मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काही दिवसापूर्वींची इथली चर्चा:

बाकी हे लोक स्ट्रॅटेजीला स्टॅटर्जी का म्हणतात? मागच्या सीझनमध्ये पण कुणीतरी म्हणत होते बहुतेक आणि कालपण अक्षय स्टॅटर्जी म्हणाल्यासारखा वाटला.

Submitted by स्वरुप on 3 October, 2021 - 14:20

हो Proud
तो भूषण कडु सुद्धा एकदम चॅटर्जी म्हंटल्या सारखा स्पष्ट स्टॅटर्जी म्हणायचा !

Submitted by दीपांजली on 3 October, 2021 - 20:00

Yess
मी मुलीला म्हणालेच... सगळे माबोवरचे पॉइंट्स बोलत आहेत मांजरेकर.
स्टॅटर्जी वरून तर शिक्कामोर्तबच झालं. कारण हा मुद्दा बाहेर कुठेही वाचला नाहीये.

स्नेहाची एंट्री झाली तेव्हा मेघा धाडे परत आली असा बर्‍याच जणांना भास झाला...मी पण त्यातलीच एक होते...अर्थातच तिच्याकडून चांगले खेळण्याच्या अपेक्षा होत्या...पण आता तर जय सोबतचे तिचे चाळे बघून असे वाटतं, बाई भीक नको पण कुत्रं आवर ...मांजरेकरांनी आज तिला स्पष्ट सुनावलंय ....पण काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही ...
मीरा चेहर्‍यावर किती निष्पाप, निरागस भाव आणून बसते वीकेंडला जशी मोठी सद्गुणांची पुतळीच आहे ...

शिवाजीने वीणाला लाथ मारली होती. दोघी जेलात गेल्या. >>> ते आधी. शिवानी परत आली तेव्हा, तिने हिना पांचाळच्या ( आठवलं नाव, आठवत नव्हतं बराच वेळ ) पोटात लाथ मारलेली.

मला वाटत गेम कळलेले असा क्रम लावला तर
मिनल
विशाल
विकास
त्रुप्ती
जय
मिरा
उत्कर्श
सोनाली
गादा
आविश्कार
स्नेहा
दादुस
दादुस ने बीग बॉस एकतरी सिझन बघितल होत की नाही अशी शन्का आहे, त्याना काहीही कळत नाही किवा ते तस दाखवतात.

माझी पण ऑलमोस्ट प्राजक्ता सारखीच लिस्ट, तृप्तीच्या वर जय येईल फक्त.
नं.१ विशाल वाटतो मला ज्या प्रकारे तो त्याची पर्सनॅलिटी/स्वभाव वगैरे दाखवतो, घरकमात भरपूर काँट्रिब्युशन, ताकद, दिसणे वगैरे तर आहेच हिरो मटेरियल.
पण टास्क्स आली कि मिनल जास्तं आवडते.

वरच्या लिस्ट मधे आदिश राहिला पण तो नविन आहे अजुन गेममधे
आज म्हणजे ममानी सगळे पत्तेच ओपन करुन दिले , आदिशने अविस्कारला का सेफ केले हे ओपन सिक्रेट आहे पण त्याला एकदम कोन्डित पकडल्यासारख झाल, बाकी मिरा, उत्कर्श,जय,स्नेहा सगळे सॉरी सरचा पाढा वाचतात, इतक कस खेळायच कुणीही नाही सान्गणार रे! तरि ममा सान्गतात.
सोनालीला बोलले ते अगदी अपेक्षित होत आता तरी योग्य खेळ करावा, स्नेहाला बबली म्हणतात पण ते बळेच आहे मला सोनाली बबली वाटते,चिवचिव चालु असते सारखी दिसायला पण गोड आहे.
विशाल खरच स्मार्ट आहे तो ममाच्या हिन्ट बरोबर उचलतो तेच मिनलच किचन पॉलिटिक्स मधे तिला झिरो इन्ट्रेस्ट आहे, सोनाली तिथेच चुकलिये 'गेम्,टास्क ह्यात स्मार्टनेस दाखवायच्या एवजी बसली भाताला फोडणी घालत.
दादुस खरच इतके साधे भोळे आहेत का? बीग बॉस म्हणजे गुण्यागोविदाने नादणार एक कुटुन्ब आहे, आपआपली काम करायचि,टास्क करायची एवढच वाटतय का त्याना... बाकी सगळ्या प्लॅन पासुन ते शेकडो हात दुर असतात.
कूणाला जिन्कायच नाहिये यावर अविष्कार पटकन हात वर करेल अस वाटल किवा त्याचा हात धरुन करा वर कूणीतरी.
ममा आज जरा जास्तच चिडले होते अस वाटत होत.

