Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.
या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरेच्चा, मालिका संपवायचा
अरेच्चा, मालिका संपवायचा विचार बदलला की काय निर्मात्याचा.
नशीब गंगेत घोड्म न्हालं
नशीब गंगेत घोड्म न्हालं एकदाचं. आता मीराच त्याची आधीची गर्लफ्रेंड होती ह्यावरुन नवीन ड्रामा लावून धरतील. होते ते दोघे एकमेकांचे पूर्वीचे बॉय-गर्लफ्रेंड. मग? आता काय त्याचं? त्याने बाकीच्यांना काय फरक पडतो?
खरंतर मीराबाई सांगत होत्या की
खरंतर मीराबाई सांगत होत्या की आपण सांगुया तुझ्या आईला, आदि पण काय. सांगायला हवं होतं. मग हडळ, रक्तपिपासू (हे असले अतिरेकी शब्द वापरलेले मला अजिबात आवडले नव्हते) ते संत मीराबाई कसं घेतलं असते आईने, बघायला मजा आली असती.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=WvKEgtub3WM
नवीन प्रोमो. मीराने चिठ्ठी पाठवलेली असते ना, त्यांच्यापर्यन्त पोचली नाही तर ती काय करणार, तिचा खरंतर दोष नव्हता. एपिसोडस वाढवा नाटक.
चिठ्ठी कशाला पाठवत बसतात?
चिठ्ठी कशाला पाठवत बसतात? व्हाट्सप मेसेज वा व्हाट्स्प ऑडिओ पाठवाना. कोण पेन हातात धरतं हल्ली?
अरे ते कन्फुजन वाढवायला नको
अरे ते कन्फुजन वाढवायला नको का, अजुनही सिरीयल जुन्या जमान्यात आहे.
२-३ दिवसापुर्वीच्या
२-३ दिवसापुर्वीच्या एपिसोडमधली एक गोष्ट आवडली की निखिल मीरा-आदिचे लग्न मोडण्यासाठी त्यांचे जुने फोटो वापरणार आहे हे त्याच्या आईला कळते तेव्हा ती ते फोटो गुपचुप डिलीट करते. आणि निखिल नंतर चीडचीड करत असताना मीच डिलीट केले आहेत हे सांगते, तू अत्यंत खालच्या दर्जाचे वागला आहेस आणि त्यामुळे तू मीराला मैत्रिण म्हणून कायमचे गमावले आहेस हे ही सुनावते.
एकंदरीत पोरांचे अती लाड करणार्या किंवा चुकीच्या प्रसंगातही मुग गिळून बसणार्या टिपीकल फिल्मी आईसारखी वागत नाही.
बाकी मीराचा लग्नातला शालू, इतरही हळद-संगिताचे पोशाख बेक्कार होते, तिला एकही कलर, कट सुट होत नव्हता. तिची, आदीची आई वगैरेंच्या साड्या सुंदर होत्या. मितालीच्या साड्या आणि पूर्ण लूक लग्नादरम्यान मस्त होता. मीराची वहिनीही बरी दिसत होती ज्या काय साड्या होत्या त्यात.
काय वाढवतायत सिरियल ? दोघे ही
काय वाढवतायत सिरियल ? दोघे ही डॉक्टर आहेत , चांगलं कमावतायत , घर भाड्याने घ्यायचं आणि राहायचं मस्त हकानाका ..पण अस झालं तर सिरियल लांबणार कशी ?
ब्रेकिंग न्युज:
ब्रेकिंग न्युज:
महाराष्ट्र सरकारची अजूनही बरसात आहे मालिकेवर बंदी.
मालिकेमुळे अवकाळी पाऊस पडल्याचा सरकारचा 'अजब' दावा!

नानबा
नानबा
नानबा
नानबा

एक प्रोमो बघितला, मुक्ता
नानबा हाहाहा.
एक प्रोमो बघितला, मुक्ता लग्नानंतर अजून एजेड वाटायला लागली आहे.
