सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

अश्विनीमुळे मालिका पुढे सरकतेय नाहीतर या लोकांनी मनूला नववा महिना लागला असता तरी सांगितलं नसत. आदी एका मुलीबरोबर दिसला तर काय झालं, तो मुलींशी बोलू शकत नाही का. सानिका लगेच ब्रेकअप झालंय वगैरे विचार करते, अरे तीच एक मुलगी आहे का आदीच्या आयुष्यात, कलीग, मैत्रिणी कोणीच ईतर बायका नसतात का तेही तो एक स्त्रीरोगतज्ज्ञ असताना. मनुमुळे मान खाली घालावी लागली वगैरे जसा दुसरा काहीच पर्याय नाहीये. खरंच १८५७ सालची विचारसरणी आहे.

अश्विनीमुळे मालिका पुढे सरकतेय नाहीतर या लोकांनी मनूला नववा महिना लागला असता तरी सांगितलं नसत. . >>> +1000
शर्मिला फार छान दिसतेय. मानबा मधल्या साखरपाकातल्या रोलपेक्षा हा बरा आहे.

या मालिकेचा स्क्रिन प्ले फक्त रोहिणी निनावे चा आहे . डायलॉग मुग्धा गोडबोले हिचे आहेत. आजकाल निनावे मॅडम जनरली स्क्रिन प्ले च फक्त करतात . डायलॉग दुसऱ्याचे च असतात. कथा कोणाची असतें ते माहीत नाही .

ही तर बेकार आहेच ,पण कुठली मालिका हातात तरी धरण्या लायक आहे ?>>> त्यातल्या त्यात बरी म्हणजे राजा राणीची जोडी, म्हणजे त्यातही बाकी दळण आहेच पण मुख्य राजा-राणीची केमिस्ट्री अगदी बिलिव्हेबल आहे. बाकीही सन्जू पोलिस बनते त्यात तिला दिर्, मावससासु,नवरा भरपुर सपोर्ट करतो हे खुप छान आणि प्रेरणादायक दाखवलय.

मी याचा फक्त विकली रिव्यू बघू की काय विचार करतेय.

ती सानिका काय नी तो निखिल काय, किती वाढवत बसणार आहेत. शंभर भाग न करता वर्षानुवर्ष चालवायची आहे का.

आदि मीरा, मल्हार मनू सर्वानी पळून जाऊन लग्न करा. बास झालं.

यांच्या दवाखान्यात फक्त डॉक्टर्स भरलेत काय..? जे फक्त लफडी करण्यासाठी पगार घेतायत..?? यांच्या हॉस्पिटल मधे कधीच पेशंट दिसत नाहीत.. कुणाचे ओपरेशन नाही.. फक्त तर एक दिवस ती कुमारी माता बनायला निघालेली रडकी मनू अ‍ॅक्सिडेंट झाल्यामुळे अ‍ॅडमिट झालेली दिसली होती.

त्यांनी सध्या पैसे कमवण्यापेक्षा घरच्यांचा आनंद,सुख,समाधान,शांती यावर फोकस केलं आहे हो!

त्यातल्या त्यात बरी म्हणजे राजा राणीची जोडी, म्हणजे त्यातही बाकी दळण आहेच पण मुख्य राजा-राणीची केमिस्ट्री अगदी बिलिव्हेबल आहे. बाकीही सन्जू पोलिस बनते त्यात तिला दिर्, मावससासु,नवरा भरपुर सपोर्ट करतो हे खुप छान आणि प्रेरणादायक दाखवलय. >> त्यातल्यात्यात बरी हीच आहे. कथानक, डायलॉग, कपडे, घर आणि इतर ही सगळं बरंच बरं जुळून आलं आहे.

