खादाडी: दादर, माटुंगा

Submitted by admin on 26 May, 2009 - 21:29

दादरच्या आसपासची खादाडी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे. तृप्तीच्या बाहेर नेहमी गर्दी असते. Sad रानडे रोडला युनियन बुक डेपोच्या शेजारी "दादर सुरती फरसाण मार्ट्" मध्ये जिलबी, कचोरी, रामपापडी, ढोकळा, पपईची चटणी, भजी असे पदार्थ अप्रतिम मिळतात. पण सकाळी लवकर जावं लागतं आणि गर्दी फार असते. तसंच स्वछतेचे निकष थोडे बाजूला ठेवावे लागतात. Happy

मुकुंदा, माझं ऑफिस तिथेच आहे, सत्कार अजूनही आहे आणि तिथे आम्ही जात अस्तोच. रूस्तम ऑफिससमोर आहे. Happy त्याच्याकडचं ते दही एकदम भारी असतं.
आणी आईसक्रीम सुद्धा. आता लंच ब्रेकमधे जाऊनच येते.
--------------
नंदिनी
--------------

पार्का जवळच्या "सुजाता" मध्ये कोणी गेलय का???
पालक पनीर्,कश्मीरी पुलाव [फळ घालुन],हैद्राबादी पुलाव्,कोल्हापुरी एक्दम लाजवाब आहेत..........

माझ्या खुप [रेशमीबंधाच्या] आठवणी आहेत........

Cannonच्या पावभाजीपेक्षा त्याच लाईनीत असलेला कालाखट्टा आणि कलिंगड (सरबत) विकणारा अजुन आहे का? मुंबईच्या उन्हाळ्यात ते कलिंगड छानच वाटायचे.

मेट्रोच्या शेजारी पुर्वी ईराणी होता. (मला वाटत, आता तेथे कामत आहे) त्याच्याकडे खिमा समोरे मस्त मिळायचे. आता खिमा समोसे फार कोठे मिळत नाहीत. काही वर्षापुर्वी एक्दा पुण्याच्या नाझचे खाल्ले होते. मेट्रोच्या पार्कींग लेनच्या बाजूला mayflowerकी mayfair नावाचे होटेल होते. तेथे आम्लेट्मध्ये लपेट्लेले कट्लेट मिळत असे. मी अंड्याच्या अलर्जीमुळे खल्ले नाही पण मित्राची ती खास ऑर्डर असायची. बघुन तरी चविष्ट वाटायचे.

व्ही.टी.ला विठ्ठ्ल नावाचे भेळपुरीसाठी प्रसिध्द असे दुकान होते. त्याचे AC हॉटेल झाल्यापासुन चव बिघडलेली वाटली.

फोरास रोडवरील "दिल्ली दरबार" मला नेहमीच आवडते (गैरसमज नसावा)कारण येथे गचाळ Open Restaurant पासुन खाणावळ स्टाईल + १०-२० माण्से बसू शकतील अश्या छोट्या केबिन + सर्वसाधारण ac restaurant + posh ac restaurant असे सर्व एकाच लेव्हलला आहे. खाण्याची चव जराही बदलत नाही. मुख्य म्हणजे दारुची सोय नसल्याने No Waiting + पहाटे ३वा चालू असते. अगदीच उशीर झाला तर उत्तम जेवायला मिळण्याची हमखास सोय. फक्त येथील डिशेस ताज्याच उत्तम लागतात. माझ्या एका कर्मदरीद्री मित्राने दिल्ली दरबारमध्ये फ्राईड राईस मागवला. तो ऑर्डर घेणाराही वेडा बनला. आम्ही त्याला समजावले पण त्याला फ्राईड राईस खायचाच मुड होता म्हणे.

हॉटेलची वानवा असलेला एरीया म्हणजे सिटीतील हार्बर लाईन: डॉकयार्ड, रे रोड, कॉटन ग्रीन, शिवडी, काळाचौकी.... मी तिथे वर्षभर साईटवर होतो. एकच जेमेतेम बरे हॉटेल होते.

व्ही.टी.ला विठ्ठ्ल नावाचे भेळपुरीसाठी प्रसिध्द असे दुकान होते. त्याचे AC हॉटेल झाल्यापासुन चव बिघडलेली वाटली. >>> अनुमोदन

नंदिनी.. रुस्तमकडे गेलीस तर माझ्या नावाने एक केसर पिस्ता आइस्क्रिम खाउन ये.. रुस्तमसमोरच ऑफिस.. मजा आहे तुझी..:)

व्हि.टी. चे विठ्ठलचे भेळपुरी दुकान अजुन आहे? न्यु एक्सलसिअरला व स्टर्लिंगला रॉजर मूरचे मुनरेकरसारखे भिक्कार जेम्स बाँड चित्रपट किंवा ८० च्या सुरुवातीला एडि मर्फीचे बेव्हर्ली हिल्स कॉप् चित्रपट पाहुन झाल्यावर विठ्ठलची भेळपुरी खाल्लेली आठवते. न्यु एक्सलसियर व स्टर्लिंग ही चित्रपटगृहे अजुन आहेत का?