होना त्यांना कुणीतरी पाणी द्या आता असं वाटत होतं Happy मजा आली पण.
काही यूट्यूबर्स पण "अगदी मी जे म्ह्टलेलो तसंच ममा आज बोलले , ते बहुधा माझे चॅनल बघतात " असे म्हणाताना दिसले. हे फीलिंग कॉमन आहे असे दिसते Happy पण ममांनीही सोशल मिडिया वाचत असल्याचा इन्डायरेक्ट उल्लेख केला आज.
आधी दिवसभराच्या फुटेज मधे जय उत्क्याला म्हणताना दिसला की स्नेहा स्वतःचा गेम खेळते आणि ते मला आवडतं तेव्हा मला आँ? हिला कसलं स्वतःचं मत ? असं फीलिंग आलं! स्नेहाला ममा बरोबर बोलले Happy अजून जरा झोडायला हवं होतं. फार इरिटेटिंग आहे. आता ते सरंगे नाही म्हटली तर बरं होईल.
आज सोनालीची साडी अन मीराचा ड्रेस वगळता सगळ्यांचे कपडे महा भयाण होते.

वीक एंड एपिसोड कसा नसावा याच उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड.
बिग बॉस चा सगळा यु एस पी घरातील लोकांना घराबाहेर काय चालले आहे हे माहीत नसनं. हिंट देने वेगळे आणि बाहेर च्या प्रतिक्रिया वर्ड टु वर्ड वाचून दाखवले तर गेमची मज्जा संपली की सगळी.
मांजरेकर स्पून फीड करत आहेत कसं खेळायचा. ते आतले लोक त्यांचे सगळे ऐकत नाहीत ही गोष्ट वेगळी.
सिझन चे सर्वात वाईट खेळाडू मांजरेकर असतील.

आदिशला जेव्हा ममां नी विचारल आविष्कारला सेव्ह करण्याबद्दल,तेव्हा त्याने गुगली टाकायला हवी होती,की मला इंन्स्ट्रक्शन होती तशी.
ममांच तोंड बघण्यासारख झाल असत.
बिबॉसचे पण यॉर्कर, दुसरा वाया गेले असते.
आता कस मी आवरू,अस झाल असत बिबॉसला.
काल ममांनी बोलण्याच्या फ्लोमध्ये चक्क शिवी दिली जी अर्थातच म्युट केली,कोणाच्या लक्षात आल का?
बाकी,दुसर्या वाईल्ड कार्डबद्दल काही कल्पना आहे का?
फिमेल असणार आणि टीम ए जॉईन करेल.

खरं तर 'तू त्याला का सेव्ह केलंस' असं मांजरेकारांनी विचारणे चूकीचे होते. इतर खेळाडूंनी विचारले हे ठीक आहे.‌पण बिग बॉस ला काय करायचंय त्याच्याशी?

या सीझनमध्ये बिग बॉस फार स्लो आणि रटाळ बोलतात असं अजून कोणाला वाटतं का? फार कंटाळवाणं वाटतं.

