मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघाला फारच अपेक्षा आहेत स्नेहाबद्दल. खऱ्या आयुष्यात टफ असणं वेगळं आणि बिग बॉस वेगळं. ... इट कुड बी अदर वे राउंड. ती खर्या आयुष्यात पण अशीच डंब असेल.
रेशम आळशी होती, पण बावळट कधीही नाही वाटली.

आता खरं तर मजा यायला सुरूवात होऊ शकते, जर तृप्ती आणि दादूसने नीट पत्ते खेळले तर. ते दोघे जिकडे जातील तिकडे बहुमत होईल. त्या दोघांनीही ठरवायचंच की जर आपण वाचत असू तर आणि तरंच कुठल्या तरी एका टीमला सपोर्ट करू. तृप्तीला ती आयडीया आलीये खरं तर पण दादूस घाण करेल बहुधा.
बाकी, स्नेहा आणि आविष्कार मठ्ठ आहेत केवळ. त्यांचा कसलाच उपयोग नाही.

आदिश सिक्रेटरुम कँडिडेट नाहीये, तो ऑलरेडी बघून आला होता शो , त्याला कोण निगेटिव दिसतय्/कोण पॉझिटिव/ आपण कसे दिसत असु सगळ्याचा अंदाज ऑलरेडी होता !
सिक्रेट रुममधे असा माणुस पाहिजे ज्याला आत्मपरिक्षणाची गरज आहे/सतत राडा करतो/अँगर इश्युज आहेत/ज्याला १०० वेळा सांगून समजत नाही, पापाचा घडा भरत आलाय पण तरीही एक प्लेयर म्हणून खूप पोटेन्शिअल आहे !
थोडक्यात जय किंवा मीरा सारखा प्लेयर !
हिन्दी मधे श्रीसन्त एकदम परफेक्ट होता सिक्रेटरुमला !
आजचा एपिसोड नुसताच टीपी होता, दादुस जायला हवा होता..आदिश डिझर्व्ड टु स्टे पण आविष्कारला सेव्ह करून त्यानी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला !
मेघा रेशमने मीनल -विशाल ला खुष केले. आज गायत्री थप्पड टास्क्मधेही दिसली नाही आणि रेशम-मेघा सुद्धा तिच्याशी काय बोलल्या दाखवल नाही , तिचा स्क्रीन टाइम कमी केला तर पुढचा नं तिचा लागु शकतो !
मांजरेकर यावेळी खूप बारकाईने शो बघतायेत आणि योग्य सल्ले देतायेत (स्पून फिडिंग वाटुच शकतं हे.)
चुगली ऐकून आलेल्या जयला अगदी बरोब्बर सांगितलं कि अशी जेस्चर्स अजुन दाखवत जा, चक्क क्युट आणि एकफम स्पोर्टिंग स्पिरिट असलेला वाटला त्यावेळी जय !
एक मानलच पाहिजे कि कोणी किती चुगल्या केल्या, प्रयत्नं केला तरी त्यांची युनिटी तुटत नाही!

स्नेहा आणि आविष्कार मठ्ठ आहेत केवळ. त्यांचा कसलाच उपयोग नाही
<<< अगदी .. मेड फॉर इच अदर Wink
मेघा आविष्कारशीही व्यवस्थित ,अगदी चेष्टा मस्करीत बोलत होती, मैत्रीणीच्या अग्ली डिव्होर्स नंतर तिच्या एक्सशी इतकं फ्रेंड्ली बोलताना पाहून थोडं नवलच वाटलं Happy

आदिशने आविष्कारला सेफ करून स्वतः:घ्या पायांवर धोंडा मारून घेतला हे बरोबर.
त्याला strong player ना eliminate करायचं होतं. हा over confidence होता.
त्याच्यासमोर आविष्कार असता तर तो वाचू शकला असता.

आदिशची पर्सनॅलिटी छान वाटली आणि तो जयला टक्कर देत होता म्हणून आणखी राहायला हवा होता.

दादुसची कॅप्टनसी बरखास्त झाली की.

थोडक्यात जय किंवा मीरा सारखा प्लेयर !<<< अगदी अगदी! दादुसला सिक्रेट रुम मधे टाकुन काय साध्य करणार बिबॉ हे त्यांच त्यांनाच माहिती!
जय -मीरा-उत्क्या सारखा प्लेयर आत गेला तर त्याच्या माघारी हे लोक काय कुचाळक्या करतात, कशी स्ट्रेटेजी आखतात हे तरी कळेल.
दादु आत गेले तरी, "मस्त आत खात पित होतो, तुमची गंमत बघत होतो, बेटा!" अस म्हणतील.

