४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मास्क लावण्याची सक्ति केली हे मलाहि आवडले नाही, जणू लोकांना अक्कलच नाही. लावतील त्यांना वाटले तर. मास्क नीट कसा लावायचा याबाबत अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध आहे.

जे स्वतः नीट मास्क घालतात त्यांना इतरांनी नाही घातला तर फरक पडत नाही.
सक्ति होण्यापूर्वी माझे बरेच मित्र, जे वृद्ध आहेत, व्याधिग्रस्त आहेत, ते अनेकदा विमानप्रवास करून आले, एकत्र भेटले, त्यांना थोडासा झाला, पण बरे झाले. फ्लू पेक्षा जास्त वाईट नाही.
खरे तर शहाणे लोक स्वतःची काळजी घेतातच. सगळ्याच बाबतीत सरकार कशाला पाहिजे?

फ्ल्यू फारच बेकार.. कॉवीड पेक्षाही डेंजर... माझी हालत खराब झाली होती... पाच सहा दिवस... इन्फ्लुएंझा ए ...
हे फ्लू मुद्दाम सोडतात असे वाटते मला- हेल्थकेर वाले...

>>>>फ्लू पेक्षा जास्त वाईट नाही.

वार्षिक फ्ल्यू बळी संख्या-किमान २०,००० ते कमाल ५०,०००
दोन वर्षांमध्ये अमेरिकेतले एकूण कोव्हिड बळी- १०,१८,०००

https://www.google.com/amp/s/amp.theguardian.com/world/2022/mar/24/cdc-c...

Trump ला वाईट्ट दाखवायच्या भरात कोविड रुग्ण मोजण्यात नको इतका उत्साह दाखवला. पाय मोडलेला पेशंट हॉस्पिटल मधे आला आणि कोविड टेस्ट + आली तर तो कोविड पेशंट म्हणून मोजला जात असे. आता बाय डन आल्यावर तो डाव उलटला.
एकंदरीत कोविड रुग्णांची आकडेवारी संशयास्पद आहे.
लोकांना घाबरवून सोडले की त्यांच्यावर जाचक नियम लादून त्यांना नियंत्रणात ठेवणे सोपे जाते असा यामागचा विचार असावा.
विज्ञान प्रेषित फाऊची असे दावे करत आहे की देशाच्या सरकारमधील एक महत्त्वाची शाखा न्याय, तिला विमानात मास्क घालावा का यावर निर्णय देण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त आरोग्य विभाग आणि त्याच्यासारख्या प्रेषितां चा आहे. अशा उन्मत्त माणसाला अर्धचंद्र दिला पाहिजे. (अर्थात ते होणे नाही! )

शेंडे - माणूस कोणत्याही कारणाने डॉक्टरकडे आला पण नंतर टेस्ट मधे + निघाला तर तो कोव्हिड पेशंट धरायलाच हवा ना? का तो कोविड टेस्ट करायला गेला आणि मग + निघाला तरच तो खरा कोव्हिड पेशंट? Happy

मास्कची सक्ती लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यांवर गदा आणते का ते न्यायालय ठरवू शकते. पण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अजून विमानात मास्कची सक्ती असावी का हे न्यायालय का आणि कसे ठरवणार? ते सरकारी आरोग्य खातेच ठरवणार. फाउची बरोबर आहे की चूक हे तो नक्की कशाबद्दल बोलतोय यावर आहे. नाहीतर उद्या या लॉजिकने प्राइम इंटरेस्ट वाढवावा का नाही हे पण न्यायालयाच्या अखत्यारीत येइल. त्या त्या विभागाचे ते एक्स्पर्ट डिसीजन्स आहेत. ते फक्त कायद्याआड येतात का इतकेच न्यायालय बघू शकते.

फारएण्ड,
काही लोक फौचीला तज्ञ मानतच नाहीत. त्याने केलेले सर्व चूकच.
जर न्यायालयाने म्हंटले कोवीडसाठी इन्वर्मेक्टिन वापरू नका तर न्यायालयाला काय कळते असे म्हंटल्या जाईल. न्यायालय कोण ठरवणार असा आरडाओरडा केला जाईल.
माझ्या मताविरुद्ध जो बोलतो ते उन्मत्त, उद्धट, वाईट्ट, वेडे असे आहेत असे काही जणांचे मत असते.

