मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्नेहा अणि जय परत तेच प्रकार सुरु.. अणि मुद्दाम अविष्कार समोर... त्याला काही फरक पडत नाही स्नेहाबाई .. कधी समजणार तुम्हाला...

मी लास्ट नॉमिनेशन पाहिले आणि सुरवातीला सोनाली ची पिरपिर. विकास मिनल आणि आविष्कार ने सेपरेट टीम करून खेळावे. विशाल सोनाली चे टॅंट्रम हाताळण्यात वेळ वाया घालवू नये.
माझे व्होटस विकास, आविष्कार ला. आविष्कार विकास मीनलला व्यवस्थित सपोर्ट करतो, सेन्सिबल आहे, सोनाली सारख्या ब्लॅकमेल करून टीमची एनर्जी डाऊन करणाऱ्या मुलीला व्होट करण्यात काही अर्थ नाही. आणि तो गेला तर स्नेहा वाचेल जे मला नकोय.
विशाल जयला त्यांचे फॅन्स वाचवतील.
स्नेहा गादा सोनाली कुणीही गेले तरी चालेल.

रेवा२ +१
परवा 'आदिश सेफ का व्हायला हवा? तुला सेफ केले म्हणून का?' असे मांजरेकरांनी विचारले तेव्हा आविष्कार पटकन् obviously म्हणाला ते आवडले. उगाच मोठी मोठी कारणं दिली नाहीत.
तो तसाही बराच मॅच्युअर वाटतो. पण बिग बॉस विनर मटेरियल नाही.
सोनाली विशालची पिरपिर आणि स्नेहा जय ची पकडापकडी यांचा जाम कंटाळा आला आता.
पहिल्या सीझनमध्ये एक्स्ट्रा शॉट्स छान असायचे. सगळे मस्त गप्पा मारत असायचे. यावेळी हेच सुरू असते तिथेपण.

आविष्कारला मतं दिल्याने स्नेहा जाऊ शकेल का? मला वाटतं तिचा मूळ फॅन बेस त्याच्या फॅन बेसपेक्षा जास्त असावा.

विकास कामचुकारपणा करतो बहुतेक. जास्त झोपतोही. काल त्याला आणि विशाललाही इतकं ताणायची गरज नव्हती.
शेवटी टीम बी फुटल्यात जमा आहे. बिग बॉस खेल गए.
आता नरकात जय आणि विकासची जोडी जमू नये मात्र.

चुगली ऐकल्यावर विशालने सोनालीला दिलेलं उत्तर विकाससाठी होतं म्हणे.
ती सतत याचं डोकं खात असते. त्याने इतक्या वेळा तिची बाजू घेऊनही - हा कधीच माझी बाजू घेऊन नाही म्हणाली.

पहिल्या सीझनमध्ये एक्स्ट्रा शॉट्स छान असायचे. सगळे मस्त गप्पा मारत असायचे... ते लोक बर्ऱ्यापैकी यशस्वी आणि चांगले कलाकार होते. अशा लोकांकडे सांगण्यासारखे बरेच काही असते. आदिश मला तसा वाटला होता.
विकास आणि जय एकत्र आले तर मला आवडेल, चांगल्या संगतीत जय पॉझिटिव्ह दिसेल.
सोनाली गेली तर कदाचित विशाल विकास नीट फोकस करून खेळतील ही. विनर मात्र मिनल हवी मला.
आविष्कारला मतं दिल्याने स्नेहा जाऊ शकेल का? मला वाटतं तिचा मूळ फॅन बेस त्याच्या फॅन बेसपेक्षा जास्त असावा... असेलही पण ऍंटी स्नेहा लोकांनी प्रोअक्टीवली आविष्कार ला वाचवले तर तो वाचेल.
सोमि वर गप्पा मारणारे सगळे लोक व्होटिंग नाही करत. त्यामुळे खूप अनप्रेडीक्टेबल आहे.

सगळे बिबॉ च्या हातात आहे कोणाला काढायच, अविष्कार हे ऑबव्हियस ट्रम्पकार्ड होतं गायत्री स्नेहाला वाचवायला !
बोरिंग होतं हे टास्क आणि एपिसोड, स्नेहा गेलेली मला आवडेल पण नाही घालवणात तिला Uhoh

विशाल आधीच भरलटला होता..त्यात सोनाली ने त्याचा गैरसमज दूर केला नाही..विकास ने तर तिला छान समजावले होते..पण विशाल ला वाटल की विकास त्यांच्यात फुट पाडतो आहे.. माझं मत विकास ला..

भांडी भांडी काय करतात हे लोक ... स्वतःचे ताट वाटी चमचा का घासत नाहीत हि लोक
स्वतःच्या पांघरुणाची घडी पण घालत नाहीत का हि लोक

मीरा विरुद्ध अविष्कार? काय ‘बिग’ बॉस पब्लिकला काय येडा समजला काय. निदान तृप्तीला तरी उभा कराय्च.

