मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बी टीमचे एक पाहिलेत का? आपापसात थट्टामस्करी, गालगुच्चे, मस्ती करत असतात. ए टीममधले नुसते कागाळ्या अन नावे ठेवणे एवढंच निगुतीने करतात.

मी आदिशला अजून दोन votes देऊन आले. शेवटी आहे तो, अर्थात दादुस आणि त्याच्यात जास्त फरक नाहीये. आधी विकास नंबर एक वर होता, आता मिनल आहे.

त्या youtuber तुषारला वाटतंय की दादुस यांचा बर्थडे जोरात साजरा केल्याने, त्यांची पाठवणी करतील. काय माहिती काय होईल. त्यांना पाठवायला हवं आता.

पुढचा वीक पण स्नेहा जायला हवी, गा दा ला नाही काढायचे. नाहीतर तृप्तीला काढा. मग त्यानंतर प्रॉपर दिवाळीत काढू नका कोणाला.

मी आदिशला अजून दोन votes देऊन आले. >>> 99 मतं देऊ शकता. 2 ने काय होणार आहे. उद्या परवा मी 20 इमेल आयडी काढणार आहे आणि एक प्रोग्रॅम बनवणार आहे. तो रन केला की चांगले 2000 मतं एका कंटेस्टंटला जायला पाहिजे.

मी शेवटी शेवटी देते 99, सध्या बास एवढी, वेळ जातो. डेस्कटॉपवरुन देते त्यामुळे वेळ लागतो. शेवटी bb ना ठेवायचं त्यालाच ठेवणार.

आधी तीन दिली आहेत त्याला, आज अजून दोन, हाहाहा.

मला काल असे वाटले की मीराला गायत्री- जय शी भांडता येत नाहीये याचे रडू आले Happy उत्कर्ष ला परवा ते सांगतही होती, की ते चुगली व्हिडिओ बघितल्यापासून तिच्या मनात आहे पण सांगता येत नाही. बाकी कुणाशी भांडायचे असेल तर थांबेल कशाला ती.
दादुस चे बड्डे सेलिब्रेशन मघून मलाही तसेच वाटले की आता पाठवणी करण्यापूर्वी त्याचे कौतुक करून घेत आहेत. त्याच्या जाण्याने घरातली इक्वेशन्स बदलणार नाहीत काहीच. तसेही स्नेहा जय च्या ग्रुप कडून खेळत असल्यामुळे तृप्ती तिकडेच जाणार इव्हेन्चुअली.
स्नेहा ची कीव वाटायला लागली आहे आता. कुठेही त्या जय ची बायको असल्यासारखी त्याच्या शेजारीच बसलेली असते. पण जणू मुकी बाहुली. काहीही मत देत नाही. टास्क मधे खेळू दिले नाही तरी तिला चालते.
ग्रुप बी ने काल पहिल्यांदा अ‍ॅज अ टीम विकास ला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आणि अमलात आणला. तरी सोनालीची पिर पिर चालू होतीच. तिची ममांनी कानउघाडणी करायला पाहिजे. सतत किचन पॉलिटिक्स वरून भांडत असते. टास्क मधे भांड ना बाई मग. असे असले तरीही एक मात्र आहे की त्या ग्रुप ला एकत्र धरून ठेवणारी तीच आहे.

हो ती येडी स्नेहा सगळ्यांना आहो म्हणते , जय तर १० वर्षांनी लहान आहे तिच्यापेक्षा .
कपडे तरी काय ते पायघोळ काफ्तान सारखे शेपलेस सगळे Uhoh
तिची डियाझनर रिचा , स्मिता साठीं कसले मस्तं ड्रेसेस पाठवायची, हिला बेकार पाठवते तिच्या पर्सनॅलिटी सारखे Wink
Btw , त्या गायत्री स्नेहानी केलेली मारामारी का नाही दाखवली ? इतक्या व्हॉयलेन्ट झाल्या होत्या का न दाखवता येण्या इतका ?
गायत्रीने थोडे डॅमेज कंट्रोल केलय शनिवार जवळ आल्याने सॉरी म्हणून !

ट्विटर वर विकास त्रुप्ती चा व्हिडिओ आलाय. तृप्ती देसाई ने खऱ्या आयुष्यात एखाद्या राजकीय पार्टीला जॉइन केले तर त्या फ्लरिश होतील. त्या क्षणात रंग बदलू शकतात.

