सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

20 डिसेंबर पासून सोनी मराठी वर रात्री 10 वाजता, तुमची मुलगी काय करते नावाची मालिका सुरु झाली आहे. कथानक वेगवान आहे.. शाळकरी, कॉलेज गोइन्ग मुल आणि ड्रग्ज़ यावर आहे. रूद्रम चे दिग्दर्शक भीमराव मुडे याचे पण direction करत आहेत. वेगाने एक एक पदर उलगडत जातोय. सगळ्यांचा उत्तम अभिनय आणि मिस्ट्री यामुळे मला आवडतेय मालिका. कोणी बघतय का???

दुधाडेची सहकारी ईतकी मूर्ख दाखवली आहे की बघण्याचा उत्साहच गेला. पोलीस ईतके मूर्ख असतात का. सगळीकडे संशय पेरून ठेवलाय. ठराविक भागाची आहे की पाणी घालणार.
बरसातमध्ये फॅमिली ड्रामा सुरु आहे. आदर्श सून, बहीण विरुद्ध नणंद, सासरे. दोन डॉक्टर स्वतः चे घर घेण्याइतके कमवत नाहीत का. अगदीच लाचार आहेत. घर आणि क्लिनिक दोन्हीसाठी दुसऱ्यावर अवलंबून. वरून स्वाभिमान तर ईतका की प्रत्येक बाबतीत लुडबुड. चार पेशंट तपासून गप गिळून पडतील तर तेही नाही. सानिकाचे वडील अजून प्रयत्नात आहेत. शिळा का असेना पण त्यांना आदीच हवाय जावई म्हणुन. तिकडे निखिलही मीराच्या आशेवर आहे. मुख्य पात्र दुसरं चांगलं काम मिळालं की सोडतील. तोपर्यंत असेच चालू राहणार.

दुधाडे पण overacting करतोय असं वाटलं मला, एक आठ मिनिटांचा एपिसोड आणि दोन तीन छोटे सीन्स बघून. तो उत्तम अभिनय करणारा आहे खरंतर, पण हल्ली त्याच्या भूमिका बघून natural नाही वाटत.

मला मधुरा वेलणकर आवडली. किलवर म्हणून कोणी drugs मधला मेन मला तिचा नवरा आहे की काय वाटायला लागलं आहे, हाहाहा. नाहीतर शेवटी कोणीतरी भलताच दाखवतील. नाहीतर दुधाडे असेल, हाहाहा.

बरसात मध्ये कधीतरी 8 मिनिटांचे बघितलं. ते तीन डॉक्टर्स आहेत त्यांना उद्योगधंदा नाहीये, व्हिलन म्हणून एकत्र आलेत, मीराविरोधात. आदिबाबा, सानिकाबाबा आणि निखिल.

त्या मुलीच्या सिरियलचे प्रोमोज मी बघणार नाही, एक प्रोमो बघून मला आता नयना आपटेवर संशय आला, मधुराची आई आहे बहुतेक ती, हाहाहा. किती संशयी मन ते.

ह्या मालिकेचा नाद सगळ्यांनी सोडलेला दिसतोय. Wink पण चालू आहे अजूनही. आता आदि मिरा डॉ. पाठकांच्या हॉस्पिटलला जॉईन झाले आहेत आणि मालिका चालू रहावी म्हणून तिकडे डॉ. पाठक आणि डॉ. वैशंपायन पॉलिटिक्स पॉलिटिक्स खेळून मिराला त्रास देतायत.
घरच्या फ्रंटवर मनूचं बाळ गेलं आहे आणि सगळी जनता आदि आणि मीराला जबाबदार ठरवत आहे ह्याकरता.
युट्युबवर आता एपिसोड्स अपलोड होत नाहीत पूर्वी सारखे. त्यांनीही नाद सोडला आहे. बरंच आहे.

