खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथले सिझलर्स चांगले असतात काय? हम्म ....
सगळ्यात पहिले सिझलर्स मी फाउंटनला फाउंटन रेस्टॉरंटमध्ये खाल्ले होते. भयानकच आवडलेले.

मामी... का माहीत नाही पण माझं योकोचा अनुभव फार चांगला नाही... Sad आता तर ठाण्यातही सुरू झालंय पण मी अजून गेलेलो नाही.. Happy

हे रेलीश का काय तिकडे एकदा जाऊन यायला पाहिजेल... Lol

एकदम नॉस्टॅलजिक धागा..
कॅडेल रोडवर "प्रभात"ची चिकन मिळते त्यांच्याकडे रविवारी (इतर दिवशी पण असतं का माहित नाही आहे) घरगुती नॉन वेज पदार्थ मस्त मिळायचे....म्हणजे चिकन पॅटिस तर खूपच आवडायचा मला..अद्याप आहे का ते??

गोखले रोड-रानडे रोडच्या जंक्शनला डॉ. गावंड, गोहिल टेलर्स आणि एक सेकंडहँड पुस्तकं विकणारा यांच्यानंतर एक दुकान आहे. कोणीतरी सीकेपी फॅमिली ते चालवते. त्यांच्याकडचे खिमा पॅटिस एकदा खाल्ले होते ते खूपच छान होते.

त्याच्या जवळच कुटुंबसखीकडचे रवा लाडू, नैयप्पम (गोड आप्पे) आणि शिंपल्यांचे कालवण एकदम भारी असतं.

त्याच्या समोरच रानडे रोडच्या सुरवातीलाच डावीकडच्या समर्थमधली तेलपोळी भारी.

तसंच जरा पुढे गेलात तर उजवीकडे पणशीकर लागतील. त्यांच्याकडचे सगळेच पदार्थ उत्कृष्ट असतात. पण विशेषतः चिवडा, बेसनाचे लाडू, डिंकाचे लाडू, शंकरपाळ्या आणि चकल्या अतिशय आवडतात.

डावीकडे डी एल वैद्य रोडवरच्या गोडबोल्यांकडे जाण्याची तसदी घेतली नाहीत तरी चालेल. पण त्यांच्या समोर एक छोटसं दुकान आहे त्यात तयार आळुवड्यांचे उंडे मिळतात. शिवाय त्यांच्याकडे मिळणारं आंबोळी घावन पीठ वापरून अतिशय चविष्ट आंबोळी तयार होतात.

आळूवड्यांचे उंडे पणशीकरच्या दुकानाबाहेरच असलेल्या डावीकडच्या छोट्याश्या दुकानातही मिळतात.

डी एल वैद्य रोडच्या बरोबर तोंडासमोर संध्याकाळी एक बाई वसईच्या ताज्या पालेभाज्या, फुलं इ घेऊन बसते. अगदी कमी भाज्या असतात पण छान असतात. काहीवेळातच संपतातही.

डी एल वैद्यरोडवरच्या स्वामी समर्थांच्या मठाजवळ असलेल्या छेडाकडे कडवे वाल उत्कृष्ट मिळतात.

मामी, मस्त माहिती!
तरी संसारसाहित्य दुकान सुटले मामीच्या नजरेतून! Happy
स्वामींच्या मठाजवळच आहे.

मामी, ते अळुवड्यांचे उंडे बापटांच्या टपरीतले का?

स्वामी मठाबाहेर विशेष दिवसांना पुरणपोळी मिळते स्वामींना अर्पण करण्यासाठी (त्यांना आवडायची). एक त्यांना द्यायची आणि एक आपण घरी येऊन गट्टम करायची Proud

कर्जतला लकीज कॉर्नरमधलं तळलेलं जिताडं खाऊन या. अ प्र ति म!!! ताजं आणि उत्कृष्ट तळलेलं. तेलकट नाही कारण तवा-फ्राय होतं. रू. ५०० ला एक मोठ्ठी प्लेट भरून. पुन्हा जावसं वाटतंय. अहाहा ...........

http://www.greenkarjat.com/2010/11/luckys-korner.html इथे उजवीकडच्या पॅनलमध्ये मिळेल ही माहिती.

(रच्याकने : जरा जास्तच लांबचा प्रदेश इथे नोंदवतेय. पण जाऊन खाणारे मुंबईचेच आहेत ना? मग झालं तर .... Proud )

मठाच्या जवळ धोंडे म्हणून एका कॅटररचं दुकान आहे. धन्वंतरीला लागून असलेल्या दामले निवासात तळमजल्यावर. त्याच्याकडचे मोतीचूराचे लाडू अप्रतिम असतात. इतर खाऊचे प्रकार, फराळाचे प्रकराही अत्यंत चविष्ट असतात. मोठ्या प्रमाणावरील घरगुती कार्यक्रमासाठी त्याच्याकडे जेवणाची ऑर्डर दिली तरी आलूपराठे, छोलेभटुरे, पावभाजी इथपासून अगदी साग्रसंगीत स्वयंपाकही घरपोच देतो.

हो दिनेशदा. पन्हंवाला असतो त्या मातीच्या भांड्यांच्या दुकानाबाहेर.

काय सांगतेस मंजू? तुमने तो मेरे पाहुणोंका इंतजाम कर दिया.

कर्जतला लकीज कॉर्नरमधलं तळलेलं जिताडं खाऊन या. अ प्र ति म!!! ताजं आणि उत्कृष्ट तळलेलं. तेलकट नाही कारण तवा-फ्राय होतं. रू. ५०० ला एक मोठ्ठी प्लेट भरून. पुन्हा जावसं वाटतंय. अहाहा ...........

>>>> मामी... बोला कधी जायचे... कर्जत माझी सासुरवाडी आहे. हवंतर जय्यत तयारी करायला सांगतो. Happy

मामी, वाचलं! Happy

शिवाजीपार्काजवळ्च्या जिप्सी समोरील कुल्फी कोणी खाल्लीय का?
बेश्ट!!!

शिवाजीपार्काजवळ्च्या जिप्सी समोरील कुल्फी कोणी खाल्लीय का?
>>> पानातली कुल्फी ना? कैक वेळा खल्ली आहे.. Happy एकदम मस्त असते.. Happy

Pages