खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्काजवळ, बालमोहनची बाजूची गल्ली सोडून एक दुकान (गाडी नाही) होते - बर्फाचे गोळ्याचे... तिकडे मावा गोळा मिळायचा... गोळा...त्याचाभोवती बासुंदीसारखं आणि सुखा मेवा...

साकरियाच्या केमिस्टच्या दुकानासमोरचं ना? आता नाही ते दुकान Sad

रच्याकने, मंडळी 'राजधानी' मध्ये ३१ मे पर्यंत आंबा महोत्सव आहे हे कालच फूडफूड चॅनेलवर ऐकलं.

दादरच्या दत्तात्रयला उद्या ६० वर्षे पुर्ण होणार म्हणुन तेव्हाच्या दरात सगळे पदार्थ मिळणार आहेत. अट केवळ एव्हढीच की तेव्हाची नाणी / पैसे देवुन भोजनाचा / फराळाचा आस्वाद घ्यायचाय..:)

अर्रे!!
दत्तात्रयवाल्यांनी हा प्रकार पन्नास की पंचावन्न वर्ष पूर्ण झाली तेव्हाही केला होता. त्याची जाहिरात कम दरपत्रक अगदी आत्ताआत्तापर्यंत हॉटेलबाहेर लावलेलं बघितलेलं आहे. Happy

पार्काजवळ, बालमोहनची बाजूची गल्ली सोडून एक दुकान (गाडी नाही) होते - बर्फाचे गोळ्याचे... तिकडे मावा गोळा मिळायचा... गोळा...त्याचाभोवती बासुंदीसारखं आणि सुखा मेवा...

>>>>> आता ही गाडी असते. संध्याकाळी पार्कात कृष्णकुंजपाशी उभी असते.

२०-२२ जणांसाठी दादर, परेल एरिया मधील चांगले व्हेज हॉटेल सांगा , spacious असावे .. बहुतेक जण सीनिअर सिटीझन आहेत . नॉनव्हेज साठी बरेच पर्याय आहेत पण जेवायला सोमवारी जाणार असल्यामुळे व्हेज हवे आहे . कल्पना आणि सुजाता सोडून एखादा चांगला ऑप्शन सांगा . जिथे आरामात बसून गप्पा ही मारता येतील. प्रीतम मध्ये व्हेज जेवण चांगले मिळते का? पण व्हेज साठी तिथे जावेसे वाटत नाही...

परळ मधे K.E.M Hospital समोर Veg Always चांगला पर्याय आहे. थोडे तेलकट पदार्थ असतात. चविला मस्त असतात. बसायला जागाही ऐसपैस आहे. बाहेर वेटिंगची सुविधा आहे.

काही दिवसांपूर्वी मित्रमंडळींबरोबर सुजातामध्ये गेले होते. मसाला इडली मागवली. पहिले काही घास बरे लागले. मात्र नंतर अतिशय आंबट होती. नाईलाजाने टाकावी लागली. Sad

माथेरान 'दादर, माटुंगा' मध्ये येत नाही. Happy पण त्यासाठी वेगळा फोल्डर नाहिये. नुकतीच तिथे गेले होते तेव्हा कुमार प्लाझा मध्ये बटर चिकन आणि दाल तडका खाल्लं. छान होतं.

माथेरान 'दादर, माटुंगा' मध्ये येत नाही. >>>> Proud अगं पण दादर, माटुंग्याची लोकं किती लांबलांबच्या रेस्टॉरंटना उदार आश्रय देतात ते बघ. Wink

मामी Happy

फिनिक्समधल्या नूडल बारचा buffet बंद झालाय. पण तिथे Chicken Burmese Curry (रुपये ३७५) खाल्ली. अप्रतिम. बॉइल्ड नूडल्स, त्यावर तळलेल्या न्यूडल्स घालायच्या. मग नारळाच्या दूधातलं चिकन घालायचं. छोट्या छोट्या वाट्यातून लेमनग्रास, कांद्याची पात, तळलेले कांद्याचे पातळ काप, चिली ऑईल, लिंबू, मोड आलेले वाफवलेले मूग वगैरे येतात ते ह्यावर घालायचं. असलं झक्कास लागतं. पैसा वसूल बॉस. Khao Suey ह्या नावानेही ही डिश ओळखली जाते. मेन्यूवर इंडोनेशियाची Nasi Goreng ही आहे. पुढल्या वेळी ते ट्राय करायचा बेत आहे.

पूर्वीचं फूड मॉल होतं तिथे काही जागेत आता Haagen Dazs आणि Ice Cream Works वाल्यांनी मोठी आईसक्रीम पार्लर्स काढली आहेत. Haagen Dazs मधलं Belgian Waffle Dream खाल्लं (रुपये ४९०) - २ बेल्जियन Waffles, एक व्हॅनिला आईसक्रीमचा स्कूप, एक कॉफी आईसक्रीमचा स्कूप, क्रीमचा dollop आणि Haagen Dazs असं लिहिलेला छोटा चॉकलेटचा तुकडा. Wafflesवर आईसक्रीम आणि क्रीम घालून खाल्लं आणि स्वर्ग हाती आल्याचा भास झाला. Happy आपुन तो फॅन हो गयेला है बॉस.