एलॉन मस्क ने ट्विटर विकत घेतले - आता ट्रंपला पुनः ट्वीटरवर घेणार.
इतके दिवस ट्वीटरला शिव्या दिल्या की ते फ्रीडम ऑफ स्पीचवर बंदी घालतात हे बरोबर नाही - जणू खाजगी संस्थांना काही अधिकारच नाहीत. (फक्त रिपब्लिकन पक्षाला भरभरून पैसे देण्याचा हक्क आहे).
आता मस्कने कुणा डेमोक्रॅट वर बंदी आणली तर यांना फ्रीडम ऑफ स्पीच आठवणार नाही, खाजगी संस्था आहे म्हणतील.

राजकारण म्हणजे ढोंगी, दुतोंडी, खोटारड्या लोकांचे काम आहे - तिथे आपले लॉजिक लागू पडत नाही. कसले वादविवादाचे मुद्दे?

>>आता मस्कने कुणा डेमोक्रॅट वर बंदी आणली...<<
जॅक डोर्सि हॅड नो क्लु ऑन रनिंग अ‍ॅन अ‍ॅग्नास्टिक सोशल प्लॅटफॉर्म. अंडर मस्क लिडरशिप, ट्विटर वुड डु ए बेटर जॉब...

"आय होप दॅट इवन माय वर्स्ट क्रिटिक्स रिमेन ऑन ट्विटर, बिकॉज दॅट इज व्हॉट फ्री स्पीच इज ऑल अबौट..."

फ्री स्पीच वगैरे वाचून मला आपले उगाचच डीसँटिस, डोन्ट से गे, डिस्ने , कॉर्पोरेट अँड कमरशीयल स्पीच , सिटीझन युनायटेड, हॉबी लॉबी असे काही शब्द आठवले.

>>
शेंडे - माणूस कोणत्याही कारणाने डॉक्टरकडे आला पण नंतर टेस्ट मधे + निघाला तर तो कोव्हिड पेशंट धरायलाच हवा ना? का तो कोविड टेस्ट करायला गेला आणि मग + निघाला तरच तो खरा कोव्हिड पेशंट?
<<
मृत्युची नोंदणी करताना एखादा मोटरसायकलचा अपघात होऊन मेला आणि तो कोविड पॉजिटिव्ह होता तर तो मृत्यू कोविडच्या खात्यात जमा होणार. हा काय प्रकार आहे? रोगाची कुठलीही लक्षणे उगीच त्या व्यक्तीला रोगी म्हणून गणणे कशासाठी? त्या व्यक्तीला आधी कोव्हिड होऊन गेला असेल आणि शरीर त्या जिवाणूंचा प्रतिकार करत असेल तरी त्या व्यक्तीला रोगी ठरवायचे? का?