प्रेक्षकांनी करायच्या चुगल्यापण मांजरेकर करतात.
जय सोनालीचे कान भरतो आणि ती विकासला येऊन विचारते हे काल सांगितलं. मागे असंच टीम ए बद्दल केलं होतं.
त्यांचं प्लानिंग प्लॉटिंग असं फोडायला नको.

चुकीच्या वागण्याबद्दल झापणे ठीक.

खरं तर 'तू त्याला का सेव्ह केलंस' असं मांजरेकारांनी विचारणे चूकीचे होते. इतर खेळाडूंनी विचारले हे ठीक आहे.‌पण बिग बॉस ला काय करायचंय त्याच्याशी?>>> आदीश स्वत:ला हवे त्याला सेव्ह करतो आणि दुसऱ्यांना त्यांनी कोणाला सेव्ह करायला पाहिजे ते सांगतो वा त्यावर वाद घालतो. त्यासाठी त्याला सुनावले. प्लस आविष्कार काहीच करत नाही मग त्याला सेव्ह करायची गरज नव्हती हेही सांगायचे असेल.

Submitted by भरत. on 24 October, 2021 - 09:39>>>>+१११११११ ज्या कंटेंटसाठी लोकं शो बघतात तोच कंटेंट दाबला कसा जाईल यासाठी मांज्या प्रयत्नशील असतो. कंटेस्टंट होऊ दे ना प्रेक्षकांच्या नजरेत वाईट, होऊ दे ना राडे, होऊ दे ना जोरात भांडण. कंटेस्टंट लोकांच्या नजरेत चांगला दिसायला पाहिजे हा अट्टाहास का? कंटाळा आला 'बाहेर चांगलं नाही दिसत' वाक्य ऐकून ऐकून. शो संपल्यावर यांना निवडणुकीला उभं करणार आहात की सोबत प्रचाराला नेणार आहात की या सगळ्यांना घेऊन आश्रम बांधणार आहात? त्या स्नेहाला ती खेळत नाही यावरून बोलणं ठीक आहे पण सारंघे वरून एव्हडं काय ओरडायचं? नका दाखवू ते, दुर्लक्ष करा. जेमतेम 10 15 सेकंद असतं ते. मांज्या अगदी असा ओरडला जसं काय स्नेहा त्याला दर पाच मिनिटांनी त्याच्या कानात सरांघे सरांघे किंचाळत असते. एव्हडं काय हायपर व्हायचं त्यात? सोशल मीडियावर लोकं सरांघे बद्दल बोलतात म्हणून झाला हा पण सुरू बुगुबुगु. मान्य आहे की सोशल मीडियावर टीम बी ला जास्त सपोर्ट आहे पण म्हणून असं नाही ना की टीम ए ला खालच्या लेव्हलवर जाऊन बोलायचं. मांज्या कधी बिग बॉसच्या घरी गेला तर ते चार जण लाईट बंद करून याच्या अंगावर गोधडी टाकून धबाधब हाणतील याला

ए टीम मध्ये एकाच्या निर्णयावर सगळे ठाम असतात! तर बी टीम विस्कळीत!असे ममां ही बोलले काल!
थोडक्यात मिराची डोके, तिची स्ट्रॅटेजी.. त्यानुसार जय उत्कर्षची शक्तीप्रदर्शन, त्यामागे दादूस गायत्री, तृप्ती ताई गुबुगुबु!
बी टीमचं सगळं स्ट्रॅटेजी करणारी मीनलच, खेळणारी मिनलच! तिथं विकास वेगळ्याच विचारात, सोनालीच डोके काहीतरी तिरपागड् विचार करण्यात, विशाल सर्वप्लेयरसमभाव..(बरोबर बोलली सोनाली, "हरिश्चंद्राचा अवतार") अन आदिश अजून स्वतंत्र विचार करण्यात.. खरच त्यांनी टीम बिल्डिंग करायला पाहिजे. विकास कशाला ए टीमचे सल्ले घ्यायला जातो? सोनालीचा ही झुकाव जयकडे!
जय, इमोशनली पोरींना weak करतोय.. ! स्नेहाचा जरा चांगला जम बसत होता ..तिला त्याच्यामागे पागल करून गुबुगुबु करून ठेवलं! आता तो सोनालीला फोडायच्या मागे.