पपेटी.. पार्काजवळच्या सुजातामधे साबुदाणा वडासुद्धा मस्त मिळायचा.

मी सांगतो तसे करा! Happy

माटुंग्याला म्हैसूर कॅफे मध्ये "वरच्या मजल्यावर" म्हैसूर मसाला डोसा खाऊन कडक कॉफी प्यायला मद्रास कॅफे मध्ये जावे.

ही तर फक्त पहिला हप्ता झाला:-)

नंतर कोच्चू गुरुवायूर मंदिराच्या मागच्या गल्लीत (नल्ली दुकानाच्या समोर) "अय्यप्पन" नावाचा ष्टाल आहे. तिथे इडली, मेदू वडे, उत्तप्पे, डोसे, पोंगल आणि इतर ब-याच, आपण न ऐकलेल्या/खाल्लेल्या दाक्षिणात्य स्पेशॅलिटीज मिळतात. केवळ लाजवाब! असे जब्री पदार्थ कॅफे म्हैसूर, कॅफे मद्रासमध्ये सुद्धा मिळत नाहीत. त्यानंतर हवी तर पुन्हा कडक कॉफी मारावी. दिल खुष हो जायेगा! Happy

पण म्हैसूर मसाला डोसा खावा तर म्हैसूर कॅफे मध्येच!

"मासली" खायची असेल तर सिंधुदुर्ग, गोमंतक वगैरे विसरा पोराहो! विरारला उतरल्यावर २ मिनिटाच्या अंतरावर "वाडवळाईट" हाटेल आहे. तिथे जाच! विरार-पालघर पट्ट्यामध्ये "वाडवळ" नावाचा समाज आहे. त्यांच्या खाद्य संस्कृतीला परंपरा आहे. त्यांचे मसाले स्पेशल असतात!

मालवणी जेवणाबद्दल मला जरूर आदर आहे. ते झणझणित असते. पण वाडवळाईट "सणसणित" असते. तिथे आपसूकच नतमस्तक व्हायला होते. तिथे हादडायला जाताना एक स्पेअर रुमाल बरोबर घेऊन जावा! Happy

माटुंग्या ला अरोरा टॉकि़ज कडुन सर्कल कडे येताना येक फक्त ईड्ल्यांचे रेस्टॉरंट आहे बर्‍याच प्रकारच्या ईडल्या मिळतात.
अभिजीत- वसई विरार चा विषय काढलास म्हणुन आणि येक दोन जागा आठवल्या
पोहा भुजींग- आगाशी गावात जाताना कोपर्‍यावर ही स्पेशालीटी मीळते,ओरिजीन बहुतेक वाडवळ खाद्य पदार्थात
वसई पाचुबंदर कोळिवाड्यात दोन रेस्टॉरंट (कम बार) आहेत तीथे ऑथेंटीक कोळी फुड मिळते.

दादर माटुंगा भागातील खादाडीबद्दल सर्वांशी संपूर्ण सहमत.
दोनदा गोवा पोर्तुगिझा मध्ये जावे लागले (योग आला असे म्हणत नाहि). पैसे दोन्हि वेळा ऑफिसने भरले होते म्हणून ठिक! मी अणि २ मैत्रिणींनी इतरांना "तुम्हि व्हा पुढे" असे सांगितले आणि शोभामध्ये जाऊन उदरभरण केले. तुम्हि म्हणाल कि एकदा अनुभव आल्याने कळले नाहि का? तर आम्हाला कळले होते पण काही लोकांना स्वतःचे पैसे जात नाहित तोवर काही कळत नाही. (या लोकांनी १२ जणांसाठी मागवलेले जेवण कुणालाहि न आवडल्याने स्वतः घरी नेले. २ दिवस आराम!)

Cannonच्या पावभाजीपेक्षा त्याच लाईनीत असलेला कालाखट्टा आणि कलिंगड (सरबत) विकणारा अजुन आहे का?
हो आहे!

