मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मीनल, सोनाली मस्त डान्स करतात, अन आपल्या टीममधले कोणी नाचत असेल तर पुढे जाऊन प्रोत्साहन पण देतात. विशाल ही मस्त एन्जॉय करतो. सोनाली आवडू लागलीय. तिचे हास्य फार छान वाटतय, मनमोकळं! विशाल अन तिची मस्करी बघायला आवडते, तिची कोल्हापुरी एक्सेन्ट अन विशालला उडवून लावणे, प्रसंगी समजावणे हे ही आवडते!
तृप्ती ताईंच काय बिनसलं आहे समजत नाही.. नुसतं किचनमध्ये काम करून अन सगळ्यांना चांगलचुंगल खाऊ घालून इतर लोक त्यांना कैप्टन करतील किंवा पुढे जाऊ देतील अस वाटत नाही. टास्कमध्ये पण हिरीरीने भाग घ्यायला पाहिजे!
उत्कर्ष अन अक्षय ही यावेळी पुढे आलेच नाहीत, मागून पिना मारायच काम फक्त! बिबॉ खरच बोलले त्या दोघांच्या चेहऱ्यावरची माशी उडत नाही.
अक्षय , सुरेखाबाई यापैकी कुणी जायला हवं आज.

मुलिमधे कुणाचच ड्रेसीन्ग फार खास नसत, मेघा,सई(कधीकधी) ,स्मिता सगळ्यात छान तयार होवुन बसायच्या.
या सगळ्या हळदिकुन्कुला आल्यासारख्या जरिच्या साड्या काय नेसतात? मस्त डिझायनर साड्या,ड्रेसेस घालावे.
<<<
होना, मेघा -सई - स्मिता ड्रेसेस घालायच्याच मस्तं पण हेअर अँड मेकप सुद्धा मस्तं करायच्या !
या सिझनला कोणाला फार नॉलेज नसावे मेकपचे, एक्स्ट्रॉ तडका व्हिडिओ मधे सुरेखा कडून मीरा धडे घेत होती मेकपचे !
पण आज बहुतेक नवरात्रं म्हणून जरीच्या साड्या नेसल्या होत्या सगळ्यांनी .
आज मला मिनलचा ड्रेस आवडला !
विकेंडची चावडी आजही छान केली म.मां नी , जयला बरच काही सुनावलं पण त्याला काहीही फरक पडलेला दिसत नाही !
सेम मीरा आणि उत्कर्ष , चुगलीचे आता डायरेक्ट व्हिडिओज दाखवूनही गृप फुटणार नाहीये त्यांचा असं दिसतय !
सगळ्यांना बरोबर सुनावलं गेलं पण विशालला अ‍ॅप्रिशिएट कमी केलं जातय असं वाटतय गेल्या विकेन्डपासून !
मीनलला सुद्धा उगीच बोलले असं वाटलं, ती चांगली खेळतीये !

घरातल्यांना बाहेर काढण्यासाठी व्होटिंग असतं तर मीरासाठी मतं दिली असती.

ती थोडीशी रवीना टंडन सारखी वाटते का?

वरच्या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी कार्यकारण संबंध नाही.

या सीझनमधले सगळेच कुणा ना कुणासारखे दिसतायत असे दिसतय Wink

स्नेहा: जुही चावला
जय: ह्रषिकेश रानडे
विशाल: सुशांत सिंग राजपूत
सुरेखा: (कधीकधीच) सुकन्या मोने कुलकर्णी
दादूस: बप्पी लहिरी
सोनाली पाटील: (कधीकधीच) हेमांगी कवी
आणि आता
मीरा: रविना टंडन

Happy

ती स्नेहा सारंघे सारंघे करून सकाळी सकाळी विव्हळत असते ते ठीक आहे पण ते करताना बोटांच्या कसल्या हालचाली करते? चुटकी वाजवल्यासारखं काही तरी करत असते.
सोनाली जबर कॉन्फिडंट पोरगी आहे. मस्त कॅरी करते स्वतःला.
जयला काडीमात्र फरक पडत नाही, पडणारही नाही. मात्र त्याच्या नादाने अक्षय, उत्क्या, गायत्री लवकर गळपटणार.
स्नेहा, मीरा, जय बरेच लाअम्बपर्यंत टिकणार आता.

ती स्नेहा सारंघे सारंघे करून सकाळी सकाळी विव्हळत असते ते ठीक आहे पण ते करताना बोटांच्या कसल्या हालचाली करते? चुटकी वाजवल्यासारखं काही तरी करत असते.>>
K-pop signature आहे म्हणे ती. अशी:
hand-fingers-heart-shape-saranghae-260nw-1452915938.jpg

त्या स्नेहावर कॅमेरा जरी आला तरी बोअर होतय, काहीतरी वियर्ड फेसेस करते , जेस्चर्स वियर्ड असतात तिची !
हसते तर काय भयंकर स्केअरी , तिचं स्क्रीन प्रेझेन्स नाही आवडत मला समहाऊ !