>>
मास्कची सक्ती लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यांवर गदा आणते का ते न्यायालय ठरवू शकते. पण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अजून विमानात मास्कची सक्ती असावी का हे न्यायालय का आणि कसे ठरवणार? ते सरकारी आरोग्य खातेच ठरवणार. फाउची बरोबर आहे की चूक हे तो नक्की कशाबद्दल बोलतोय यावर आहे. नाहीतर उद्या या लॉजिकने प्राइम इंटरेस्ट वाढवावा का नाही हे पण न्यायालयाच्या अखत्यारीत येइल. त्या त्या विभागाचे ते एक्स्पर्ट डिसीजन्स आहेत. ते फक्त कायद्याआड येतात का इतकेच न्यायालय बघू शकते.
<<
काय निकष लावून ही बंधने लावली आणि उठवली जात आहेत, त्याने लोकांच्या संविधानाने दिलेल्या हक्कावर किती गदा येत आहे हे न्यायालयेच ठरवणार. साधारणपणे काँग्रेस, सिनेट हे कायदे पास करतात. राष्ट्रपती कारभार हाकतो आणि हे सगळे संविधानाप्रमाणे चालते का हे पहायला न्यायालय आहे. पण बायडनने आणीबाणीच्या नावाखाली सगळे नियम लोकांच्या गळी उतरवायचा सपाटा लावला आहे.
सी डी सी ही संस्था शिफारस करू शकते. कायदा करू शकत नाही. उदा. मांस, समजा बीफ, किती तपमानापर्यंत गरम केल्यानंतर खाण्याजोगे होते ह्याबद्दल सी डी सीच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. पण म्हणून लगेच कुठल्यातरी रेस्टरॉ ने कमी तपमानाला नेऊन गरम केले म्हणून सी डी सी त्याला शिक्षा करू शकत नाही.
विमानातील मास्क बंधने ही वैज्ञानिक कसोटीवर कितपत उतरतात ह्याबद्दल मोठ्या शंका आहेत. लोकांचे मास्क अशा पदार्थाचे बनलेले आहेत का की ज्याने खरोखरच जंतुसंसर्ग थांबेल अशी कुठलीही कसोटी नाही. विमानातील प्रवाशांमुळे कोविड प्रचंड पसरतो असा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. उलट विमान क्षेत्रातील जाणकार असे सांगतात की विमानात खेळवली जाणारी हवा ही अतीशुद्ध असते. खातापिताना मास्क काढून ठेवायची सवलत आहे हे अवैज्ञानिक आहे. जर जंतू मास्क न लावल्यामुळे पसरत असतील तर खाणारी, पिणारी व्यक्ती ते पसरवणारच. जर त्यांना मास्क न घालण्याची सवलत आहे तर सर्वांना का नाही? मास्क सक्तीने लावल्यामुळे होणार्या त्रासाचे कुठलेही मोजमाप नाही असे का?
काय कसोटी लावून मास्कचे बंधन उठवले जाणार हे एक मूव्हिंग गोलपोस्ट आहे. आज हे असेल तर उद्या ते. त्यामुळे त्याचेही धड उत्तर नाही. आम्ही म्हणू तेव्हाच सक्ती शिथिल करणार ही मनमानी आहे.
जेव्हा फौची सारखे सत्ता डोक्यात जाऊन मदमस्त झालेले लोक जुलूम जबरदस्ती करतात तेव्हा त्याला उत्तर म्हणून कोर्टाची पायरी चढावीच लागते.

ट्विटर इलॉन मस्कने विकत घेतल्यामुळे तमाम पुरोगामी, उदारमतवादी आणि डावे दु:खाने विलाप करत आहेत. आता ट्वीटरवर सर्व विचारांचे स्वागत होणार ह्या विचाराने विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते अत्यंत उद्विग्न आणि खिन्न झाले आहेत. काय ही भलतीच विसंगती!
ट्वीटरची चिमणी आता निळा रंग बदलून जांभळी होणार की काय? हा हंत हंत नलिनी गजउज्जहार!

त्याने लोकांच्या संविधानाने दिलेल्या हक्कावर किती गदा येत आहे हे न्यायालयेच ठरवणार. >>> मग मी तेच सांगतोय की. पण मास्कची गरज आहे की नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही.

आणि कोविड पेशंट बद्दल तुमचा वरचा पॉइण्ट "मृत्यूचे कारण" हा नव्हता. तो तुम्ही आता लिहीताय. वरती असा पेशंट का कोव्हडचा पेशंट धरावा का हा प्रश्न होता. आणि तो धरलाच पाहिजे. किती लोकांना कोव्हिड झाला या संख्येत तो यायला हवा.

बाय द वे, कोणी उत्साह दाखवला? बायडेनने? तो तेव्हा कोठे सत्तेवर होता?

बाकी ६ जानेवारीच्या बर्‍याच भानगडी बाहेर येत आहेत. टोटल मनोरंजन.

>>
त्याने लोकांच्या संविधानाने दिलेल्या हक्कावर किती गदा येत आहे हे न्यायालयेच ठरवणार. >>> मग मी तेच सांगतोय की. पण मास्कची गरज आहे की नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही.
<<
कुठल्या कसोट्या लावून मास्क सक्ती केली जात आहे आणि ती कारणे संवैधानिक आहे का नाही हे न्यायालय नक्की ठरवू शकते.

