सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

उमेश कामत माझा प्रचंड आवडता आहे. मुक्ता आणि उमेश साठी ही मालिका बघतेय. अजूनतरी मालिका मस्त चालू आहे. मुक्ता उमेशचे सीन्स अगदी उत्तम रंगतायत. मजा येते आहे पहायला.

रमड ला अनेक अनुमोदन
एकतर मुक्ता बर्वे लाडक्या अभिनेत्रीपैकी एक आहे,तिचे सगळेच मुव्ही आवडले होते,रुद्रम नतर फॅन झाले होते तिची,एका लग्नाची दुसरी गोश्ट फक्त तिच्यासाठी पाहिली.मुक्ता आणि उकाची जोडीही भारी वाटते.
खरतर हिची रायटर आणि मानबाची रायटर एकच असल्याने मनात शन्का आहेच पण एकदरीत मालिका अजुनही छान चालु आहे.

मी सर्फ करताना सोनी Liv वर ही मालिका दिसली. उमेश आणि मुक्ताचा फोटो पाहुन मराठी मालिका पहायची हिंमत केली. पाहिले 2-3 भाग पाहिले आणि आता फॉलो करते आहे.
खरं तर अति अति टिपिकल कथानक आहे, पण मुक्ता उमेशमुळे पेशन्स टिकुन आहे. मुक्ताची फिजिओथेरपिस्ट मैत्रिण फार क्युट आहे. सगळ्यांचे अभिनय आवडले आहेत. अगदी लहान भूमिकेतले कलाकार ( पॉलिक्लिनिकची रिसेप्शनिस्ट, उमेशच्या आईची मेड) सुद्धा चांगले काम करताहेत. बाकी तर मोठे /अनुभवी कलाकार आहेत.
(आज पहिल्या पानावरचा कुमारी माता धागा पाहुन पटकन या सिरीयलची आठवण आली आणि लगेच हा धागा दिसला)

बघायला सुरवात केली होती पण अगदीच कै च्या कै आहे , अ‍ॅक्टिंग पण कोणाचेच आवडल नाही.
मुक्ता बर्वे आवडेनाशी होऊ नये म्हणून बघायची थांबवली !
मुक्ता-उमेश सोडून स्टारकास्ट अतिभयंकर आहे.. मुक्ताचा भाऊ कसला पिचका आहे , ती कोण वहिनी अत्यंत बेकार पर्सनॅलिटी आणि शाळेतल्या मुलींच्या वरतांड शिकाऊ ओव्हर अ‍ॅक्टिंग !
सर्वात बेकार मुक्ताच्या आईचा रोल करणारी बाई आणि त्या उमेश कामतची आई !
गोष्ट पण अचाट आणि अतर्क्य.. पुणे/मुंबई कुठल्यातरी मोठ्या शहरात २१ व्या शतकात घडणारी गोष्ट आहे, कुठल्या सुशिक्षित मराठी घरात कॉलेज मधे जाणार्या मुलीसाठी लग्नाचे बघतात Uhoh

वेगळा धागा काढला, बरं झालं. रेशीमगाठवर लिहीलं जायचं याचं. मी उमेश मुक्तासाठी बघतेय. उमेश ओयेहोये एकदम, दाढीतला आवडतो, स्माईल क्युट. फ्लॅशबॅकमधला चम्या वाटतो. मुक्ता थोराड दिसतेय पण आवडतेय.

मुक्ताची फिजिओथेरपिस्ट मैत्रिण फार क्युट आहे. >>> हो, ती पल्लवी भावे वैद्य.

>>मराठी घरात कॉलेज मधे जाणार्या मुलीसाठी लग्नाचे बघतात
अगं, ती २४-२५ वर्षाची आहे पण. मास्टर्स करत असणार, ते पण गटांगळ्या खाऊन असू शकेल Proud
हल्ली २७-२९ कॉमन आहे म्हणा. पण २५ म्हणजे फार काही लवकरही नाही.