स्नेहा आणि आविष्कार मठ्ठ आहेत केवळ. त्यांचा कसलाच उपयोग नाही----------म्हणून च लग्न केलेलं त्यांनी...
माझ्या साबा म्हणतात अशा लोकांना - खेकडास मेकड मिळाल्यावर दुसरं काय होणार

दादुसला सिक्रेट रुम मधे टाकुन काय साध्य करणार बिबॉ हे त्यांच त्यांनाच माहिती!>>>नाहीतर काय....आणि secret room मध्ये न्यायची पद्धत पण किती

common,repeated....घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशी...बकवास...जय बोलला सुद्धा मला वाटलंच होतं...
काल मेघाला पाहून खूप मस्त वाटलं...आणि तिने घरातल्यांना दिलेले suggestions पाहून तर असं वाटलं...seriously मांजरेकर बोअर झाले आता मेघाला द्या होस्टिंग....रेशम काल पण जरा विचित्रच वाटली...काय मूर्खासारखे हातवारे करत होती...एवढी मोठी आहे..पण जराही सेन्स नाही असं वाटलं...शिवाय मेघाच्या बोलण्यावरून तिची टिंगल करणेही चालू होतं तिचं.....
यावेळी Bigg boss चा आवाजही आधी सारखा प्रभावी वाटत नाही.....
आदिश राहायला हवा होता....चॅनेल चा सपोर्ट बहुतेक उत्कर्षला जास्त आहे....म्हणुनच चॅनेलवर त्याचं promotion करणे,त्यांच्या ग्रुपला सरळ सरळ hints देणं चालू आहे...त्यामानाने विशालला तेवढं महत्त्व देत नाहीत...उत्कर्ष शेवटच्या दोघात दिसला तर आश्चर्य वाटायला नको....

आदिश डिझर्व्ड टु स्टे पण आविष्कारला सेव्ह करून त्यानी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला ! >>> करेक्ट डीजे. बाहेरुन बघून येऊनही दोन वि किंवा मीनलला सेफ करावं हे समजलं नाही त्याला. वर सेल्फ गोल केला त्याने म्हटलं आहे (बहुतेक रेवा).

स्नेहा आणि आविष्कार मठ्ठ आहेत केवळ. त्यांचा कसलाच उपयोग नाही. >>> अगदी अगदी. तरी सरंगेला ठेवतील. अविष्कार जाईल.

आता सो मि वर आदीशच्या बाजुने लोकं बोलतायेत, अरे वोटींग का नाही केलं त्याला. मीही कंजुसपणा केला म्हणा.

चावडी हल्ली फारच एकसुरी आणि बोअर व्हायला लागलीय..... ते जे गेम वगैरे असतात ते अतिशय फालतू असतात..... कानात सांगा, बाण मारा, थप्पड मारा पण इतकी करुनही यांच्यातले वैर संपत नसेल तर काय उपयोग त्या हेट बस्टर गेम्सचा?
चुगल्या मात्र कालच्या बऱ्या होत्या.... सोनालीची चुगली त्या दोघातले अंतर वाढवेल असे वाटतेय!
जय पण चुगलीनंतर मीरावर आभासी गोळी मारताना बरा वाटला!!

मेघा छान दिसत होती आणि विनरचा ऑरा जाणवत होता..... रेशम बालिश वाटली!!

दादूस वाचले हे ते वाचतील म्हणून हात वर करणाऱ्यांनाही खरे वाटत नव्हते Wink
आदिश चांगला खेळत होता..... कुठल्याही ग्रूपमध्ये जेल होणे वाईल्डकार्ड एंट्रीसाठी नेहमीच अवघड असते..... तो हळूहळू स्थिरावत होता!

आता A टीमवाल्यांचा माज कमी करण्यासाठी एखादा हुकुमशहा आणावा.... नंदकिशोर चौघुलेंसारखा Wink

आज दादूसचे अपहरण? त्यांना सिक्रेट रुममध्ये नेवून काही फायदा नाही!!

मेघा खरंच छान बोलत होती. सगळ्यांना मार्मिक सल्ले दिले. रेशम पूर्ण वेळ त्या स्कर्टशी खेळत होती, काहीतरी विचित्र हातवारे करत होती, नक्की काय करत होती तिलाच माहित. रेशम इथेही मेघाची टिंगल करत होती आणि तिला वेड्यात काढत होती. कमाल आहे या बाईची. रेशमचे दंड (arms) कमालीचे सुरकुतलेले दिसत होते तर मेधाचे दंड टोन्ड, वेट्स मारत असल्यासारखे. असो.
स्नेहाने खऱ्या आयुष्यात जे काही भोगलं आहे त्यामुळे येणारी मॅच्युरिटी तिच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही. त्यामानाने आविष्कार शांत वाटतो, मूर्खासारखा वागत, बोलत नाही. स्नेहाने आदिशला माती म्हटले आणि थोडया वेळाने तो बाहेर जाणार कळल्यावर रडायचे नाटक करत होती. अति बोलते ती. त्या दिवशीपण डोळ्यावर पट्टी आविष्कारने बांधली आहे म्हणून अशी आहे म्हणे, काहीही बोलते.

