खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादरला शिवाजी पार्क चं चिंबोरी, मेमसाब आणि गोमांतक मालवणी खाण्याकरता...
गोमांतकला मात्र रांगच लावावी लागते. कायम वेटिंग असते तिथे.

मामा काणे तर फेमस आहेच.

मराठी - आस्वाद (दादर आणि माहिम). थालीपीठ, उपमा, मिसळ, फराळी मिसळ, वडापाव, कोथींबीर वडी. फक्त त्यांना साबुदाणा खिचडी नीट करता येत नाही. बाकी बेष्ट

सौदिंडीयन- मद्रास कफे ( माटूंगा), रामाश्रय (माटूंगा)

माटूंगाच नाव निघाल आणि "श्रिकृष्ण बोर्डींग (उडीपी)" चा उल्लेख कसा विसरले मी? स्टेशन च्या समोर. व्हेज जेवण एकदम बेस्ट.

तमाम पोद्दार वाल्याना, मणिस ( हिंदु कॉलनी ) ला विसरता येणे शक्यच नाही.

माटूंग्याच्या कॅफे गुलशनचा तोंडावळा बदललाय. वेगळे पदार्थ मिळतात आता तिथे.

माटुंगा स्टेशनसमोर गेली २५ वर्षे एक पाणीपुरीवाला आहे. त्याच्याकडे दहि बटाटा पुरी आणि रगडा पॅटीस छान मिळते.

दादरच्याच प्रकाशमधे,(शिवाजी पार्क) भगर, भरली वांगी, डाळींबी उसळ, साबुदाणा वडा वगैरे अजुन छान मिळतात.

दादरच्या पणशीकरांकडे अजुनहि उत्तम फराळी मिसळ मिळते. आता ते जरा ऐसपैस झालेय. छबिलदास समोर बटाटावडा अजून आहे पण आता त्याच्याकडे बरेच पदार्थ मिळायला लागल्याने, दर्जा घसरलाय.

दादर सिद्धीविनायक मंदिराच्या बाजुला एक चाटवाला आहे त्याच्याकडची आईस पानीपुरी...वॉव्...पाणीच सुटल तोंडाला..

दादरला सिटी लाईटच्या बाजूच्या गल्लीत पाणीपुरीवाला आहे. त्याच्याकडे रगडा पॅटीस, पाणीपुरी, दही बटाटा पुरी केवळ अप्रतिम.. (रैना, प्लिज नोट )
कविता, शिवाजी पार्कला बालमोहनच्या इथे टिब्जची फ्रँकी चांगली असते. बाकी वडापाव साठी किर्ती कॉलेजचा अशोकचा वडापाव आणि शिवाजीपार्कला वनितासमाजच्या समोर सह्ही असतो. तिथे भजीपाव पण मस्त असतो.

एकेकाळी मराठी पदार्थांसाठी फेमस दत्तात्रय आता चालु आहे का ? काही वर्षांपुर्वी ते बंद होणार असे वाचले होते. तेव्हा हॉटेल व्यावसायीकांत मराठमोळा ठसा उमटवीणारे हॉटेल बंद पडु नये म्हणुन बाळासाहेबांनी विनंती केली होती. या हॉटेलला ५० की ६० वर्षे पुर्ण झाल्यावर त्याने स्थापने दिवशी पुर्वीच्या दरात सर्व पदार्थ दिले होते. (१ पैसा, ४ पैसे, ६ पैसे अश्या दराने) आणि तेव्हा जुन्या नाण्यांचा संग्रह असणार्‍या कित्येकांनी याचा लाभ घेतला होता.
असो माझा अनुभव .... मागे त्याच्याकडे लोणी आणि थालीपीठ मागीतले. तर त्याने बटर आणुन दिले. Sad
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

>>> दादरला सिटी लाईटच्या बाजूच्या गल्लीत पाणीपुरीवाला आहे.
जबरी असते इथली पाणीपुरी.
आणि अजुन एक म्हणजे - किर्ती कॉलेजचा वडापाव.