मी मागे खूप महिन्यांपुर्वी एकदा म्हटलं होतं की मनुचं बाळ जाऊ शकतं.... अन खरंच गेलं..! Uhoh (कोणीतरी माझ्यावर जाम ओरडलं होतं की मनुच्या बाळाच्या जीवावर का उठलात म्हणुन.. पण काय करणार.. एकदा का लेखकाच्या लेखणीचा अंदाज आला की कोणीही सांगु शकतो यांचं भविष्य..!!)

आता सांगु का काय होईल पुढं..? आता मनू वेडी होईल... तिचं वेड बरं करायला मीरा प्रेग्नंट राहून जन्मलेलं बाळ मनुला देईल... (परंतू, इथे मीराला जुळं राहिलं तर प्रेक्षकांच्या दृष्टीने फार बरं होईल... म्हणजे मीराचा त्याग थोडा जस्टिफाय होईल अन मालिका संपेल..!!)

हो ना मला ते राव साहेबच आ ठवले. पोरांना मारून काय मनो रंजन करतात.

तो मल्हार तर मला एक कानफटीत मारून आर्मीत जवान म्हणून पाठवावा दहा वर्शे असेच वाट्ते. आधी ऑपरेशन करुन घ्यावे नसबंदीचे मग हाकलावे. अरे अजून एम बी ए चे चिट्ठी हातात नाही. पण आय हॅव बिग ड्रीम्स त्यासाठी पैसे खूप लागतील. ते कुठून? लग्न पोर उद्योग झालाच आहे.
वर आई काय म्हणते अरे बाबांनी मला पण आत्ताच खूप सपोर्ट केला आहे तर तू परत आता पैसे मागू नकोस. अगं मग तू तरी का मागितलेस. टेलरिन्ग दुकान चालवून कमावायचे होते ना पैसे.

हिचे सिल्क शिफॉन जे अर्धे जळले ते बापानीच खरेदी करून दीले वाट्ते. डिस्गस्टिन्ग वुमन. पन्नाशी आली आता हिची. पण आईबाबांच्या जिवावर जगते.! तो जाड्या नवरा बिन कामाचा.

मनूचे बाळ कट वैशंपायन चा च असे ल. त्याने डॉक्टर पाठवला त्याने आत काय केले काय माहि ते.

मीराचे आई बाप एक घन चक्कर आहेत.

बाळ गेलं?? हे कधी झालं
काल आमच्या घरचे जो एपिसोड बघत होते त्यात ती त्या ठोंब्याला म्हणत होती घर विकून एक कोटी येतील आणि मीरा ला एककोटी मिळतील ते ही ती आपल्यालाच देईल (घरचाच माल आहे हिच्या) मग त्यात तू स्टार्ट अप कर
याला अजून चड्डीची नाडी बांधता येईना

या अकख्या घरात कितीही विचित्र वाटले तरी बाबा च बरे आहेत निदान अकख्या घरादाराला पोसत तरी आहेत
ते सोडून कोणालाही चार पैसे कमवायची अक्कल नाही
फुकटचे खाऊन वर यांच्या अक्कलहुशाऱ्या

आणि ते 25 हजार घेतल्याचा सिन तर इतका बाळबोध होता की लेखकाच्या डोक्यावर जाऊन ठणकन काहीतरी हणाव इतका संताप झाला

कुठल्या भांगेच्या नशेत हे लिहितात

हे असले शॉट्स बहुतेक ऐनवेळी कोणी सुट्टी घेतली (इथे मला त्या ऊका ने ऐनवेळी सुट्टॅ घेतल्यामुळॅ हा बाळबोध शॉट घ्यावा लागला असण्याची शक्यता वाटतेय..!) की असे बिनडोक शॉट्स टाकून शिरेल पुढे पळवत असावेत. प्रेक्षकांना अशा शॉट्स मधुन भांग पाजली की तेही पुढील काही भाग भांगेच्या नशेत लोळत पडून एपिसोड बघत बसतात हे शिरेल वाल्यांना ठाऊक असावे.

दळिद्र हो दळिद्र!
(संदर्भ: रावसाहेब)

चांगल्या कल्पना, रिअलिस्टिक संवाद आणि प्रसंग या सगळ्या गोष्टींचं मजबूत दारिद्र्य.