यात मला ते 'गडबडगुंडा' असं त्या फिजिओथेरपिस्ट च्या मागून ओरडतात ते अजिबात आवडत नाही.
बाकी ३ कलाकार मानबा मधूनच आले आहेत. पैकी अश्विनी झालेल्या मुलीने (ही मानबा मधे जेनी होती) रोल परफेक्ट केलाय पण ते कॅरॅक्टर डोक्यात जातं. या मालिकेची टिपीकल मालिका बनू नये असं मनापासून वाटतं. तिचा नवरा झालेला कलाकार आणि मल्हारचा बाबा हे दोघेही मानबा मधे होते.
कुठल्या सुशिक्षित मराठी घरात कॉलेज मधे जाणार्या मुलीसाठी लग्नाचे बघतात >>> ती पीजी करते आहे ना? मग बघत असतील. अजून अशी पुष्कळ घरं आहेत शिल्लक Proud

आजचा भाग बघायला सोनी लिववर गेले तर पैसे भरा सांगताहेत Angry दुपारी दोन वाजता बघेन आता. रात्री बाराला लागते पण आज हास्यजत्रा संपतच नव्हतं आणि सगळ्या मालिका स्लो मोशन दिसत होत्या, मग नाद सोडून दिला.
मानबा मधून चार कलाकार आलेत, मिरेची आईपण होतीना मानबा मध्ये, म्हणजे तीन कलाकार तर एकाच घरात आहेत. पल्लवी वैद्य गोड दिसते आणि ते गडबडगुंडा संगीत आवडते मला. मुक्ता आणि उमेश वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिका करणार नाहीत त्यामुळे ठराविक भागात संपेल. उमेशचा चांगुलपणा आणि परोपकार दाखवण्यासाठी काही प्रसंग उगीच पेरलेत. उमेशची आई सारखी त्या सांभाळणाऱ्या मुलीला बावळट म्हणते ते फारच खटकतं.
मीरा बहिणीला मुल हवंच आहे वगैरे स्वतःच ठरवते आणि त्यांच्या लग्नाचा निर्णय घेऊन मोकळी होते. तो मल्हार तर स्पष्ट नाही सांगतो मूल वगैरे आणि आदिराजही प्रॅक्टिकल बोलत असतो तर या बहिणींचं काहीतरी वेगळंच. वरून ती मनू मारे म्हणते मी एकटी मूल वाढवेन, अरे कशाच्या जीवावर. फक्त मीरा आणि आदिराजची भेट व्हावी आणि प्रेमकथा पुढे जावी म्हणून ही मनुची गोष्ट तोंडी लावायला.

अगं, ती २४-२५ वर्षाची आहे पण. मास्टर्स करत असणार >>> हो.

आई तिच्या लग्नाची घाई, मीरा पस्तीशीशी झाली तरी लग्न करत नाहीये, हिचे तस नको व्हायला म्हणून करतेय अस म्हणाली होती.

आजचा भाग बघायला सोनी लिववर गेले तर पैसे भरा सांगताहेत >>> दोन दिवसांनी बघायला मिळतो तेही रात्री , परवाचा आज रात्री ह्या प्रकारे. मी तसंच बघते.

रेशीमगाठ एपिसोड त्याच रात्री उशिरा बघायला मिळतो. ते नवऱ्याने पैसे भरून घेतलं आहे पण मी रात्रीच बघते, लवकर नाही बघत. आता संपेल तो प्लॅन . मी सांगितले नवीन नको घेऊन. तसेही झी मराठी किती वर्षानी बघते श्रेयस प्रार्थना साठी .

मनू बद्दल समजल्यावर सुहीता यांनी फार सहज अॅक्टिंग केली. तो त्रागा, ते डायलॉगज सर्व natural वाटलं, एकीकडे मिराला पण योग्य सुनावले अस मला वाटलं.

मुक्ता आणि उमेश वर्षानुवर्षे चालणाऱ्या मालिका करणार नाहीत त्यामुळे ठराविक भागात संपेल. >>> शंभर भाग असावेत, सोनी liv वर episodes 100 अस येतंय.

ती मनू मारे म्हणते मी एकटी मूल वाढवेन, अरे कशाच्या जीवावर.>>> ताईच्या जीवावर, दुसरे काय.

बाय द वे इतका घोळ घालण्यापेक्षा, आदि मीराने दोघांचे गुपचुप लग्न लाऊन दिलं असते आणि मग दोघे दोन्ही घरी आम्ही लग्न केलं सांगायला गेले असते तर जास्त सोपे नव्हतं का. ही स्थळ आणा, लग्न ठरवूया फार कठीण आहे.

