मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जय आणि ऊत्कर्ष त्यातल्यात्यात अविष्कार ला बोलुन घेत होते, जय म्हणत होता अविष्कार माझ्यापेक्षा ग्रेट आहे. . . . कसली वृत्ती आहे!

स्नेहाने ममां च्या हिंट चा एवढाच अर्थ घेतला की जय सोबत कट्टी बट्टी, पकडा पकडी आणि सरंगे म्हणताना ती डेफिनेटली दाखवली जाते आहे. मग तिने उलट तेच करत रहायचे ठरवले Happy तीच स्ट्रॅटेजी आहे तिची.

ती स्नेहा अविष्कार ला फार छळत होती
म्हणजे अगदी पर्सनल ग्रज काढत होती असं वाटलं...
आणि ती अक्षरशः मूर्खासारखं काही ही बोलत असते
>>>+१

स्नेहा जास्तं अनॉयिंग कि गायत्री काँपिटिशन आहे. >>> होना.

मला मीरा बरी वाटते खरंतर.

ती स्नेहा अविष्कार ला फार छळत होती >>> त्यामुळे सो मि वर अविष्कार आवडतोय हिच्यापेक्षा.

सोनाली आणी त्रुप्ती ताई शेवट पर्यत राहिल्या.
आविश्कारने सगळे टास्क काहीही तक्रार न करता केले, बिचार्‍याला नाच रे मोरा करताना एवढा दम लागला होता तरी स्नेहाच चालुच होत
जय अपेक्षेप्रमाणे ५ मिनिटही टिकला नाही मिनलने उसकवल्यावर लगेच फायर अप!!
गादा किती पर्सनल बोलत होती तरी सोनालिने मुकाट सगळ एकून घेतल.
आजच्या टास्कमधे मिरा आणि जय विल लॉस्ट देअर कुल हे अगदी नक्की होतच आणी झालही तसच
जयला बिलकुल आवडत नव्हते मिरा -गादाने त्याच्या विरोधात जाणे लगेच अप्सेट होवुन गादाला फिरवलेच.
फेयर खेळु फेयर खेळु म्हणत सोनाली शेवटी राहिली म्हणून परत उत्कर्ष नाराज होताच

तिघे आउट होईपर्यंत पाहिलं मी. म्हणजे फार नाही मिस केलं.
आविष्कारला सगळ्यांनीच छळलं काल.
देवदूत राक्षसांचे नोकर कसे? सूचनांचे तसं काही होतं का?

काल मी पहिल्यांदाच लाइव्ह पाहिलं. दुपारी जेवताना विकास, मीनल, सोनाली, मीरा त्यांच्या नावाची स्पेलिंग्ज डिस्कस करत होते. विशाल बाजूला कोपऱ्यात बसून होता.
विकास पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी असं सांगत होता. त्या तिघींना वेलांटी माहीत होती किंवा आठवत होती याबद्दल मला शंका आली.

मीनलचं हसणं एकदम सात मजली आहे. ती हसू लागली की बाकी काही ऐकू येत नाही..

आज आविष्कार मेड माय डे , नाच रे मोरा विथ झाडु omg.. जबरा एन्टरटेन्मेन्ट Rofl
आज त्याला बाद करायला नको होते , मज्जा केली अविष्कारने !
सैतानात मीनल मस्तं, स्नेहा गायत्री बेकार !
टिम्स शफलिंग आवडलं मला .. पुन्हा एकदा विकास वर्सेस विशाल, स्नेहा वर्सेस मीरा .. मज्जा !
बिबॉ ला नेहेमीच्या रायव्हलरीज पेक्षा २ मित्रांच्या विशाल वि. विकास मधे जास्तं इंटरेस्ट आलाय, २ फ्रेंड्स जेंव्हा शत्रु होतात तेंव्हा मेघा वि.पुष्कर सारखा अग्ली रिव्हेन्ज गेम होतो !
विशाल इमोशनली काहीतरी वेगळाच आहे ना ! खूप काँप्लिकेटेड.. पटकन सॉरी म्हणून पुन्हा काहीतरी लागेल असे बोलतो , कधी रडतो, एकटा बोलतो, मित्रा साठी जेल फोडतो, त्याच्याशीच नंतर भांडतो, रुसतो , आता मीनलशीही पंगा घेतोय Uhoh
पण त्यामुळेच तो उठून दिसतोय हेही खरच !
असो, पण विकास विशाल दोघे खूप हुषार आहेत आणि त्यांना गेम समजतो, त्यांना माहित आहे कि काय केल्याने टॉप २ मधे रहातील !

