चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हो, मनात विचार आलेला.
पण मग ऑन ए सेकंड थॉट असाही विचार केला की तसेही शाहरूखला बघून तुम्हाला मीच आठवणार असेल तर शाहरूख काय आणि मी काय.....
आणि बघा..
तसेच झाले Happy

चला शुभरात्री Happy

धागा आज आत्ता वाचला. १८-४-२२ च्या विधीच्या पोस्ट विषयी सांगावेसे वाटते. फार पूर्वी विधान सभेला legislative council असा शब्द होता. आणि विधान परिषदेला legislative assembly. दोन्हींना मिळून मला वाटते कायदेमंडळ म्हणत असत. तेव्हा पदनामकोशाचे काम चालू होते आणि कठीण शब्द वापरले जात असल्याने तो बदनाम कोश (आ अत्रे) झाला होता. एकदा law साठी विधी हा शब्द सुचवण्यात आल्याचे त्यांना कळले. ते तेव्हा विधिमंडळाचे सदस्य होते. तेव्हा ते सभागृहातच म्हणाले होते की काय हा शब्द. म्हणजे उद्या आम्ही सभागृहात विधी करतो असे होईल.( किंवा, उद्या आम्हांला सभागृहात विधी करावे लागतील)
वाक्य कसेही असले तरी विधि वरची कोटी आचार्य अत्र्यांचीच आहे.

*तातडीची सूचना*

सर्व पोलीस ठाण्यांपासून नागरिकांना सांगण्यात येते की , रस्त्यावर आता अशी मुलं दिसतात त्यांच्याकडे त्यांचा घराचा पत्ता लिहिलेला कागद असतो ते मूल हरवल्याचा दावा करतात.
जर तुम्हाला ही मुले दिसली तर त्यांना लिखित पत्त्यावर नेऊ नका कारण तेथे काही लोक तुमची हत्या करण्यासाठी, तुमचे शारीरिक अवयव काढून घेण्यासाठी किंवा महिलेचा बलात्कार करण्यासाठी वाट पाहत आहेत,
म्हणून तश्या मुलांना त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा जवळच्या आपत्कालीन वस्तीवर घेऊन जा. पण त्यांच्याकडे असलेल्या पत्यावर चुकूनही जाऊ नका . पाहिजे तर ताबडतोब जवळच्या पोलिस स्टेशन ला जाऊन हा प्रकार सांगा.

कृपया हे सगळीकडे प्रसारित करा. ही बाब 100% खरी आहे . काही ठिकाणी हे प्रकार घडले आहेत . म्हणून आपण चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका. उगाच नको त्या अडचणीत फसू नका.

हे तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा.

तुमचे हितचिंतक.....,
*महाराष्ट्र पोलीस*

टाटा सारखे व्यक्तीमत्व कधीतरी सारासार न विचारता डिसिजन्स घेतील का ? आणि अशाप्रकारे इगोस्टिक बोलतील का? हे वरचे वाक्य एखाद्या शाहरुखच्या पिक्चर मधल्या माफिया ने म्हटल्यासारखे सारखे वाटतय. Lol
'गलत डिसिजन' शब्द डिक्शनरी मे हैईच नही हमारे||
हम जो भी डिसिजन लेता है उसको 'करेक्ट डिसिजन' बनाता है||

किंवा दवणीयः
कुठ्लाच निर्णय कधी चुकीचा नसतो |
कारण निर्णय घेतल्यावर मी तो बरोबरच करतो ||

>> टाटा सारखे व्यक्तीमत्व कधीतरी सारासार न विचारता डिसिजन्स घेतील का ? आणि अशाप्रकारे इगोस्टिक बोलतील का?

तसे नव्हे. कधी कधी निर्णयाचे परिणाम काय होतील याबाबत संधिग्दता असते. योग्य की अयोग्य हे काळ ठरवतो. हातात वेळही कमी असतो. अशा वेळी निर्णय घ्यावा लागतो आणि त्याबाबत सकारात्मक रहावे लागते. या दृष्टीने ते उद्गार प्रेरणादायीच वाटतात. पण ते टाटांच्या तोंडी घालण्यात आलेत.

मुन्शी प्रेमचंद यांनी कविता लिहिल्यात का? एक फॉर्वर्ड आलाय. गुगल बाबांना विचारलं तर अशा अनेक दिसताहेत. कविता कोष'वर जाऊन पाहायला हवं.

कविता लिहिल्याचे कधी ऐकले नाही.
कदाचित त्यांच्या कथा/कादंबऱ्यातील उतारे कविता म्हणून व्हायरल होत असतील का?
जसे हे:

Screenshot_20221004-110836_Chrome.jpg

मी कसा आहे..?

