सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

आदिची आई ज्या पद्दातिने मिराची चौकशी,कौतुक, लग्नाविषयी विचारत होती हिन्टृस देत होती त्यावरुन अगदी सहज मिरा-आदी च्या लग्नाविषयी बोलतेय हे कळत होत तरी मिराकडे कोणालाच ते कळल नाही का?
हे अस ताकाला जाउन भान्ड लपवल्यासारख मनु-म्ल्हार लग्नाचा विषय काढण एकदम अचाट होत, मल्हार आणि मनु अल्पवयिन असल्यासारखे का बिहेव्ह करतायत सगळे? तस असेल तर लग्नाची घाई का करतायत तेही कळत नाही? दोघही सेटल नाहित तर बेबी कस वाढवणार आहेत?
कालची समिधा गुरुची अ‍ॅक्टिन्ग आवडली

समिधा गुरु दिसतही छान होती.

ते मीराचे बाबा पहील्याच भेटीत प्रेग्नंसीबद्द्ल सांगायची घाई करत होते, नशीब आदी मधे पडला. एक धक्का तुर्तास बास होता.

मीराला सरळ मागणी घालायला हवी होती आदीसाठी आईने, मीराशी जवळीक साधून बोलतायेत ते लक्षात आलं काहीजणांच्या पण मनुच्या लग्नाची घाई आहेना, तिथे लक्ष जास्त मीराकडच्यांचं.

आदिच्या आईला आपल्याला सगळेच आजार आहेत आणि आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही अस सतत वाटत असतं.

डोळ्यांना काय झालंय तिच्या? >>> काही नाही. ती चष्मा असून लावत नसते म्हणून नंबर वाढतो, मीरा डोळे तपासून नवीन नं काढून देते.

आता अदि मीरा नि दोन मुले यांची लग्ने लावून टाका नि सिरियल संपवून टाका.
आणखी बरसात होत राहिली तर उगाच पूर यायचे.

कोणी बघत आहे का ही सिरियल? मी आधी मुकःता आणि उमेशसाठी बघत होते.पण स्टोरी मध्ये काही फार दम नाही वाटला.
हे दोघ तरी किती खेचणार.आणि त्या आदिराजच कँरँक्टर तर पहिल्या भागापासून अस दाखवल आहे की जणू काही मीराला परत मिळवण हेच त्याच ध्येय आहे.
संवांदांमध्येपण तोचतोचपणा यायला लागला आहे .
मुक्ता खूप मोठी आणि थोराड वाटते ,त्या मानाने उमेश तिच्यासमोर कोवळा वाटतो.
आता तर काय मीराला जेलस करण्यासाठी की काय कोण जाणे पण प्राजक्ता दातारला आणल आहे,उमेशसाठी.दोघांनी लग्नाला होकार दिला आहे पण एक महिना मागून घेतला आहे.बहुतेक आदिराजने तिला पटवून ठेवलेल कसाव आणि ही सुध्दा मीराला आदिच्या आयुष्यात परत आणायलख मदत करणार असेल.

आता अमेरिकन सिरियल असती तर त्या नवीन मुलीशी लग्न करायला अभि तयार होतो कारण ती म्हणते तिला फक्त बापाचे पैसे हवे आहेत नि ते जर अदीने तिला दिले तर अदी इतर कुणाबरोबर राहिला तरी तिची हरकत नाही.
एका जुन्या सिरियलमधे घटस्फोट होण्याआधी एक माणूस नि त्याची प्रेयसी कुठेतरी दूर जंगलात जाऊन लग्न करतात नि ती दुसरी बायको पहिल्या बायकोबरोबर एकाच घरी रहाते. ती सिरियल खूप चालली, त्यामुळे इथेहि तसे करायला हरकत नाही.

मग लग्न करून अदि त्या इस्टेटीचा मालक झाला की ती इस्टेट बायकोच्या नावाने करेल, स्वतः तिथे नोकर म्हणून राहील, मीराशी लग्न करेल नि ते दोघे सगळी इस्टेट गरीबांचे रोग दूर करण्यात घालवतील. मग अदीची पहिली बायको, इस्टेटीची मालक अदी मीरावर खटला करेल, पण जज त्यांना सोडून देईल!
आणखी बरेच काही काही होईल, पण तोपर्यंत बरेच जण सिरियल पहाणे बंद करतील.