सही, भजी पाव किर्ती कॉलेजच्या इथलाच अशोकचाच.
रामनायका माटुंग्याच अगदी मस्त, केळीच्या पानात जेवण. मला वाटतं तिथेच खाली महाभोज पण आहे.
सरस्वतीकडचा उपमा छान.
तिथेच पुढे आनंद भुवन उत्तम आहे, इडली हाऊस सुद्धा आवडलं विविध प्रकारच्या इडल्या, तसच एका प्लेट मध्ये ३ Happy मद्रास कॅफेतली कॉफी तर काय वर्णावी महाराजा!
रुईयाच्या मागेच चायनामन सुद्धा मस्त आहे.
मी दत्तात्रय मधे ३-४ वर्षांपूर्वी स्वतः थालपीठ मागवले होते तर साजूक लोणी दिले होते बरोबर.

हायला उपाश्या, कसल्या कसल्या आठवणी करून देतोस ह्या...
चायनामन सोडलं तर बाकी सगळीकडे जाऊन आलोय.
आणि तसच 'दिवा' पण एक वेगळं वाटलं मला. live music वैगरे असतं.

श्रीकृष्ण बटाटावडा- प्लाझाच्या समरच्या गल्लीतच्??(आता आठवत नाही).
स्टेशणजवळचे कामत पण बरे होते इडली डोसा साठी.

मधुरा मध्ये पण साबू वडा वगैरे वगैरे चांगले मिळायचे.

थाळी महाभोजची पण मस्तच. रामनायक सुद्धा चांगले वाटायचे. खूप काही छान नाही पण बरोबरच्या मद्रासी फ्रेंड्सबरोबर जावून सवय लागली होती सुट्टीत अगरवाल सुटला की तिथे पळा चालत जावून ते ही. (अगरवाल बंद पडला काय? )

मनू, श्रीकृष्ण वडा स्टेशनजवळ छबिलदासच्या गल्लीत, आणि अगरवाल पण बहुतेक चालू असावेत. दादर टीटीला मोठी जाहिरात आहे अजूनही..

कबूतरखान्याला गोल देवळाच्या समोर ओळीने गुजराथ्यांची दुकाने आहेत, तिकडे कचोरी, समोसा, ढोकळा, अळूवड्या वगैरे फरसाण आयटेम्स मस्त मिळतात. आणि सीझनमध्ये दर रविवारी उंधीयो पण मिळतो पण तो अजून चाखून पाहिला नाही.

उंधीयो खावा तो आमच्या पटवर्धन कॅटरर्सचाच... Happy

सर्वात छान म्हणजे माहेर कडचे जेवण. मी न विसरता तिथे जातो.

दुपारी जेवणाच्या वेळी जर माटुंग्याला असाल तर - स्टेशनच्या बाजुला रामानायक ला अवश्य जेवण करा. सुंदर जेवण असतं. इथल्या जेवणाने अपचनाचा विशेषतः त्रास नाही होत. २.३० ते ३ पर्यंत जेवण बंद करतात. १ मे, १५ ऑगस्ट अश्या काही ठराविक दिवशी खास (फिस्ट) मेनु असतात.

मंडळी, शुश्रूषा हॉस्पिटलच्या समोरचं "अपूर्वा" पण चांगलं आहे. तिथे चायनीज फूड झकास मिळतं. प्युअर व्हेज आहे मात्र. विकेन्ड्ला गर्दी ठरलेली. तिथे जवळ आता एक "होम शेफ" चं आउटलेट पण आलंय. अजून ट्राय केलं नाहीये. कोणी ट्राय केलं असेल तर पोस्ट करा.

सायबिणी गोमांतक (शिवसेना भवनजवळ) कडे बटर चिकन हंडी छान मिळते. सोलकढी थोडी तिखट असते पण चांगली लागते. बिर्याणी मात्र खास नाही.

