सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटलं मल्हार मनु चे बाळ जिवंत असेल पण तसं काही दाखवलेले दिसत नाहीये. एक प्रोमो बघितला त्यावरून वाटतंय. तो अमोल अति बिझी, ती मधुरा अति बिझी. ह्यांना पाच महिन्यात एवढं कामच काम मिळालं, छान छान.

एकत्र कुटुंब न दाखवल्यास शिरेली चालणं अवघड आहे. बाकी बोर्ड ओफ डिरेक्टरसमध्ये प्रत्येक शिरेल घुसली.

Pages