Haagen Dazs एकदमच ब्येश असतं. आताशा इथे सगळीकडे मिळायला लागलंय. पण लै महागडं.

नुडलबारबद्दलच्या सुचनेला पुरेपूर न्याय दिला जाईल याची खात्री बाळग. Proud

मामी, मेन्यूवर त्याचं स्पेलिंग kaukswe असं काहीसं आहे.

रच्याकने, माहीमला एलजे रोडवर सबवे आलंय. आणि Has Juice Bar.

आजच पुन्हा एकदा इंडिगो डेलीला मैत्रिणीबरोबर गेले होते. पुन्हा एकदा इंडिगो डेलीच्या प्रेमात. Happy
चिकन पेप्पर इन रूमाली रोटी .... यम्मी!!! रॅव्हिओली सुध्दा अप्रतिम होती. आणि खास मैत्रिणीनं रेकमेंड केलेलं बेक्ड योगर्ट विथ ब्लॅकबेरी प्रिझर्व ..... अप्रतिम!!! मज्जा आली. Happy

काल आम्ही सात सहेलियां एकीच्या वाढदिवसानिमित्त गुडअर्थमधल्या Testing Room मध्ये गेलो होतो. तिथे सांग्रिया ऑर्डर केली की अनलिमिटेड मिळते. रीफिल करत राहतात. रेड तर असतंच पण व्हाईट वाईनचं पण होतं. मस्त होती.

स्टार्टर्स ओके ओकेच. स्मोकी चिकन एशियन सुप to die for. एक कलिंगड आणि फेटाचीज सॅलड जरा हटके वाटलं. मेन कोर्स मध्ये मी सामन विथ बीटरूट रिसोटो घेतलं होतं. ओकेच वाटलं. मैत्रिणीचा बासा एकदम चविष्ट होता. केकच कापल्याने बाकी डेसर्ट खाल्लं नाही.

बायदवे, मागच्या आठवड्यात खाल्लेलं मोशेमधलं सामन सँडविच मार डाला होतं. जरूर जरूर चाखा.

मामी, दादर-माहिम-लो.परळ परीसरातली कुठली हॉटेलं माहिती आहेत का ज्याचं कूपन भेटीदाखल देता येईल?

>>एक कलिंगड आणि फेटाचीज सॅलड जरा हटके

मामी, त्यात पाईननटस होते का? मागे मी एके ठिकाणी खाल्लं होतं आणि जाम फिदा झाले होते.

रच्याकने,फिनिक्समध्ये बिग बझारच्या बाहेरचे स्टॉल्स (पाणीपुरी, सॅन्डविच, पावभाजी, ज्यूस वगैरे विकणारे) गायब झालेत.....रेनोव्हेशन साठी का कायमचे माहित नाही

नरिमन पॉइन्टच्या CR2 mall मध्ये Ruby Tuesday मध्ये Fish And Chips घेतलं होतं. 'अप्रतिम' हा एकच शब्द! मस्त क्रिस्पी फिशचे तुकडे आणि चविष्ट Tartar Sauce. Proud

फिश आणि चिप्स मस्तच. पण तरीही रूबी च्युसडेची पूर्वीची चव गेलीच. योको मधलं फिश अँड चिप्सही मस्त असतं.

दादर परिसरातल्या लोकांनो, रानडे रोड जंक्शनवरच्या कुटुंबसखीकडे मिळणारा मशरूम मसाला एकदम झकास असतोय.

सीपीके मधली लेमन बटर चिकन अप्रतिम. बरोबर देतात ती स्पॅगेटीही अमेझिंग.

फिनिक्स मार्केट सिटी, एलबीएस रोड, कुर्ला येथील ग्रिलिओपोलीस अप्रतिम. स्टार्टस तर फारच उत्कृष्ट.

नाही ना मिळालं Sad

पुर्वी वरळीच्या ज्वेल ऑफ इंडीयाचं मिळायचं आणि मेलाचंही बहुतेक... पण आता मेला बंद झालंय आणि ज्वेल ऑफ इंडीयाच्या वेबसाईटवर 'सध्या नाही' असं काहीसं तेव्हा वाचलं होतं.

मेलाच्या जागी इंडिया अँड बियॉण्ड आलंय. मागच्या आठवड्यात गेलो होतो. मोरक्कन पनीर मस्त होतं. लेमन हर्ब्ज चिकनही मस्त होती. रिसोटो इतका खास नव्हता.

वाशीला एक साधंसं पण अतिशय चविष्ट केरळीय नॉनव्हेज जेवण देणारं हॉटेल आहे असं मध्यंतरी पेपरात वाचलं होतं. कोणाला माहित आहे का?

Pages