कदचित ही खूप वर्षं चालणारी
कदचित ही खूप वर्षं चालणारी शिरेल असावी म्हणुन एजेड दिसणारी मुबो निवडली असावी. म्हटलं तर विग घालुन तरूण.. किंवा जख्ख म्हातारी दिसावी म्हणुन पांढर्या केसांछा विग.. अन हे रनिंग टाईम सिचुएशन्स साठी ती आहे तशी चाळीशीतली आहेच त्यामुळे फार काही टेंशन्स नाहीत. या वयात तिला तसाही इतर कोणता चॅनेल लीड रोल ऑफर करणर नाही.. आरामात ८-१० वर्षं बरसात चालूच राहिल. अगदी मनुबाळाचं लग्न अश्विनी बाळाशी होईपर्यंत शिरेल चालु राहील बहुदा..!!
तुका म्हणे उगी रहावे जे जे
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे!
या वयात तिला तसाही इतर कोणता
या वयात तिला तसाही इतर कोणता चॅनेल लीड रोल ऑफर करणर नाही..>>>>> का नाही? रुद्रम सारखे रोल्स ती अजूनही करु शकते. फक्त आता ह्या सास-बहू टाईप रडक्या रोलमध्ये ती शोभत नाही. त्याच कारणासाठी मला तिची ' एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही आवडली नाही. ओव्हरहाईप्ड सिरियल होती ती.
रुद्रम छान सिरीयल होती. आम्ही
रुद्रम छान सिरीयल होती. आम्ही पण आवडीने पाहिली. पण तुम्ही म्हणता तसं डेली सोप मध्ये आता मुब ची सद्दी नक्कीच संपली आहे.
डेली सोप मध्ये हव्या असणाऱ्या व्यक्तीमत्वात अन् भिनयालाा देखील प्रचंड मर्यादा जाणवत आहेत
काहीही बावळटपणा चालू आहे.
काहीही बावळटपणा चालू आहे. कसली थोराड आणि वयाने मोठी दिसतेय मुब
लग्नानंतरचा एक प्रोमो बघितला.
लग्नानंतरचा एक प्रोमो बघितला. 2-3 मुलांची आई आणि उकाची ताई वाटते आहे अगदी! आणि तिचे एव्हढे क्लोज अपस का घेतात?
अखेरीस कथा नेहमीच्या घरगुती
अखेरीस कथा नेहमीच्या घरगुती छळाच्या मार्गावर येऊन पोहोचली तर? आता तर अजिबातच बघू नये असं वाटायला लागलंय. अबोला, धुसफुस वगैरे गोष्टींमधे किती दिवस अडकून पडणार आहेत लोक्स? तेच तेच दाखवायचा कंटाळा कसा नाही येत? निखिलला पण उगाच व्हिलन करून ठेवलंय. आता सगळं ताण ताण ताणून, अंत पाहून फायनली सगळं सुरळीत करतील... मे बी अजून दोनेकशे वर्षांनी. तोवर रडारडीची बरसात चालूच ठेवतील.
) मग निखिल पुन्हा मुबशी लग्न करू पाहणार आणि मग अगदी आयत्यावेळी काहीतरी घडून मुब उका एकत्र येणार वगैरे. इतकं सगळं सहन करायची माझ्यात तरी हिंमत नाही. वेळेत पाहणं थांबवणं उत्तम.
या पॉईंटला मला 'तू तिथे मी' नामक नतद्रष्ट मालिकेची आठवण आली. त्यात नाही का... तिला छळलं, मग त्यांना वेगळं केलं, असह्य होईतो त्या प्रियाची कारस्थानं दाखवली आणि मग पुन्हा ७ वर्षांनी ते एकत्र येतात या नोटवर आपला छळ थांबवला. तसंच काहीसं इथे तर करणार नाहीत ना अशी धास्ती वाटते. म्हणजे मुब आणि उका वेगळे होणार (बरसात चालूच
पाहणार्या लोकांनी प्लीज इथे अधेमधे अपडेट्स टाकत रहा. काही वेगळं घडत असेल तर तेवढं पाहीन मी.