>>
आणि कोविड पेशंट बद्दल तुमचा वरचा पॉइण्ट "मृत्यूचे कारण" हा नव्हता. तो तुम्ही आता लिहीताय. वरती असा पेशंट का कोव्हडचा पेशंट धरावा का हा प्रश्न होता. आणि तो धरलाच पाहिजे. किती लोकांना कोव्हिड झाला या संख्येत तो यायला हवा.
<<
आजिबात नाही. रोगाची लक्षणे नसताना केवळ हॉस्पिटलमधे आला आहे म्हणून माणसाला कोव्हिड पेशंट धरणे हे साफ चूक आहे. अशा प्रकारे शिरगणती करुन स्टॅटिस्टिक्स चे वाटोळे झाले आहे. खरोखर आकडेवारी हवी असेल तर प्रत्येक रहिवाशाची केली पाहिजे. पाय मोडला, हात भाजला, कान तुटला अशा कारणाने आलेल्या लोकांची तपासणी करून ते ठरवणे चूक आहे.
त्या माणसाकडे रोगाशी लढण्याशी शक्ती असेल तर उगाच आकडेवारी फुगवून का सांगायची? फार्मसी लॉबीचे उखळ पांढरे करायला?
आणि हो, मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारीही अशीच फुगवलेली आहे. अनेक बातम्या तसे सांगत आहेत (विशेषतः जेव्हा बायडनचे नाव खराब होताना दिसते आहे म्हणून तर जास्तच!)
https://www.fox35orlando.com/news/fox-35-investigates-medical-examiner-explains-how-covid-19-death-is-determined
ही उघडकीला आलेली एक केस. अशा अनेक केस असतील ज्यात ही गफलत झाली असेल. कारण आकडेवारी फुगवल्यास फार्मसी लॉबीला फायदा होता हे उघड आहे. आणि सरकारलाही हवी तशी बंधने घालायला मुक्त रान मिळाले.

>>
बाय द वे, कोणी उत्साह दाखवला? बायडेनने? तो तेव्हा कोठे सत्तेवर होता?
<<
जेव्हा हा रोग एक अज्ञात भीतीदायक साथ होती तेव्हा लोक काय वाट्टेल ती बंधने स्वीकारत होती त्यात माजी राष्ट्रपतीही आले. फौची सारख्या नराधमाने जाणून बुजून ही माहिती लपवली की हा रोग एका चीनी प्रयोगशाळेतील कृत्रीम बनवलेला व्हायरस बाहेर पडून निर्माण झाला आहे. शिवाय लस निर्माण झालेली नव्हती त्यामुळे काहीच्या काही निर्बंध घातले गेले. पण अनेक महिने उलटल्यावरही ही मनमानी चालूच होती कारण बायडन सरकारने फौची सारख्या मुजोर माणसाला पूर्ण मुभा दिली होती. आजही दिलेली आहे.

आजिबात नाही. रोगाची लक्षणे नसताना केवळ हॉस्पिटलमधे आला आहे म्हणून माणसाला कोव्हिड पेशंट धरणे हे साफ चूक आहे. >>> टेस्ट + आली असेल तर रोगाची वरकरणी लक्षणे नसतील तरी शरिरात आहेतच की. एखाद्याला ताप व खोकला असेल आणि तो जर पोट बिघडले म्हणून हॉस्पिटल मधे आला, तर तिन्ही रोगांत त्याची गणना होईलच की.

बाकी फाउची बद्दल ऑलरेडी गोष्टी Dispel करून झाल्या आहेत. "चोरलेली" निवडणूक झाली, मग ६ जानेवारीला अ‍ॅटिफा वगैरे झाले आता हे नवीन. तिकडे ते वोक बिनडोक आहेत, आणि इकडे हे नग.

कुठलीही लक्षणे नसताना निव्वळ रक्ताची चाचणी पोझिटिव्ह आली म्हणून त्याला रोगी ठरवणे एक तर मूर्खपणाचे आहे किंवा काहीतरी काळेबेरे आहे. आकडेवारी फुगवली की हॉस्पिटलला, फार्मसीला भरपूर पैसे मिळतात त्यामुळे हे गैरप्रकार होत असणार हे उघड आहे.

फौची बद्दल काहीही चूक निघालेले नाही. त्या नराधमाने पद्धतशीरपणे माहिती लपवली आहे, खोटारडेपणा केला आहे, स्वतःची तुंबडी भरण्याकरता कांगावखोरपणा केलेला आहे. त्याच्याच नेतृत्त्वाखाली अमेरिकेत दरडोई सर्वाधिक कोव्हिड मृत्यू आणि रोगी निर्माण झाले. त्याने दिलेल्या तमाम आज्ञा शिरोधार्य मानूनही भारत वगैरे प्रचंड लोकसंख्येच्या देशापेक्षा अमेरिकेतले प्रमाण सर्वाधिक होते ही काय ह्या उन्मत्त माणसाच्या यशाची पावती आहे का? ज्यांना हा इसम नि:स्वार्थी, महापुरुष, जनसेवेचे कंकण बांधलेला वगैरे वाटत असेल त्यांची कीव येते.
आपल्या विरोधी मांडलेली मते, अनुभव, ज्ञान हे वोक सोशल नेटवर्किंग मिडियाला हाताशी घेऊन दाबून टाकणे, संबंधित लोकांना ब्लॉक करणे, कायमचे हद्दपार करणे वगैरे गैरप्रकार करायची एका वैज्ञानिकाला गरज का भासते?

