सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

हो ना, गच्चीत नेऊन चंद्र दाखवायचे वय आहे का त्यांचं

जरा तर रिएलस्तीक व्हा की गडयानो, वयाला अनुसरून वागा

ती मनू रडायला आल्याचा अभिनय करते तेव्हा मला आता तिला उलटी होईल बहुतेक असं वाटतं>> अगदी अगदी, बेक्कार रडका चेहरा आहे तिचा.

मनु फार आवडत नाही, रडी वाटते. तिचा आवाज चांगला असावा असं वाटतं मात्र, गात असावी.

सोनीवर महाराणी ताराराणी सिरीयल येतेय, त्यात माझी आवडती अभिनेत्री स्वरदा थिगळे लीड करतेय. बघेन आता, मधे ती हिंदीत गेली, आधी सिम्पल मग अति glam रोल करत राहिली, फार कुठली सिरियल नाही बघितली पण माझे मन नंतर आता कदाचित ही सिरियल बघेन तिच्यासाठी.

पंधरा नोव्हेंबरपासून आहे, वेळ नाही माहिती. कदाचित बरसात संपणार असेल तर त्या जागी येईल.

सोनीवर महाराणी ताराराणी सिरीयल येतेय>> अरे वा... छान. बघायला हवी. ताराराणींच्या कर्तृत्त्वाचा झळाळ पाहता येईल.

मीरा थोडी लाजताना आणि हसताना दिसते आजकाल. दोघांचे रोमँटिक सीन फारच लांबवतात. पी एन गाडगीळची जाहिरात करून झाली. त्यांचे दागिने म्हणजे खोदा पहाड निकला चुहा वाटतात म्हणजे बॉक्स अगदी भारी आणि आत दागिना अगदी साधा आणि इतकुसा. असो फुकट असल्यावर काय. आदिमायला पाय आहेत याचा शोध जणू काही मीरानेच लावलाय असे वागताहेत सगळे. एका दिवसात म्हातारी काठी घेऊन चालायला लागली जणू काही ईतके दिवस घरचे हिब्रू भाषेत सांगत होते तिला चाल गं माय म्हणून. आता काठी सोडून एक दिवस दुसऱ्या मालिकेत पळून जाईल, सन टीव्हीवर आधीच प्रोमोमध्ये दिसतेय. मीराबाबा आले परत कविता घेऊन. त्यांना माहित नसतं का कविता कधी छापून येणार ते, बाहेरचे लोक सांगतात त्यांना आणि मग ते पेपर विकत घेतात Uhoh अश्विनी चौके आणि छक्के मारत असते. दोन मिनिट येते पण धमाल करते आणि सगळ्यांना धडकी भरवते. आता म्हणते मी निखिलशी बोलू का Lol आणि निखिल पोचला तिकडे आदीच्या घरी. किती तो निर्लज्जपणा. दहा वर्षांपूर्वी घरच्यांशी ओळख का नाही करून दिली याचं काहीतरीच पुचाट कारण देतो आदी, आता काय बदललंय त्याच्या मते.

ती मुक्ता आता.. "चाली चाली" आणि "एक पाय नाचव रे गोविंदा " म्हणते का काय वाटलं मला ..
काय तो ड्रामा..मुक्ताला कुणीतरी विग बदलायला सांगा रे..भयाण दिसते..
"अवघाची संसार" मालिका बघून अमृता सुभाष आवडायची बंद झाली तसच मुक्ता च्या बाबतीत झालंय..

Lol बरच मनोरंजन वाढून ठेवलेलं दिसतंय आत्तापर्यंत न बघितलेल्या एपिसोडसमध्ये!

कुठेतरी ती रोहिणी निनावे दिसली. बरीच तरुण आहे की ती! आत्तापर्यन्त जे काही विविध मालिकांचे एपिसोडस बघितले त्यावरून ती जगाचा फारसा अंदाज नसलेली कोणीतरी वयस्कर बाई असावी अस वाटत होतं!

त्रिकोण कसला चौकोन आहे की

मी तर म्हणतो मराठी सीरियल ने आता बंधने तोडून पंचकोन आणि षटकोनी प्रकरणे हाताळावीत

असेही प्रेक्षक काय दाखवतील ते बघतात इमानाने तर

मीरा पण त्या निखिलला खूप झुलवते आहे. पहिल्याच वेळी स्पष्ट शब्दात नकार द्यायला काय झाले होते? म्हणे नंतर बोलू. मग तो आशेला लागणार नाहीतर काय!

निखिल बावळट आहे. मीराला भाव दिला नसता तर तिने मुकाट त्याच्याशी लग्न केले असते. आता आदीला एका मुलीबरोबर बघून मीराचा जळफळाट होईल. आजचा अमोलचा नाव विसरणे प्रकार बळेच विनोद निर्मितीचा प्रयत्न.