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

हॉटेलची वानवा असलेला एरीया म्हणजे सिटीतील हार्बर लाईन: डॉकयार्ड, रे रोड, कॉटन ग्रीन, शिवडी, काळाचौकी.... मी तिथे वर्षभर साईटवर होतो. एकच जेमेतेम बरे हॉटेल होते.>>> हो. तिथे माझे हॉस्टेल होते. पण सेल्स टॅक्सच्या ऑफिससमोर हातगाडीवर लंच विकणारे भरपूर असतात. मस्त व्हरायटी असते.

पण म्हैसूर मसाला डोसा खावा तर म्हैसूर कॅफे मध्येच!>>>> ह्म्म!!

दादरमध्ये अमराठी पदार्थ छान मिळतात ते खालील ठिकाणी-
सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ Oven Fresh मधले Lasagne, Mezzeh, Fondues, Sizzlers हे बर्‍यापैकी चविष्ट आहेत. जिप्सी कॉर्नर वर Baked potatoes with garlic bread छान मिळतं.
पौर्वात्य पदार्थांसाठी कॅडल रोडवरचं Tamnak Thai छान आहे- तिथल्या मिष्टान्नांत शहाळ्याच्या गराच्या वड्या उत्तम आहेत!

गोवा पोर्तुगीझा बरं आहे, 'दिवा महाराष्ट्राचा'च्या पदार्थांचा दर्जा/त्यांच्या किंमती पाहून फार विरस होतो.

शिवाजीपार्कला कॅडेल रोडवर जिथे आधी सन्मान हॉटेल होतं तिथे परवा पाहिलं तर "दादर, मुंबई, २८" अश्या नावाचं एक हॉटेल आणि "Deja Vu" नावाचा एक कॅफे आलाय. कोणी गेलात तर इथे नक्की पोस्टा.

दादर, मुंबई, २८ - चांगल आहे, पुर्वीच्या सन्मान च्या मानाने थोड महाग आहे पण मस्त आहे(मी ट्राय केलेले सीफुड सुप, प्रॉन्स गर्लिक, फिश थाय करी वरुन सांगतोय बाकी मेन्यु माहित नाही) . मेन्यु लिमिटेड आहे (चायनीज , थाय आणि भारतीय )

रानडे रोडच्या कोपर्‍यावरच्या सुजाता मधील मेदुवडा बेस्टचं - सांबारात बुडवून मागवावा. डॉ. आंबेडकर रोडवरच्या ग्रेट पंजाब चे मटण शीग कबाब छान असतात. सायबिणी गोमांतक चा खिमा.

माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीत प्रकाशचे केटरिंग होते. केवळ अप्रतिम....

रुईयाच्या मुलींच्या कँटिनमध्ये अतिशय छान ब्रेड-रोल मिळत असे. त्याची चटणीहि मस्त असायची.

वाईट्ट अनुभव : टाईम्स मध्ये आलेला रिव्यू वाचून शितळादेवी जवळ असलेल्या 'काकोरी कबाब हाऊस' मध्ये गेलो अणि फसलो. इतकी बेक्कर बिर्याणी!

पाटील धन्यवाद! Happy

मामी, दादरला जिप्सीमध्ये पाणीपुरीचा कॉर्नर सुरू केलाय. मी ट्राय केली होती पण पाणीपुरीच्या सर्वसाधारण किंमतीच्या मानाने बरीच महाग आहे आणि चवही काही खास नव्हती. स्वच्छता हा निकष असेल तर आगर बझारजवळ (पोर्तुगीज चर्चवरून सिध्द्दीविनायक मंदिराकडे जाताना) नवं सहकारी भांडार आलंय तिथे चाटसाठी स्टॉल आहे. पाणीपुरी बरी असते, भेळ ट्राय करून पाहिली नाहिये.

रगडा पॅटीस आणि फालुदा कुल्फिसाठी गांधी मार्केटजवळचं हिमालय बेस्ट आहे.

सिटीलाईट च्या मागे येक भेळपूरी वाला होता(आत्त्ता आहे की नाही हे नाही माहीत) चव मस्त , स्वच्छता प्रत्यकाचा मापदंड वेगळा

शुश्रूषा हॉस्पिटलच्या समोर "अपूर्वा" म्हणून एक हॉटेल आहे. तिथे चाट, डोसा वगैरे छान मिळतं. व्हेज चायनीज सुध्द्दा चांगलं असतं. हॉटेल एकदम स्वच्छ - निदान १ महिन्यांपूर्वी तरी होतं. Happy

स्वप्ना, माटूंगा स्टेशनसमोर एका गल्लीच्या तोंडाशी एक पाणीपुरीवाला बसतो. आता त्याने
स्टॉल टाकला आहे. त्याच्याकडची पाणीपुरी, रगडा पॅटीस आणि दही बटाटा पुरी मस्त.
गेल्या २५ वर्षांपासून खातोय तिथे !!!