शर्मिला राजाराम सर्वांना कामाला लावतेय वाटलं आज.... मज्जा आहे. अश्विनी..! मस्त कॅरॅक्टर मिळवलं तिनं या मालिकेत. मु.ब. अन ऊ.का. च्या मार्केट व्हॅल्युचा हिलाच फायदा होइल की काय असं वाटलं...

अंजू यांची सूचना मनावर घेतली मनू आणि मल्हारने. आता लग्न होतं का ते बघायचं. आदी म्हणतो आजी आजोबा सांभाळतील बाळाला, अरे कोणते आजी आजोबा. आजी आजोबांना परस्पर गृहीत धरून हा भाच्याचं लग्न लावायला निघालाय. त्यांनी आधीच मल्हार नावाचं बाळ सांभाळलं आहे, आता मल्हारचं बाळ सांभाळतील Lol

हाहाहा.

बाय द वे सानिका प्रकरण कुठपर्यंत आलं आणि समजलं का मिराला आणि ते दुसरे निखिलसाहेब काय म्हणतायेत.

निखिल काल मीरासाठी अंगठी घेऊन गेला होता. तिने सांगितले त्याला की ती विचार करेल. रात्री आठला मला बघायला मिळत नाही आणि दुपारी दोनलाही. रात्री बाराला दाखवत नाहीत आता.

बरसातचा आठ मिनिटांचा भाग बघितला. अश्विनी चांगलं करते की दोघांचे लग्न लावते ते. ते आदि मीरा लग्नाचे दळण दळत बसतात त्यापेक्षा भारीच की हे. लग्न झालं असेल तर अश्विनीसाठी खास टाळ्या, तिचा उद्देश काहीही असो, योग्य निर्णय.

ती मध्येच मैत्रीण कडमडली आहे, आज काय ते समजेल मला.

अश्विनीने भारी मजा आणली. हे म्हातारे हिरो हिरवीन बिन लग्नाचे राहून इतरांना पायात पाय घालून पाडायला बघतात हे नाही म्हटलं तरी बोचत होतच. आता अश्विनीने बाजी मारून ह्यांना खिंडीत गाठलं आहे.. इथून पुढे जाम मजा येणार.. दोन्ही घराच्या म्हातारा - म्हातर्यांना काय एक्स्प्रेशन देता येतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. मु. ब. अन् उ.का. दोघेही नेहमीच्या मक्खपणात मीरा - मल्हारच्या लग्नात बावाचळल्या सारखा अभिनय करत होते. नाही म्हणायला ती डॉक्टरीण अन् अश्विनी काय ते खरा अभिनय करत होत्या. शर्मिला राजाराम शिंदेचा कालचा अभिनय बघून हसू आवरत नव्हते Biggrin

शर्मिला पहिल्या सिरियलपासून उत्तम अभिनय करते, स्टार प्रवाह वर एक सिरियल खूप चालली, ती जुई गडकरी नायिका होती, रडतराऊत नुसती. ही व्हिलन होती पण जबरदस्त केलं हिने. बहुतेक पुढचं पाऊल नाव होतं त्या सिरियलचे. हर्षदा खानविलकरची होती.

त्या चला हवा येऊ द्या मधे पण हिचे स्किट्स चांगले करायची... पण ग्रुपिजम मुळे त्या उमेश जगतापला दिलं बक्षिस. बिचारा अजुनही तिथंच साड्या नेसून कामं करतोय अन ही शर्मिला तिथुन बाहेर पडून चांगली कामे मिळवतेय. स्टार प्रवाहच्या शिरेलीत होती हे माहित नव्हते.

मग अश्विनी सौरभला घेऊन पळून जाईल तिथून. आधीच दोन नंदांना घरातून बाहेर कसे घालवायचे यासाठी प्रयत्न करत होती. त्यात एक लग्नाचा जावई आणि दुसरा लिव्ह इन वाला(मुक्ताचे प्रेम आहे पण लग्न करण्या इतपत विश्वास नाही म्हणून) जावई घरात आले तर मज्जाच मज्जा!

Pages