कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्वली, किटलीचा उपयोग पाणी गरम करून त्याची वाफ घ्यायला होईल का? स्टीमर इतके परिणामकारक नसेल पण त्यातल्या त्यात बरे. तसेच दिवसभर त्यातून कोमट पाणी करून पिता येईल.
ब्रेकफास्टला गरम गरम चहा/कॉफी व बिस्कीट घ्यायचे. तुम्ही तिकडेच असाल तर सूप किंवा मॅगीची पॅकेटस, छाती शेकायला पिशवी पाठवता येईल का त्यांना?
AC आहे तर जास्तीचे ब्लॅंकेट्स मिळतील का ते विचारा. त्यांना लवकर बरे वाटो.

ओह पल्वली! तुम्हांला काही पाठवता येणार नाही का? हॉटेलमध्ये आहेत का? डॉक्टर चेक अप अलाऊड नाहीये का?

खरे तर कोव्हिड मध्ये मोकळी हवा हवी व एसी नको. तेथील डॉक्टरांना विचारून घ्या.

माझी खूप डिलेड अशी घाटकोपर मधील ट्रीटमेंट पार पडली एकदाची ह्या आठवड्यात. मागील आठवड्यात एकटीच गेले तेव्हा त्यांनी परत पाठवले बरोबर कोणेतरी हवेच असते. कारण मला मध्येच काही झाले इमर्जन्सी उद्भवली तर कोणी तरी माझ्या साइडचे हवे म्हणून. त्यामुळे लेकीच्या सोयीने तिला घेउन ह्या आठवड्यत गेले. त्यात आधी उबर मध्ये चुकीचा पत्ता टाकला पण वेळेत लक्षात आले मग यु टर्न घेउन आलो. त्या भानगडीत बीपी हाय झाले. मग मात्र सर्व सुरळीत झाले. पुढील डेट जून पहिला आठवडा. आता ऑक्सि जन बीपी सर्व ठीक आहे. ह्याच वेळात कामाचे प्रेश र ही फार होते पण तिथे संयमित चर्चा केली व मला शक्य आहे तेव्ढेच करू शके न अशी त्यांना कल्पना दिली. नाहीतर हार्ट वर परिणाम व्हायचा. नेक्स्ट वीक टू डी एको व कलर डॉप्लर टेस्ट राहिली आहे ती करून घेइन.

परवा एक कलीग ने ऑफिस व्हिजीट केली तो पूर्ण वेळ मास्क ग्लोव्ह्ज घालून आला होता व अँटिजेन टेस्ट करून आला होता त्याशिवाय परवानगी नाही आहे आत यायला.
त्यामुळे गाडे चालू आहे धीम्या गतीने.. सी पी आर स्कोअर हाय आहे पण त्यावर कोणीच काही औषध प्रिस्क्राइब केलेले नाही.

पल्वली सेंडिण्ग यु लव्ह अँड सपोर्ट इन दीज टाइम्स . अहोंची तब्येत सुधारेल व विलगीकरण संपेल अशी प्रार्थना करते.

स्पायरो मीट र बद्दल प्रतिसाद लिहिला होता हपिसातून पण तो उडाला. मला कोणी काही प्रिस्क्राइब केले नाही पण मी फेसबुक वर एक डॉक्ट्रचा वि डीओ आला त्यात त्याने सांगितले होते व तो स्पायरोमी टर कसा वापरायचा ते ही दाखवले होते. तीन नळ कांडी आहेत त्यात एकात बॉल आहे. आपण जोरात फुंकून तो बॉल किती वर जातो ते बघायचे ह्यात फुपुसांची क्षमता कळते असे काहीतरी आहे. पोस्ट कोव्ह्डि मेडिकल रिव्ह्यू पण पाहिजे पण आधी रुग्णांनाच अटेन्शन मिळत नाही आहे धड तर बरे झालेल्यांचे काय असा प्रश्न पडतो.