हो मलाही स्नेहाचे ड्रेसेस अजिबात आवडत नाहीत. काहीच्या काही वाटतात.
दादुस ला सगळे काल डोक्यावर बसवत होते म्हणुन तो खूष होता पण त्याचा नॉमिनेशन टास्क मधे जय आणि स्नेहाने मुद्दाम गेम केला ते त्याला कधी कळेल का Happy गायत्री डॅमेज कन्ट्रोल ला लागलेली आहे. परवा आणि काल पण सॉरी / माफी, रडणे सगळे झाले.दादुस ला म्हणे तुमची पिटुकली तुम्हाला मत देतेय वगैरे. कसले विनोदी आहे हे.
तो तृप्ती- विकास चा व्हिडिओ पाहिला. ती म्हणते माझ्याशी नीट बोला. एक मत गेम चेन्जर ठरू शकतं. तिला गेम कळला असावा, पण स्नेहा मठ्ठ ती मठ्ठच. एका दुसर्‍या व्हीडिओत ती तृप्ती ला म्हणताना दिसते जय च्या ग्रुप नेच दादुस ना कॅप्टन केले. आता आपण त्यांनाच सपोर्ट करू वगैरे.

एका दुसर्‍या व्हीडिओत ती तृप्ती ला म्हणताना दिसते जय च्या ग्रुप नेच दादुस ना कॅप्टन केले. आता आपण त्यांनाच सपोर्ट करू वगैरे.: ती जय साठी खेळत आहे की स्वत साठी? पण तिच्या कडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तृप्ती हुशार आहे, बाकी लोक आपल्या आपल्या परीने चमकत आहेत. तिनं तिला झेपेल असा मार्ग निवडला आहे. लवकर जाईल बाहेर तर बरे.

दादुस ला सगळे काल डोक्यावर बसवत होते म्हणुन तो खूष होता पण त्याचा नॉमिनेशन टास्क मधे जय आणि स्नेहाने मुद्दाम गेम केला ते त्याला कधी कळेल का: नेव्हर. पोरांनी खेळत खेळत गंमत केली असे म्हणेल तो Happy
त्यांच वय मला माहीत नाही, पण आजी आजोबा नातवंडांना जसे ढील देतात तसेच ते वागतात. एकदम निर्मळ मनाचे वाटतात.

टीम बी पुन्हा हारली आजच्या टास्कमध्ये>> मला तर तृप्ती नेच timing सांगताना काही झोल केला असं वाटलं.. जय च्या टीम च सांगताना जरा अडखळली

आविष्कारने मीराला मारलेला टोमणा भारी होता.

भोपळा टास्कमध्ये स्नेहाच्या डोळयान्ना लावलेली पट्टी सैल झाली होती, तर ही म्हणते कशी, 'ही पट्टी मला आविष्कारने बान्धली, म्हणजे ती सैलच असणार" हे देवा, इथे सुद्दा पर्सनल.

मीराच रडण जेलमध्येही सुरुच

मला तर तृप्ती नेच timing सांगताना काही झोल केला असं वाटलं.. जय च्या टीम च सांगताना जरा अडखळली>>>माझा Game part मिस झाला पण नवर्‍याने अन् सासूबाईंने पाहिला तर त्यांचही हेच म्हणणं होतं...सोशल मीडियावर पण खूप बोलणे बसत आहेत तृप्तीला याबद्दल...नक्की काय झालंय ते आज पाहीन voot वर...

तृप्तीने खरंच झोल केला असेल तर बिग बॉस बोलतीलच आज याबाबत. बाकी टास्क करावा तो अ तुकडीनेच. 100% देतात टास्कमध्ये. सोनाली लवकरच अ तुकडीला जॉईन होणार आहे. रड्या विशालने सोनालीचं नाव घेऊन काल पण सेल्फ गोल केला. नशीब हा हॉकी, फुटबॉलपटू नाही झाला नाहीतर आपल्याच गोल पोस्टमध्ये सटासट गोल मारत सुटला असता. Lol आपल्याच गोलपोस्ट मध्ये गोल मारत बसलाय, त्याच्याच टीमचे 10 प्लेयर त्याला अडवायचा प्रयत्न करताहेत पण हा त्या सगळ्यांना जुमानत नाही वर त्यांनाच बोलतोय की मला जे योग्य वाटतंय तर मी करतोय, कोच बाहेरून नको गोल मारू किंचाळत छाती बडवून घेतोय, विरुद्ध टीमचे खेळाडू लांबूनच बसून सगळी मज्जा बघताहेत असं काहीसं चित्र दिसलं असतं. Lol

टीम अ मधले दोघेच खेळले. टीम बी मधल्या सगळ्यांनी भाग घेतला टीम अने ते magnets चुकीच्या स्लॉट्समध्ये लावले होते. तिथेही नीट नाही. आणि एक तर तृप्तीच्या हातात देऊन पळाले. टेक्निकली हरले होते ते.