त्या सोना- विशालने टिम बी ची वाट लाउन टाकली.
विशालने दूसऱयांदा विकासला टार्गेट केले. तो स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.
जयने, ममां ने दिलेल्या हिंट नुसार, नरकाचा स्वर्ग करायचे ठरवले.

बाकी आता बिगबॉसने दादुस, अविष्कार, स्नेहा ला लवकरच सेंड-ॲाफ द्यावा.

विकासला एवढं वाईट वाटायची खरे तर दाखवायची गरज नव्हती. स्नेहा बाहेर होईल की तो हा साधा विचार करून त्याने शांत रहायला हवे होते आणि स्पर्धाही कोणाशी होती तर मीनलशी जी लायक आहे स्वर्गात जायला हे गादाशिवाय कोणीच नाकारू शकत नाही. गोष्टी मनात ठेऊन योग्य वेळी बदला घेता आला असता. तो रडला तर त्याला सहानुभूती मिळेल असे विकासला वाटले असेल पण इथे सहानुभूतीची गरजच नव्हती.
आविशकार चांगले मराठी बोलतो म्हणून तो टिकला पाहिजे. नरकाला नरकं बोलणारी गादा किंवा सरांगे गेली पाहिजे यावेळी.

विकास नॉमिनेट झाला म्हणून रडला नाही. तो काही पहिल्यांदाच नॉमीनेट झालेला नाही
विशाल त्यांच्याबद्दल त्या आधीपासूनच रोष दाखवत होता. ते सगळं स्पष्ट झाल्यामुळे त्याला वाईट वाटलं असावं.
मेघानेही त्यांना जाता जाता सांगितलं होतं - तुमची युनिटी स्ट्रॉंग नाही.

कोण कोण आहेत नॉमिनेटेड.

बिग बॉसपण स्नेहा जय जोडी का प्रेक्षकांच्या माथी मारतायेत. त्यांच्या अगेंस्टच दिसतंय पब्लिक सो मि वर.

विशाल, स्नेहा, गायत्री आधीच नॉमिनेटेड.
जय, विकास, सोनाली, आविष्कार काल नॉमिनेट झाले.

दादूस, उत्कर्ष, मीनल, तृप्ती, मीरा सेफ.

फालतू टास्क होता,एका व्यक्तीवर ठरणार कोण सुरक्षित आणि कोण nominate. त्यातही जोड्या अशाच बनवल्या होत्या की टीम A चे जास्त लोक सेफ होतील. विकासचा वाद निरर्थक होता. लाईव्ह मध्ये एकत्र आहेत team B Happy

आता अविष्कार गेला तर पुढचा नंबर दादूसचा लागेल. दादूसने हुशारी दाखवत आविष्काराला स्वर्गात टाकायला पाहिजे होतं. म्हणजे दादूसचा अजून एक आठवडा राहायचा चान्स वाढला असता. मांज्याने जाब विचारल्यावर त्याच्यावरच उलटवायला पाहिजे होतं कि तुम्हीच मागच्या आठवड्यात सांगितलं होतं वीक प्लेयर आपल्यासोबत नॉमिनेट झाले कि आपले इथे राहायचे चान्सेस वाढतात. म्हणून पुढच्या आठवड्यात माझ्यासोबत नॉमिनेट व्हायला त्याला सेफ केला.

काल त्याच टास्क मधे जेव्हा जय आणि उत्कर्ष मधल्या एकाला निवडायची वेळ आली तेव्हा गायत्रीने दोघेही तेवढेच स्ट्रॉम्ग आहेत असे बोलून खाली बसली. तसेच विशाल ने करायचे ना. एवढी गरज काय होती विकास ला मुद्दाम सगळ्यांसमोर कॉल आउट करण्याची. एकंदर या तिघांचे एकमेकातले रुसवे फुगवे सारखे दाखवतात कशाला आपल्याला. बोर होते ते. फक्त काल विशाल आणि सोनाली "आल्टर इगो" म्हणजे काय यावर अंदाज बांधत होते तेव्हा फार मजा वाटली Happy
विशाल एकूण इमोशनली अनस्टेबल आहे. त्याला हँडल करणे ग्रुप मधल्या कोणालाच नीट जमत नसावे.
स्नेहाने तेवढ्यात मीराला टॉन्ट मारून घेतला. पण हिचे स्वतःचे काय?! काल सरंगेच्या वेळी फॉरवर्ड केले मी.
आता आविष्कार ची पाठवणी होणार असे दिसते. दादुस पुढच्या आठवड्यात. त्याला त्या किडनॅप टास्क मधे आत नेऊन टिप दिल्या असाव्यात कोणाला नॉमिनेट कराय्चे याबद्दल. कारण नाहीतर त्याला गायब करण्याचे काही कामच नव्हते.
तृप्तीला ममा इतके बोलले तेव्हाच माझ्या मनात आले होते, हिला इतके ऐकून घ्याची सवय नसेल. काल ती तेच म्हटली. बाहेर असे कुणी बोलले तर दगड फेक करायची असे काहीतरी Lol