दादुस ना सिक्रेट रूम मधे नाहीये नेलेले. काहीतरी टास्क असेल.
सिक्रेट रुम मधे न्यायचे तर कुणाला कळू नये अशा पद्धतीने नेतात.

स्नेहाच्या आविष्कार बद्दलच्या कमेंट्स मुळे खूप नेगेटिव्ह वाईब्स येतात. तो शांतपणे सोडून देतोय. रिऍक्ट होणे टाळतोय. स्नेहा अप्रगल्भ दिसतेय प्रेक्षकांना तिच्या अशा वागण्या-बोलण्याने. आणि तसे तिच्या वयाशी आणि असलेल्या अनुभवाशी सांगड घालता येत नाहीये तिच्या आविष्कार संबंधी वागण्याची. खेळाडू म्हणून आविष्कार संथ असेल, फार ऍक्टिव्ह नसेल किंवा आळशी असेल. पण मॅच्युअर वाटतो आणि बॅलन्सड सुद्धा कारण स्नेहाच्या बाबतीत सांभाळून वागतोय.

आदिश साठी सोमि वर फार ऊसासे टाकले जात आहेत. मला आश्चर्य वाटलं बिग बॉस टीमला एव्हडा पॉप्युलर प्लेयर काढून आपला कंटेंट कमी होईल हे नसेल का लक्षात आले?
की ते लोक व्होटिंग मॅनेज करत नाहीत हे सिद्ध करायचे होते त्यांना?

आदिश चे एलिमिनेशन खरंच चक्रम वाटले. दादुस ला ठेवले त्याचा उपयोग ते नक्की कशासाठी करणार आहेत असा प्रश्न पडलाय कालपासून. कदाचित आता नॉमिनेशन टास्क मधे समजेल.

आजपण सांरंगे केलंच तिनी
<<<
Uhoh
आज नवीन व्हिडिओ आलाय त्यात जयशी पकडापकडीही चालुच आहे..
गाढावापुढे वाचली गीता म्हणावं तर गाढवाला तर गाढवाचा अपमान होईल.. पिस ऑफ फर्निचर म्हणावं तर फर्निचर खूप काँट्रिब्युशन देतं घरात हिच्या पेक्षा !
बुगुबुगुच्या आधी खरोखर स्नेहा जायला हवी , गुड फॉर नथिंग , तिच्यापेक्षा अविष्कार बरा म्हणायची वेळ आलीये !

मेघाचा वरचा व्हिडिओ बघतेय , तिने खरच को होस्ट केले पाहिजे पुढच्या वर्षी मांजरेकरां बरोबर , एकदम करेक्ट फिडबॅक आहे तिचा.
विशालला तिने महाराष्ट्राची मनं जिंकतोयेस सांगितलं हे ऐकून हुश्श झालं, समहऊ त्याचं फार कौतुक होत नाही , तरी या विकेंडला केलं थोडं कौतुक ममांनी !

तो विकास सारखा रडतो काय? अजून कळल नाही का याला की आपण दरवेळी नॉमिनेट होऊन वाचतोय.मला उषा नाडकर्णीची आठवण झाली.सॉलिड हायपर व्हायची नॉमिनेट झाल्यावर.
आज बिग बॉसने सगळ्या दोस्तांच्या जोड्यांत फूट पाडली.......
अगदी खर.उद्या जय आणि उत्कर्षमध्ये होणार आहे.अस यु ट्युबवर पाहिल.
विशाल विकास मध्ये वाद टास्कवरून आहे,समजू शकते.पण यांच्यात स्नेहावरुन.एवढी कोण आहे ती.

विशाल , विकास, सोनाली हे तिघे सतत एकमेकावर रुसण्यात अन मग एकमेकाना सफाई देण्यात गुंतलेले असतात. ते सेटल करून आता गेम वर फोकस केले नाही तर लोक वैतागतील. मग आतापर्यन्त मिळालेली लोकप्रियता तेवढ्याच पटकन निसटूनही जाऊ शकते.

दोन तरी वाइल्ड कार्ड एन्त्री आणाव्या बिग बॉस ने एखादी मस्त मिनल सारखी डॅशिन्ग स्मार्ट मुलगी जी गादा-मिराला अजुन नर्व्हस करतिल, एखादा हॅन्डसम हन्क टाइप जो जयला कॉम्पिट करेल.

स्नेहा ने रडून रडून जय कडून तिची अर्धी काम करण्याचं वचन घेतलं>>> अगदी. म्हणे मी दिवसभर काम करते आणि तरीही मी दिसत नाही असे बोलतात.
मला मागच्या सिजन मधली मेघा आठवली. सगळे तिला बोलायचे कि सतत पुढेपुढे करते, तिलाच कॅमेरावर येण्यासाठी सगळं करायचं असतं. तेव्हा ती सांगायची मी बिगबॅासचे सगळे भाग बघून आले आहे. अगदी ५-५ तास घरकाम केले तरी ते टिव्हीवर नाही दाखवत.

Pages