परवा दोन मे एका वय्सकर मित्राचा वाढदिवस असतो. जनरली हे सगळे माझ्या नवृयाचे मित्र. सत्तरच्या दशकात तरूण असलेले दारू सिगरेट
व्यसने असलेले हे व्यक्तिमत्व . लग्न केलेले नाही त्यामुळे ब्रह्म्हचारी मुंजा लाइफ स्टाइल. फोन वर वायफळ गप्पा करणे जुने किस्से आठवून खिदळणे ह्या पलीकडे माझा फार संबंध नाही. फोन त्याने उचलला पण तो १२ दिवसांच्या ट्रीटमेंट नंतर जस्ट हॉस्पिटल बाहेर पडला होता व ऑक्सिजन मास्क लावूनच बोलत होता. मी फार बोलू शक णार नाही म्हटला. पण त्यातही एका वाक्यात लेकीची खुशाली विचारली. ह्याला पोरेबाळे नाहीत त्यामुळे लेकीलाच कधी मधी काही वाढदिवसाला गिफ्ट देत असे वगैरे. मी पण नंतर परत फोन करते म्हणून ठेवून दिला. मग मला फार रडायला आले ऑक्सिजन क्रायसिस मध्ये लोकांचे काय होत असेल हे प्रत्यक्ष ऐकणे आजिबात सोपे नाही. यु कॅन रिअली फील द लंग्ज स्ट्रगल. चेन स्मोकिन्ग करून आधीच वाट लागलेल्यंचे काय होत असेल. ह्या विचाराने कसे तरी झाले.

ह्या फोन चे रेकॉर्डिन्ग आहे माझ्याकडे पण परत ऐकायचे डेअरिन्ग नाही . परत खुशाली विचारायला मेसेजच करेन.

सिगरेट वगैरे व्यसने वाइट असा आजार असेल तर.

सर्वांना खूप खूप धन्यवाद . माझा नवरा रविवारी घरी पोचला, त्याला अजून कोरड्या खोकल्याचा खूप त्रास आहे. तो covid चा UK variant ने इन्फेक्ट झाला होता. आणि इथल्या डॉक्टरांच्या मते त्याला झालेल्या कोविड ला ते long covid म्हणतात आणि हा बरा व्हायला खूप काळ जाऊ शकतो . खूप घरगुती उपाय चालू आहेत आणि ते चालू ठेवेन पण अजून त्याच्या खोकल्यावर इलाज नाही सापडला. पण तो आता घरी आहे आणि घरचं पौष्टिक अन्न त्याला मिळतंय त्यामुळे तो लौकर बारा होईल बहुदा Happy

हो, घरी आल्यावर जरा मनासारखं खाता पिता येईल.
आपली टिपीकल कंफर्ट फूड, गरम वरणपाणी तूप लिंबू, मऊ खिचडीभात, टॉमेटो सूप वगैरे
ब्रोकोली बदाम सूप पण छान बनते.

पल्वली कृपया प्लीज फक्त घरगुती उपायांवर भिस्त ठेवू नका. डॉक्ट्रर इ एन टी स्पेशालिस्ट चे कन्सल्टेशन घ्या. कोरडा खोकला/ पोट बिघडणे हे कोविडचे खास लक्षण आहेत. अ‍ॅलो पाथी औषधे नक्की प्रिस्क्राइब करून घ्या. तुमचा विश्वास नसला तरी सांगत आहे. कारण इन्फेक्षन लंग परेन्त जाउ शकते.

माझी प्रॅक्टो वरील डोक्ट रने दिलेली सर्व औ षधे काल संपली एक महिन्याने जवळ जवळ. आज कमी गोळ्या बघून चक्कर आली.

मी ड्रेसिन्ग टेबल वर सका ळ च्या गोळ्या रात्री च्या गोळ्ञा असे सेपरे ट मांडून ठेवते.

पल्वली , तुमचा अनुभव वाचून अंगावर काटा आला. . खरंच तुरुंगवास भोगावा लागलाय. आता घरी ते लवकर बरे होवोत हीच सदिच्छा.
वर उल्लेख केलाय तसा एक ENT मात्र नक्की गाठा. कोरडा खोकला फार चिवट असतो.

पल्वली कृपया प्लीज फक्त घरगुती उपायांवर भिस्त ठेवू नका. डॉक्ट्रर इ एन टी स्पेशालिस्ट चे कन्सल्टेशन घ्या. कोरडा खोकला/ पोट बिघडणे हे कोविडचे खास लक्षण आहेत. अ‍ॅलो पाथी औषधे नक्की प्रिस्क्राइब करून घ्या. तुमचा विश्वास नसला तरी सांगत आहे. कारण इन्फेक्षन लंग परेन्त जाउ शकते.> अमा , अहो, तीच चिंता आहे मला. पण इथले डॉक्टर पुढे काहीही ट्रीटमेंट द्यायला तयार नाहीत. त्यांच्या रेफेरल शिवाय स्पेशालिस्ट ला भेटता येणार नाही. म्हणून मग मनाला बरं वाटावं म्हणून घरगुती इलाज. Sad

Pages