सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

मीरा खरेच भोचक आहे
विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये एवढा कॉमन सेन्स तरी बाळगावा
आणि सांगायची उपदेश करायची इतकीच उबळ आली असेल तर वेळ काळ बघून बोलावं

बरं झालं तिला हाकलून दिलं घरातून

त्या दोन उनाड पोरांना पण आता वठणीवर आणा कोणीतरी
स्वकष्टची शून्य कमाई असताना हे आई बाप होणार
निदान पोराचा लंगोट दुपटी तरी स्वतःच्या पैशाने घ्या की राव

थॅंक यु चंपा. पहीली आठ मिनिटं बघायला मिळतात त्यामुळे उत्सुकता होती, पुढचं तुमच्यामुळे समजलं. आता बघायची गरज नाही.

अनु तिथे यु ट्युबवर बघायला मिळत असतील, इथे सोनी लिव वर बघायला लागतात आणि ते लवकर टाकत नाहीत.

किती अतिशहाणी आहे ही मीरा. दुसर्‍यांच्या घरी जाऊन दिवा लावून शुभंकरोती म्हणायचे संस्कार शिकवतेय. स्वतःच्या घरी म्हणताना दाखवायचं होतं की.

कोरोना फुल स्विंग मधे असताना ती सांगलीतलं कलर्स मराठीचं शुटिंग संपवून मुंबईतल्या येऊ कशी तशी साठी धावपळ करायच्या..? त्यांना बरी परवानगी मिळाली होती एकाच वेळी.>> करोना काळात ते शुटिन्ग मुबैच्या कुठल्यातरी रिसॉर्ट किवा बन्गलोला केल असाव त्यानी,सेट सगळा बदलला होता त्या मालिकेचा आता परत ओरिजनल घरात करत आहेत.

पाठक किवा सानिका बाबा अजिबात डॉक्टर वाटत नाहित, पाठकाना नेहमी सुट घालुन फिरताना दाखवलय एकदाही हॉस्पीटल सेटिन्ग मधे दाखवलेल नाही.

आज अश्विनीने जाम मजा आणली. पाठकांच्या हॉस्पिटलचा स्लॅब कोसळला अन त्याची न्युज झाली म्हणुन तिने जाम चिमटे काढले सासू-सासरे-मीरा अन नवर्‍याला.

दुसर्‍यांच्या घरी जाऊन दिवा लावून शुभंकरोती म्हणायचे संस्कार शिकवतेय >>> पाठकांच्या घरात आता २ बाळं आहेत ना . तिसर यायचयं .

आज झापायचा सपाटा लावला होता. आधी सानिकाबाबांनी मीराला झापलं, मग अश्विनीच्या नवऱ्याने अश्विनीला झापलं, मग मीराने निखिलला झापलं.
सानिकाबाबा बोलले ते बरोबर होतं, पुढची पिढी बावळटच आहे. बरं झालं आदिबाबाने जाताना मीराचा अपमान केला, नाहीतर ती काय तिथून हलली नसती. अश्विनी मीराला बरोब्बर ओळखते, तिने आगाऊपणा केला असणार हे अश्विनीला कुणी न सांगताही समजलं Lol सत्य कटू असतं म्हणून ते मीराच्या आईबाबांना झेपलं नाही. प्रसिद्धी मग ती कोणत्याही बाबतीत मिळालेली असो ती चांगलीच असते हे अश्विनीला चांगलंच उमजलंय. ती मीरापेक्षाही हुशार आहे खरंतर. उगीच बिचारीला ओरडत असतात. शेवटी निखिलला अपमान झाल्याचं दुःख नाही पण मीरा आणि आदिचं भांडण झालं असेल हा विचार करून आनंद झाला.
पुभामध्ये आदी शिडीने मीराच्या बाल्कनीत येतो आणि तिला मिठी मारतो. त्या आधी तो मल्हारचा सल्ला घेतो. मीरानेही बहिणीचा सल्ला घ्यायला हवा होता, गाडी लवकर मार्गी लागली असती.

आदी एकदा म्हणतो की गाडी शिकत असताना मीराने स्वतःची चूक असताना दुसऱ्याला झापलं होतं इतकं की जाताना तो माणूस तिची माफी मागून गेला होता. तेव्हा मीराची नीतिमत्ता कुठे गेली होती. एकंदरीत मीरा दुसऱ्याला शिकवायला नेहमी पुढे असते.

आदी म्हणतो थांब मीरा मी तुला सोडतो, यावर मीरा म्हणते, तू मला सोडलेलंच बरं. मग ती आदिमायशी अगदी गोडगोड बोलते की कशी आता आपल्याला परत चाकाची खुर्ची नको आहे आणि खूष राहा वगैरे. मनू बाळाला सांगते की इथे तिची काळजी घेणारी माणसं आहेत (खरं तर ती पाठकांना आठवण करून देते की मनू बाळ आणि तिला होणारे बाळ ही आता त्यांची जबाबदारी आहे). मग चपलांचा टॉक टॉक (लाकडी फ्लोरिंग आहे बहुतेक) आवाज करत ती बाहेर पडते.
अश्विनीची तोफ खरं तर मी मीस केली.
मीही ऑफिसचं काम करत येता जाता बघत असते, अगदीच नाही जमलं बघायला तर आवाज मोठा ठेवून फक्त ऐकते. नंतर ऍप वर येण्याची वाट बघण्यापेक्षा...

