खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादर आणि माटुंगा भागात मराठमोळ जेवण >>> यासाठी आस्वादला पर्याय नाही. नाहीतर प्लाझासमोर तृप्ती आहे. सेनाभवनच्यापुढे प्रकाश आहे, त्याच्या जरा पुढे दत्तात्रय आहे. नॉनव्हेजसाठी शिवाजी मंदिरसमोर गोमांतक आहे. गोवापोर्तुगीजामधे फायस्टार मराठी जेवण मिळेल, गोंडस नावं पण बेचव आणि महागडं!

आस्वाद फायनल करु बहुतेक.. हादडुन आल्यावर रिव्हु टाकेनच.. धन्यवाद सर्वांना.. (रच्याकने गूग्ले, झोमॅटो इ. इ. सगळीकडे जाऊन आल्यावर शेवटी मायबोली च उअपयोगी पडले हे पुन्हा पटलं.. Happy )

गोवा पोर्तुगिझा मराठमोळं? त्यांचेच दिवा महाराष्ट्राचा म्हणायचेय का? दोन्ही ओव्हरहाईप्ड
शाकाहारी मराठी जेवणासाठी आणि येक ऑप्शन म्हणजे MIG club वांद्रे समोर अमेय.
L.J. Road |माहीम , सिटिलाईट आणि विक्टोरिया चर्च च्या मधे , भंडार गल्ली च्या आसपास एक पोटोबा नावाचे रेस्टॉरंट चालु झालेय, जागा छोटी आहे आणि गर्दी होती म्हणुन ट्राय करायचे राहुन गेलेय.
ही जि काय दोन चार मराठी रेस्टोरंट्स आहेत ती सगळी शाकाहरीच का?

पाटील, अमेय बेस्ट आहे. तसेच चेतना कॉलेजजवळ "चिनार" सुद्धा मस्त आहे मांसाहारी आणि शाकाहारीसाठी. तिथे शाकाहारी मी जेवले आहे... अप्रतिम.

वरळीच्या अटारिया मॉल मधल्या बार्बेक्यू नेशनला कोणी गेलं आहे का?
आम्ही नेहमी बॅन्ड्राच्या बार्बेक्यू नेशनला जातो...तिथला मेनू मस्त असतो. इथे पण सेमच मेनू असतो का?टेस्ट न क्वालीटीबद्द्ल पण लिहा..... कुणी जाऊन आल असेल तर प्लीज शेयर करा.
उद्या जायच आहे बॅन्ड्रापेक्षा वरळीजवळ पडेल म्हणून विचारते आहे Happy

जाऊन आलो मस्त अ‍ॅम्बियन्स न मेन्युसुद्धा......

माहिमहून दादरला जाताना फाईव्ह स्पाईसनंतर करिम्स म्हणून नवं हॉटेल आलंय. कबाब, बिर्यानी मिळेल असं लिहिलंय. कोणी जाऊन आलंय का?

आगर बाजारातील पुरेपुर कोल्हापुर कसं आहे? आम्ही त्या हॉटेलपर्यंत गेलो. पण अ‍ॅम्बियंस पाहून परत आलो. जेवण चांगलं आहे का तिथे? स्वच्छता वगैरे?

आगर बाजारातील पुरेपुर कोल्हापुर कसं आहे? आम्ही त्या हॉटेलपर्यंत गेलो. पण अ‍ॅम्बियंस पाहून परत आलो. जेवण चांगलं आहे का तिथे? स्वच्छता वगैरे?
>> अज्जिबात जाऊ नका. त्यापेक्षा उपास केला तरी चालेल. महाबेक्कार.

इथे पहिल्या पानावरच पुरेपुर कोल्हापुरबद्दलची चर्चा आहे : http://www.maayboli.com/node/8043

दादरमध्ये पुर्वी (१० वर्षापुर्वी) एक घरगुती खानावळ होती. तिथे चतुर्थीला जेवणात मोदक असत. आम्ही ते खाण्यासाठी अंधेरी/पार्ल्याहुन तडफडत जायचो. आता नक्की ठीकाण/आठवत नाही पण हा बाफ बघुन त्याची आठवण झाली.

>>आगर बाजारातील पुरेपुर कोल्हापुर कसं आहे?

एकदा घरी जेवण मागवायचा मूर्खपणा केला होता. तेव्हापासून त्या हॉटेलच्या समोरून जायलाही भीती वाटते. त्यापेक्षा इथून कोल्हापूरला चालत जाऊन तिथे जेवेन. Proud

कालच फिनिक्स मॉलमधल्या पॅलॅडियमध्ये 'एशिया सेवन' मध्ये जेवले. हे आशियाई रेस्टॉरंट आहे - जपानी, थाई, कोरीयन, चायनीज, ईंडोनेशियन आणि व्हिएटनामिज पदार्थ इथे मिळतात.