एवढे डॉक्टर लोक आहेत कुटुंबात, एकही जण डोक्याने नॉर्मल
नाही. आणि बहुतेक सगळे रिकामे दिसतात.

कोणी पेशंट सुद्धा फिरकत नाहीत यांच्या दवाखान्यात. या बिनडोकांना अडचणित आणायचं असेल तेव्हाच कधीतरी कोणी पेशंट टपकतो... फार फार तर यांच्यापैकीच कोणाला वैद्यकिय गरज लागली तर हॉस्पिटल कार्यरत होतं.. इतर वेळी शुकशुकाट..!!!

नाय आमच्या घरी आई वडील बघतात
जेवढा वेळ असतो तेवढ्या ओझरट्या वेळात बघावीच लागते
आणि तिथे बसून टीका केली किंवा हसलो तर हुसकावून लावतात

पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून मग इथं येऊन भडस काढावी लागते

आणि तिथे बसून टीका केली किंवा हसलो तर हुसकावून लावतात>> ++++११११११

मी तर जाम पिडतो ही सिरियल बघणार्‍या माझ्या आई अन बायकोला. Proud

संत मीराबाई आणि आदीराज समोरच्या व्हिलन टीममधे अजुन काही व्हिलन्सची भर पडलेली दिसली, मनु आणि मल्हार. काल साडेआठ मिनिटांचा शॉट बघितला.

मला असं वाटतंय, बाळ गेलं नसेल. मोठे दोन व्हिलन आणि मल्हारमाता (कदाचित ही नसेलही त्यात) यांनी मिळून गायब केलं असणार, मनु आणि संतबाई यांना पाठक घरातून वजा करण्यासाठी.

हे अशासाठी वाटतंय, आदीला दुसरीकडे गुंतवुन आपल्या मर्जीतल्या डॉक्टरांकडून सिझर करुन घेतलं.

ती मनु कित्ती तोंड उचकटायला लागलीय संतबाईवर.

मनूचे बाळ कट वैशंपायन चा च असे ल. त्याने डॉक्टर पाठवला त्याने आत काय केले काय माहि ते. >>> अगदी अगदी. हेच मनात आलं, वर लिहीलं. तुमची कमेंट आत्ता वाचली.

भ्रूण साधारण किती आठवड्यांचा असेल तर तो असा जगू शकेल..? मनुचं पोट पण दिसत नव्हतं... फार फार तर ३-४ महिन्यांची प्रेग्नंट असेल.

फक्त मीराच नाही, दोघी बहीणी नको आहेत त्यांना खरंतर (मल्हारमाता मागे बोलत होतीना). बाळ गेल्यावर मनु मल्हारला वेगळं करता येईल वाटत असेल.

त्या आदी आणि मीराने सरळ सगळं सोडून कुठेतरी गावात जाऊन प्रॅक्टीस करावी.

इथल्याच एका सिरीयलचा काल आठ मिनिटं बघितला. तो मधुरा वेलणकरचा सिरीयलमधला नवरा गॉन केस वाटतोय, जुगार बिगार खेळत असतो. एवढा तो आमदार का मिनिस्टर माझा माणूस म्हणतो आणि पंधरा लाख देत नाही त्याला. तिचे वडील गुन्हेगार असतात, आई संन्यासी असते, मुलीला कर्जतला पार्टीला जायचंय, तिथे ड्र्ग्ज असणार आहे. शाळेत पण ड्र्ग्ज कसं पोचतं, त्यात मला तर म वे च्या सहशिक्षक मित्राचा संशय येतोय (मागे एका शॉटवरुन). तो इन्स्पेक्टर साध्या संशयावरुन कोणालाही बदडतो पुरावे नसताना आणि तोंडघशी पडतो, त्याची बॉस मस्त वाटली, काम छान करते. हे सर्व कालचा थोडा भाग आणि मधे मधे काही प्रोमोज बघुन लिहिलं. यात एक बेडरीडन म्हातारी दाखवली आहे, बहुतेक म वे च्या नवऱ्याच्या gf ची आई असावी ती गीतांजली कुलकर्णी आहे का, असेल तर रोल साधासुधा नसेल. मुख्य माणूस मंत्री का आमदार तो असेल तर म वे चे पूर्ण कुटुंब अडकवले जातंय ह्या केसमध्ये. म वे ने फार सुंदर काम केलंय. मुलीची भूमिका दीप्ती भागवतच्या मुलीने केलिय, दीप्ती सध्या येसुबाई करतेय ताराराणी मध्ये. हयात म वे मुलीला शोधायला बाहेर पडेल तेव्हा वेग येईल, त्यानंतर बघायला हवी. आत्ता तशी बोअर होतेय.

