आवळ्याच्या पाककृतींचे संकलन

Submitted by धनवन्ती on 17 December, 2021 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवळे, आवळे आणि अजून जास्त आवळे.
मीठ, गूळ, इ.
आणि आवळ्याच्या पाककृती माहित असणारी मंडळी Happy

क्रमवार पाककृती: 

आवळ्यासारख्या बहुगुणी फळाला यथोचित सन्मान देण्यार्या पाककृती आणि टिपा यांचा हा एक संकलन धागा आहे.

Note - युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४ इथून काही मजकूर copy paste केला आहे. https://www.maayboli.com/node/80670

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके..
माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर सुगरणी आणि सुगरणे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा..!
धन्यवाद धनवन्ती .. आवळ्याचे च्यवनप्राश ह्या धाग्याची लिंक दिल्याबद्दल...!

माझी आवळा कॅन्डी करण्याची पद्धत: बरीचशी मुग्धा प्रमाणेच. पण मी पाक न करता फोडींवर नुसती साखर घालून 3 दिवस मुरवत ठेवते. दिवसातून 2 वेळा ढवळते. चौथ्या दिवशी तारेच्या मोठ्या गाळणीतून ते निथळून घेते. निघालेले पाणी बाटलीत भरुन फ्रीज मधे ठेवून सरबत म्हणून वापरते.
फोडींवर पिठीसाखर भुरभुरून 2 दिवस त्या सुकू देते. डब्यात भरून फ्रीज मधे ठेवते. एक ते दीड वर्षे टिकते ही कॅन्डी.

टिकाऊ आवळा सरबत :
एक किलो आवळे किसून अथवा चिरून मिक्सरला लावून लगदा करून ( ह्यामुळे आवळे पूर्ण वापरले जातात). ५० ग्रॅम आले तासून चिरून मिक्सरवर लगदा करून. ५ मोठी रसरशीत लिंबे पिळून.
फडक्यावर आवळा लगदा घेऊन मोठ्या चाळणीत धरून पिळून रस स्टीलच्या पातेलीत. त्यातच आल्याचा लगदा पिळून. लिंबूरसही मिसळून. अंदाजाने अर्धा ग्लास मीठ. एक किलो साखरेचा एक तारी पाक थंड झाल्यावर मधापेक्षा अधिक दाट होणार नाही इतका पातळ. सगळे रस आणि मीठ थंड पाकात घालून व्यवस्थित मिसळावे. बाटल्यांत भरून ठेवावे. फ्रिजमध्ये कितीही ( वर्षानुवर्षे) टिकते. पिताना सहासात पट पाणी घालून आवडीनुसार साखर मीठ अधिक वाढवावे.

शिजवा चिरा, वाटा काही केलं तरी आवळ्यातलं व्हिटॅमिन सी उडून जात नाही, नष्ट होत नाही लिंबासारखं असं म्हणतात.

पूर्वी मला पण असेच वाटत होते. पण माबोवर चिनुक्स यांच्या लेखात किंवा प्रतिसादात वाचल्यासारखे वाटतेय की आवळा शिजवला की vit C कमी होते. कुणी रासायनिक तज्ञाने यावर प्रकाश पाडला तर बरे होईल.

https://www.maayboli.com/node/2548/by-subject/14?page=8 इथे शब्द्खुणेद्वारे केलेली लिस्ट आहे.
मी मायबोली पाककृती अ‍ॅप वापरत नाही पण अ‍ॅडमिनला विनंती केली तर अ‍ॅपवर आवळ्याचे पदार्थ संकलित दिसू शकतील बहुतेक. अर्थात आठवणी सांगत धाग्याद्वारे संकलन करण्यातही मजा आहे.

यात आम्ही आवळ्यांना छिद्रे पाडुन ठेवतो. >>> बहीण करते असे पण थोडेच करते. मीही मागच्या वर्षी केलेले असे. थोडे करायचे असतील तर ही पद्धत बरोबर. कोकणात वर्षभराचे पण घालतात त्यामुळे छिद्र न करता योग्य वाटतं.

मी नेहेमी कच्च्या आवळ्यांचे लोणचे करते, शिजवून नाही करत.

