मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मीरा एव्हडी का रडत होती. सगळे नाटकी वाटले मीनल सोडून. मीनल सांगत होती मीराला की तिची आजी मीराला मोमो म्हणून ओळखते Happy विकास झोपतो तर दादूस का नाही बोलले तसं. ते कॅप्टन म्हणून केपेबल नाहीत.
स्नेहाचं मराठी किती वाईट आहे. धड वाक्य जुळवता येत नाही तिला.

मराठी सगळ्यांचच धेडगुजरी आहे.... त्या आज्जीच्या भाषणबाजी मध्ये "प्राउड करवले/प्राउड झाले" वगैरेचा इतका चुकीचा वापर केला सगळ्यांनी!
हा टास्क नाहिये त्यामुळे रद्द करु नका म्हणून छान खसखस पिकवली आज्जींनी

विकासचा कालचा वावर आवडला.... तो खुप मॅच्युअर वाटतो.... सोनालीला आणि विशाललाही छान समजावत होता तो!
म्हणजे लोक त्याच्याबरोबर येऊन मन मोकळे करतात, त्याचे एकाचे दुसरे करुन तिसऱ्याला सांगताना किंवा काडी लावताना फारसा दिसलेला नाहिये तो!
सोनाली आणि विशालचे 'तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असे आहे..... विशालपण तिला कधीकधी गृहीत धरतो आणि त्यामुळे तुला माणसांची किम्मत नाही हे सोनाली म्हणते ते कधीकधी पटते!
कालपण सोनालीने एक भारी डायलॉग मारला..... "हा असला राजा हरिश्चंद्र नको आपल्या टीममध्ये" Rofl
आदिश पण काल सोनालीला चांगले समजावत होता!

मीरा आणि गायत्रीतला ह्युमन ॲंगल हळूहळू बाहेर येतोय (टास्क सोडून)

दोन्ही ग्रूपला लटकून राहणारे आणि आपल्या एका मताची किम्मत मिरवणारे आतल्यांची गरज म्हणून काही दिवस नॉमिनेशन पासून वाचू शकतात पण ज्यादिवशी नॉमिनेशन मध्ये येतात तेंव्हा प्रेक्षक त्यांना वाचवत नाहीत

दादूसला कॅप्टन कशासाठी व्हायचे होते तेच कळले नाही..... सगळे महत्वाचे निर्णय घ्यायला त्यांना इतरांचा आधार लागतो!

स्नेहाचं मराठी किती वाईट आहे. धड वाक्य जुळवता येत नाही तिला. >>> अरेरे, कल्याणची असून असं. कल्याण डोंबिवलीकरांचं मराठी चांगलं असतं असा माझा समज आहे.

तृप्ती सारखी मी, माझं, मला, मी कशी चांगल्या खेळाडूला संधी देणार, माझं मत महत्वाचं, मी सगळ्यांना आवडते, मी एका टीमकडून नाही, मी संचालक पद गाजवलं, मीच चांगली कॅप्टन, मला सगळं येतं, मी सगळ्यांना खायला घालते, मी मी आणि मी Lol

हो तृप्ती स्वतःच्याच प्रेमात आहे Happy
बी ग्रुप मधल्या आविष्कार सोडून सगळ्यांनी टास्क खेळला ते आवडले. तसाही प्रमोशनल टास्क होता. याउलट ए ग्रुप ने कुणालाही चान्स न देता जय- उत्क्यानेच सगळे राउंड खेळले. अर्थात त्या ग्रुप मधल्या इतरांनी असे म्हटलेही नाही की आम्हालाही खेळू द्या. स्नेहा नुसती टॅग अलॉम्न्ग करते आहे त्यांच्या सोबतीने. तृप्ती काल म्हणत होती आपण कोणत्याच बाजूने न खेळता आपल्या मताने खेळू वगैरे पण दादुस ला ते काहीही समजत नव्हते. उत्क्या दिसला तर दादुस मधेच म्हणे ये ना बंधू! तृप्तीने त्याला गप केले Lol
बाकी काल महाबोर झाले. कोणाच्या आजीच्या आठवणी ऐकण्यात काहीही इन्टरेस्ट वाटला नाही मला. जेल टास्क मुळे सगळेच मीरा -मीनल दोघींशी छान बोलत वागत होते. प्रमोशनल टास्क मधेही सगळे एकमेकाशी चांगले बोलत होते. एरव्ही बिबॉ सिलेक्टिव एडिटिंग दाखवतात हे पुन्हा लक्षात आले.