याच चॅनेलवरची ताराराणीपण आठ मिनिटं बघितली, स्वरदा छान काम करते. यतीन कार्येकर बोअर वाटतोय, मला आवडतो तो तरी. राजाराम तेजस्वी दिसतोय, संताजी धनाजी मधला एक पण जाम तेजस्वी दाखवलाय.

हुश्श झालं लिहून सोनीचे.

आला...आला... हॉस्पिटल मधे चौथा पेशंट आला... शिरेल सुरू झाल्यापासुन हे दुसरं हॉस्पिटल अन चौथा पेशंट..!! खरंच.. भाग्य उजळलं..!! बहुतेक, माठक हॉस्पिटल मधे आठवड्यातुन अर्धा-एक पेशंट येतात वाटतं..!!
आधीच्या हॉस्पिटलात कधीच कोणी यायचं नाही. एकदा मनूचा अपघात झाला तेव्हा ती अन एकदा हनिमुनला गेल्यावर फुड पॉयझनिंग झाल्यावर (किवीचा ज्युस पिला म्हणुन..!) उकाला अ‍ॅडमिट केलं असे दोन घरचेच पेशंट मी स्वडोळ्याने पाहिले होते. त्यानंतर एक डोळेवाला पेशंट आला अन त्यास उपचार देता देता मुबची डॉक्टरकी सर्वांना पुरती समजली.. त्या एकमेव पेशंटामुळे मुब अन उका ते हॉस्पिटल सोडुन माठकांच्या घरच्याच हॉस्पिटल मधे येतात काय अन एका महिन्यात ३ पेशंट (बाहेरचे) मिळतात काय..!!!!

आजच्या साडेआठ मिनिटांच्या भागात मनू जास्तच आगाऊ वाटली. आई बाबांना घर विकण्याची जबरदस्ती करत होती. मूल गेल्याचं फार दु:ख दिसलं नाही. बाबांना वाटेल तसं बोलून, दबाव टाकून घर विकून पैसे द्या सांगत होती. ही कोण सांगणार किंवा कोणाही मुलांना आईबाबांच्या कष्टाचे घर विकण्यासाठी दबाव टाकण्याचा काय अधिकार आहे. वरून प्रॅक्टिकल विचार करा सांगत होती. मल्हारला settled माहेरच्या पैशाने करणार ही. तिच्या आईने तिला प्रॅक्टिकल विचार तिने कसा केला नाही हे मस्त सुनावले.

पुढे काय झालं कोणी बघितलं असेल तर लिहा.

हो मी आत्ताच युट्युब वर पाहिला हा भाग. छान आहे. मला वाट्ते पुण्यात सधन कुटुंबात हा वाद बरेच ठिकाणी चालू अस्णार कारण कर्वे प्रभात भांडारकर रोड वर भरपूर प्रॉपर्टी जुने दगडी बंगले आता रि डेव्हलप होत आहेत. फेसबुक वर आठवणीतील पुणे गृप वर भावुक लोक फोटो टाकत असतात.

पण जर ज्येना चा मनसुबा नसेल तर त्यांना कोणी फोर्स करू शकत नाही. मनूचे इतकी वर्श लाड केले ते भोवत आहे. आई ने छान सुनवले.
भाउ जरा नाकर्ता टाइप आहे. जॉब नाही. सून घर बसवायला च आली आहे असे वाट्ते आहे. घर गेले तर म्हातारा म्हातारी कुठे जातील का फ्लॅट मिळेल ?

