कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्निदिव्यातून पार झाल्या सारख ?, >> हो एक पार पडले अजून चॅलेंजेस आहेत त्यावर कॉनसंट्रेट करते आहे. सर्वांचे सल्ले लक्षात घेउन पडून मोबाइल वर गेम खेळत बसणार वीकांत भर.

अमा, तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले हे वाचुन आनन्द झाल. आता अजुन पुढचे काही दिवस आराम करा.
कालच माझी बहिण पण बरी आहे असे डॉक ने सान्गितले आहे. दोन चार दिवसात ती पण ऑफिस ला जाउ श्कते. पन तरिहि ति सध्या अजुन आराम करणार आहे. आई पण बरी आहे पण वय जास्त असल्याने डॉक ने एकदा एक्स रे बघुन ठरवु असे सान्गितले आहे. पण तरिही ति देखिल आता व्यव्स्थित आहे असे डॉक म्हनाली.
जर कोणी कोथरुड, कर्वेनगर परिसरात रहात असेल तर 'मरीयम सय्यद' असे डॉक चे नाव आहे. दर दोन दिवसानि घर येउन तपासुन जात होती. गरज असेल तरच अ‍ॅड्मिट होण्यास सान्गते. अन्यथा घरिच पेशंट बरे करणे याला ती प्रधान्य देते.

३१.०३.२०२१ ला नवऱ्याचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला , घरीच homequartine दिले. नंतर जाऊ व दिराला त्रास होऊ लागला म्हणून रिपोर्ट केले तर पॉसिटीव्ह आले. मग सासू व सासरे सारखी लक्षण दिसू लागली . त्याची टेस्ट केली NMMC मध्ये पॉसिटीव्ह आल्यावर बराच कोलाहल घरी झाल्यावर त्यांना covid सेंटर मध्ये घेऊन गेले .
NMMC तर्फे फवारणी केली गेली . बोर्ड हि लावला कोविद पॉसिटीव्ह चा. नशिबानी माझी एकटी ची टेस्ट नेगेटिव्हवं आलीये.

हा पूर्ण महिना घरून काम इतक्या लोकांच्या home quarantine मध्ये गेल्या .. आता नवर्याच्या रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे व सासू सासरे घरी परत आले आहेत. थोडा बरे वाटतेय पण अजूनही बरच टेन्शन हे आहे..

मनी टेन्शन घेऊ नका. ईतके लोक एकच घरात असतिल तर नक्किच पळापळ होते. य परिस्थितित जितके मन शान्त ठेवु तितके आपण (निगेटिव्ह) अस्लेले लोक आपल्या लोकांना मदत करु शकतो, त्यांची काळजि घेउ शकतो.

निगे टिव्ह रिपोर्ट आल्यावर मेसेज येतो व त्यात एक लिंक असते त्यात क्यु आर कोड असलेला आपले नाव असलेला रिपोर्ट ऑन लाइन असतो. व आरोग्य सेतू अ‍ॅप मध्ये पण पॉझि टिव्ह अस्ताना जे लाल असते ते हिरवे होते.

लेकीच्या मैत्रीणीचे आई बाप दोघेही पॉझिटिव्ह आहेत व आता तिला ही सिंप् टम दिसत आहेत. वडील आय सी यू मध्ये आहेत. व त्यांना टोसिलिफब
औषधाची गरज आहे पण खारघरात ते मिळत नाही आहे. शोध चालू आहे. काही माहिती असल्यास नक्की इथेच द्या. मी कळवेन तिला.

आरोग्य सेतू अ‍ॅप मध्ये पण पॉझि टिव्ह अस्ताना जे लाल असते ते हिरवे होते. >>>> मी आरोग्यसेतु अँपवर गेले 6 महिने कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. ते लाल रंगात you are Covid positive वाचुन एवढा वैताग आला की गुढीपाडव्याच्या दिवशी आरोग्यसेतु डिलीट करून मी स्वतःला हेल्दी डिक्लेअर करून टाकलं. (BTW मला अजुन एकदाही कोव्हिड झाला नाही आणि हे govt ला सर्वप्रकारे सांगुन मी दमले आहे. माझे कोव्हिड टेस्ट रिपोर्ट्स इमेल, व्हाट्सअप्प, लेखी, तोंडी सगळीकडे पाठवुन झाले. आता फक्त छापुन रस्त्यावर उभं राहुन वाटायचे बाकी आहेत)

म्हणजे पॉझिटिव्ह नसताना पण ऍप पॉझिटिव्ह दाखवते?हे म्हणजे विचित्रच झालं.तेही 6 महिने?हा फारच मोठा बग आहे.
एकदा आरोग्य सेतू बनवणाऱ्या डेव्हलपर कंपनी ला सांगून बघ.