हॉस्पिटल सेटअपपेक्षा आदिबाबा आणि सानिकाबाबा यांच्या सुटबुटाचा खर्च परवडला. असंही मालिका आदी आणि मीरा भोवती फिरते. ते दोन म्हातारे डॉ वाटतात की नाही याने कोणाला काही फरक पडणार नाही असे निर्माता आणि इतरांना वाटत असावे. अमोलसुद्धा एकपात्री विनोदी कार्यक्रम करतो असे दाखवले आहे पण त्याची झलक कधी बघायला मिळत नाही.

पहिल्या आठ मिनिटांचे बघितलं.

मला तर वाटतंय, सानिका बाबांनीच स्लॅब पाडायला लाऊन आदीबाबाना अडकवले आहे. सानिकाने बाबांना सांगितलं असणार, आदि मला आवडतो पण तो दुसरीवर प्रेम करतो त्यामुळे केलं असावं आणि उपकार केल्याचं दाखवून आदिला जबरदस्तीने सानिकाशी लग्नासाठी तयार करायचं.

अमोलसुद्धा एकपात्री विनोदी कार्यक्रम करतो असे दाखवले आहे पण त्याची झलक कधी बघायला मिळत नाही.>>>>
तो नाव विसरून जे केविलवाणा विनोद करायचा प्रयत्न करतो तीच झलक पुरेशी आहे Happy

तेच तर. मागेही ते नाव बदलून मनूला बघायला येणाऱ्या मुलाला फोन करायचा होता तर तो केवढा घाबरला होता. त्याची बायको कधी प्रत्यक्षात कपडे हाताळताना दाखवली नाही, स्केचेसवर समाधान मानायचे आपण. नशीब मनू, मल्हार, आदिमाय आणि अश्विनी काही करत नाहीत.

केविलवाणा विनोद करायचा प्रयत्न करतो तीच झलक पुरेशी आहे >>> तरीच आदीमाय नेहमी त्याला सांगत असते की दुसरा काही कामधंदा करा म्हणून.

नाही बघितला आजचा भाग. कोणीतरी सांगा काय झाले ते. दुपारी दोन वाजता बघायचं ठरवते पण नेमकं दोन वाजता विसरून जाते.

नाही पाहिला तरी चालेल असाच होता. मीरा आदीला फोनवर सांगते आपण आता थांबूया हे सगळं असं होऊन बसलय तर ( पाहीलं तर स्वत:चा भोचकपणा नडलाय आता).
नंतर काहीतरी ते मल्हार बाळाकडून पोरगी पटवायच्या टिप्स घेऊन आदीचं शिडीवर चढणे वगैरे माकडचाळे होते. पुढील भागात आदी मीरा समजून वहीनीचा हात पकडणार आहे, बरोबरच होईल , ती हुशार आता यांना पण पळून जा सांगून त्यापुढील भागात लग्न असावं बहुतेक Proud म्हणजे तरी प्रेक्षकवर्ग सुटेल कदाचित‌.

अत्यंत आचरटपणा
आदी मल्हार च्या शिकवणीनुसार शिडी चढून जातो आणि वहिनीला मीरा समजुन उठवायला जातो मग परत खाली येतो आणि मिराच्या खोलीला शिडी लावल्यावर म्हणतो खुप उंच आहे हे आपण घरी जाऊया
भावा हे वाक्य पहिल्यांदा शिडी चढताना होते, तेव्हा राहून गेले आता पुढच्या वेळी म्हणू असे नसते ते

दोघेही एकमेकांना लव्ह यु वगैरे म्हणतात इथवर पाहिले

धन्यवाद भाग्यश्री, आशुचँप हा भाग बघितला नाही तरी चालेल. +१
आशुचँप Lol
अश्विनीला कळले ते बरे झाले. तीच पटापट हालचाल करून स्वतःचा आणि आपलाही जीव सोडवेल.

अश्विनीला कळले नाहीचे. अश्विनीच्या रूमला खिडकीला ग्रील वगैरे काहीच नाही असे कसे. कोणीही वर चढून येऊ शकतो. ती शिडी कुठून आणली होती त्यांनी. शिडीही तिथेच ठेवत असतील तर धन्य आहेत. कोणता डॉ एवढा प्रसिद्ध असतो आणि मीडिया त्याच्या मागे लागते.
ती रिसेप्शनवाली कलरवर गेली आहे बहुतेक सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमाचे पात्र करायला.
कितीही अ आणि अ असली तरी मुक्तासाठी मी बघते. अश्विनीचे पात्र बोनस आहे.

उमेश बरा वाटला त्यात, ही जरा कृत्रिम वाटली मला. मला मुक्ता आवडते तरीही, तिने नीट नाही केला तो सीन असं वाटलं, मी शिडी गॅलरी सीन बघितला.

एका प्रोमोत सानिकाबाबा उमेशवर लग्नासाठी जबरदस्ती करतायेत अस दिसलं.

100 भाग जवळ आले, ह्याचाच जागी दिवाळीनंतर महाराणी ताराराणी येणार असावी.

आदीबाबा राजन ताम्हणे आहे की मीराबाबा?

हो अंजु, तो प्रोमो बघितला होता त्यावरून आता पाणी ओतताहेत की काय असे वाटले!

मीरा बाबा कधी काळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या सांगायला यायचे का..??

Pages