कालची चावडीपण मस्त झाली!!

त्याआधी विशाल मिनल आणि सोनालीमधला डायनिंग टेबलवरचा संवाद ऐकताना काही दिवसापुर्वी इथेच व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय!

सोनाली आज खुप छान दिसत होती, एकदम अवखळ वावर होता तिचा पूर्ण एपिसोडभर.... मग ते चपाती प्रकरण असो, माझ्याबद्दल पण काहितरी बोला असा ममांना केलेला लाडिक आग्रह असो की सौंदर्या कोण असा विषय निघाल्यानंतरचे हावभाव असोत..... फुल्ल आवडून गेली ती आज!

अपेक्षेप्रमाणे सुरेखाताईंनी चपाती प्रकरणावरुन बोलणी खाल्ली.... . गायत्री आणि उत्कर्ष फार चालू आहेत.... जय नसताना त्याच्या आणि स्नेहाच्या फ्लर्टींग बद्दल बोलत होते आणि जय जेंव्हा विचारत होता की ते गाणे मला उद्देशून होते का? तर म्हणतात नाही नाही अरे ते विशाल आणि सोनाली साठी होते; तुझा वेगळा विषय चालला होता म्हणे!

मीरा आज परत टारगेट झाली आणि ते होणारच होते!

मागच्या आठवड्यातल्या चुगल्यांचा पुरावा दाखवला ते एक बरे झाले..... काही लोकांना रिॲलिटी चेक मिळेल अशी अपेक्षा आहे.
विकास त्या कचरावाल्या चुगलीवर अपेक्षेपेक्षा थंड रिॲक्ट झाला.

विशाल सेफ झाल्यानंतरचे अक्षयचे जेश्चर खरच वाखाणण्यासारखे होते.... तो खरच जेंटलमन वाटतो पण खेळला नाही तर टिकणे अवघड आहे या शोमध्ये!

जयचं लग्न ठरवत होते का महेश ..
लव्ह मॅरेज करणार की अरेंजड असं कायसं विचारत होते ...मी त्यानंतरचा थोडा भाग मिसला

या सीझनमधले सगळेच कुणा ना कुणासारखे दिसतायत असे दिसतय
जुही चावला
जय: ह्रषिकेश रानडे
विशाल: सुशांत सिंग राजपूत
सुरेखा: (कधीकधीच) सुकन्या मोने कुलकर्णी
दादूस: बप्पी लहिरी
सोनाली पाटील: (कधीकधीच) हेमांगी कवी
आणि आता
मीरा: रविना टंडन
>> मीनल वैशाली सामंत सारखी( फक्त बारीक) पण बोलताना वैशाली चा भास होतो

मला मिनल रणविर ब्रारची बहीण वाटते, दात सेम. तो आवडतो खूप.

स्नेहाला जुही चावला म्हणू नका, जुही फार गोड आहे. स्नेहा अजिबात आवडेनाशी झालीय.

अक्षय आउट.
आदिश वैद्य इन
घरातल्या सर्वाधिक जणांना अक्षय सेफ असेल असं वाटत होतं.

मला शनिवार रविवारी उत्कर्ष आणखीनच डंब वाटतो

दादुस ने स्वतःच तेजस्वी ची पाटी घालून घेतली :-D. बाकी लोक बरोबरच बोलत होते... ते फार गेम खेळणाऱ्या डोक्याचे नाहीयेत... अक्षय गेला पण तो तसा त्या घरासाठी misfit पण होता..कोणाच्या अध्यात मध्यात न राहून गेम कसा होईल दादा ... पण ठीक आहे त्याला त्याच्या बाळाची आठवण पण येत असेल.. good for him...

सुरेखाताई चपातीवाले जायला हव्या होत्या पण ठिके खाष्ट सासू कन्टेन्ट देतायेत म्हणून ठेवले असेल त्यांना !

ती स्नेहा खरच खूप भयानक हसते आणि कुठेही हसते.तोंडही विचित्र करते.
आदिश सध्या तरी विकास ग्रुप जॉईन करेल अस वाटत आहे,पण घरात फार टिकेल अस वाटत नाही.
ते ममां काय सारखी लव्ह सॉंग्ज गात आहेत.आणि आज काय म्हणाले की आता रोमँटिकची पाटी विशिलकडे आहे,नंतर बदलेल.कखय चालू आहे बिबॉसच्या डोक्यात.
आदिश वैद्य एन्गेज आहे. मग कोण?

आदिश वैद्यने गुम है किसिके प्यार में शो, bb साठी सोडला.
इथे टिकला म्हणजे मिळवलं.

IMG_20211010_234948.jpg

..

..

