कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत विश्वासू अशा सायन्स विषयी बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या मीडिया वरील बातम्याच वाचार जा.
कुत्र्या च्या छत्री सारखे उगवलेले चॅनेल,न्यूज पेपर, स्वयं घोषित तज्ञ ह्यांच्या पासून दूर राहा.
Covid काळात अफवा पसरवणे ,चुकीची माहिती देवून गैर समज पसरवणे ह्या मध्ये डॉक्टर पासून अनेक तज्ञ पण सहभागी होते.
असा रिपोर्ट आहे

खरं असेलही.पण अश्या निराशावादी बातम्या सायंटिस्ट लोकांनी देऊ नये, लोकं आधीच पंक्चर आहेत.
शिवाय 'इतके' मिलियन हा जगाच्या लोकसंख्येचा किती टक्का आहे यावरही चर्चा व्हावी मीडियात.

बरोबर.
मी Lancet या शास्त्रीय नियतकालिकात त्यासंबंधीचा मूळ लेख वाचला .
निसर्गात लाखो जीवजंतू आहेत. त्यांची उत्क्रांती चालूच आहे. नवनवे रोग निर्माण होतच राहणार आहेत. त्या दृष्टीने संशोधन चालूच असते.

माध्यमांनी बातम्या संयमितपणे दिल्यास बरे होईल.

ज्या कोविड बाधितांचा आजार दीर्घकाळ टिकून राहिला त्यांच्या रक्तातले serotonin चे प्रमाण कमी असलेले आढळले आहे.
या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अभ्यास झालेला आहे. ते कमी झाल्यामुळे मेंदू आणि आकलनासंबंधातील लक्षणे दिसत असावीत असा अंदाज आहे .
अधिक संशोधनाची गरज आहे.

https://www.cell.com/cell/fulltext/S0092-8674(23)01034-6?_returnURL=https://linkinghub.elsevier.com/retrieve/pii/S0092867423010346?showall=true

चीनमध्ये श्वसनासंबंधित नवा धोकादायक आजार, चिमुकल्यांना विळखा; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...

केरळमधील JN.1 संसर्गानंतर .....
कर्नाटकात ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन व्याधी असलेल्या नागरिकांना मुखपट्टीची सक्ती सरकारकडून जारी.

WHO. ही संस्था कशी काम करते?
ही WHO ही संस्था जास्त फंड देणाऱ्या लोकांच्या फेवर मध्ये काम करत असावी?
खूप लोकांना वाटत.
त्या मुळे who ह्या संस्थेचा पूर्ण मान राखून भारत सरकार नी स्वतःच्या यंत्रणा मार्फत त्याचा अभ्यास करावा

भारतीय जनतेचा भारत सरकार वर पूर्ण विश्वास आहे.
भारताच्या साथीच्या रोगा विषयी अभ्यास करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी who च जे काही निष्कर्ष आहेत त्याचा अभ्यास करून ,.
नंतर भारतीय संस्था नीच योग्य ती माहिती देशाला दिली पाहिजे.
आणि ह्याच संस्था माहिती खरी की खोटी ह्याल जबाबदार असतील.
कायदेशीर कारवाई ह्या संस्था न वर भारताचा कोणताही नागरिक करू शकेल.

ही व्यवस्था च भारत सरकार नी स्वीकारावी.
Who ला डोक्यावर बसवू नये

चुकीची माहिती, समाजात भीती निर्माण होईल अशी खोटी माहिती प्रसारित करणारे.
१) न्यूज पेपर,
२) इलेक्ट्रॉनिक मीडिया.
३) कथित तज्ञ .
४) समाज माध्यम वरील व्यक्ती.
ह्यांच्या वर माहिती खोटी ठरली तर सामान्य नागरिक ना सहज कायदेशीर कारवाई करता आली पाहिजे .
आणि तो कायदेशीर खर्च सरकार नीच केला पाहिजे.
हल्ली काही ही अनेक क्षेत्रातील मीडिया खात्री न करता बातम्या प्रसिद्ध करत असतात

मी डिसेंबर २५ ते ३० भारतात येण्याचा विचार करत आहे. अचानक लॉकडाऊन लागून अडकून पडायची शक्यता किती आहे?

सध्या कोविडसह इतर श्वसनविकारांमध्येही एकदम वाढ झालेली दिसते. गरजेनुसार संबंधितांनी दक्षता घेणे उत्तम. घाबरून जायचे काहीच कारण नाही. सरकारी पातळीवर आढावा घेतला जात आहे. त्याकडे लक्ष ठेवून राहू.

कुठल्याही अनधिकृत ढकलपत्रांकडे साफ दुर्लक्ष केलेले बरे.

लोक covid ला बिलकुल भित नाहीत.>>>
हेमन्त तुम्ही काही डॉक्टर नाहीत. त्यामुळे बेजबाबदार प्रतिसाद टाळावेत,

A i बेस्ड रिसर्च चालुही असतील,पण निराशाजनक नसलेला निष्कर्ष मिळाला तरच जनतेपर्यंत माहिती नेण्यात अर्थ आहे, म्हणून थांबले असतील.

https://www.hindustantimes.com/india-news/actorpolitician-and-dmdk-founder-vijayakanth-passes-away-in-chennai-report-101703734686582.html

अभिनेता विजयकांथ यांना कोविड निमोनिया झाला होता. नवीन वेरियंट मध्ये निमोनिया व्हायची शक्यता जास्त आहे का?

नाही. साथरोग तज्ञांनी तसे काही म्हटलेले नाही.
त्याची संसर्गक्षमता जास्त आहे परंतु आतापर्यंत तरी त्यामुळे होणारा आजार नियंत्रणात दिसतोय.

https://www.ama-assn.org/delivering-care/public-health/jn1-omicron-subva...

आज (31 डिसेंबर रोजी) covid-19 च्या नामकरणाला चार वर्षे पूर्ण झाली.

निदान पुढील वर्षाखेरीस तरी हा आजार सामान्य होऊन त्याला दैनंदिन बातम्यांमध्ये स्थान असू नये ही सदिच्छा !

मी डिसेंबर २५ ते ३० भारतात येण्याचा विचार करत आहे. अचानक लॉकडाऊन लागून अडकून पडायची शक्यता किती आहे?

आता आपल्याला अनुभव आहे अचानक lockdown लावला जाणार नाही.
पहिले जाहीर केले जाईल .लोकांची सोय केली जाईल इच्छित स्थळी पोचण्याची .
आणि नंतर lockdown लावला जाईल

30 जानेवारी 2020 रोजी भारतातील खात्रीशीर निदान झालेला पहिला कोविड19 रुग्ण आढळला होता. गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांना) मृत्यू आला होता.

त्याप्रित्यर्थ भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध शाखांतर्फे 30 जानेवारी हा कोविड हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

अभिवादन !

उपचार चुकीचे झाले ह्या मुळे खूप लोकांचे मृत्यू झाले असे खूप लोकांना वाटते .
त्या मुळे तुमच्या ह्या पोस्ट शी कोणतीच संवेदना नाही.

Pages