नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
तमालपत्र म्हणजे दालचिनीच्या
तमालपत्र म्हणजे दालचिनीच्या झाडाचे पान म्हणे. असे वाचनात आलेले मधे.
+१
+१
लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनॅमोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र (तेजपात) म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात सस. पासून ९००–२४०० मी. उंचीपर्यंत आढळून येतो. कापूर, दालचिनी या वनस्पतीही लॉरेसी कुलात येतात.
https://marathivishwakosh.org/19463/
Acacia catechu ह्याला काळा
Acacia catechu ह्याला काळा खैर किंवा खैर म्हणतात, पण ह्याला तमाल सुद्धा म्हणतात. हा रंगाने डार्क ब्राऊन असतो. खैराचे निखारे लाल लाल पेटतात. जेव्हा आपण एखाद्याचे डोळे खदिरांगारासारखे दिसत होते म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ डोळे खदिर म्हणजे खैराच्या धगधगत्या निखाऱ्यांसारखे दिसत होते असा असतो. हा वृक्ष निळा नव्हे पण काळसर दिसतो म्हणून कदाचित कृष्णाला तमालनील म्हटले असावे.
' अधिकारीक' हा शब्द प्रयोग
' अधिकारीक' हा शब्द प्रयोग बरोबर वाटतो का?
इथे वाचला : (https://krushimarathi.com/vande-bharat-train-breaking-mumbai-solapur-van...) :
… याबाबतचा अधिकारीक निर्णय अजून झालेला नसला तरी देखील रेल्वेमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिली असल्याने ….
***"
जसे प्रतिनिधी >>>> प्रातिनिधिक
तसेच,
अधिकारी >>> अधिकारीक ??
नियमानुसार पहिल्या अक्षराची
नियमानुसार पहिल्या अक्षराची वृद्धी व्हायला हवी. आधिकारिक. असा शब्द आहे का हे माहीत नव्हतं.
अधिकारिक आणि अधिकृत यात काय
अधिकारिक आणि अधिकृत यात काय फरक असेल?
अधिकृत हे धातुसाधित विशेषण
अधिकृत हे धातुसाधित विशेषण आहे, म्हणजे अमुक एक क्रियापद केलेले (भूतकाळवाचक) - असा अर्थ होतो. इक प्रत्यय हा धातूला नाही, तर नामाला लागतो. तो लावून विशेषण बनते. तिथे त्या मूळ नामाशी संबंधित असा अर्थ होतो. धर्माशी संबंधित धार्मिक, उपचाराशी औपचारिक, इत्यादी.
धन्यवाद.आधिकारिक >> ? नसावा.
धन्यवाद.
आधिकारिक >> ? नसावा.
https://en.m.wiktionary.org
https://en.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0...
हिंदीत हा शब्द आहे
ओ ! धन्यवाद.
ओ ! धन्यवाद.
अनवट हा अणवटचा अपभ्रंश.
अनवट हा अणवटचा अपभ्रंश.
त्याचा प्रवास संस्कृत >> गुजराती>>> मराठी असा झालेला दिसतो.
जालावर उपलब्ध असलेल्या तिन्ही कोशांमध्ये त्याचा असा अर्थ दिलेला आहे:
एक तऱ्हेचा रुप्याचा दागिना (पायांतील)
त्याची फोड अशी आहे
अण्वी = बोट + वृत्त. किंवा. का. आणीं = वाटोळेपणा + वृत-वेढे?
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%9F+
***
फक्त अण् चा एक वेगळा अर्थ आहे:
अण् = शब्द करणें.
प्रश्न असा आहे की..
गाण्याची अनवट चाल, अनवट राग इत्यादीमध्ये अनवट म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा, हा अर्थ कुठून आला ?
वट = वेगळा ? की
(वेगळी) वाट ??
अनन्यवत् असावे का?
अनन्यवत् असावे का?
प्राकृत आणि यादवकालीन शब्दांसाठी ' तुळपुळे फेल्ड हाऊस ' पाहायला पाहिजे. माझ्याकडे हा कोश नाही. उगम कदाचित मिळेल.
मराठीत अनवट राग म्हणजे अगदी वेगळा राग.
अनवट म्हणजे मी अशी वाट
अनवट म्हणजे अशी वाट ज्यावरून सहसा कुणी जात नाही हा अर्थ घेते. इंग्रजीतून Road less traveled.
अनवट म्हणजे अशी वाट ज्यावरून
अनवट म्हणजे अशी वाट ज्यावरून सहसा कुणी जात नाही
>>
बरोबर. फक्त हा अर्थ आपल्याला सहज उपलब्ध कोशांमध्ये मिळत नाही.