भाउ जरा नाकर्ता टाइप आहे. जॉब नाही. >>+++१११
सून घर बसवायला च आली आहे असे वाट्ते आहे.>>>++++१११११११

घर गेले तर म्हातारा म्हातारी कुठे जातील का फ्लॅट मिळेल ?>> देसाईंच्या घरातले वाद बघता ते ज्या भागात रहात असावेत त्या भागात स्वच्छंदी जीवन जगण्यात आयुष्य घालवलेल्या आई-बापांची मुलं बरेचदा अशीच निघतात. एखादी संतती घोकंपट्टी करून चांगल्या कॉलेजातून चांगली डिग्री घेते परंतू वास्तवाचं भान नसल्यामुळे कुणाकडुनही पिळून निघते.. उरलेल्या संतती आई-बापांच्या स्वच्छंदी जीवन जगण्याच्या हट्टापायी दुर्लक्ष झाल्याने वाया जातात. मग अशा मठ्ठ वारसांसाठी हे स्वच्छंदी आई-बाप म्हणजे निरुपयोगी वस्तू ठरते.. फ्लॅट-बिट काही मिळत नाही त्यांना. सरळ वृद्धाश्रमात रवानगी केली जाते. तर तिकडे कावेबाज बिल्डरांना बंगले विकून दूर कुठेतरी २-४ फ्लॅट्स अन त्याच्या फर्निचरसाठी अर्धा-एक कोट रुपयांची बिदागी देऊन वारसांची बोळवण करून घेतली जाते. तेच फ्लॅट भाड्याने देऊन पुढील पिढी जन्माला येईपर्यंत आई-बापांना वृद्धाश्रमांत टाकणारे वारसदार स्वच्छंदी जगण्याचा उपक्रम साजरा करतात.

मनु दिवसेंदिवस व्हिलन होत चाललीय, मीरा आणि बाबांना तर वाटेल तशी बोलतेच पण आदीशी पण अतिवाईट टोनमध्ये बोलली. आधी ती रडूबाई होती, आता आवाज चढवूबाई, वसकन ओरडूबाई झालीय.

मीरा आणि आदिने सरळ बाहेर पडावे, कितीही थांबवलं तरी थांबू नये.

दुसरं म्हणजे जर आई बाबांनी स्व:कष्टाने निर्माण केलेलया प्रॉपर्टीवर ते स्वत: असताना मुलं हक्क सांगू शकतात का, त्यांची इच्छा नसेल तर विकायला लाऊ शकतात का. इतकी जबरदस्ती का, सौरभ निदान नम्रता तरी ठेवतोय, मनू तर ओरबाडुन घेण्याच्या टोनमध्ये बोलतेय. मल्हार आयते भांडवल आजोबा देत असतील तर देऊदेत ना, तिथे त्याची आई नाही म्हणते. मनु स्वत: नोकरी करू शकते ना काही दिवस गेल्यावर, सध्या ती त्या परिस्थितीत तब्येतीने नसेल. लवकर भरभर सर्व रेडिमेड हवं मनू मल्हारला.

मल्हारच्या आईला एवढी वर्षं माहेरात संसार केल्यावर काल उपरती झाली की माहेरचं घर सोडून स्वतःचं अस्तित्व दाखवायला हवं. इतके दिवस माहेरात नवर्‍याला अन मुलाला घेऊन थांबली तेव्हा आईच्या आजारपणाचं कारण सांगत होती. असो. आता आई पण हिंडु फिरु लागली आहे. भावाचं पण लग्न झालं आहे. स्वतःला पण सून आली आहे. गोडी गोडीत वेगळं झालेलं चांगलं. नशीब ती देसायांच्या लेकी सारखी नाही की वडिलांना त्यांच्या स्वकष्टार्जित घराला विका म्हणुन धोशा लावला आहे अन अद्वातद्वा बोलून स्वतःचं अन घरातील इतरांचं मनस्वास्थ्य घालवत आहे...!!

Pages