कालचा नाच रे मोरा मस्तच होता... भारीच.. अस काही वेगळी आइडिया बरी वाटते... शेवटी आविष्कार आणि सोनाली ला ठेवायला हवं होत...

मला बोअर होतंय आता bigg बॉस बघणे...किती बोअर करतात....पण यावेळी Bigg boss ने टास्क डोकं लढवून दिला..म्हणजे एका टीमने उसकवलं तरी दुसर्‍या टीमला शांत राहणे क्रमप्राप्त होते...त्यातच विजय होता.यावेळी captaincy टास्क पण असाच देतील बहुतेक म्हणजे कॅन्सल तरी होणार नाही.
काल उत्कर्ष खरंच राक्षस दिसत होता.सोनाली बझर वाजल्यानंतर उत्कर्षाच्या अंगावर गेली.तेसुद्धा मजेमजेत तरी उत्कर्ष मान्य करत नव्हता...extra डोकं लावतो तो.
यावेळी captaincy चे उमेदवार निवडण्याचा गोल्डन चान्स टीम B कडे आहे.त्याचा फायदा करून घेतला पाहिजे त्यांनी.दोन्ही उमेदवार b team मधून निवडायचे.सोनाली-मीनल किंवा सोनाली-विकास असे.

जय म्हणत होता अविष्कार माझ्यापेक्षा ग्रेट आहे>>>>ते उत्कर्ष म्हणवून घेत होता जय कडून....स्वतःला कित्ती ग्रेट समजतात हे लोक...बाहेर येऊन पहा म्हणावं लोकं किती शिव्या घालत आहेत. आणि माणूस म्हणून आविष्कार नक्कीच ग्रेट आहे या अतिशहाण्या लोकांपेक्षा...

काहीही असो,, मीरा आवडु लागलीय. गादा, स्नेहा प्रचंड इरिटेटींग. त्या सोनालीला आणि अविष्कारला किती टॉर्चर केल.

स्नेहाने काल पहिल्यांदा टास्कमधे पायघोळ अंगरखा सोडुन टास्कला साजेसा ड्रेस घालाय्चा प्रयत्न केला. पण हाय रे दैवा... तसा काय चढउतर- पळापळीचा टास्क नव्हताच! Biggrin

गायत्री, मीनल, अविष्कार, तृप्ती खुप छान खेळले.
विशाल रडका वाटतोय सारखं मीनल, विकासला टार्गेट केल्याने.
जय, मीरा फुसके.
दादूस, स्नेहा गुड फॉर नथिंग.
विकास, उत्क्या मुद्दाम जास्त उचकवत नव्हते चांगले दिसण्यासाठी.

सर्वांना धन्यवाद, तुमच्यामुळे समजतं सर्व. बघण्यात वेळ घालवत नाही. विकेंड बघेन. खरंतर मला मीनलसाठी टास्कस बघायचे असतात. पण बाकी कोण सहन करणार. तिच्या फेसबुक पेजवर जायला हवं एकदा.