वरील सरबतात साखरेच्या पाकाशिवाय काहीच उकळायचे शिजवायचे नसल्याने आवळा, लिंबू, आले ह्यातल्या उपयोगी घटकांतले रेणू उष्णतेमुळे मोडतोड न होता बऱ्याच प्रमाणात मुळातल्यासारखे रहातात.
आणि पाक दाट झाला तर स्फटिक होतात, ते मोडावे लागतात इतकेच. रसांचे मिश्रण ओतले की पाक पातळ होतोच. पण फायदा असा की पाक आटल्यामुळे मिश्रण साठवण्याच्या बाटल्या कमी लागतात. मात्र वापरताना अधिक डायल्यूट करावे लागेल.
आलेरस घातल्यावर छान फिका गुलाबी रंग येतो. डायल्यूट केल्यावर टिकत नाही म्हणा तो.

वा हे चांगल काम झाल सगळ्या आवळ्याच्या रेसिपीज इथे आल्या ते. माझ्या पण दोन असतील रेसिपीज मायबोलीवर. नंतर शोधून देते.

IMG_20211225_014638.jpg

मिठाच्या पाण्यात आवळे घातले , प्रत्येकावर चमच्याने 7,8 बारीक बारीक घाव केले.

मीठ किती घालणार ?
Proud

( ह्याचे उत्तर दिल्याशिवाय सेकंड इअर mbbs ला पास करत नाहीत. उत्तर आहे hypersaturated salt solution म्हणजे पाण्यात भरपूर भरपूर मीठ विरघळून तळाशी थोडे अजून मीठ दिसले पाहिजे.

पोस्ट मोरटेम करून अवयव अशाच बरणीतून व मीठमय पाण्यातून लॅबला पाठवतात)

आवळे न शिजवता केलेला मोरावळा :-
आवळे धुवुन पुसून खिसून घ्यावेत. एक वाटी खीस असेल तर दोन वाट्या साखर घालून त्यात एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा आले खिसून (किंवा वेलदोडे पूड) घालावे. एकत्र मिसळून काचेच्या बरणीत भरावे.
बरणी पंधरा दिवस कडक उन्हात ठेवावी. रोज एकदा हे मिश्रण वरपासून खालपर्यंत ढवळावे.
फक्त झाकणावर कपडा बांधावा म्हणजे कडक उन्हात ते ठिसूळ होऊन तडकत नाही.
पंधरा दिवसांत हे छान मुरते. मात्र ऊन कडक हवे.
फ्रीजबाहेर पण एक वर्षभर टिकते. ओला हात किंवा ओला चमचा इ. लागू देऊ नये.
पूर्वी मी नेहमी हे करायची पण आता कडक ऊन मिळत नाही म्हणून बंद केले.
साखर नेहमीचीच... पिठीसाखर कधी वापरून पाहिली नाही.
यात आवळे कच्चे असल्यामुळे विटामीन सी टिकून राहते.

आवळा सुपारी, वड्या, सरबत , मोरांबा हे प्रकार सगळ्यांच्या माहितीचे आणि चाखलेले आहेंत .. त्यात आवळा गटागट गोळ्यांची भर घालते. अर्थात कृती नेहमी प्रमाणे सोपी , बिनधास्त आहे. इंग्रो तल्या तयार आवळा फोडी पासून ही तयार करता येतील. प्रमाण इकडे- तिकडे झाले तरी चालते.

साहित्य : -
. १किलो आवळे
. १/२ किलो साखर
. साधे मीठ, काळे मीठ, सेन्धव मीठ
. जिरे - मिरे पूड
. हिंग अगदी थोडासा
. अर्धी वाटी पिठी साखर
( अर्धा किलो साखरेतुन अर्धी वाटी साखर घ्या )
कृती : --
आवळे स्वच्छ धुवुन घ्या. एका पातेलीत दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा . पाणी उकळले कि त्यात हे आवळे घालुन पातेलीवर झाकण ठेवा. २ -३ मिनिटा नी मोठ्या चमच्याने हे आवळे ढवळुन घ्या . अजुन २ मिनिटानी आवळ्याचा रंग ब दललेला दिसेल सुरीने टोचुन पहा. आवळा शिजलेला/ मऊ झालेला दिसेल .
रोवळी / चाळणी वर पातेल्यातील पाणी गाळुन आवळे कोरडे करा.
किसणीवर हे आवळे किसुन घ्या. बिया वेगळ्या करा.आवळे मऊ झाल्याने सहज किसता येतात.
एका परातीत आवळ्याचा किस व साखर एक त्र कालवा २ दिवस उन्हात ठेवा. त्यातली साखर आळली कि या मिश्रणात सर्व मसाले अंदाजाने घाला. एकत्र करा. चव घ्या. या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या करा.
एका लहान प्लेट मध्ये पिठी साखर घेऊन त्यात या गोळ्या घोळवा.
एका ताटात पसरवुन ठेवा. २-३ दिवस घरात वाळवा..
बरणीत भरुन ठेवा.
टिप : चाट मसाला वापरता येईल.
पिठीसाखरेत गोळ्या घोळवल्यावर उन्हात ठेवू नका ( साखरेला पाणी सुटेल ).