की ती इस्टेट बायकोच्या नावाने करेल,…… घालवतील.>>>> एकदा नावावर केलेली मालमत्ता परत कशी उडवतील?
संवांदांमध्येपण तोचतोचपणा यायला लागला आहे .>>>+१

मी आदी मुक्ता हॉटेलात जातात, तो भाग बघितला. दोघे छान दिसत होते, डायलॉगज त्या सीनमधले छान होते.

Complicated का करतायेत अजून, वरचे वाचून लिहितेय हे.

उपकथानकं कंटाळा आणतायत. ही मालिका त्या दोघांभोवती फिरवून चटकदार करण्याऐवजी नेहमीचे सो कॉल्ड तिढे कशाला घालतायत?

आदी आणि ती मुलगी लग्न ठरलंय असं नाटक करतील एक महिना. तोपर्यंत मल्हार आणि मनुचं लग्न उरकतील आणि एक महिन्याने सांगतील की आमचं एकमेकांशी पटत नाही. मल्हारच्या लग्नाची घाई का करताहेत हे जोपर्यंत स्पष्ट सांगणार नाहीत तोपर्यंत आदीमाय आणि ओढणी काही मल्हारचं मनावर घेणार नाहीत ही साधी गोष्ट आहे. इकडे आदी लग्न करतोय म्हणून मीरा निखिलला हो म्हणेल. मग आदी फुगून बसेल. किती ताणणार ते TRP वर ठरणार असेल.

इतक्यात फेसबुकवर एक भारी रिव्ह्यु वाचला या सिरियलचा

साहित्यात सगळे उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ असताना, बनवणारी व्यक्ती सुगरण असताना मुळात पाककृतीच विचित्र असेल तर पदार्थाचा विचका होतोच. कितीही सुरेल शब्द, उत्तम चाल, जाणकार संगीतकार आणि सुंदर वाद्यमेळ असला तरी गाणारा पिचक्या बेसूर आवाजाचा असेल तर गाण्याचा पचका होतो‌.
तशीच काहीशी गत 'अजूनही बरसात आहे' या मालिकेची आहे. बहुतांश कलाकार कसलेले आहेत, अगदी नवे कलाकारही चांगलं काम करत आहेत. मुग्धा गोडबोलेंचं संवादलेखन उत्तम आहे. मालिकेची निर्मितीमूल्यं बरी आहेत. पण या मालिकेचं कथालेखन इतकं भंगार आहे की हे नक्की काय चाललंय असा प्रश्न पडतो.
कुठल्याही पात्राला धड व्यक्तिमत्व नाही. अगदी नायिकेपासून सुरुवात करायची तर इतर बाबतीत पुढारलेली नायिका काही बाबतीत १८५७ सालची मूल्यव्यवस्था जोपासून आहे. कुठलंही असभ्य वर्तन न केलेल्या नायकाला ती फक्त त्याने मित्रांच्या भंकस करण्यात भाग घेतला म्हणून सोडून देते. नायिकेचे आई-वडील मोकळ्या विचारांचे आहेत पण फक्त आपली धाकटी मुलगी गरोदर राहिली म्हणून तिचं एका उथळ मुलाशी‌ लग्न करून द्यायला तयार होतात. २०२१ मधेही नको त्या वेळी गरोदर असलेल्या मुलीशी गर्भपाताच्या पर्यायाबाबत बोलतही नाहीत. २०२१ मधे ते सुद्धा १९२१ सालच्या चित्रपटात असल्याप्रमाणे वागतात. नायिकेचा भाऊ सवडीनुसार उथळ आणि समंजस वागतो.
नायकाच्या घरी व्यक्तीरेखा ढोबळ असल्या तरी बऱ्यापैकी सुसंगत वागतात. पण नायकाची सहसा समंजस असणारी बहीण मधेच सटकल्यासारखी वागते.
या सगळ्यात बिचारे कलाकार लिहून समोर आलेला प्रसंग उत्तम निभावतात म्हणून मालिका सहन होते. पण गोष्ट अशीच चालू राहिलं तर उत्तम अभिनयही या मालिकेला तारू शकणार नाही.
मालिकांच्या निर्मात्यांचा आणि टीव्ही चॅनल्सचा असा समज असतो की कुठलीही प्रसिद्धी उत्तम असते आणि लोक वाईट बोलले तरी फायदाच होतो. मात्र जर तुमचा अपेक्षित दर्शकवर्ग सुशिक्षित मध्यमवर्ग - उच्चमध्यमवर्ग असेल तर हे तर्कट लागू पडत नाही. झी मराठीचा फुकाचा आत्मविश्वास त्यांना जसा भोवला त्यातूनही या नवकॉर्पोरेट चॅनलवाल्यांना अक्कल येत नाही. अशी स्वातंत्र्यपूर्व काळात वागल्यासारख्या तरुण व्यक्तिरेखा असेल तर आजची तरुणाई तुमच्याकडे का ओढली जाईल?
उत्तम जमलेल्या पदार्थाला रॉकेलची फोडणी द्यावी अशी कथा लिहिल्याबद्दल Sony मराठी चं अभिनंदन.