गुढीपाडव्याच्या दिवशी आरोग्यसेतु डिलीट करून मी स्वतःला हेल्दी डिक्लेअर करून टाकलं. >> Lol

पैशांच्या बाबतीत उलट होत असतं.
मी HDFC Bank चे स्विंग ट्रेड साठी काही शेअर्स घेतले होते. कालपासून ते माझ्या अकाऊंट मध्ये शून्य संख्या आणि म्हणुन गुंतवणूक शून्य आणि मार्केट व्हॅल्यू शून्य दाखवत आहे. पण निदान यादीत दिसत तरी आहेत. ते गायब होऊ नये म्हणुन काल ब्रोकरकडे तक्रार केली. आज संध्याकाळ पर्यंत ठीक होईल म्हणाले.

लक्षणे नसलेल्यांना अमुक इतक्या दिवसांनी आपो आप निगेटिव्ह = करोनामुक्त आणि सौम्य लक्षणे असलेल्यांना लक्षणे दिसायचे थांबल्यावर अमुक दिवसांनी + मिनिमम अमुक दिवसांनी दुसरी टेस्ट न करताच निगेटिव्ह मानायचे ना? अमांनी स्वतः होऊन दुसरी टेस्ट केली का?

अमांनी स्वतः होऊन दुसरी टेस्ट केली का?>> हो दुसरी टेस्ट केली ना आर टी पी सी आर. १४ दिवस विलगी करण झाल्यावर लॅब मध्ये जाउन फॉर्म भरून केली. नेक्स्ट डे लॅब ने फोन केला निगेटिव्ह आहे रिपोर्ट घेउन जा. तर त्या दिव शी बिल्डिंग सील झालेली. मग नेक्स्ट डे सकाळी तिने इ मेल केला. रिपोर्ट. तो ऑफिसच्या हेल्थ ऑफिसर ला पाठवला. १७ दिवस विलगी करण पूर्ण करून मगच पुढे काय ते. तरी मास्क लावूनच आहे.

मीरा च्या उलटा अनुभव माझ्या मित्राला आला. त्याचा लॅब रिपोर्ट पाॅझिटीव्ह , सगळी करोनाची लक्षणे आणि आरोग्य सेतू म्हणते You are safe .... तरी तो 24 तास blue tooth and location चालू ठेवतो.. तरी पण त्याचे app - no risk दाखवतेय.

Home quarantine च्या गोळ्या दिलेल्या असतात. त्या वेळेवर घ्याव्यात.
भरपुर आहार घ्यावा, म्हणजे चौरस आहार, जेवण जात नसेल तर थोड्या थोड्या वेळाने खावे. पोट भरलेले असले की वीक्नेस येत नाही.
पुरेसे पाणी प्या वे
आणि श्क्य तेव्हढी विश्रान्ती घ्यावी.
गार पाणी, गार वारं इत्यादी टाळावे.
जमेल तसे वाफ घेणे वगैरे करावे.

माझ्या मित्राचा ताजा अनुभव. स्थान - मालाड मुंबई
आईला अशक्तपणा , ऑक्सिजन सॅच्युरेश ९३-९५ असल्याने त्याने सोमवारी कोव्हिड टेस्ट बुक केली.
मंगळवार सकाळची वेळ मिळाली. टेस्ट झाली.
बुधवारी सकाळी लॅबकडून पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला.
त्याला मी मुंबै मनपाच्या वॉर्ड - वॉर रूमचे फोन नंबर दिले होते. त्याने फोन केल्यावर मनपावाल्यांनी त्याला आईला भरती करायला सांगितले.
वय ६०+ . तसंच सह आजार. सौम्य लक्षणे असल्याने त्याचा विचार घरीच ट्रीट करायचा होता.
मनपावाल्यांनीच गोरेगाव नेस्को सेंटरवर बेड उप लब्घ असल्याचे सांगून तो बुक केला. अँब्युलन्स पाठवली. तीत डॉक्टरही होता. हवा असल्यास ऑक्सिजनची सोय शक्य होती.
सेंटरवर पोचल्यावर प्रत्यक्ष बेड ताब्यात यायला मात्र ३ तास लागले. स्वच्छतागृहांची अस्वच्छता हा एक इश्यु आहे.
आईचे हेल्थ स्टेटस पाहण्यासाठी त्याला एका वेबसाइटची लिंक , युझर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे.

टेस्ट बुक करणे, रिझल्ट मिळणे, बेड मिळणे या गोष्टींना किती वेळ लागेल याबद्दल धाकधूक होती. त्या जवळजवळ विनासायास झाल्या.

ता. क. - घरची चादर - बेडशीट घेऊन जाणे.
चहा जास्त हवा असेल तर कप, पेला घेऊन जाणे.