सिरीयल ऊ का- मुक्ताच्या प्रेमाची आहे का त्या मनु व तिच्या मित्राची?
किती दिवस झाले तेच दळण चाललय..

एपिसोडस् 'सध्या' शंभर आहेत. टीआर्पीनुसार पुढचं सगळं ठरत असतं.

करोनामुळे मुक्ताउमेशची पण कामं कमी झाली असतील तर डेलीसोप चांगलंच आहे.

युट्यूब वर दिसते ही मालिका. पण काही दिवस मागे आहे.
मुक्ता ३५शीतल्या बाईचा रोल करते ते बरे झाले कारण आता ती तशीच दिसते.
मल्हार-मनू कंटाळवाणे वाटतात.

एखादा एपिसोड पाहिला. सुहिता थत्तेंच्या कानातले झुमके किंवा जे काय आहे ते लक्षात राहिलं. फॅशन पोलिसांचं काय म्हणणं आहे त्यावर?

मुलीसाठी लग्नाचं किंवा वेळीच लग्नाचं महत्त्व यावर घरातच वादविवाद स्पर्धा होती. मुलीचं लग्न हे एकमेव उद्दिष्ट ठेवून जगणारी मुलीची आई.
आई कुठे काय मधल्या यश गौरी साखरपुड्यातल्या तीन एपिसोड सलग चाललेल्या लग्न, अपत्य जन्माला घालणं करियर या वादविवादाचं खूप कौतुक छापून आणलं गेलंय. या मालिकेत लग्न आणि करियर याबद्दल वादविवादाच्या फेर्‍या असतील. दोन्हीकडे तीच संवादलेखिका आहे.

उमेश कामतच्या कॅरॅक्टरच्या घरची श्रीमंती ठसवायचा आटोकाट प्रयत्न केला होता. घरात सूटबूट घालून फिरणारे लोक. राजन भिसेंचा प्रचंड कंटाळा आलाय. सगळ्या मालिकांमध्ये एकच एक एक्स्प्रेशन आणि टोन.

विषय किंवा अभिनेते कोणाहीसाठी आवर्जून मालिका पहावी असं वाटलं नाही.

राजन भिसेंचा प्रचंड कंटाळा आलाय. सगळ्या मालिकांमध्ये एकच एक एक्स्प्रेशन आणि टोन.>>> मला तर उमेश, मुक्ता, त्याच्या आणि तिच्या आईचे काम करणाऱ्या या सगळ्यांचे सगळ्या मालिकांमध्ये एकच एक एक्स्प्रेशन आणि टोन वाटतात .

तो मल्हार आणि त्याची आजी प्रचंड डोक्यात जातात.
त्याची आई तर दिवस रात्र ओढणीतच गूतंलेली असते. यूट्युबवर फ्रेश एपिसोड येतात ८ मिनिटाचे दुसरया दिवशी.

भयानक सिरीयल आहे
आमच्या घरी फार आवडीने बघतात
त्यामुळे काही बोलताही येत नाही
कुठल्या काळात जगतात हे लोकं
आदी आणि तो मिराचा मित्र यांच्यात बालिश शाळकरी मुलांसारखं जे काही सुरू आहे मीच कसा लाडका हे असह्य आहे
ना त्या मल्हार ला ना मीरा ला नोकरी
कुणाच्या जीवावर मूल वाढवणार आहेत च्यायला
त्यांचा बलिशपणा बघता त्यांची आई बाबा सोडा लग्नाची पण तयारी वाटत नाही

कुणाच्या जीवावर मूल वाढवणार आहेत च्यायला>>> घरच्यांच्या Lol
लेखक/लेखिकेने अधिराज आणि मीराला पुन्हा जवळ आणण्यासाठी मल्हार आणि मनूला बावळट बनवले आहे.

असेल असेल.. तसे असेल. आपण काय सगळ्या शिरेलिंमध्ये सगळ्यांचं चांगलं होऊदे अशी आशा करत दोन अडीच वर्ष वेड्यासारखी वाट बघत राहतो अन् आपल्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन लेखक,दिग्दर्शक,निर्माते, चॅनल अन् कलाकार लखपती अन् करोडपती होतात.

अरे तो मीराचा मित्र काय नमुना दाखवलाय ,, , डोक्यात जातो.