हीरा म्हणतात त्याप्रमाणे विशिष्ट कोश पाहावे लागतील
शोधलं, नाही सापडलं.
शोधलं, नाही सापडलं.
मी 'अनवर्त भूमंडळी' पर्यंत बघून आले. ते पूर्ण वेगळं आहे.
खरंय !
खरंय !
..
रच्याकने ..
अतरंगी शब्दाचेही तेच आहे. कोशात मिळत नाही.
हा शब्द आधुनिक धरायचा की प्राचीन ?
आधुनिक
आधुनिक
आधुनिक.
तुळपुळे Feldhaus मध्ये सुद्धा नाही.
ठीक.
ठीक.
तुळपुळे Feldhaus हे नाव तुमच्यामुळे प्रथमच कळले.
Anne Fekdhaus ह्यांना भेटायची
धन्यवाद.
Anne Fekdhaus ह्यांना भेटायची संधी खूप वर्षांपूर्वी मिळाली होती. कै.श्री तुळपुळे ह्यांनी महाराष्ट्रातल्या कोरीव लेखांची सूची करून त्यांवर महत्त्वाचे लिखाणही केले आहे त्यामुळे त्यांचे नाव आणि साहित्य माहीत होते. यादव काल हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.
मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ
मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ
हे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहेत असा माझा समज होता/ आहे. (पुढचे / मागचे.. पान/ बाजू )
परंतु, मलपृष्ठ या शब्दाचा दोन शब्दकोशांमधील अर्थ पूर्ण वेगळा दिलेला आहे :
१. पुस्तकाच्या आरंभीचें कोरें पान
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%B2)
२. पुस्तकाचे आरंभीचें पान
( छापील शब्द रत्नाकर).
अन्य एका लेखात (https://www.weeklysadhana.in/view_article/arun-nerurkar-remembering-85-o...) परिमलपृष्ठ हा शब्द वापरलेला आढळला.
“पुस्तकांची छपाई, बांधणी (पेपरबॅक आणि हार्डकव्हर), मुखपृष्ठ, परिमलपृष्ठ आणि ब्लर्ब, ..”
परिमलपृष्ठ म्हणजे पुस्तकाचे मागची बाजूच म्हणायचे ना ?
परंतु, परिमल म्हणजे सुगंध.
"मागचा" असा अर्थ काय कुठे सापडला नाही.
मग ही सगळी मोट कशी बांधायची ?
<< ही सगळी मोट कशी बांधायची ?
<< ही सगळी मोट कशी बांधायची ? >>
क्लिष्टता कमी करायची. पुढील पान/मागील पान किंवा पहिले पान/शेवटचे पान असे म्हणायचे.
उ बो
उ बो
मलपृष्ठ वाचलं की उगाच घाण वाटायचं, आता परिमलपृष्ठ वाचून त्यावरच अत्तर शिंपडल्यासारखे वाटत आहे.
साधनामध्ये मलपृष्ठचं चुकून
साधनामध्ये मलपृष्ठचं चुकून परिमलपृष्ठ झालं नसेल ना?
मलाही चुकूनच छापलेलं वाटतंय.
मलाही चुकूनच छापलेलं वाटतंय.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
मलपृष्ठचं चुकून परिमलपृष्ठ झालं नसेल ना? >>>
कदाचित चुकूनही झाले असेल. परंतु 'मल' म्हणजे आरंभीचे, ही माहिती कोशातून प्रथमच कळली.
मलपृष्ठ वाचलं की उगाच घाण
मलपृष्ठ वाचलं की उगाच घाण वाटायचं, आता परिमलपृष्ठ वाचून त्यावरच अत्तर शिंपडल्यासारखे वाटत आहे +१
चुपके चुपके मधला, 'परि-मल?' म्हणणारा ओमप्रकाश डोळ्यासमोर आला.
ती वहिनी फक्त बोलणं ऐकून
ती वहिनी फक्त बोलणं ऐकून नाकाला पदर लावते. Go , do !
हो. मला पण मलपृष्ठ म्हणजे
हो. मला पण मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पानच वाटायचं. मी वाचलेले पुस्तक या धाग्यावर लिहिताना एकदा ब्लर्बला मराठी शब्द शोधत होतो तेव्हा मलपृष्ठ म्हणजे पहिले कोरे पान हे कळले. शेवटच्या कव्हर पेजला काय म्हणतात ते अजूनही कळले नाही.
"'मल' म्हणजे आरंभीचे"
"'मल' म्हणजे आरंभीचे"
हे सर्वांना पटतेय का ?
मल** म्हणजे मागचे आणि मुख** म्हणजे पुढचे, असे अगदी शालेय जीवनापासून शिकवले गेले आहे.
Pages