काल मी थोडं उशिराच सुरू केलं तेव्हा उघडा जय आणि स्नेहाची झोंबाझोंबी सुरू होती.

आविष्कार ४५+ आहे? स्नेहाचं वय काय? ती टीनेजर सारखी वागत असते. सकाळी आठचं गाणं वाजू लागलं की मी दोन मिनिटांसाठी चॅनेल बदलतो.

आज किती बोरिंग एपिसोड होता, लग्झरी बजेट टास्कला तसाही काही अर्थ नाही, हरलेल्यां सकट सगळेच खातात जे मिळतं ते !
आज्जीवरून गहिवरणे नाटकी वाटलं सगळ्यांचं , मीराचं फारच् पण त्या निमित्तानी आणि जेल मधे गेल्यामुळे पहिल्यांदाच मीनल-मीरा नीट बोलत होत्या एकमेकींशी !

दातार का म्हणे रडली न भेटलेल्या , न बघितलेल्या आजी वरून??? सगळ्यांच च नाटक आणि त्या पुतळ्याला पाया पडणे तर हाईट

त्या उत्कर्षला फार फुटेज देतायेत, वर ऑलरेडी १०० वेळा होऊन गेलेल्या ‘शिन्देशाही बाणाची’ पुन्हा पुन्हा जाहिरात् आणि प्रक्षेपण Uhoh
नाही सहन होत त्याचं स्क्रीन प्रेझेन्स, गायत्रीला मी फॉरवर्ड केलं .

मला तर तृप्ती नेच timing सांगताना काही झोल केला असं वाटलं.. तीचा आतापर्यंत खेळ बघता एवढी मोठी चूक ती
त्या जाहिरात टास्क साठी करेल असे वाटत नाही. आणि केली असेल तर ती मूर्ख आहे

कुठल्या तरी क्लीपमधे उत्क्या कान कोरत बोलत होता. मराठी सिनेमात निळू फूले यांचे एक खलनायक पात्र डोळ्यासमोर येऊन गेले. :- D

उत्कर्ष साठी दुसऱ्या कोणावर अन्याय नका करू बिग बॉस, विशेषत: टीम बी मधल्या कोणावर.

यावेळी विकेंड डाव बघेन फक्त.

<<कुठल्या तरी क्लीपमधे उत्क्या कान कोरत बोलत होता. मराठी सिनेमात निळू फूले यांचे एक खलनायक पात्र डोळ्यासमोर येऊन गेले. :- D<<हो आणि स्नेहा काल आज्जीबद्द्ल बोलाय्ला आली तेव्हा, चक्क लहानमुले शेंबुड पुसतात तसे तळहाताने नाकाचा शेंडा वर करत नाक पुसत होती. Biggrin नाटके नुसती.
एकटा विशाल अन मिनल काय ते खरे वाटले रडतांना! अन विशालचे कारण ही तसेच होते, करोना काळातच त्याची आज्जी गेली आहे.
आज्जी बोलत असताना मीराने हळूच येउन मीनलच्या खांद्यावर डोके ठेवले हे खुप छान वाटले.

स्नेहा काल आज्जीबद्द्ल बोलाय्ला आली तेव्हा, चक्क लहानमुले शेंबुड पुसतात तसे तळहाताने नाकाचा शेंडा वर करत नाक पुसत होती>> तस तिला 2 3 वेळा दाखवलं आहे.. कॉलेज च्या टास्क मध्ये पण प्रोफेसर तिला प्रश्न विचारत असतात तेव्हा पण तिने आधी अस केलेल आणि मग उत्तर दिल होत.. आश्चर्य आहे अजुन त्यावर मीम कस नाही आलं??!! Lol मला तर सगळ्यात बावळट तिच वाटते...सकाळ सकाळ उष्ट्या हवाई पप्प्या देते बाकी काही नाही

Pages