कायच्या काय आहे जे दाखवताय ते. मुळात स्टोरीच नाहीये नीट मालिकेला. फक्त मुक्ता आणि उमेशच्या जोरावर मालिका उभी केलीये, त्यातही मुक्ताचे फ्लॅशबॅक सीन अगदीच बालिश घेतलेत, तीला नीट नाही जमलेत ते. लहान मुलीसारखी कसातरी चेहरा करून रडते. आणि शर्ट पँट घालून तीला दहा वर्षांनी यंग दाखवायचा प्रयत्न तर फारच बालिश आणि विनोदी आहे. उमेश तरी थोडी संयत ॲक्टींग करतो.

ज्या प्रसंगावरून त्यांचं मित्रात चिडवाचिडवी होते तो प्रसंग तर अगदीच प्याँ घेतलाय. १८५७ काळातला.

आणि च्यायला ते मनु मल्हार आपल्या भविष्याची कसलीच काळजी करताना दिसत नाहीत , जणुकाही मीराने काळजी वहावी म्हणूनच ती प्रेग्नंट राहीलीये Uhoh , म्हणजे आमचं काम झालंय आता पुढे तुमचा नंबर काय करावं ते बघण्याचा Proud

आदि, मीराचे मित्र किती बालिश बाळू दाखवलेत. ती झोपलेली असताना तो नुसता आत येतो त्यावर बावळटपणा!!! १९७० साली घडतंय की काय असं वाटतं. Angry

गेल्या शनिवार भयंकर तमाशा झाला असं ओझरतं बघताना जाणवलं... आदीमाय मीराच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या सोफ्यावरुन उठुन कुणाच्यातरी आधाराने स्वतःच्या पायाने चालत जाऊन व्हील चेअरवर जाउन बसलेली बघितल्यावर मी स्वतःला चुमुटा काढुन बघितलं (एखाद्याला रॉकेटात बसुन अंतराळात जाण्याचा मोह असतो.. कुणाला विमानात बसण्याचा.. कुणाला ट्रेन मधे... माझ्यासारख्याला एस.टी.त बसण्याचा.. परंतु आदीमायेसारखा व्हील चेअरीत बसुन ती पगारी बाईकडुन फिरवून घेण्याचा भन्नाट मोह अजुन बघितला नव्हता..!).

मागच्या आठवड्यात मी फार न बघितल्याने (सोमवारचा बघितला बहुतेक), मगाशी विकली रिव्हु बघितला, यु ट्युबवर सोनी मराठी नावाने आहे.

फार complicated करतायेत अस वाटलं.

मला तर त्या अश्विनीचा अप्रोच आवडला.
<सात्त्विक संताप मोड>
ह्या बावळटांच्या एकाच्याही अंगात दम नाहीये खरं काय ते सांगण्याचा. कधीही कसंही गोंजारून मांडीवर बसवून सांगितलं तरी ते असंच रिअ‍ॅक्ट करणार होते. हे त्या एकाही एवढ्या हुषार बावळटाच्या डोक्यात आलं नाही?
< /सात्त्विक संताप मोड>

मला अश्विनीने एकदम बॉम्ब टाकल्यासारखं सांगितलं ते समहाऊ नाही आवडलं. तिची पद्धत अयोग्य वाटली.

