कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, घरीच राहायला मिळेल अशी आशा करूया. पण जर जावंच लागलं तर वरील यादीत आणि तुमची जर नेहमीची औषधे असतील (ब्लडप्रेशर वगैरे) तीही घ्यायला हवी. आठवड्यापूर्वी माझी आई कोविड सेंटर मधून घरी आली. तिथे वायफाय नव्हते. अर्थात ती सरकारी सेंटर मध्ये होती. आणि घशाला कोरड पडतेय असा पूर्वी घरी असताना न आलेला अनुभव तिला तिथे आला. तर त्याकरिता चघळायला गोळ्या घ्यायला जमलं तर बघा. बाकी मनोबल टिकवण्यासाठी वैयक्तिक मार्ग निवडला की उपयोग होतो हे नक्की. (उपासना, वाचन, आई कीर्तन ऐकायची.)

मेरे साथ सिर्फ मेरी तकदीर है ... दिवारमधील अमिताभचा अ‍ॅटीट्यूड घेऊन जा Happy

बाकी सल्ले ईथले जाणकार आणि अनुभवी देतीलच. धाग्याचा फायदा सर्वांना !

लवकर बरे होण्यास शुभेच्छा Happy

अमा, ठीक होईल सर्व. खूप शुभेच्छा!!!! (दादर अलिकडे-पलिकडे असा विचार करू नका. जिथे उपचार सांगतिल तिथे जा. दादर अलिकडे-पलिकडे लहान गोष्ट आहे - देव न करो नि झालंच तसं तरी तुम्ही बरोबर हँडल कराल.....)

अमा, एक फार जुनं गाणं आहे हिंदी सिनेमातलं. त्यातली नर्तकी हिरोला विनवत असते नदी किनारी जाऊ नकोस, गेलासच तर बीच धारे जाऊ नकोस, तरीही गेलास तर पल्याड जाऊ नकोस, पलिकडे पोचलास तर सवतीला भेटू नकोस. त्या धर्तीवर
तुमची टेस्ट निगेटिव्ह येऊ दे, जर पॉझिटिव्ह आलीच तर घरीच राह्य्ला मिळू देत अन बीएमसी वाल्यांनी नाहीच ऐकलं तर त्यातल्यात्यात चांगल्या व सोयीच्या सेंटरमधे तुम्हाला जागा मिळावी. याकरता शुभेच्छा.
आवड असेल आणि सामान हाताशी असेल तर विणकाम / भरतकामाचा प्रॉजेक्ट घेऊन जा. वायफाय असेल नसेल तरी थोडा वेळ घालवता येईल.

https://g.co/kgs/vT2YQu

साहिरचे शब्द आणि जयदेव यांचं संगीत. लक्षात राहणार नाहीतर काय!

वर सर्वांनी उपयुक्त गोष्टींची यादी दिली आहेच. वाचनाची आवड असेल तर काही पुस्तके ठेवा. लॅपटॉप शक्यतो नकोच, गहाळ होण्याची शक्यता असते कारण पेशंट गुंगीत, झोपेत असू शकतो, हेडफोन देखील साधेच न्या.
माझी बहीण 2 आठवड्यापूर्वी ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होती, ऐन वेळी दाखल केल्याने ती फक्त कपडे आणि जुजबी समान घेऊन गेली होती पण नंतर नेऊन दिलेलं सामान, टिफिन हॉस्पिटल स्टाफ ने तिला दिला. छोटं हॉस्पिटल होतं म्हणून असेल कदाचित.
काळजी घ्या, काळजी करू नका, चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा

अमा, काय आला रिपोर्ट? +1>> पॉझिटिव्ह. काल रात्री फोन वर कळले आता रिपोर्ट मिळेल. सध्या तरी होम आयसोलेशनात आहे. सामान जुळवून ठेवले आहे बाफ अनुसार. ऑफिसच्या हेल्त ऑफिसरला रिपोर्ट सब मिट करावा लागतो ते करेन मग टेकिन्ग इट डे बाय डे.

ओह नो!! लवकर बर्‍या व्हा!! खूप विश्रांती घ्या, जपा.
(आलिया भटला पण पॉझिटीव्ह रिपोर्ट आला म्हणे... लगता है तुम दोनो हमकू छोडके किधरकू पार्टी किया ... हलके घ्या, आनंदी रहा.)

हा प्रतिसाद चार पाच वेळा टंकला आणि खोडून टाकला. पण महत्वाचं वाटतंय.
माझ्या आजीला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमधे दाखल केलंय. आयसीयूत आहे. पण शौचालय एकच आहे. ते अतिशय गलिच्छ आहे. जे बरे होण्यासारखे आहेत ते ही संसर्गाच्या भीतीने धास्तावले आहेत. आजी इथून बाहेर काढा म्हणतेय, पण मामाला इथून काढले तर नंतर बेड मिळणार नाही याची काळजी आहे.
या गोष्टी आधी लक्षात येत नाहीत. घाबरवण्याचा हेतू नाही. पण दाखल होण्याआधी बघून घ्यायला जमले तर पहावे.

आराम करा. औषधे कशी मिळवणार? कोणी आणून देणार आहे का? केमिस्ट होम डिलिव्हर करतात. नाहीतर 1mg वर बघा. डब्याची सोय बघावी लागेल.
घरात पुरेशी कॅश आहे का?

आराम करा.

औषधे कशी मिळवणार? हो एक केमिस्ट आहे घरपोच करून देणारा.

कोणी आणून देणार आहे का? केमिस्ट होम डिलिव्हर करतात. नाहीतर 1mg वर बघा.
डब्याची सोय बघावी लागेल. >> ते म्यानेज होते आहे.
घरात पुरेशी कॅश आहे का?>> हो धन्यवाद

अजून फोन आला नाही आहे.

रानभुली हो असे अनुभव येतात.

धन्यवाद सर्वांचे

कोविड साठीची औषधे. सप्लिमेंट्स - मिनरल्स, व्हिटॅमिन्स.

तुमच्या डॉक्टरना कन्सल्ट करत असालच. ब्लड टेस्ट इ. साठी.

अमा, भरपूर विश्रांती, योग्य आहार आणि सप्लीमेंट्स या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लवकर छान बरं वाटेल तुम्हाला! शुभेच्छा!

अमा
आराम करा...लागलं काही तर कळवा ..

अमा काळजी घ्या. तुम्ही धीराच्या आहातच मी अजून नवे काय सांगणार. तुम्ही लवकर बर्या व्हाल.

Pages