हो हो ! धन्यवाद स्वप्ना_राज, पाटील आणि दिनेशदा! हि सर्व माहित आहेत. चांगली हि आहेत. पण एकदम झक्कास नाहित, जशी एल्को मार्केट्ची आहे. माटुंगा मात्र झक्कास! स्वप्ना_राज, अग अपूर्व माझ्या बहिणीच्या ऑलमोस्ट अंगणातच असल्याने खूपच वापरून झालयं.

दादर २८ मध्ये गेलो होतो. मेनु काही खास नाहि. चायनीज प्नन्जाबी खाउन कन्टाला आलाय. जाहिरात पाहुन गेलो.पण विशेश नाही. महाराश्त्रियन पदथ्र मिळ्त नाहीत.

नविन धागा कसा उघडायचा माहित नसल्याने येथे लिहीले आहे.
कोकणातील खादाडी (किंवा मुंबई बाहेरील खादाडी):

कुडाळ ST Stand (जुना)च्या EXIT बाजुला एक भजीवाला आहे. must try. जनरली भजी मऊ किंवा बुगबुगीत असतात. ह्या भजीवल्याकडची भजी थंड झाली तरी कुरकुरीत! "मेल्यान भजावर बंगलो बांधलो" असे म्हणत लोक ती भजी घेण्यासाठी वाट बघतात. समोरच्या बाजूला बाळकृष्णचे कॉकटेल. नेरुरच्या रस्त्यावर "भाओजींची खानावळ".

गोवा पोर्तुगिजा चा एक किस्सा :

आम्ही ७ मैत्रीणी तिथे एकदा जेवायला गेलो. गप्पा मारणे, टवाळक्या करणे आणि जमले तर जेवणे हा प्रोग्रॅम होता ... कसचे काय! तिथे २ वादक आणि एक गायक यांचं एक भरारी पथक होतं. आम्ही जरा खॅखॅ-खूखू ची मैफिल जमवली होतीच की त्यांनी आमचा ताबा घेतला. तिघे उगाचच चेहेर्‍यावर अतीव आनंदाचे भाव आणआणून आमच्या कानात कोकणी संगीत ओतायला लागले. आम्हाला कुठे बघावं कळेना... त्यांच्याकडे किंवा एकमेकींकडेही बघण्याची खोटी, कारण हसून हसून मेलोच असतो. टेबलाकडे बघत तब्बल १०-१५ मिनिटं काढली ..... तेवढ्यात दुसर्‍या टेबलावर दोन कबुतरं येऊन बसली. तर ही आगाऊ मंडळी, त्यांच्या टेबलाशी जाऊन घसा साफ करायला आणि वाद्य खाजवायला लागली. बिच्चारी कबुतरं!

इथे आम्ही सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा एकदा अड्डा जमवायला लागलो तर खुददस्तुर अवचटसाहेब टेबलाशी हजर! त्यांनी तर कमालच केली. स्वतःच्याच प्रेमात किती म्हणून पडायचे? त्यांनी प्रत्येकीला स्वतःचे कार्ड दिले - न मागता, सत्यनारायणाचा प्रसाद देतात ना तसे! बरे ते कार्डं पण दणदणीत, दोन फोल्ड असलेले असे तीन पानी बिझिनेस कार्ड! पहिल्याच पानावर अ.साहेबांचा साजूक तुपातला हसरा चेहेरा.... आणि बाकीची सर्व जागा बारीक मजकूराने भरलेली. त्यात बरीच इंग्रजी अद्याक्षरं होती. त्यां सगळ्या डिग्र्या होत्या. आणिही काहीबाही छापलेलं होतं पण ते वाचून व्हायच्या आत बरीचशी जाड बाडं हातात कोंबली गेली. ते होते अ.साहेबांचे फोटोचे आल्बम. कोणा थोरामोठ्यांनी त्यांच्या रेस्टॉरंट मधे वर्णी लावल्याबद्दल त्यांना अ.जोडप्याबरोबर फोटो ... असे अगणित फोटो...

तरीही आम्ही ऑर्डर दिली, जेवलो. मग बिल देऊन झाल्यावर सगळी कार्डं गोळा केली आणि एका टेबलमॅट खाली सरकवून दिली. हसू दाबत धावत बाहेर पडलो आणि ती कार्डं बघून अ.साहेबांचा चेहरा कसा होईल ह्या विचाराने दाराबाहेरच भरपूर हसून घेतले.

पुन्हा जाणे नाही.

मामी :d

Pages