मला youtube दाखवलेल्या धावत्या वर्णनात सानिकाचे वडील आदीला एका मुलीबरोबर बघितल्याच सांगतात. ती त्यांना म्हणते तस नसावं तुम्हाला काही तरी भास झाला असेल!!! आणि मग तिच्या चेहऱ्याचा close up. त्यावरून आणि मधल्या एका भागात ती आदीला lunch ला जाऊ यात का विचारते त्यावरुन तिला आदी आवडला आहे असे वाटते.

अतिशय पाणी घालून पातळ करताहेत कथानक. हल्लीच्या काळात असे कोणी ताणत का? ती बावळट मनु फक्त रडते! किती vaseline वाया जातंय उगाचच!

मु ब एकदम पोक्त दिसते. त्यात तिच्या आणि मनुच्या केसंचा विग! कधी विंचरतात की नाही असं वाटावं एव्हढा गलिच्छ वाटतो! जटा दिसतात! Lol

वत्सला मलाही वाटतंय तिला म्हणजे सानिकाला आदी आवडला आहे आणि ती व्हिलन होईल नंतर म्हणजे त्याला मिळवण्यासाठी काहीतरी करेल.

अंजु +1

ललिता प्रीती, मी मधून मधून बघते पण त्याने फार काही फरक पडत नाही. कथानक कळत रहातं. अर्थात न बघणं उत्तमच Lol कारण इतर अनेक मालिकांसारखीच पांचट मालिका आहे ही पण!

दुर्दवाने उत्तम कलाकार सगळे वाया घालवलेत, खरतर १० वर्शानी पुन्हा भेटलेली जोडी याची फुलणारी लव्हस्टोरी अशी मस्त थिम हाताशी असताना एखाद्या कसलेल्या लेखकाने ट्युलिपचे मळे फुलवले असते पण इथे रोहिणि निनावे ताइनी अक्षरक्षः कचरा केलाय.

निनावे बाई फक्त पैशांसाठी लिखाण करतात... प्रेक्षकांशी काही देणंघेणं नसतं त्यांना. प्रोड्युसर, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ज्ञ यांच्यासहित स्पॉटबॉईज पण खूप मानतात त्यांना... त्या लेखिका असणार्‍या सर्वच सिरियल्स कमीत कमी १००० भाग तरी पूर्ण करतातच. १००० भागांसाठी त्यात कमीत कमी १००० रुपयांवर काम करणार्‍या माणसालाही मालिका संपेपर्यंत १०-१२ लाख मिळतात.. मग प्रत्येक एपिसोडाचे २,३,४,५ ते २०-३० हजार रेट असणारे आपोआप करोडपती होतात. शिवाय कमीतकमी २-३ वर्षं सतत प्रेक्षकांसमोर आल्याने मार्केट व्हॅल्यु वाढते ते वेगळेच... मग मु.ब. किंवा ऊ.का. सारखे ठोकळेबाज अभिनय करणार्‍यांना वीग लाऊनही म्हातारपणापर्यंत कामं मिळत रहातात.

एक शर्मिला राजाराम शिंदे अन ती वैद्य सोडली तर इतर कुणाला अभिनय जमतो का हे भिंग लाऊन बघितलं तरीही ओळखणं मुश्किल आहे. सगळ्यांचे हावभाव पहिल्या एपिसोड पासून सेम..!!

अश्विनी चा अभिनय ( आणि नारदमुनी सारखी व्यक्तिरेखेला शोभणारी केशभूषा ) छान आहे. मनू चा चेहेरा कायम रडक्या स्मायली शी मिळताजुळता वाटतो. मठठ्पणात मल्हार ला शोभते अगदी. साधी बातमी सांगायची धमक नाही आणि निघाली एकटीने मूल वाढवायला , बरं त्याला खायला काय घालणार स्वतः कमवत नसताना याचा विचार नाहीच! मल्हारची आई आणि आजी दोघी आवडतात मला . आदि - मीरा असताना वाजणार पार्श्वसंगीत छान आहे ( अमांच्या मुळे जरा लक्श गेलं !)

Pages