सोनाली ची कानउघडणी झाली पाहिजे असे इथे डिस्कशन झाले आणि आज प्रोमो मधे ममा सोनालीला अगदी तसेच बोललेत ते बघून मज्जा वाटली! Happy

मांज्याला नक्की काय अपेक्षित आहे तेच समजत नाही. सगळ्यात प्रथम बिग बॉस भलत्याच भ्रमात आहे कि यांनी तयार केलेले टास्क उच्च प्रतीचे एंटरटेनमेंट टास्क असतात . एकतर राडे भांडण होतात म्हणून लोकं बिग बॉस बघतात, यांचे टास्क एव्हडे पांचट असतात कि सगळे गुडी गुडी खेळले तर ९०% पब्लिक बघायची कमी येईल. त्यात प्लस म्हणजे चुगली बूथ आणि मांज्याचे कन्टेस्टंटना तू असाच का बोललास तसाच का खेळलास यावरून कानउघाडणी या गोष्टींमुळे खेळाडूंच्या मुसक्या बांधल्या जातात आणि प्रेक्षकांना हवा तो कन्टेन्ट मिळायचा कमी येतोय. अरे मांज्या सगळं गुडी गुडी पाहिजे असेल तर शेकडो डेली सोप मालिका असतात त्या बघतील ना प्रेक्षक तुमच्या बिग बॉसचे पांचट टास्क कशाला बघतील ते? मांज्या काय विनाकारण हायपर होऊन शो ची मजा घालवतो दर वीकेण्डला? एखादा कन्टेस्टंट चुकला तर ती चूक दाखवण्याइतपत ठीक आहे पण जमिनीच्या व्यवहारात फसवल्यासारखे दात ओठ खाऊन त्याच्या अंगावर धावून जाणं बरोबर नाही.

हो तोच पाहिला मी Happy दादुस ला पण तडकावले आहे. पण त्याचा प्रॉब्लेम तो अनफेअर आहे हा नसून त्याला काही मतच नाहीये असले तरी मांडता येत नाही हा आहे!
जमिनीच्या व्यवहारात फसवल्यासारखे >>> Lol

दादूसला कॅप्टन कशासाठी व्हायचे होते तेच कळले नाही..... त्याचा हॅपी वाला बड्डे होता ना Lol
तृप्ती विकास क्लिप मध्ये ऐकले की त्यांना बाहेर च्या मित्रांना दाखवायचे होते Lol

जमिनीच्या व्यवहारात फसवल्यासारखे दात ओठ खाऊन त्याच्या अंगावर धावून जाणं बरोबर नाही.
<< Biggrin
तिकडे सलमान काकांचं एकाच काँटेस्टन्ट वर अख्खा वार घालवणे, काँटेस्टन्टला आईची शिवी दिल्याने ब्रेक डाऊन होतो का नाही हे प्रुव्ह करण्यासाठी त्या स्पर्धकाला मुद्दाम ‘मैं तेरी मां XX देता ‘ वगैरे वक्तव्यांचं संचालन पाहिलत कि मांज्या बेश्ट वाटेल Happy

आज बहुतेक सगळे पॉइंट्स इथे लिहिलेलेच आहेत. काही तर वाक्ये जशीच्या तशी.
फक्त विकासला व्हायलेंसबद्दल ओरडले. त्याबद्दल इथे कोणी लिहिलं नाहीए. मुलींना पीस ऑफ फर्निचर म्हटलं.
स्नेहा सरंगे विकते हे सॉलिड होतं. जोरात हसू आलं. वर त्यावेळी जयला राग आलेला दाखवला.

उत्कर्षच्या भावाला पण सुनवलं.

मजा येतेय.. सगळी इथली वाक्य.. Lol
प्रेक्षकांची सिपंथी मिळवा हे उगाच सांगितलं मिराबाईला! मीनलच केवढं कौतुक केलं... उत्कर्ष, जय पेक्षा भारी पडली ती पोरगी अस म्हणाले तेव्हा त्या दोघांचा चेहरा.. Biggrin अन गादा कधी स्वतःहून टास्क मध्ये मला घ्या म्हणत नाही म्हणून तिलाही बोलणी!
सारंगी बाईंना काढा आता!

मीनलच केवढं कौतुक केलं... उत्कर्ष, जय पेक्षा भारी पडली ती पोरगी अस म्हणाले तेव्हा त्या दोघांचा चेहरा.. >>> व्हय काय, आपुन खुश. पोरीची दृष्ट काढायला हवी, नाहीतर पुढच्या वेळी ओरडतील, जमिनीवर पाय ठेव, हुरळून जाऊ नकोस, आत्ता खेळतेस तशीच खेळ.

उद्या रेशम आणि आणखी एक जण येतेय. मेघा आहे का ती?