शेंडे, जर हि आकडेवारी धरली गेली नसती तर मृत्युदर खूपच जास्त वाढून दिसले असते. किती लोकांना विषाणू संसर्ग झालाय हे कळणे महत्वाचे नाही काय ?

>>>>भारत वगैरे प्रचंड लोकसंख्येच्या देशापेक्षा अमेरिकेतले प्रमाण सर्वाधिक होते ही काय ह्या उन्मत्त माणसाच्या यशाची पावती आहे का?

आकड्यांची तुलना थेट करून उपयोग नाही. एक्सेस मोरटालिटी बघा- कोव्हिड पूर्व मृत्यू आणि कोव्हिड काळातले मृत्यू.

भारतात खूप अंडररिपोर्टींग आहे.
इथे लिहिलेले - https://www.misalpav.com/comment/1111732#comment-1111732

भारत कोव्हिड ला घाबरत नाही. तसेही दोन Vaccine घेवुन काहीही लक्षण नसताना टेस्ट +ve येतात. कुछ तो गडबड है दया......त्यापेक्षा भारतात लोकांनी सर्दी खोकल्यासाठी कोव्हिड टेस्ट करणे बंद केले Happy

असामी*, असे विचार करत नसतात. काढून टाका ते स्धब्द मनातून.
इथे फक्त बायडेनला शिव्या देण्यापुरते अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.

कॉमी तुम्हाला कळत कसे नाही?
हा सगळा फौची नि डेमोक्रॅट लोकांचा प्लॉट आहे!! असे म्हणायचे.
उगाच विषयाला धरून, समजून असे काही लिहायचे नाही.
उद्या पासून ट्वीटरवर जाऊन मस्कला नि रिपब्लिकनांना यथेच्छ शिव्या घाला - एका दिवसात तुमचे खाते बंद होईल.

मी अजून त्या वोक गणितावरच अडकलोय.
नशीब आमचे कुलकर्णी सर 'गंगुबाई कठियावाडीचे चाहते' वगैरे नव्हते. नाहीतर आम्हाला कसली गणितं सोडवायला लागली असती देव जाणे Proud

मला खालील गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत -
१. जरी ट्रंपने अफघानिस्तानातून निघून जायची तारीख ठरवली असली तरी, बायडेनने (जो स्वतःला मुरलेला, अनुभवी राजकारणी समजतो) त्याने अमेरिकेच्या प्रचंड आर्थिक नि लष्करी शक्तीच्या बळावर तालीबानशी दुसरा करार करणे सहज शक्य होते.
बुशने कोणत्या कारणाने इराकवर हल्ला केला? केवळ करता येतो म्हणून. जगात कुणाची हिंमत नाही झाली त्याला अडवण्याची.
इथे तर सबळ कारण होते गेसैन्य काढून घेतले तर देश तालीबानच्या घशात जाणार, अमेरिकेची शस्त्रात्रे तालिबानला मिळणार हे एखाद्या लहान मुलाला समजले असते.
२. वॅक्सिन नि मास्कची सक्ति - कशाला? लोकांना समजते ना? ज्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक जेंव्हा हॉस्पीतलमधे व्हेंटिलेटरवर पडलेले नि मेलेले पहातील, तेंव्हा झक मारत सगळे मास्क लावतील नि व्हॅक्सिन घेतील. उगीचच जिथे तिथे स्वतःचा शहाणपणा!
३. फौचीला त्याच्या ऑफिसमधे बसवून ठेवायचे - जनतेशी काय बोलायचे ते सरकारचे लोक ठरवतील. मास्कची नि व्हॅक्सिनची सक्ति करायची की लोकांना व्हायरसबद्दल खरी माहिती सांगून व्हॅक्सिन घेणे, मास्क लावणे कसे फायद्याचे आहे हे पटवून देणे ही कामे शास्त्रज्ञाची नव्हेत, तेथे मुरलेले, वर्षानुवर्षे लोकांना खरे खोटे पटवून, निवडून येणार्‍या लोकांचे आहे.
४. सगळ्यात मूर्खपणा म्हणजे सी आर टी नि लैन्गिक शिक्षण यावर नको तेव्हढा भर!!! त्यापेक्षा सायन्स, मॅथ, मेडिसिन यावर जास्त लक्ष द्या ना!!