अगदीच असह्य होतं ते
चार वेळा आदी बरोबर नाव सांगतोय तरी मुद्दाम विसरतोय
लेखकाचे वैचारिक दारिद्रय दुसरे काही नाही

मुळात तो निखिल न फोन करता थेट मनु च्या सासरी मीरा ला आणायला जातो, यावरून मीरा त्याला झापत नाही हेच अचाट आहे

कोणीही कुठेही कसाही कुणालाही न विचारता येतो काय जातो काय

बलिशपणाची कमाल आहे

मालिकाच अख्खी बालिश आहे. त्या दोघांचे रोमॅंटिक सीन्स तर भयंकर ओढून ताणून टाकलेत, आणि तेव्हा ते उमेशचं जमतंय ? जमतंय बोलणं तर फार डोक्यात जातं‌. Very irritating. दोघा बाळांनी आपली सोय स्वत:च लावून घेतली शेवटी, आणि हे म्हातारे बसलेत जमतंय जमतंय करत Lol .

मी हल्ली बघत नाही, चार दिवसांनी एपिसोड टाकतात, गेले उडत. सगळंच काय पैसे भरून घ्यायचं. तशीही बोअर दिसतेय, इथे वाचून.

आठ मिनिटांचे सीन्स पहायला मिळतात youtube वर ते बघते मी.

गेला म्हणावं बरसात चा सिझन आता, आवरा तुम्ही पण >>> नाही ना परतीचा पाऊस झोडपायला येतोय परत, as per हवामानखाते म्हणून ते लांबवतायेत Wink . हल्ली खात्याचे अंदाज बरेचदा योग्य असतात.

आज काहीतरी वेगळंच वळण घेतलं मालिकेत. डॉ पाठकांनी मीराला अपमान करून घालवून दिलं, पण ती नक्की जाईल की नाही ते उद्या कळेल कारण नेहमीप्रमाणे आदीचा जीव कळवळला आहे ती घर सोडून जायला निघाल्यावर. मनूला अजून स्वीकारायची पंचाईत आणि ही चालली त्यांना नीतिमत्ता शिकवायला. उमा सरदेशमुख मालिकेतून ब्रेक घेणार आहेत अशी बातमी वाचली, त्याच त्या सन टीव्हीच्या मालिकेसाठी.

चंपा तुम्ही सविस्तर लिहीत रहा. त्यामुळे मला एपिसोड बघायची गरज पडणार नाही, चार दिवसांनी टाकतात हल्ली.

मीरा पण भोचकपणा कशाला करते, जा आता आपल्या घरी.

अरे बापरे!
त्या उमा सरदेसाई छान अभिनय करत होत्या! एका वेळी दोन वेगवेगळ्या चॅनल्स वर काम करता येत नाही का हल्ली?
अंजु, मला youtube फीड मध्ये जवळपास लेटेस्ट एपिसोडस आदळत असतात... अर्थात मी ते कधीतरीच बघते. 2020 सुरुवातीला काही ज्येष्ठ नागरिक इथे आलेले असताना youtube ला subscribe केलं होतं. Subscibed असल्याने आदळत असतील एपिसोडस.... अजून काही मालिका पण असतात फीडमध्ये...

येऊ कशी तशी मी नांदायला मधल्या गोखले बाई नाही का तिकडे कलर्स मराठीवरच्या एका मालिकेत असाच लीडच्या आईचा रोल..? कोरोना फुल स्विंग मधे असताना ती सांगलीतलं कलर्स मराठीचं शुटिंग संपवून मुंबईतल्या येऊ कशी तशी साठी धावपळ करायच्या..? त्यांना बरी परवानगी मिळाली होती एकाच वेळी. उमा सरदेशमुखना पण देतील तसा चान्स. नाहीतरी सन टिव्हीवरील त्यांच्या रोलची झलक बघून त्या रात्रीस खेळ चाले मधल्या माईचाच रोल एक्स्टेंड करत असल्या सारख्या दिसल्या...

डॉ पाठक यांच्या नवीन रुग्णालयाचे काम चालू असताना काही मजुरांचा अपघात होतो. डॉ पाठक घाबरतात कारण त्यांना वाटते की त्यांचे नाव खराब होईल. सानिकाचे बाबा सल्ला देतात की काही दिवस आदिबाबाने गायब व्हावे म्हणजे कुठेतरी जाऊन राहावे. यावर मीरा कर नाही त्याला डर कशाला असे म्हणते. सानिकाचे बाबा हिच दुनियादारी आहे असे म्हणतात. मीरा आदिमायबरोबर पाठकांची बॅग भरायला जाते. तेवढ्या वेळात पोलीस येतात आणि सानिकाचे बाबा सांगतात की डॉ पाठक दिल्लीला गेले आहेत. त्याचवेळी मीरा आणि आदिमाय बॅग घेऊन बाहेर येतात आणि अजून काही भरायचे आहे का विचारतात. पोलीस म्हणतात की आम्हाला बॅग तपासावी लागेल. सानिकाचे बाबा लगेच कमिशनरशी बोललो आहे म्हणतात. आलेला पोलीस कमिशनरशी बोलतो आणि नाईलाजाने निघून जातो. सानिकाचे बाबा यांनी कधीकाळी कमिशनरचे उपचार केलेले असतात आणि कमिशनरने कधी गरज लागली तर सांगा असे म्हटलेले असते.
पुभामध्ये मीरा म्हणते की आपण डॉ आहोत आणि रुग्णसेवा आपले कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला चुकीच्या गोष्टी शिकवत आहात. यावर आदिबाबा म्हणतात की तुम्ही पाहुण्या आहात, तुमचे काम झाले असेल तर जाऊ शकता. मीरा बॅग आणि डोळ्यात पाणी भरून जाताना दाखवली आहे.

Pages