आदीश स्वत:ला हवे त्याला सेव्ह करतो आणि दुसऱ्यांना त्यांनी कोणाला सेव्ह करायला पाहिजे ते सांगतो वा त्यावर वाद घालतो. त्यासाठी त्याला सुनावले. प्लस आविष्कार काहीच करत नाही मग त्याला सेव्ह करायची गरज नव्हती हेही सांगायचे असेल.
<<<
एग्झॅक्ट्ली, मीनलशी वाद घातला आणि आविष्कारला वाचवताना त्याने कारण हे दिलं कि तो खूप स्ट्राँग कॉन्टेस्टन्ट आहे, जर म्हंटला असता कि त्याला एव्हिक्शनची जास्त रिस्क आहे तर एकवेळ पटल असतं Happy
एपिसोड आणि पंचेस मस्तं होते आजही, किती आपलेच शब्द बोलले असं खरच सगळ्यांना वाटलं, चॅटर्जी स्टॅटर्जी ऐकून तर वाटलं वाचलीये माझी पोस्ट Proud
मांजरेकरांनी सॉलिड धुलाई केली गुंड गँगची , वर मागच्या आठवड्यात पाहुणी आलेल्या शूर्पणखेलाही टोले मारले Proud
मीनलचं कौतुक, इतर मुलींचं फर्निचर काँट्रिब्युशन, मीनलच्या कौतुकामुळे जय उत्कर्षचा थोबाड फोडल्यासारखा चेहरा, तृप्तीच्या संचालनाची + विकासला कोंडायच्या सो कॉल्ड स्ट्रॅटजीची चिरफाड, जयला टॉमी वरून ,अँगर मॅनेजमेन्ट आणि उघडे फिरण्यावरून पुन्हा दिलेली समज,| गायत्री मीराची अक्कल , मच निडेड सोनालीच्या किचन पॉलिटिक्सची शाळा सगळच भारी पण……. बिनडोक स्नेहाला तिची जागा दाखवून दिली हे आणि सारंगे बन्द करायला सांगितले हे सर्वात मोठे सत्कार्य Biggrin
उत्कर्षच्या २ दात धमकी वरून त्याची जी शाळा घेतली, खरच हहपुवा झाली !
बाकी सोशल मिडिया, बाहेरच्या जगातले फिडबॅक, मीराला सिंपथी घ्यायची आयडिया इ. सांगायची काही गरज नाही, अर्थात तरीही हे लोक काही इंप्लिमेन्ट करत नाहीत !
आज सोनालीचा रफल्ड बॉर्डर कॉकटेल साडी लुक आवडला , स्नेहा आणि तिचा मेकप अतिभयानक Uhoh
उद्या मेघा जाणार आहे बिबॉ मधे, तिला मी इन्स्टाग्रॅम वर मेसेज केला होता मागच्या आठवड्यस्त कि जर तुला तिथे जायचा चान्स मिळाला तर मुलींना थोडी स्ट्राँग खेळायची अक्कल आणि बेसिक मेकप लेसन्स दे,तिने लाइक केला होता माझा मेसेज Wink

खरं तर 'तू त्याला का सेव्ह केलंस' असं मांजरेकारांनी विचारणे चूकीचे होते. इतर खेळाडूंनी विचारले हे ठीक आहे.‌पण बिग बॉस ला काय करायचंय त्याच्याशी?>>exactly..