कुठलीही लक्षणे नसताना निव्वळ रक्ताची चाचणी पोझिटिव्ह आली म्हणून त्याला रोगी ठरवणे एक तर मूर्खपणाचे आहे किंवा काहीतरी काळेबेरे आहे. >>> !!!

फाउचीने तुमचा तात्या वाईट दिसू नये म्हणून सर्दी, खोकला वगैरे कॅटेगरीत थोडी माणसे टाकायला हवी होती असे दिसते. बाकी मूर्खपणा, कीव येते वगैरे रस्त्यावर तुम्ही निघाल्यामुळे तिकडे जाण्यात इंटरेस्ट नाही.

बाकी काही नाही पण त्यांना धुरळा उडवून नसलेल्या विषयाचीपण कशी मस्त हवा करता येते हे शिकण्यासारखे आहे. Lol

नंद्या४३ - १ व ३ शी सहमत आहे. २ बद्दल - "लोकांना समजते" असे आजूबाजूला बघून वाटले नाही. अनेक ठिकाणी लोक मास्क घालत नव्हते. जे लोक मास्क घालत नाहीत त्यांनाच जर फक्त त्रास झाला असता तर आपोआप हा प्रॉब्लेम सुटला असता. पण त्यांच्या बिनडोकपणामुळे त्यांच्या जवळच्या व न जवळच्या इतरांनाही संसर्ग झाला असणार त्याचे काय?

४ बद्दल - नक्की काय मटेरियल आणले आहे पुस्तकात ते मला माहीत नाही. त्यामुळे अजून काही ठाम मत नाही. ते एक उदाहरण लोकांनी ट्विट्स मधून फिरवले असले काही शिकवत असतील तर ते काढायलाच हवे.

४ बद्दल - नक्की काय मटेरियल आणले आहे पुस्तकात ते मला माहीत नाही. त्यामुळे अजून काही ठाम मत नाही. ते एक उदाहरण लोकांनी ट्विट्स मधून फिरवले असले काही शिकवत असतील तर ते काढायलाच हवे. >> बायबल चे रेफरन्स पण काढायला हवेत ह्याच न्यायाने अशी एक याचिका दाखल झाली आहे फ्लोरिडामधे. मजानु टाईम छे !

एनाराय पब्लिक कुणाच्या बाजूने आहे? तसे डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देत असावेत पण रिपब्लिकनला सपोर्ट करतात का?

असामी,
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत न्यू जर्सीच्या प्रसिद्ध कवयित्री च्या आत्मचरित्राबद्दलचे प्रश्न विचारले होते. कारण ती प्रश्नपत्रिका तयार करणार्‍याला ते आत्मचरित्र फार आवडले. त्यातती बाई काळी, नि तिला कसे प्रॉब्लेम आले ते लिहीले होते. ते पुस्तक त्या शिक्षकाच्या विद्यार्थ्यांनी वाचावे असे त्या शिक्षकला वाटले. नंतर तीच प्रश्नपत्रिका शिक्षकांच्या वेबसाईटवर गेली नि काही शिक्षकांनी ती तशीच्या तशी उचलून आपल्या विद्यार्थ्यांना दिली.
काळ्या बाईबद्दल असल्याने सी आर टी चा संबंध जोडणे कठिण नाही!
म्हणून ती पुस्तकेच रद्द केली. माझे सिनिकल मन सांगते की आता कुणा रिपब्लिकन देणगीदाराने प्रसिद्ध केलेले पुस्तक लावल्या जाइल.
मग यात येशूबद्दल गोडवे गायले जातील पण उघडपणे नव्हे.

आपण लहान असताना आपल्या गणितामधे भिंतीवरून सरपटणार्‍या पाली नि गळक्या नळांचे फुटके हौद, मजूर अ नि क्ष का असत हे आत्ता कळायला लागले आहे. Lol

Pages