अमेझिंग जेवण होतं. आधीही दोनदा तिथे जाऊन सुशी खाल्ली आहे, ती आवडली होतीच. सामन सुशी, चिकन डिमसम, फड थाई नुडल्स (चिकन), पॅन फ्राईड नुडल्स, लॅम्ब, मशरूम-गार्लिक राईस, प्रॉन्स थाई करी वगैरे एकसे एक चविष्ट पदार्थ चाखायला मिळाले.

नक्की जा. मात्र मिसो सूप पिऊ नका. मागे घेतलं होतं - अजिबात आवडलं नाही. मॅगी सिझनिगचं एक पाकीट अर्धा लिटर पाण्यात कालवून दिल्यासारखं लागलं.

मामी, मी पण फड थाई नुडल्स (चिकन) खाल्ल्ंय तिथे. मस्त असतं. meal-in-the-bowl पण ट्राय करा एकदा.

फिनिक्स मध्ये Maitai Lounge (PVR च्या समोर) मध्ये खाल्लं. Lomi Lomi bruschetta, Kung Pao Chicken ऑर्डर केलं होतं. Lomi Lomi bruschetta चं नुस्तं नावच एक्झॉटीक होतं. bruschetta वर बारीक चिरुन कांदा आणि टॉमॅटो घातला होता. ६ तुकड्यांना २८० रुपये टिचवावे लागले. Kung Pao Chicken जस्मिन राईससोबत सर्व्ह केलं पण काही खास नव्हतं आणि quantity सुध्दा कमी होती. परत काही इथे जाणार नाही.

फिनिक्स मध्ये राजधानी आहे तिथे फक्त buffet असतो का?

haagen dazs मध्ये Macadamia Nuts चं आईसक्रीम खाल्लं. झ का स!

फिनिक्स मध्ये राजधानी आहे तिथे फक्त buffet असतो का?
>>> आता त्याचं नाव सरोवर का काहीसं आहे. आधीच्या राजधानीत तरी फक्त थाळी मिळायची. आताचं माहित नाही.

सॉरी मामी, मला थाळीच म्हणायचं होतं.

हापिसात महाराज भोग चा लंचबॉक्स मागवला होता. आधी तर डिलिव्हरी करत नाही म्हणाले. मग ५-६ लंचबॉक्सेस ऑर्डर केले तर येण्याजाण्याचं रिक्षाचं भाडं वसूल केलं. एका बॉक्सचे चांगले १४५ रुपये टिचवले. पण जेवणाने निराशा केली. भेंडी, पनीर आणि कॉर्न असलं अगम्य कॉम्बिनेशन असलेली भाजी - मीठाशिवाय त्यात दुसरा मसाला नव्हता.डाळ बरी केली होती. बटाट्याच्या आमटीत मसाला बरा होता पण ५-६ मोठेमोठे बटाटयाचे तुकडे. भात शिजलेला होता हे आमचं नशिब. चपात्या ५ होत्या आणि तूप लावलेल्या असल्यामुळे चांगल्या होत्या. २ फरसाण होती - एक कचोरी आणि एक बेसन वडी. छोट्या डब्यात पुदिना चटणी होती. पापड आणि काकडीचे २ तुकडे सॅलड म्हणून तर स्वीट डिशमध्ये एक गुलाबजाम. लोणचं बहुतेक घालायला विसरले असावे. किंमतीच्या मनाने दर्जा एकदम सुमार. पुन्हा मागवणार नाही.

लोअर परेलच्या हाय स्ट्रीट फिनिक्स मधील स्मोक हाऊस डेलीतलं ओक अ‍ॅश सॅलाड आणि लेमन्+डिल कंबोडियन बासा ..... अमेझिंग.

लेकीला एशिया सेव्हन मधली नॉनव्हेज सुशी प्लॅटर लैच आवडलीये. त्यांचा इंडोनेशियन स्टीम फिशही मस्तच.

मामी, इंडिगो डेली मधले Fusilli with fried leek, almonds, roasted garlic and pesto cream तसंच BBQ chicken wafer thin pizza पण झक्कास आहे.

रच्याकने, दादर-प्रभादेवी भागात कानवले कुठे मिळतात कोणाला माहित आहे का?

कसे म्हणजे? एशिया सेव्हन मधली सुशी चांगलीय पण त्याहीपेक्षा मला स्वतःला शिरोज मधली सुशी जास्त आवडते.

ऑलिव्ह ऑन द रेसकोर्स मध्ये सध्या थेलासा पॉप अप रेस्टॉरंट सुरू आहे. त्यात ग्रीक जेवणाचा आस्वाद घेता येईल.

लोक्स, सेनाभवनसमोरचं चंद्रगुप्त बंद पडलं का रेनोव्हेट होतंय. काल पाहिलं तर बंद होतं आणि काहीतरी काम चालू होतं.

Pages