुसार त्यांची यंत्रणा अपेक्षित शब्द बदलत राहते. पहिल्या चालीसाठी आपल्याला जर स्वतःचा शब्द सुचत नसेल तर त्यांनी Random guess चा तयार पर्याय ठेवलेला आहे. ते बटन दाबले तरी चालते.

सारांश : या खेळात निव्वळ तर्कापलीकडे जाऊन निर्माता आपला शब्दसंग्रह पूर्ण खुला करुन ‘बाहेर’ काढायला उद्युक्त करतो. इथे लवकरात लवकरच्या पायरीवर उत्तर आले याचे कौतुक नसून ते आपला खेळ मुद्दाम अधिकाधिक लांबवत नेतात. तीच या खेळाची मजा आहे.

वर्डलव्यसनी मित्रहो,
आता तुमच्या व्यसनांमध्ये याही खेळाची भर घालून टाका !

पण घाबरायचे कारण नाही. शब्दांचे तळीराम झाल्याने नुकसान काहीच नाही !!

तर्कबुद्धी तर तल्लख होईल आणि शब्दसंग्रह सुद्धा विकसित होईल !!! Happy
………………………………………………………………………………………………………………………
Dordle हे जुळे वर्डल असून इथे खेळता येईल:
https://zaratustra.itch.io/dordle

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या देशाचा आकार आणि नाव दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण.

नुकतेच 21 जून ला त्याच्याबद्दल अन्यत्र लिहिले होते.

जगातील तीन देशांचे एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला असतो.

आजचा देश या तिघांपैकी एक आहे

+११
द्वीपसमूह : आताच वाचले दोघांच्याबद्दल !
#Worldle #178 3/6 (100%)

179.png
आजचा देश शोधणं अशक्यप्राय होतं. तो नकाशात दिसत नाहीए , हे कळलं. मग असे कोणते इवले इवले देश त्या भागात आहेत, ते आठवून शोधलं.

आजच्या पिटुकल्या देशाचा नकाशा पण मजेदार आहे
जणू एखादे लहान बाळ मांडी घालून बसले आहे आणि त्याच्या अंगावर नक्षीदार बटनांचा कोट चढवला आहे...

Daily Quordle 189
४...६
७...९
quordle.com

जमले.

https://worldle.teuteuf.fr/
भूगोलाच्या वरील खेळात नुकतेच त्यांनी काही नाविन्य आणलेले दिसते.

देश ओळखून झाल्यानंतर पुढे काही फेऱ्या सुरू होतात.
त्यातल्या पहिल्या फेरीत दोन नकाशे देऊन संबंधित देशाचे शेजारी ओळखायचेत. त्यानंतर पुढच्या फेरीत देशाची राजधानी आणि नंतर देशाचा झेंडा ओळखायचा असतो.

हे गुगल न करता न आल्यास खरी मजा.
पाहून उत्तर दिल्यास सामान्यज्ञानाची उजळणी ! Happy

रेल्वे चाहत्यांसाठी रेल्वेचे तीन अक्षरी वर्डल :
https://irfca.org/irfca-wordle/

ज्या स्थानकांचा संकेत तीन अक्षरी असतो तशी स्थानके नेहमीच्या पद्धतीने ६ प्रयत्नात ओळखणे.

अगदी !
सर्व फेऱ्या खेळून पहा. गंमत वाटेल.

14 देश ओळखायला मजा आली. मला 16 attempts लागले. तरी त्यांनी शेजारी बघताना फक्त भूसीमा घेतल्या. सागरी सीमा घेतल्या तर आणखी 2 देश add होतात.

आणि एक interesting गोष्ट म्हणजे 14 पैकी 2 देश आजच्या देशाच्या exclave चे शेजारी आहेत. त्या 2 देशांची बॉर्डर आजच्या देशाच्या मुख्य भागाशी लागून नाही.

बरोबर !
मला देखील ते दिसून आले

***सागरी सीमा घेतल्या तर आणखी 2 देश add होतात.
>>>अमेरिका व जपान हे रशियाचे सागरी सरहद्दी देश आहेत ही माहिती रंजक आहे.

Happy पण नेहमीच फक्त भूसीमा घेतात असेही नाही. परवा कॅनडा होता तेव्हा कॅनडाला 3 शेजारी देश आहेत हे मला नवीनच ज्ञान होते. मी 2 समजत होतो. विचार करुनही तिसरं कोण काही कळेना. शेवटी गूगल केले. कॅनडाचा शेजारी फ्रांस हे टोटल सरप्राइज! (Saint Pierre and Miquelon बेटांमुळे.) म्हणजे linguistically ते जवळ आहेत हे माहिती होते पण geopolitically सुद्धा जवळच आहेत हे नाही.
तेव्हा रियलाईज झाले की फ्रांसने अजूनही जगभर वसाहती ठेवल्या आहेत. उद्या Worldle मधे फ्रांस आला आणि फक्त भूसीमा पाहिल्या तरी 'फ्रांसचे शेजारी - ब्राझील आणि सुरीनाम' यासाठी तयार रहा Lol त्यात जर त्यांनी सागरी सीमा घेतल्या तर कॅनडा पासून मादागास्कर, कोमोरोस वगैरे कुठलेही देश फ्रान्सचे शेजारी असतील. युरोपियन वसाहतवादाची अशीही legacy!

'फ्रांसचे शेजारी - ब्राझील आणि सुरीनाम' यासाठी तयार रहा
>> झकास Happy

सध्याच्या खेळाच्या शेवटच्या फेरीत अंदाजे लोकसंख्या ओळखण्याचा प्रश्न असतो तो छान वाटतो
तो साधारण तर्क लढवून आपण उत्तर देऊ शकतो.

आजच्या Worldle देशाची राजधानी भारतीयांना चांगलीच ओळखीची. इतिहासातल्या एका मोठ्या घटनेमुळे. शिवाय Liechtenstein आणि आजचा देश यांच्यात एक साम्य आहे जे जगात फक्त या दोनच देशांत आहे.

Pages