सेनाभवन समोरच्या चंन्द्र्गुप्तमध्ये पूर्वी चिकन पॉट राईस छान मिळायचा. त्याचं "इंडस किचन" असं नाव बदलल्यानंतर गेलो होतो तर मेनू बदललेला, किमती जास्त आणि जेवणाची क्कालिटी बेकार. Sad

सिटीलाईट्च्या आधी शोभा रेस्टॉरंटकडून हिंदुजाच्या दिशेने जाणार्या गल्लीत वळलं की शेवटी डाव्या हाताला "स्टॅटस" म्हणून रेस्टॉरंट आहे. त्यात पण नॉनव्हेज चांगलं मिळतं

माहीमला चर्चच्या समोर "आराम" म्हणून हॉटेल आहे त्यात गुजराती थाळी अप्रतिम मिळते.

आणि हो....जिप्सीची पावभाजी अफलातून Happy

आराम मधली थाळी कच्छी असते गुजराती नाहि
माटूंगा रोड स्टेशन कडुन एल जे रोड कडे येताना संदेश आणि समाधान नावाची दोन स्वीट्स ची दुकान कम रेस्टॉरंट्स लागतात तीकडे जीलेबी, रबडी आणि तत्सम प्रकार चांगले मिळतात,
याच रस्त्याने गोवा पोर्तुगिजा च्या पुढे गेल्यावर पॉल्स चायनिज आहे तीथे ईंडियन चायनिज बरं मिळत आणि खास म्हणजे रात्री उशिरा प्रर्यंत मिळतं Happy
रुपारेल लॉ कॉलेज च्या दक्षिणेकड्च्या रस्त्यावर मथुरा भवन बार आहे तीथे सकाळि पोळा नवाचा डोसा कम भाकरी प्रकार मिळतो चटणि बरोबर ( सकाळिच नंतर टिपिकल बार, स्वच्छतेच्या धुवट कल्पना असलेल्यानि सुद्धा इथे फिरकु नये)

दादरला कबुतरखान्याजवळ "विसावा" मध्ये लस्सी आणि डोसा छान मिळतात. पण इथेही सॉलिड गर्दी असते नेहेमी. प्लाझाच्यासमोर "त्रुप्ती" (हे कसं लिहायचं?) मधे मराठी जेवणाची थाळी चांगली मिळते.

शिवाजीपार्कला लेडी जमशेदजी रोडवर "स्वीट बेंगाल" मध्ये बंगाली मिठाई मिळते Happy एकदम झकास!

दादर टी टी ला स्टेशनच्या मागे एक लस्सीवाला होता !! नाव विसरलो त्याच !! कोणाला आठवतोय का ? आणि माटुंग्याला एक होत आश्रय वाटत ? आता नाव विसरलो, रुपारेलला असताना आम्ही मित्र जायचो तिथे !

दादर लस्सीवाला म्हणजे कैलाश बद्दल म्हणतोयस का?
आणि माटुंग्याच्या रामाश्रय बद्दल?

हां कैलाश बरोबर ! त्याच नाव रामाश्रय का ? मला का माहीत नाही त्याच नाव आश्रय वाटत होत.

माटुंग्याचं आश्रय. रुपारेलच्या विद्यार्थ्यांचं आवडतं ठिकाण. बारावीची परीक्षा संपली की चव्हाण सर सर्व विद्यार्थ्यांना तिथे पार्टी द्यायचे.

कैलाश ची लस्सी अप्रतीम. Happy
आणि बायकोच फेवरेट म्हणजे - प्रकाशचा बटाटेवडा आणि टोमॅटो ऑमलेट.
==========
GO Red Wings !!!

चिनू आश्रयच ना ? आणि चव्हाण म्हणजे रुपारेल चे केमिस्ट्री वाले ?

हो. केमिस्ट्रीचे चव्हाण सर. वेंगसरकर, पागधरे इ. मास्तरही तिथेच असायचे.
आश्रयच्या समोर एक चायनिज खाद्यपदार्थांची गाडी असायची. तिथला फ्राईड राईस मस्त असे.

ओह आलं लक्षात चिनूक्ष. केमिस्ट्रीचे चव्हाण सरही आठवले, बीटीएस ला ते केमिस्ट्री शिकवायचे.

चिनूक्ष तू पण वेंगसरकरांकडे का ? कुठल्या वर्षी ?

माटुन्ग्याला (वेस्ट) शितल मध्ये नोन्-वेज छान भेट्तो तर शोभा मधे वेज

Pages