लेखक/लेखिकेने अधिराज आणि मीराला पुन्हा जवळ आणण्यासाठी मल्हार आणि मनूला बावळट बनवले आहे>>> हो ते फक्त एक निमित्त आहे , हे दोघं भेटण्यासाठी. फारच ताणताय आता ते मनु मल्हार प्रकरण, कंटाळा आला. अजूनही त्याच्या घरी कोणालाच कळवायची इच्छा आणि घाई होत नाहीये , सगळे आपले निवांत , टाईमपास. की डायरेक्ट बारशालाच बोलवून सांगणारेत बाळाचा बाप तुमचा मुलगा आहे म्हणून Uhoh , एकंदरीत ॲवरेज च आहे मालिका, काही वेगळेपण नाही.

आणि उमेश किती वेळा तो एकच शर्ट घालणारे आता , निळा चौकटीचा? मुक्ता तरी आज हाटेलात नटून आली होती जरा, आणि म्हणे मला आता काहीच वाटत नाही , तु ही पझेसिव्ह होऊ नये,, , लब्बाड Wink

त्यांचीच केमिस्ट्री छान वाटते बघायला
बाकी सगळा आनंदी आनंद आहे
यांच्या आयुष्यात इतकी कॉम्प्लिकेशन्स बघून आपण फारच सुखात जगतो असे वाटते Happy

आज मनूला दुसऱ्या मालिकेत बघितलं, फुलाला सुगंध मातीचा, त्यातही तिला नुकतेच मूल झालंय.
आज मीराने झापलं आदिला, किती बालिश वागतोस म्हणून.

मुलीचं लग्न हे एकमेव उद्दिष्ट ठेवून जगणारी मुलीची आई. >>>>>>>> हे तर सगळयाच मालिकेत असत.

आई कुठे काय मधल्या यश गौरी साखरपुड्यातल्या तीन एपिसोड सलग चाललेल्या लग्न, अपत्य जन्माला घालणं करियर या वादविवादाचं खूप कौतुक छापून आणलं >>>>>>>>>>> मला आवडले ते एपिसोडस. संवाद छान होते त्यात.

राजन भिसेंचा प्रचंड कंटाळा आलाय. सगळ्या मालिकांमध्ये एकच एक एक्स्प्रेशन आणि टोन. >>>>>>>> _++++++++११११११११११

अरे तो मीराचा मित्र काय नमुना दाखवलाय ,, , डोक्यात जातो. >>>>>>>> तो तर सगळीकडे एकच काम करतो. नायिकेचा मित्र, कबाब मे हड्डी. तिकडे 'रन्ग माझा वेगळा' मध्ये दिपा- कार्तिकला वेगळ केल ह्याने. इथेही हेच करतोय.

ह्या शिरेलीचे लेखक मंडळ एक वेगळा धागा काढून आपल्याकडून पुढे काय काय ट्रॅक ठेवावेत याबद्दल चाचपणी करताहेत की काय असं वाटू लागलंय मला.

ही सीरियल बोरिंग झाली आहे. पहिले 4 एपिसोड चांगले वाटले फक्त.
काहितरी नविन आहे असे वाटले होते. पण पुन्हा तोच टिपिकल पणा.

मला ही आवडत नाहीये. मुक्ता खर म्हणजे मला खूप आवडते.पण मुळात कथेत, संवादात दम नसेल तर ती तरी काय करणार ?

मी एकच जरा ओढीने बघते ती म्हणजे राजा रानी ची ग जोडी कलर्स वरची . Casting ,कथा, संवाद, अभिनय, सेट, कपडे सगळंच बरं आहे तिचं. गेले दीड एक वर्ष माझा interest बऱ्या पैकी टिकून आहे त्यातला. पण trp नाहीये बहुत करून तिला , संध्याकाळी सात ला असते. प्राईम टाईम काही मिळत नाहीये तिला.

मला फ्लॅशबॅकमधले आदी मीरा सीन प्रचंड बोअर व्हायला लागलेत. मी ते पुढे ढकलते. दोघेही कृत्रिम वाटतात त्यात.>>> +१११ , दोघेही ओवर ॲक्टिंग करतात त्यात , मुळात कथेचा जीव पण फार छोटा आहे आणि नावीन्यही नाही. लवकर संपेल बहुतेक. कथा कशी असावी हे आई कुठे काय करते कडून शिका म्हणावं , चार वर्षे तरी चालते मग Lol

Pages