विशाल च्या डोक्यात खरंच काय चालतं कळत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे फार. पण त्याच्या ग्रुप्मधल्यांना राग येणे साहजिक आहे. आता डेविल टास्क मधे तर त्याने फारच राडे केलेत असे प्रोमो मधे दिसले. एकदम सर पे कफन टाइप दोन्ही ग्रुप मधल्यांना छळलेय!! Happy त्यामुळे सगळेच उखडणार त्याच्यावर.
उत्क्याच्या तोंडाला पाणी सुटले आहे आता कोणा कोणाला माझ्याकडे ओढू म्हणून Lol पण त्याला समजत नाहीये बाहेर कुणाला पॉप्युलॅरिटी आहे ते. एका व्हिडिओत जय आणि उत्कर्ष म्हणत होते हे फार सोपे आणि मोनोटोनस होत चाललंय यार. फारच ईझिली जिंकतो आपण सगळे टास्क्स. त्यामुळेच सर मला सांगत असतात, किंवा चुगल्या पण आपल्यालच येतात. Happy त्याला काहीही फीडबॅक मिळाला तरी तो त्याचा एकच अर्थ काढतो. "ते आपल्याला मेसेज देत आहेत की आपण बरोबर चाललोय. आपण गेम चांगले खेळत आहोत".
उत्क्या भयंकर हलकट वाटतो पण. गायत्री - मीरा स्नेहाबद्दल बोलायला आल्या तेव्हा त्यांना अगदी आपण त्यांच्या विश्वासात असल्यासारखे बोलतो. जय शी बोलेन वगैरे. पण नंतर जय सोबत भलतेच काहीतरी बोलतो. सध्या मला मीरा चांगली वाटायला लागलीय- स्नेहाशी पंगा घेतल्यापासून Happy

आविष्कारची मुलाखत फिरतेय, बहुतेक लोकमतने घेतली आहे. हि विडिओ मुलाखत त्याने रेकॉर्ड कधी केली. एक महिला पत्रकार त्याला प्रश्न विचारतेय जी व्हिडिओत दिसत नाहीये. एलिमिनेट झाला कि काय आविष्कार. प्लेअर म्हणून त्याच्याविषयीचं ऍनालिसिस जे काय असेल ते, पण माणूस म्हणून रिस्पेक्ट निर्माण झालाय त्याच्याबद्दल. सो त्याने होऊंनये आटा या पॉईंट ला एलिमिनेटे असे मनापासून वाटतेय.

ऍक्ट रायडर्स म्हणून यूट्युबर आहे, संध्याकाळी त्याचा विडिओ पहिला. त्याने म्हटलेय कि करंट वोटिंग ट्रेंड नुसार सगळ्यात खालती गायत्री, शेवटून दुसरी स्नेहा आणि शेवटून तिसरा आणि वरून पाचवा आविष्कार आहे. बरे वाटेल मनाला या वेळी आविष्कार वाचला तर आणि बुद्धीचा तर्क देखील सुखावेल.

इथे व्होट अपील केलेलं लोकांना खटकतं बहुतेक.
पण इथे लिहिणाऱ्यांनी ५०-५० मतं आविष्कारला दिली तर तो वाचू शकेल का?
५० कारण उरलेली मतं आपल्या आवडत्या सदस्याला.

कुणाला गायत्रीचा कालचा पर्फॉर्मन्स आवडला का? मला भारी वाटल्ं तिचं काम. पण विशालची टीम आज जो राडा घालणार आहे तो बघता हे काहीच नाही. पण यातून एक कळलं विशाल, जय फिजिकली स्ट्राँग आहेत पण मेंटली कच्चे आहेत. लगेचच ट्रिगर होतात. मीनल ह्यात बाप आहे.

मला एक कळत नाही. जय चे लॉजिक असे आहे की स्नेहा १००% त्याला (त्यांना) पुढे सपोर्ट करेल तर मग तिचे शुअर वोट का सोडायचे तिला दुखवून. पण मग तिच्यासाठी गायत्री आणि मीरा हे दोन सपोर्टर्स का सोडून देतायत तो आणि उत्कर्ष?!