टास्कमध्ये स्नेहा आणि गायत्रीने आदिशला मारलं होतं म्हणे. हे पाहिल्याचं आठवत नाही.

<<उद्या रेशम आणि आणखी एक जण येतेय. मेघा आहे का ती?< येस, मेघा येतेय!
<<टास्कमध्ये स्नेहा आणि गायत्रीने आदिशला मारलं होतं म्हणे. हे पाहिल्याचं आठवत नाही.<< तो सीन कट केला वाटत. मलाही दिसला नाही. लाइव्ह बघणार्यांनी सांगावं!

टास्कमध्ये स्नेहा आणि गायत्रीने आदिशला मारलं होतं म्हणे. >>> मारल्यावर बाहेर काढतात ना, मग ह्या कशा शोत.

स्नेहाला झापले ते छान झाले, पण कुठे तरी फारच खालच्या लेव्हलवर जाऊन मांजरेकर बोलले असेही वाटले.
तृप्तीलाही बरोबर बोलले. पण अजून त्या फ्रिजच्या जाहिरातीत तिने वेळेचा झोल करून अ संघ जिंकला असे दाखवले, त्याबद्दल बहुतेक उद्या बोलतील.

आजचा भाग बघून एकच समजलं ते म्हणजे सगळ्या कंटेस्टंटनी विशाल आणि मिनलची तळी उचलायची म्हणजे मांज्या आणि बिग बॉस खूश होणार.

{मारल्यावर बाहेर काढतात ना, मग ह्या कशा शोत.}
एव्हिक्शनसाठी नॉमिनेट केलंय. गेल्या वेळी शिवला केलं होतं असं.
विकासने उत्कर्षचा गळा दाबला म्हणे. पण ती प्रतिक्रिया असावी. तो नॉमिनेट नाही.

मांजरेकर इथल्या पोस्ट तिथे वाचून सगळ्यांचा फोकस हलवतात. तृप्ती घरात एक पोलिटिकल फीगर म्हणून इमर्ज होत होती. त्यामुळे एकसुरी बोरिंग पॅटर्न ब्रेक झाला असता. पण ते ओरडले की ती पुन्हा जेष्ठ नागरिक मोड मध्ये जाणार. मीरा सिंपथी मिळवायला आणखी नाटकी रडणार.

आदिशने सांगितलं, स्नेहा अन गायत्रीने त्याला मारलं ते, पण त्यावर काही प्रतिक्रिया न देता ममांनी शिताफीने विषय बदलला! Uhoh

<<मीरा सिंपथी मिळवायला आणखी नाटकी रडणार<< नाहीतर काय, आता सिपंथी मिळवण्यासाठी चुरस लागणार.
ममां तृप्ती ताईवर ही जोरात ओरडले.. कोणाला सफाई द्यायची संधीच देत नव्हते!

{मारल्यावर बाहेर काढतात ना, मग ह्या कशा शोत.}
एव्हिक्शनसाठी नॉमिनेट केलंय. गेल्या वेळी शिवला केलं होतं असं. >>> हो शिव चावला होता, पण बिग बॉसनी आरोहला माफ करायला सांगितलं होतं (मागून) आणि त्याच वेळी शिवानीने पण ती कोण होती उंच item girl तिच्या पोटात लाथ मारली ते दाखवले नव्हतं. ह्या न्यायाने त्या दोघी शोत हे बरोबर.

विकासने उत्कर्षचा गळा दाबला म्हणे. पण ती प्रतिक्रिया असावी. तो नॉमिनेट नाही. >>> ओहह हे सर्वच चूक आहे.

शिवाजीने वीणाला लाथ मारली होती. दोघी जेलात गेल्या.

उत्कर्षनेही विकासला काहीतरी केलं असावं. मी सलग पाहिलं नाही. आज आणि त्या दिवशीही.

आज मांज्या प्रेक्षकांवरही भडकला असल्यासारखा बोलत होता.

गादा बेडुक वाटत होती.

नाटकी मीरा कसा खोटा खोटा आज्ञाधारकतेचा मुखवटा पांघरून बसते चावडीवर.

स्नेहाला चोपलं...गार वाटलं

सोनालीची पण टिवटीव जरा कमी होईल आता

विशाल मीनल विकास अदीश आवडतात अजून

दादुस इनर्ट गॅससारखा आहे

तृप्तीचा पण चेहरा उतरला आज

जय मांज्याकडे असा बघत होता की बाहेर भेटलास की बघतो

उत्क्या असं बघतो की पपा आणि भाऊ बघून घेतील. फार पाताळयंत्री वाटतो तो.

एकंदरीत आपली मीनलच बेश्ट वाटतेय.

Pages