आवळे,
साखर,
पाणी,
पिठीसाखर.
१)आवळे धुवुन पुसून कोरडे करुन घ्यावे, प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करुन डिप फ़्रीजर मध्ये २ दिवस ठेवावे. २ दिवसांनी बाहेर काढुन ठेवावे thawing होऊ द्यावे. Thawing झाल्यावर त्यातील बिया काढुन पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्यात ( सहज करता येतात ).
२)साखरेचा पक्का पाक करावा आणि गार होऊ द्यावा, आवळ्याच्या पाकळ्या पाकात ३ दिवस मुरवत ठेवाव्यात, सगळ्या पाकळ्या बुडतील एवढा पाक असावा, रोज आवळ्याचा रस निघेल तो काढून टाकावा, पूर्ण पाक काढू नये, ( या रसाचे सरबत करता येते ).
३)तीन दिवसांनी आवळे साधारण कोरडे वाटतील,
एका ताटात पिठीसाखर घ्यावी. आवळ्याची १-१ पाकळी त्यात घोळवून एखाद्या जाड प्लॅस्टिकच्या कागदावर काढून ठेवावे, ७-८ तास सावलीतच वाळू द्यावे.
४) आवळा कॅंडी तयार.
मी केली तेव्हा पूर्ण वाळेपर्यंत अर्धी संपली, त्यामुळे फ़ोटो नाही टाकता आला.
१)कृती खूप वेळखाऊ वाटली तरी करताना काही वाटत नाही.
२)अगदी बाजारात विकत मिळण्याय्रा कॅंडी सारखी होते.
मुग्धा खुपच छान क्रुती
मुग्धा खुपच छान क्रुती सांगितलीस. मी उकडुनच घेत होते आवळे पण ते मोरावळा प्रमाणे व्हायचे. आता याप्रमाणे करेल. धन्यवाद.
मायबोलीतुन खुप नवीन पहायला व शिकायला मिळत त्यामुळे समस्त मायबोलीकर बंधु-भगिनींना धन्यवाद--धन्यवाद--धन्यवाद.
मुग्धा खुपच छान क्रुती
मुग्धा खुपच छान क्रुती सांगितलीस. मी उकडुनच घेत होते आवळे पण ते मोरावळा प्रमाणे व्हायचे. आता याप्रमाणे करेल. धन्यवाद.
मायबोलीतुन खुप नवीन पहायला व शिकायला मिळत त्यामुळे समस्त मायबोलीकर बंधु-भगिनींना धन्यवाद--धन्यवाद--धन्यवाद.
मी केली होते हे.. पण न सुकवता
मी केली होते हे.. पण न सुकवता तसेच शेवटी थोड्या पाकात ठेवले. छान लागते

आवळा आणि साखर पण अंदाजे प्रमाण लिहा ना.. किलोमधे असेल तर बरे
वर्षा-आवळा आणि साखर पण अंदाजे
वर्षा-आवळा आणि साखर पण अंदाजे प्रमाण- आवळे १ किलो असतील तर किलोपेक्षा थोडी कमी साखर घ्यावी. पक्का पाक केल्यावर आवळ्याच्या पाकळ्या पाकात पुर्णं बुडायला हव्या.
निल्सन
मी पण करणार पण तीन दिवस आवळे पाकात मुरवत ठेवायचे ते फ्रिजमध्ये की बाहेर?
तीन दिवस आवळे पाकात टाकून फ़्रीजबाहेर ठेवावे.
मी आठवडा भर ही ठेउन पाहीले
मी आठवडा भर ही ठेउन पाहीले होते.. आधीचे आवळे वेगळ्या जातीचे होते बहुतेक. आता परत प्रयत्न केला तर फाके निघाले.. पण १-२ तुटले.. मी फ्रीझ मधून काढल्यावर ४-५ तासाने फाके काढायचा प्रयत्न केला. त्याने काही फरक पडतो का?
व्हिडिओ टाकता येईल का? मग काही चुकते का ते कळेल.. (जसे खालच्या बाजुने फाके काढले तर त्रास होतो.. वरच्या-देठाच्या बाजुने सोपे जातात)
शेवटी बनवली आवळा
शेवटी बनवली आवळा कँडी..
पाककृतीबद्दल खूपखूप धन्यवाद.
- पिंगू
छान झाली कँडी. त्यात थोडा
छान झाली कँडी. त्यात थोडा लिंबुरस आणि आले घातले. पाकात ३ दिवस मुरवून पाकळ्या सावलीतच वाळवल्या. पीठीसाखरात घोळवले नाही. कारण काही उरलच नाही
खूप खूप धन्यवाद!
मुग्धा, आवला कॅन्डी खूपच मस्त
मुग्धा, आवला कॅन्डी खूपच मस्त झाली. एकदम दुकानातल्या सारखी. खूप खूप धन्यवाद.
फोटो काढला आहे. नंतर देते.
धन्यवाद आरती. फोटो टाक लवकर.
धन्यवाद आरती. फोटो टाक लवकर.
hello mugdha, mee awala candy
hello mugdha,
mee awala candy ukadun karat hote ... pan fodi श्रींक ह्यायच्या
आता करुन बघीन ...
थन्क
मी फ्रीझर मध्ये ठेऊन पाहीले
मी फ्रीझर मध्ये ठेऊन पाहीले आवळे... पण त्यांच्या फाका निघाल्यच नहित.
आता काय करु?
मुग्धा, खूप छान रेसिपी आहे.
मुग्धा, खूप छान रेसिपी आहे. मी या वर्षी 2-2 किलो आवळे आणून चांगला 10 किलोचा आवळा पेठा केला या पद्धतीने. फक्त मी पाक नाही केला. नुसती साखर घातली. बाकी रेसिपी Same. .
या रेसिपीसाठी खूप धन्यवाद.
Pages