त्या स्नेहाला ती खेळत नाही यावरून बोलणं ठीक आहे पण सारंघे वरून एव्हडं काय ओरडायचं? नका दाखवू ते>>>+11111

वीक एंड एपिसोड कसा नसावा याच उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड.
बिग बॉस चा सगळा यु एस पी घरातील लोकांना घराबाहेर काय चालले आहे हे माहीत नसनं. हिंट देने वेगळे आणि बाहेर च्या प्रतिक्रिया वर्ड टु वर्ड वाचून दाखवले तर गेमची मज्जा संपली की सगळी.
मांजरेकर स्पून फीड करत आहेत कसं खेळायचा. ते आतले लोक त्यांचे सगळे ऐकत नाहीत ही गोष्ट वेगळी.
सिझन चे सर्वात वाईट खेळाडू मांजरेकर असतील.>>>> मला खरं तर आधी कालचा एपिसोड आवडला होता....पण नंतर विचार केल्यावर अगदी हेच आलं मनात...यावेळी सगळ्या सोमि वरच्या comments जशाच्या तश्या बोलून दाखवत आहेत अगदी सारंगे सारख्या अनावश्यक पण...शिवाय कोणी कोणाला का save करावं याबद्दल बोलणे म्हणजे personal नाही का....

काल ममांनी बोलण्याच्या फ्लोमध्ये चक्क शिवी दिली जी अर्थातच म्युट केली,कोणाच्या लक्षात आल का?
<<<
हो , तो शब्दं म्युट करण्या इतका बॅड वर्ड आहे माहित नव्हतं Happy

अरे ,बर्थ डे बॉय घरात राहिला.आणि जयशी टक्कर घेणारा आदिश बाहेर.
बरोबर,आदिशमुळे टीम बी निगेटिव्ह क्षहोईल ही भीती वाटली असेल बिबॉसला, म्हणून आदिश बाहेर.

काल ममांनी बोलण्याच्या फ्लोमध्ये चक्क शिवी दिली जी अर्थातच म्युट केली,कोणाच्या लक्षात आल का?>>> हो, हे मी पण notice केलं...

श्वेता आंब्रे यांनी fb वर लिहिलेली पोस्ट...मला पटली..म्हणून इथे जशीच्या तशी टाकत आहे...
थोडं सोनाली बद्दल.....

आजून पर्यंत सगळ्यांना आवडणारी आणी चांगली स्पर्धक असलेली सोनाली...... अचानक तिच्यात पण तृप्ती चा आत्मा घुसल्या सारख करत तिने पण या वीक मध्ये खूप एर्रिटेड केलं... काय ते तोंडातल्या तोंडात बोलण अक्षरशः चीड येते .... अर्थ नसलेल्या गोष्टींवर किती तरी वेळ चर्चा करणं...... मुळात तिला बोलायचं असतं ते बाजूला राहत आणी वेड्यासारखं काहीतरी बडबडत असते.... मला वाटतं विशाल ने तिला हेच बाण मारायच्या टास्क मध्ये सांगितलं होत.....की मुद्द्याचं बोलत जा... . पण तिला जर विशाल ने काही सांगितलं तर तिला तिचा तो अपमान वाटतो..... काय झालं त्याने तुझं नावं घेतलं तर...... जेल मध्ये तर नाहीच ना गेलीस...... त्यात एवढं over react व्हायची गरज काय.....एवढी धडपड picture मध्ये यायची.... मग टास्क मध्ये का कमी पडते...

बरोबर बोलले मांजरेकर sir तुला विश्वास नाही.....तुला स्वतःच्या डोक्याने विचार करता येत नाही......... तिला जय वर विश्वास आहे.. ..... आणी जय च ऐकून विकास ला जाब विचारते..... विशाल वर संशय घेते..... आज नाटक करून दाखवत होती विशाल ला ती किती possessive आहे....मीरा सोबत बोलू नको न all ...

