कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सासुसासरे गोरेगाव कोविड सेंटर मधे होते गेल्या वर्षी.
फक्त चार्जर/ बादली (आंघोळीच्या पाण्यासाठी)/ कपडे आणा असं सांगितलं होतं.
बाकीची जनता पत्ते वगैरे घेऊन आली होती. टिव्ही होता. 3 वेळ गरम खाणं, 2 दा चहा होता.

सासुसासरे खूप शांत स्वभावाचे आहेत, त्यांना त्यांच्यापेक्षा तिथल्या नर्सेस ची जास्त काळजी होती .
त्यांचा अनुभव चांगला होता . 14 दिवस होते ते तिथं

अमा, काळजी घ्या पण काळजी करू नका. धास्ती घेऊ नका.
You will be alright soon

अमा, काळजी घ्या. लवकर बर्‍या व्हा.
सध्या माझी आई आणि बहिण पण याच फेज मधुन जात आहेत. कालच त्यांचे टेस्ट चे रेपोर्ट पॉझिटिव आलेत. त्या घरिच आहेत.

अमा काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा.

निर्झरा तुमच्या आईबहिणीला पण लवकर बरं वाटूदे.

सासुसासरे खूप शांत स्वभावाचे आहेत, त्यांना त्यांच्यापेक्षा तिथल्या नर्सेस ची जास्त काळजी होती . >>> रिस्पेक्ट.

सध्या (१०-१२ दिवसांपूर्वी) नेस्को कोविड सेंटर (गोरेगावचे) फार गलिच्छ असल्याचा फर्स्ट हॅंड अनुभव आमच्या इमारतीतील महिलेला आला. तिथे पाणी नव्हते. त्यांनी CMO ला वगैरे तक्रार केली आहे आणि त्यामुळे आत्ता स्थिती सुधारली असल्यास कल्पना नाही. तेव्हा तिथे जावे लागलेच तर जरा चौकशी करता आली तर पहा.

अमा लवकर बऱ्या होण्या साठी शुभेच्छा. मला वाटतंय घरीच राहण्याचा सल्ला देतील. त्यांना सांगा मी घरी राहू शकते आणि x/नातेवाईक मदत करू शकतात. बाकी मी माझा अनुभव लिहिलेला वाचलाच आहे ना. काहीही माहिती हवी असल्यास संपर्क करा. काळजी घ्या आणि पोसिटीव्ह (मनाने) राहा.

अमा, ऑल द बेस्ट,
जिथे कुठे राहाल तिकडे मजेत राहा,
सगळे 15-17 दिवसांसाठीच आहे, तेव्हडा पेशन्स टिकवून ठेवा.
लौकर बर्या व्हा !!

अमा, भरपुर आराम करा, छान काळजी घ्या आणि तुम्ही मस्त मौला आहात, चिंता करणार नाही याची खात्री आहे. पण माबोवर मात्र तब्येतीचे अपडेट्स टाकत रहा. कारण आम्हाला काळजी वाटत राहील.

Get well soon !

अमा.. wishing you speedy recovery...
निर्झरा, कुटुंबियांना लवकर बरे वाटो.

अमा, लवकर बर्‍या व्हा. तुम्ही एकट्या राहाता तेव्हा तुमचे डेली अपडेट मुलीला, जवळच्या मैत्रीणीला देत रहा.
औषधांबरोबरच घरगुती उपायही चालू राहू देत. रोजचा, वाफारा, जमलं तर नेती, पालथे झोपणे चालू ठेवा.
https://www.youtube.com/watch?v=4ItbpVvcMQs
वरील लिंक आहे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमधील डॉ. धनंजय केळकर यांची. कोवीड झालेल्या काळात घरच्या घरी करायचे व्यायाम यासाठी.
खूप ऑडस् मधून जाऊन देखील तुमचा नेहमी पॉझीटीव्ह अ‍ॅटीट्युड असतो, तशाच राहा.

शुभप्रभात. इतक्या शुभेच्छा वाचून गहिवरून आले आहे. माझ्या तर्फे सर्वांना तीच सप्रेम भेट. कौन कहता है कि माबो का दिल नहीं है.

बी एम सी ने अनुल्लेख केलेला आहे आत्ता परेन्त. उगाच घाबरून बसायची माझी परंपरा मी सांभाळली आहे.
ताप उतरून गेला. ऑक्सिजन ९९ आहे.

निर्झरा माझ्या तर्फे तुम्हाला भावनिक आधार.

अमा, तुम्ही घरीच रहाल. मजेतच रहा. आराम करा.

माझ्या आईलाही कोविड झालाय. वय पंचाहत्तर. आज सातवा दिवस आहे. तिला डायबेटीस, बिपी, डिमेन्शिआ आहे पण तरी टकाटक आहे. मस्त ऑर्डरी सोडत असते दिवसभर. Pmc वाले दरवाज्यावर कोविड पेशंटचं घर असा कागद लावून गेलेत तर ती त्याला तिचं मानपत्र म्हणते. गॅलरीतून आसपासच्या जे. ना मैत्रीणींशी गप्पा मारते. तिचा पाॅझिटीव अॅटिट्युड पाहून आम्हालाही नवल वाटतं.

अमा, कश्या आहात आता? काळजी घ्या, आराम करा
लवकर बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा☺️

अन हो, थोडे बरे वाटले तरीही दुर्लक्ष करू नका भरपूर आराम करा, जेवण कमी करू नका नाहीतर अशक्तपणा होऊ शकतो. जमल्यास स्क्रीन टाईम कमी करून झोप काढा.

Pages