In Mulund center people are even having table fans stand fans because ac is not so good. I just did antigen test ordered by company waiting for results

कोणी Home quarantine असेल तर आहार आणि दिनक्रम काय आणि कसा असावा?
माझी आई आणि बहिण साधारण असा दिनक्रम पाळत होत्या.....
सकाळी ऊठल्यावर कोमट पाण्यात चिमुट्भर हळद घलुन पिणे, नन्तर मधासोबत सितोपलादी घेणे, थोड्या वेळाने १ आवळा खाणे, ऑक्सिजन लेवल चेक करणे, मग इथेच एक लिन्क मिळाली होती त्यातिल दोघींना जसा झेपेल तसा व्यायाम करणे, तोपर्यन्त नाष्टा येई. मग काही खाण्या आधिच्या गोळ्या मग नाष्टा, त्या नन्तर विनोदी कार्यक्रम बघणे आणि स्वताचे आवरणे. तो पर्यन्त डबा येई. मग पुन्हा दुपारचे जेवण आणि गोळ्या. ते झाले की थोडी विश्रांती. उठल्यावर लिम्बू सरबत घेणे, थोड्यवेळाने एखादे फळ खाणे, पुन्हा एकदा श्वासाचा व्यायम करणे. ( दिवस भरात मिळुन थोड्या थोड्या वेळाने बहिंण आणि आई सोबत मधे मधे फोनवर दोन तिन वेळा बोलणे व्ह्यायचे) व्यायम झाल्यावर पुन्हा कर्यक्रम बघणे. दिवसभरात एकदा वाफ घेणे.मग सन्ध्याकळचे गोळ्या जेवण गोळ्या. पुन्हा एकदा ऑक्सिजन तपासुन डॉक ला पाठवणे. झोपताना पुन्हा वाफ घेणे, सितोपलादी घेणे आणि झोपणे.
या सगळ्यात बहिनी पेक्षा माझ्या आईने स्वताला मानसिक सन्तुलनाने चान्गले ठेवण्याचा चांनगला प्रयत्न केला. त्यांमुळे ती लवकर बरी झाली.
या सगळ्यात आम्ही पाळणर्‍या गोष्टी म्हणजे, फोनवरून त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांना धीर देत राहणे, ऑन्लाईन जमेल तशी मदत करणे आणि सगळ्यात महताचे म्हणजे ईतर नातेवाईकांचे कळणारे करोनाचे रिपोर्ट अथवा काही दुखद घटना या त्यांना न सांगणे. तसेच त्यांना फोन करणार्‍या ईतर नातेवाईकांना पण हे पाळायला सांगायचो.

निर्झरा,
खूप चांगला दिनक्रम आहे.

स्टीम इनहेलर - वाफा घ्यायचं उपकरण.
इथल्या इस्पितळात कोविड रुग्णांनी काय सोबत आणावे या गोष्टींच्या यादीत हेही पाहिले.

बर्‍या झालेल्या रुग्णांना फुफ्फुसाचा व्यायाम म्हणून स्पायरोमीटर वापरायला सांगतात का?

हे सगळं वाचून मला एकदम भरून येत आहे. माझा नवरा १७ एप्रिल पासून डार्विन, ऑस्ट्रेलिया मध्ये विलीगीकरणात आहे. इथे येणाऱ्या विमानात एकूण ४७ जणांना संसर्ग झाला त्यात हा पण होता. इथल्या नियमांप्रमाणे दिवसातून एकदा ताप चेक करतात आणि फोने वर  लक्षणे काय आहेत विचारतात. कोणतीही औषधे देत नाहीत, दिवसभराचे जेवण सकाळी ६ वाजता अजून देतात आणि रूम मध्ये मिक्रोवेव्ह नाही(पण फ्रिज आणि किटली आहे). त्याला खूप ताप आणि खूप कोरडा खोकला आहे. पण बिचार्याला थंडगार अन्न खाऊन त्रास होतोय. ब्रेकफास्टसाठी थंड दही आणि कॉर्नफ्लेक्स देतात. अन्न जात नाही, वाफ घ्यायला स्टीमर नाही, रूम मधला AC बंद करायचा नाही, रूम ची खिडकी उघडायची नाही. कोरड्या खोकल्यावर काही औषध देत नाहीत. अशाने  तो कसा बरा  होणार?! आणि खोकला पूर्ण गेल्याशिवाय घरी सोडणार नाही म्हणतायत! सगळंच अवघड आहे. तुरुंगवास परवडला ह्या पेक्षा! आपल्याकडे अजून कॉमनसेन्स वापरात आहेत हे पाहून खूप बरे वाटते. 

पल्वली,
लवकर बरं वाटुदे त्यांना.नळाला गरम पाणी असेल ना बहुधा?किंवा बाथ टब मध्ये थोडेफार शेक मिळवता येईल.
हॉटेल वाल्याना आयुर्वेदातले कफ चे धडे वाचायला द्यायला हवेत.

किटलीतून पाणी गरम करून घेता येईल पिण्यासाठी. तापावर आणि खोकल्यावर काही औषध देत नाहीत हे चूक आहे. रूमाल/टॉवेल च्या गार पाण्याच्या घड्या ठेवता येतील का? खोलीतलं तपमान उबदार ठेवता येईल का? अन्न आल्यावर लगेच खायचं नाही. नळाला गरम पाणी असेल तर त्या पाण्यात खाण्याचा बाऊल बुडवून ठेवता येईल किमान गारपणा जाण्यासाठी. फारच जुगाड स्वरूपाचे उपाय आहेत पण आत्ता हेच सुचतंय पटकन.

Pages