पण जर possessive आहेस तर मग विकास समोर एकंदरीत सगळ्यां महाराष्ट्रासमोर त्याला तू स्वार्थी पण म्हणतेस...... तरी विकास ने तो शब्द तोडला.... की नाही विशाल चा स्वार्थ नसणार त्याचा काहीतरी future plan असेल म्हणून........ हीच बोलते विशाल स्वार्थी आहे त्याला आपल्या माणसांची किंमत नाही तसं असतं ना सोनाली ताई तर त्याने जेल तोडलाच नसता..... त्याला काय माहिती नसेल का... bb च्या प्रॉपर्टी च नुकसान केलं तर आपण नॉमिनेट होऊ म्हणून.... तरी त्याने मैत्री निभावली..... तू भात शिजवायला नकार दिलास त्याने तो बनवलाय त्याची duty नसताना.....

सोनालीला तो स्पेशल treat करतो......आणी ही विश्वास कोणावर ठेवते.... जयवर.....

विकास ला vote दे हे पण विशाल ने तुला समजावले? ... का? मुळात समजवायची गरज का पडावी..... मान्य आहे तुझे आणी दादूस चे relation चांगले आहेत..... पण तिथं त्या वेळेस सगळे स्वतःच्या ग्रुप चा विचार करत होते...... मग स्वतःच्या ग्रुप मधल्या माणसाला च आपण आधी सपोर्ट केला पाहिजे हे का कळलं नाही तुला....उद्या तुला गरज लागली तर तुझा ग्रुपच तुला सपोर्ट करेल.... दादूस नाही... .

त्या बाबतीत मग मीरा उलट best आहे.... ती स्वतःच्या team च्या against तरी जात नाही....... सोनालीला स्वतःच्या team च्या सगळ्याच मेंबर चा प्रॉब्लेम असतो..... minal बद्दल पण खुसुर फुसूर चालू असते..... aadish खरंच काय बोलला होता किचन मध्ये गायत्री चपाती करत होती तेव्हा..... उगाच picture मध्ये यायला काही वाद काढत बसायचं का.....

जय सोनालीचे च का कान भरायला येतो..... मीनल चे का नाही भरत? कारण त्याला माहित आहे सोनाली हलक्या कानाची आहॆस.... मीनल तोडीस तोड उत्तर देईल त्याला....

आणी असचं करत राहिली तर हिची गत पण तृप्ती आणी स्नेहा सारखी होईल..... घर का ना घाट का....

आणी जर विशाल सोबत लगेच हात मिळवणी करायची असते मग उगाच भांडण करून त्याला नको ते बोलून त्याची image का down करतेस....... उगाच picture मध्ये यायला काही करायचं का?

विशाल तिच्यासाठी खूप करतो पण सोनालीला त्याची किंमत नाही हे असचं same जय स्नेहाला सांगत होता dining table वर ..... live मध्ये पाहिलं मी...

I dont know एवढा master mind विशाल त्याला का हे कळत नाहीये....

मी खरंच खूप fan होते सोनालीची.... की straight forward आहे, मस्ती खोर मनमोकळे nature आहे तिचं...... पण या week मध्ये खरंच खूप एर्रिटेड झालं..... सोनालीच किट किट आणी तोंडातल्या तोंडात बोलण ऐकून........

विशाल ला बोलते तुझे मुद्दे त्या व्यक्ती पेक्षा मोठे असतात.... अरे विशाल नावाची जी हस्तीं आहे ना तिचं सध्या सगळ्यात मोठी आहे.... लाखो मनावर राज्य करते.....तू मुद्द्याचं काय घेउन बसलेस.....

Any ways best of luck सोनाली

तुझं असंच वागण राहील तर तुझी counting पण मीरा आणी गायत्री मध्ये होईल..... कदाचित त्या पेक्षा पण वाईट होईल..... कारण त्या स्वतःच्या team सोबत तरी प्रामाणिक असतात...... असं होऊ नये हिच सदिच्छा

Pages