मला एक कळत नाही. जय चे लॉजिक असे आहे की स्नेहा १००% त्याला (त्यांना) पुढे सपोर्ट करेल तर मग तिचे शुअर वोट का सोडायचे तिला दुखवून. पण मग तिच्यासाठी गायत्री आणि मीरा हे दोन सपोर्टर्स का सोडून देतायत तो आणि उत्कर्ष?!
<<<
त्याला वाटतय कि या दोघींना जय शिवाय पुढे जाणे जमणार नाही त्यामुळे जयची गरज त्यांनाच जास्त आहे, त्याला स्वतःला कोणाची गरज नाही.
जय म्हणेल त्याला या विरोध करणे अ‍ॅफोर्ड करु शकत नाही असं वाटतय त्याला.
गायत्रीच्या बाबतीत हे खरं आहे पण मीरा स्ट्राँग आहे, तिला शो मधे उठून दिसण्यासाठी कोणाचीच गरज नाही, उलट स्नेहा आणि जयच्या विरोधात गेली तर आवडेल ऑडियन्सला.

पण मग तिच्यासाठी गायत्री आणि मीरा हे दोन सपोर्टर्स का सोडून देतायत तो आणि उत्कर्ष?!.. त्याला आवडते ती. मे बी नॉट इन रोमॅन्टिक सेन्स पण तो तिच्या कडे जास्त झुकलेला दिसतो. मीरा आणि तो नाईलाजाने एकत्र आहेत. त्या दोघांमध्ये ट्रस्ट इश्यू आहे. उत्क्या सगळ्यांशी डील करत फीरत असतो. त्यामुळे त्या चं काही कळत नाही

कुणाला गायत्रीचा कालचा पर्फॉर्मन्स आवडला का? मला भारी वाटल्ं तिचं काम... अगदी भारी नाही पण बेअरेबल. तशीही ती बरीच टोन डाऊन झाली आहे. मला वाटते जय आणि ती उत्कर्ष मुळे वाईट दिसतात.
सगळ्यात खालती गायत्री, शेवटून दुसरी स्नेहा... ओह नो, ही बया टीकणार म्हणजे

गायत्रीच्या बाबतीत हे खरं आहे पण मीरा स्ट्राँग आहे, तिला शो मधे उठून दिसण्यासाठी कोणाचीच गरज नाही, उलट स्नेहा आणि जयच्या विरोधात गेली तर आवडेल ऑडियन्सला.>> अगदी, ममानी सान्गितल ना टिम ए मधे युनिटी आहे कारण तिथे वन मॅन शो आहे,जय एके जय.
काल गायत्रीला जयने व्यवस्थित गुन्डाळले आणि वर गालावर किस वैगरेही करायला लावले त्याला माहिती आहे गादाला तो आवडतो,स्नेहा या एकाच कारणाने गादाला आवडत नाही.
हा ग्रुप शो नाही हे सान्गा याना कुणीतरी, टिम बी विस्कळीत वाटते कारण तिथे कुणाच्या एकाच्या डोक्याने जात नाही.
बाकी हा टास्क खरा चॅलेजिन्ग आहे पण मला बोअर झाले होते, पुढे करत करत पाहिला.

आज विशाल गंडालाय पारच.. विकास ला फुल टॉर्चर करून हिरो बनवतो आहे तो.. टीम बी वाले येडे आहेत. विकास विशाल ने।मिळून स्वतः च्या लोकात कोणाला तरी कॅप्टन बनवायचा चान्स होता..
विशाल फारच कॉम्प्लिकेटेड आहे.. काही च कळत नाही त्याचा नक्की स्वभाव

विशालच्या अंगात सैतान घुसल्यासारखा वाटलं! त्याने एकट्याने गेम खेळायचं ठरवलं आहे, अस वाटतय, टीमची गरज नाही

आज पण उघड्या अंगाला झोंबाझोंबी. हे ठरवून होतंय बहुतेक.
ते सरंगे करताना कॅमेरापण तिच्या आणखी जवळ जातो.

Pages