आमचे मित्र बेफि यांनी टाकलेल्या एकमेव रेसिपीत आवळा + ओली हळद अशी बेफाम चटणी आहे.
कुण्या हौशी शोधकाने लिंकवा पाहू प्लीज.

https://www.maayboli.com/node/47190

ही घ्या..

ही एकमेव नाही बरं, त्यांनी अजून एक रेसिपी पेश केली आहे.
( लिहीली आहे असे लिहीणे योग्य वाटले नाही )

धन्यवाद, धनवन्ती.
आधी केली नसेल तर यंदा करून पहा ही चटणी. खरच फार भन्नाट बनते!

इथे वाचून खूऊऊऊप काळे+सफेद मीठ घालून पाण्यात आवळे ठेवले. आता ते मुरलेत..खाताना जरा खारट लागतात. बाटलीत अजून पाणि ओतून डायल्युट करू का?

नको

मी केले होते ,

पण मग बाहेरचे लिक्विड डायल्युत असेल तर मग आवळ्यातील रस हळूहळू बाहेर येऊन पाण्यात मिसळतो व आवळा म्हणजे फक्त एक लाकडी गोळा होतो.

आवळ्यातल रस आवळ्यातच रहाण्यासाठी बाहेरचे सोल्युशन concentrated हवे
खारट न होता ते तसे संहत बनवणे हे सहजपणे जमणार नाही, पण त्याला पर्याय नाही

फार खारट असतील तर गाजर वगैरेचे थोडे लोणचे बनवून त्यात आवळे कापून घाला रोजच्या रोज.

पण आता जास्त पाणी ओतले तर प्रयोग पूर्णच फसेल, माझे 1,2 आवलेच शिल्लक होते , मी पाणी घातले आणि मग आवळे एकदम बेचवच झाले , आणि मग मला हे रसायनशास्त्र आठवले

आवळा चटणी
ओली हळद नव्हती ,
कोथिंबीर , मिरची व साखर घातली आहेIMG_20220119_215615~2_0.jpg

भारी दिसतेय चटणी.

आवळे खारट जास्त वाटत असतील तर त्या पाण्यात थोडे आल्याचे तुकडे घालून बघा. मुरल्यावर टेस्टी लागतात.

फार खारट असतील तर गाजर वगैरेचे थोडे लोणचे बनवून त्यात आवळे कापून घाला रोजच्या रोज.>>>

आवळे खारट जास्त वाटत असतील तर त्या पाण्यात थोडे आल्याचे तुकडे घालून बघा. मुरल्यावर टेस्टी लागतात.>>>>

गूड आयडियाज Happy गाजर आणि आल्याचे तुकडे घालेन. लोणचं नको.

आवळ्याचं छुंदा
आवळे १० min वाफवून घ्यावेत.
थोडे थंड झाले की किसून घ्यायचे
मग स्टीलच्या पातेल्यात तो किस टाकून तेवढाच पण चवीप्रमाणे गुळ टाकायचा. सारखा हलवायचा गुळ करपु द्यायचा नाही.
५min नंतर त्यात अंदाजे काळे मीठ, १ इंचाचे आले julian cut किंवा सुंठ,
Freshly grinded coarsely black pepper+इलायची
टाकायची.
अगदी झटपट होणारी साधी सोपी रेसिपी आहे.
आम्ही चमच्याने असंच खातो.
फ्रिज बाहेर ठेवली होती आठवडाभर टिकले.IMG_20220125_230155.jpg

Pages