आता कपट कारस्थान मधुरा आणि
आता कपट कारस्थान मधुरा आणि आदीबाबा मिळून करणार असं दिसतंय. आणखीन काही वर्ष तर कुठेच जात नाही ही चक्की.
आता कपट कारस्थान मधुरा आणि
आता कपट कारस्थान मधुरा आणि आदीबाबा मिळून करणार असं दिसतंय >>> अरे बापरे! या वळणाला आल्या पण गोष्टी इतक्यात? अवघड आहे
एक छोटी क्लिप बघितली त्यात
एक छोटी क्लिप बघितली त्यात आदीबाबा मधुराला सांगतात की त्यांनी मुबला माफ केलेलं नाहीये आणि मग मधुरा व्हिलन स्टाईल हसताना दाखवली आहे.
मुळात ह्या दोघांचं १० वर्षांपूवी अफेयर होतं आणि आता ह्यांनी लग्न केलंय ह्याचा इशू करण्यासारखं मटेरियल मुळातच नाहीये. त्यामुळे सिरियल जेव्हा सहन न होऊन जीव टाकेल तेव्हा टाकेल.
ळात ह्या दोघांचं १०
ळात ह्या दोघांचं १० वर्षांपूवी अफेयर होतं आणि आता ह्यांनी लग्न केलंय ह्याचा इशू करण्यासारखं मटेरियल मुळातच नाहीये.>>> ते आहेच पण रोहिणि निनावे नामक मठ्ठ लेखक बाइला हे कुठुन कळणार, ह्याच्यापेक्षा उत्तम स्क्रिप्ट माबोकर लिहु शकतिल.
वाइट फक्त याच वाटत की चान्गले कलाकार असल्या तिनपाट सिरियल्स मधे काम करुन स्वत:ची इमेज का खराब करुन घेतात.
इथे थोडे असहनिय झालं म्हणून
इथे थोडे असहनिय झालं म्हणून झीम ला येऊ कशी तशी बघायला गेलो तर तिकडे नुसता राडा...
सगळीकडे तीच रडकथा आहे. कुसुम
सगळीकडे तीच रडकथा आहे. कुसुम म्हणून एक दिसली सोनी मराठी वरच. तिथेही तोच प्रकार. मुक्ता बर्वे लाजते तेव्हा कृत्रीम दिसतं. तिचं मन नक्कीच उडलेलं असणार मालिकेतुन.
हिन्दी कुसुम खूप वर्षांपूर्वी
हिन्दी कुसुम खूप वर्षांपूर्वी आलेली, त्याची मराठी आवृत्ती असणार, सेम चॅनेल म्हणून वाटतंय. अजिबात बघू नका. हिच्या मैत्रिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे अफेअर वगैरे असली स्टोरी. ही मराठी कुसुम दिसायला मात्र छान आहे, शिवानी बावकर.
हो नं... अन बालाजी
हो नं... अन बालाजी टेलिफिल्म्ची निर्मिती..!! मराठीत हा ब्रँड पहिल्यांदाच आलाय असं वाटतंय.
पण हे लोक्स घरात राहतातच का?
पण हे लोक्स घरात राहतातच का? कुठे पण शिफ्ट व्हावं मस्त जगावं काम करावं तर ते नाही. ह्यांचा रोमान्स ब्घवत नाही अगदी.
हॉस्पिटलात राहिले तरी चालेल
हॉस्पिटलात राहिले तरी चालेल खरंतर.. पेशंट तसेही नसतातच तिथं...!!
हॉस्पिटलात राहिले तरी चालेल
हॉस्पिटलात राहिले तरी चालेल खरंतर.. पेशंट तसेही नसतातच तिथं...!!>> व्या ख्ह्या विक्ख्ह्हिए वुख्हू.
खरंय. घरचाच गायनाक आहे लवकरच जुळे होईल. मनु नंतर मीरा ची डिलिव्हरी.
त्या मधुराला एक दोनच ड्रेस आहेत त्यात हिरवी ओढणी मजार वरील चाद र ओढायची ती चोरुन आणल्यावाणी वाट्ते.
Pages