वर कोणीतरी याच हास्याबद्दल लिहिलं होतं ना.
IMG_20211010_234908_0.jpg

होना... Lol तो जय एवढा romantic होत होता...आणि हिचे हसणे आनी एक्सप्रेशन बघून त्याचा काय आमचा पण मूड़ गेला Lol

आज फिरायला गेलो होतो त्यामुळे episode हुकला... पण आज कोण evict झालं हे बघायला इथे आले... अन्‌ आनंद मिश्रित आश्चर्य वाटले... आनंद याचा की अक्षय जावा - जाईल असं कालपासून intuitions वाटत होते....पण नेहमीच bb मध्ये असणारा favorism बघता थोडी शंकाही वाटत होती... आणि आश्चर्य अशा गोष्टीच वाटले की यावेळी सगळ्याच बाबतीत bb एवढा fair कसा काय बुवा?? बाकी जे झालं ते मस्तच.... अक्षयला तिकडे खूप बोअर होत होतं ( फॅमिलीला miss करणे वगैरे ) म्हणून तो प्रेक्षकांनाही बोअर करत होता.... So गेला ते छान झालं..

फैजल कोण तीन नंबर फोटो का. तिचा करंट bf आहे अस वाचलं कुठेतरी. नाव विसरले (हेच असावं), फोटोही नव्हता बघितला आणि कोण तो मला माहितीही नाही. कयूट दिसतोय, डोळे छान आहेत त्याचे.

पुढच्या आठवड्यात गायत्री गेली पाहिजे, किती कर्कश्श आवाज आहे तिचा. मीरा आणि गायत्री कुचक्या आहेत. तृप्तीचं कौतुक झालं तर मीराने गायत्रीला लूक दिला. झगामगा आणि मला बघा आहेत दोघी. विशालने मोठेपणा दाखवून बाजी मारली. जय आणि मीराला नेहमी वरची जागा पाहिजे. हवेत असतात दोघे. आदिश टीम बीमध्ये सामील होईल. विशाल छान दिसत होता एखाद्या राजासारखा. उत्कर्ष फार आतल्या गाठीचा वाटतो, काहीतरी बनेल भाव असतात चेहऱ्यावर.

मला सोनाली सोनाक्षी सिन्हा आणि मीरा बिपाशा बसूसारखी दिसते कधी कधी.

सुरेखाताईन्नी फुगा कोणावर फोडला 'भ्रमाचा भोपळा' टास्कमध्ये?

दुपारी स्टार प्रवाह परिवार एवॉर्ड शो मध्ये विशाल दिसला. तिथेही निरागस वाटला.

आज गायत्रीने भोकाड नाही पसरला अक्षयला निरोप देताना. नशीब!

आदिश वैद्य कदाचित जय, विशाल, उत्कर्ष/ विकास ला पहारेकरी म्हणून निवडेल.

तो जय कसला खुनशी नजरेने बघत असतो!!! म मांकडेपण तसाच बघत होता. एक क्षणभरही 'सॉरी' लूक नाही. आणि कसला एकदम अंगावर धावून जातो.
मराठी बिग बॉस च्या प्रेक्षकांना हे कितपत रुचेल काय की.
मला सोनाली चा वावर एकदम प्लेझंट वाटतो. विकास बराच स्टेबल आहे. मीनल खेळते जबरदस्त. विशाल ने थोडा राग कंट्रोल केला पाहिजे. आविष्कार इतरांशी बोलताना फार सॉर्टेड वाटतो. सल्ले चांगले देतो. पण तो इमेज बिघडू नये म्हणून फार दबून असतो असं वाटलं. त्याने खरंच आता स्नेहाचा अनुल्लेख करावा आणि स्वतः कडे लक्ष द्यावे.
त्याचं मराठी पण चांगले आहे. जय, मीनल फार मोडकंतोडकं मराठी बोलतात. अडखळत.
तृप्ती सरप्राइजिंगली मला बरीच बॅलन्स्ड वाटली. उगाच वाद घालत नाही.
स्नेहा, सुरेखा ओकेच आहेत. 'टास्कस्' मध्ये ही मुलं दंगा करतात म्हणून आम्ही करू शकत नाही, असं काही तरी सुरेखा म्हणत होती. अरे, बिग बॉस मध्ये दंगा असणार हे माहिती नव्हते का येण्याआधी?
खरं तर मेघा जशी पूर्ण तयारीने आली होती तसे कोणीच दिसले नाही गेल्या सीझनमध्ये आणि यापण.

स्नेहा आधी आवडायची.. .. आता ते भयानक हसणे इरिटेट व्हायला लागले. ए टिमला इतके फटके पडुनही गादाचे नाक वरच.खुनशी आहे ती. मीरा एकवेळ बरी. तृप्तीताई आवडयला लागल्यात. बी टिमवाले तसे सगळे टास्कपुरतीच फक्त खुन्नस दाखवतात.
मधे ब्रेकच्या वेळी ए टिम कशी हसत होती मीनलला, कि पत्त्यांच्या खेळात तिला कसे डाउनग्रेड केले जयने अन मग ती किती चिडली वै. अक्षय जावासा ही वाटत होता अन गेला तेव्हा वाईटही वाटले.

Pages