खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी ८ च्या सुमारास प्प्रभादेवी परिसर व फोर्ट येथे ऑम्लेट मिळत नाहीये. चर्चगेट समोर एक इराणी आहे पण त्याच्याकडचा टोस्टर कित्येक महिन्यापासून बिघडला आहे. ओल्या गच्च पाव स्लाईस देतो. ब्याटरी मारावी....

स्टेडीयम रेस्टऑरंट, चर्चगेट जवळ. तिथे मिळेल
जर तुम्ही नरिमन पॉईट ला येत असाल तर तिथे सचिवालय जिमखाना कँटीन मध्ये मिळेल. पण ते ८ वाजता उघडतं का ते मला माहित नाही.

त्या स्टेडिअम रेस्टारंटाचाच किस्सा सांगतोय. त्यातला टोस्टर आता कायमाचा बंद केलाय आता तोस्ट मिळणार नाही येथुन पुढे असे त्याने जाहीर केलेय...

फायनली इतक्या वर्षांनी आज रात्री 'बडे मिया' ला जाण्याचा मुहुर्त लागलाय नाहितर याआधी फक्त प्लानच बनलेत.
तर ऐकिव माहितीवरुन तिथला 'चिकन भुना' हा मस्ट ट्राय कॅटेगरीत आहे. तर अजुन कोणते पदार्थ फेमस आहेत तिथे. तसेच आजुबाजुला अजुन खाण्यासाठी काय काय फेमस आहे? प्लीज मदत करा.

मी ठाण्याला राहुन अजुन मुंबईला कधी गेली नाही हां एकदा लहान असताना शाळेतुन पिकनिक गेलेली मुंबई दर्शनला Proud

खाण्यावर जास्त प्रेम असल्यामुळे खास खादाडीसाठीच जाणार आहोत (त्यात थोडंफार फिरणं होईलच :डोमा:) म्हणुन उत्तम खादाडीच्या जागा शोधतेय. झणझणित, चमचमित कॅटेगरीत येणारे पदार्थ आणि नंतर गोड अशी ठिकाणे सुचवा. आज जिवाची मुंबई करणार आहे मी Lol

आगावु धन्यवाद Happy

हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये खूप बदल झालेत. haagen dazs, krispy kreme जवळचं falafels, पीव्हीआर समोरचं big kahuna बंद झालेत. मरुश, सबवे सगळ्यांची समोर बसायची सोय काढून घेतली आहे. haagen dazs ऐवजी Jamie Oliver चा पिझेरिया आलाय.
कोमलाजच्या जागी आलेलं बायब्लॉस बंद होऊन त्याऐवजी रेनफॉरेस्ट आलंय. जेवण चांगलं आहे तिथे पण मेन्यू पण वाचता येत नाही एव्हढा अंधार असतो.

मामी, छान असते का हो ही? ट्राय करेन म्हणते. >>> कल्पना नाही. मी कधी ट्राय केली नाहीये. जाता येता दिसते मात्र.

शेगावला खाल्लेली शेगावची कचोरी म्हणजे ओहोहो!
भर्पुर मालमसाला आत, तरी थोडीशीच तिखट आणि वरचे क्रस्ट!!

जिप्सी च्या बाजुला पण शेगाव च्या कचोरी चा बोर्ड बघितला, एकदा ट्राय करायलाच पाहिजे. आमच्या कडे कचोर्या आवडतात सौराष्ट्र च्या च.

>>जिप्सी च्या बाजुला पण शेगाव च्या कचोरी चा बोर्ड बघितला

हो? बघायला पाहिजे. राजा-राणी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसच्या कोपर्‍यावर असलेला इराणी (राजा बढे चौक ना हा?) जाऊन आता तिथे कॅफे आलाय. कोणी गेलंय का?

अरे, इथे येत नाही का आजकाल कोणी? असो. शिवाजीपार्कला ३०१ F चं आऊटलेट आलंय तिथे पेरू-चिली cremelette नक्की ट्राय करा.

आगार बाजार मधील चैतन्यं हॉटेल बेस्ट आहे. अस्सल मालवणी जेवण नॉन वेग तर मस्त आहेच पण veg हे फार छान मिळत , ते स्वतः icecream बनवितात . नक्की भेट दया

आगार बाजार मधील चैतन्यं हॉटेल बेस्ट आहे. अस्सल मालवणी जेवण नॉन वेग तर मस्त आहेच पण veg हे फार छान मिळत , ते स्वतः icecream बनवितात . नक्की भेट दया

रावी, नरीमन पॉइंटला स्टेटस रेस्टॉ आहे.
तिथे सध्या आहे उण्धियु. सीजन आहे आता म्हणुन. चांगला असतो.
चर्चगेट जवळ सम्राट मधे अतिशय तेलकट, तेलात भाज्या पोहत असतात असा उंढियु दोन्ही वेळी होता. आजिबात आवडला नाही.
जर्रा लांबचं म्हणजे बाबुलनाथला सोम रेस्टॉ मधे अप्रतिम जेवण आहे. तिथला उंधियु मी खाल्लेला आजवरचा बेस्ट आहे.

मस्त धागा

माझे फेवरेट जागा -
माटुंग्यातलं “अय्यपन इडली”- फूल मार्केटच्या गल्लीतून चालत गेलं की उजवीकडे कॅार्नरला “अय्यपन इडली” आहे.. इथलं सगळंच आवडतं. फिल्टर कॅाफी पण बेस्ट आहे .. प्रत्येक इंडिया ट्रिपमधे एक फेरी असतेच इथे

रसना पंजाब - डॅान बॅास्को शाळे समोरचं.. पूर्वी फार आवडायचं.. गेल्या ६-७ वर्षांत गेले नाही

दादर टीटी सर्कल मधलं डी. दामोदर - इथली सुतारफेणी अप्रतिम असते

वर बडे मिया चा उल्लेख वाचला
बडे मिया - चिकन मलाई टिक्का रोल, मटन खिमा रोल, चिकन भुना रोल
गिरगाव चौपाटी समोरचं बॅचलर्स - मी त्या एरियात गेले कि इथे जातेच .. ह्यांचा चॅाकलेट मिल्कशेक एकदम अफलातून आहे.. सॅंजविचेस पण मस्त.. पिझ्झ्यावर पास्ता टाकून एक प्रकार मिळतो तो माझ्या भाच्यांचा फेवरेट आहे.

Pages