काल त्याच टास्क मधे जेव्हा जय आणि उत्कर्ष मधल्या एकाला निवडायची वेळ आली तेव्हा गायत्रीने दोघेही तेवढेच स्ट्रॉम्ग आहेत असे बोलून खाली बसली. तसेच विशाल ने करायचे ना. एवढी गरज काय होती विकास ला मुद्दाम सगळ्यांसमोर कॉल आउट करण्याची.>>
+1
मी किती फेअर खेळतो हे दाखवायच्या नादात तो असं करतो असं वाटतं.
विकासला त्याचेच जास्त वाईट वाटले असावे.

विशाल एकूण इमोशनली अनस्टेबल आहे. त्याला हँडल करणे ग्रुप मधल्या कोणालाच नीट जमत नसावे.>> अगदिच सहमत ! तो त्याच्या झोन मधे असल्यासारखाच असतो.

धन्यवाद भरत. अविष्कारलाच काढतील आपण वोटस दिली तरी. आदीशच्याऐवजी त्यालाच काढलं असतं परवा. बिग बॉस मला तर टीम ए च्या बाजुने वाटतात. सो मि वर नावं ठेवतात म्हणून म मां ओरडल्यासारखं दाखवतात. त्या दोन मठ्ठ तारका स्नेहा आणि गायत्री राहतील आणि पुढे नॉमिनेट पण होणार नाहीत.

आता अविष्कार गेला तर पुढचा नंबर दादूसचा लागेल. दादूसने हुशारी दाखवत आविष्काराला स्वर्गात टाकायला पाहिजे होतं. म्हणजे दादूसचा अजून एक आठवडा राहायचा चान्स वाढला असता. मांज्याने जाब विचारल्यावर त्याच्यावरच उलटवायला पाहिजे होतं कि तुम्हीच मागच्या आठवड्यात सांगितलं होतं वीक प्लेयर आपल्यासोबत नॉमिनेट झाले कि आपले इथे राहायचे चान्सेस वाढतात. म्हणून पुढच्या आठवड्यात माझ्यासोबत नॉमिनेट व्हायला त्याला सेफ केला...धमाल आली असती असे झाले असते तर. पण दादुस एव्हडा पोहचलेला नाही. त्रुप्ती असती तर तीने हे नक्की केले असते.
ती विनिंग मटेरिअल नसेल पण बायकांमधे मीनलनंतर तीच आवडते मला. तीच्या बाहेरच्या व्यवसायातील क्वालीटीजचा चांगला उपयोग होतोय तीला.

आता अविष्कार गेला तर पुढचा नंबर दादूसचा लागेल. दादूसने हुशारी दाखवत आविष्काराला स्वर्गात टाकायला पाहिजे होतं. म्हणजे दादूसचा अजून एक आठवडा राहायचा चान्स वाढला असता. मांज्याने जाब विचारल्यावर त्याच्यावरच उलटवायला पाहिजे होतं कि तुम्हीच मागच्या आठवड्यात सांगितलं होतं वीक प्लेयर आपल्यासोबत नॉमिनेट झाले कि आपले इथे राहायचे चान्सेस वाढतात. म्हणून पुढच्या आठवड्यात माझ्यासोबत नॉमिनेट व्हायला त्याला सेफ केला...धमाल आली असती असे झाले असते तर. पण दादुस एव्हडा पोहचलेला नाही. त्रुप्ती असती तर तीने हे नक्की केले असते.
ती विनिंग मटेरिअल नसेल पण बायकांमधे मीनलनंतर तीच आवडते मला. तीच्या बाहेरच्या व्यवसायातील क्वालीटीजचा चांगला उपयोग होतोय तीला.

तृप्तीला ममा इतके बोलले तेव्हाच माझ्या मनात आले होते, हिला इतके ऐकून घ्याची सवय नसेल. काल ती तेच म्हटली. बाहेर असे कुणी बोलले तर दगड फेक करायची असे काहीतरी
<<<<
मलाही तो सिन पहातना जेवता जेवता ठसका लागला हसून , ममा नक्कीच यावर काहीतरी पंच मारणार चावडीवर Proud

हो टोटली, मीरा मधे पोटेन्शिअल आहे खरं तर, ती बिबॉ मटेरिअल तरी आहे निगेटिव असली तरी.. गायत्री मात्रं कुठल्याही प्रकारे स्क्रीन वर बघायला/ऐकायला नको वाटते , स्नेहा सुद्धा !
स्नेहा जास्तं अनॉयिंग कि गायत्री काँपिटिशन आहे.

ती स्नेहा अविष्कार ला फार छळत होती
म्हणजे अगदी पर्सनल ग्रज काढत होती असं वाटलं...
आणि ती अक्षरशः मूर्खासारखं काही ही बोलत असते

Pages