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे.

एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते.

तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला.

"आज कसं येणं झालं..?"

उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले.

कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे.

घरमालक विनम्रपणे म्हणाला,"मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं."

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा."

एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.

घरमालक उद्योगपतींलना म्हणाला," तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते."

यावर उद्योगपती हसले व म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे."

"माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो."

घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता.

उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले.

तिथे बरीच गर्दी होती.

उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,

"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका."

उद्योगपती म्हणाले,

"आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही."

"उद्योगपती" "हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे."

"मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे."

एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले.

रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली.

त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत.

सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात.

त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली.

लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते.

त्या दिवशी एक प्रसंग घडला.

हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.

त्यामुळे ती घाबरली.

तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.

ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली.

तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार..

उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'"

हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा."

उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड."

उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली.

तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.

त्याची उत्सुकता चाळविली गेली.

तो उद्योगपतींना म्हणाला, "साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??"

उद्योगपती म्हणाले, "अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले."

ते मला म्हणाले होते, "तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. 'तू कसा आहेस' हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा."

"तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे."

मला हे पटले आहे की, "खरोखरच आपण कोण आहोत' हे महत्त्वाचे नसतेच."

'आपण कसे आहोत' यावर आपली किंमत ठरते.'

"जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते."

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव ..

'रतन टाटा…'

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी..

कुठलीही गुंतागुंत नसलेली.. अशी असतात.

खरेतर...साधे राहणे हेच कठीण असते.

व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे...

म्हणूनच, "तुम्ही कोण आहात?"

हे महत्वाचे नाही.

"तुम्ही कसे आहात?"

हे महत्वाचे आहे...

>>>>>

रतन टाटांच्या नावाने आलेले आहे, त्यामुळे सांगता येत नाही हे खोटं आहे का खरं आहे (इति हर्पा).

काय काय करायला लावतात हे लोक रतन टाटाना Uhoh
भाड्याच्या घरात थांबवतात, रांगेत तिष्ठत उभे करतात, लहानपणी दाईला लाथ मारायला भाग पाडतात, मग त्यांच्या वडीलाना त्यांना बदडून काढायला सांगतात, विमानात बसायला लावून हवाई सुंदरीला त्यांच्या अंगावर पेय सांडायला सांगतात.

>> उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड."
>> उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली.

हे ऐकल्यावर वास्तविक एखादया हवाई सुंदरीला घाबरून चक्कर आली असती. हे साधे वाक्य नाही. उद्योगपती हे रतन टाटा ऐवजी सिनेमातले अमरीश पुरी आहेत अशी कल्पना करा म्हणजे त्या वाक्याचा खरा अर्थ कळेल Lol Come on, it's clear that her job is at risk. Whoever he is. पण नाही. यांच्या हवाई सुंदरीला हे ऐकून 'खुदुकन' हसू येते.

हद्द आहे Rofl अक्षरशः हसून हसून पुरेवाट झाली हे वाचून.

उद्योगपती हे रतन टाटा ऐवजी सिनेमातले अमरीश पुरी आहेत अशी कल्पना करा म्हणजे त्या वाक्याचा खरा अर्थ कळेल >> Lol Lol

वाचलेले आहे, पण काही तपशील वेगळे होते तेव्हा नक्कीच.
बहुतेक इकडले तिकडले ऐकीव (म्हणजे वाचीव म्हणावे लागेल आता) किस्से एकत्र करून टाटांच्या नावावर खपवलेत.
ड्रायव्हर विमानात सुद्धा? असे वाटुन गेले वाचताना. पण या नवनीतहृदयी उद्योगपतीने ड्रायव्हरला नको का विमानप्रवास अनुभव म्हणुन सोबत नेले असणार हे पण लक्षात आले.

-----------------
उद्योगपती हे रतन टाटा ऐवजी सिनेमातले अमरीश पुरी आहेत अशी कल्पना करा म्हणजे त्या वाक्याचा खरा अर्थ कळेल >> Lol

नेताजी बोस, रतन टाटा, महात्मा गाँधी इंग्रजीत, गुलज़ार, हरिवंश राय बच्चन हिंदीत आणि पु. ल, व. पु, शिरवाडकर- कुरुंदकर मराठीत. यांच्या नावाने अत्यंत टिनपाट कोट्स/ कविता/किस्से येतात. बिच्चारे !

ऐतिहासिक फ़ॉरवर्डस मधे सर्व महापुरुष सात फूट उंच, ६० मणाचा भाला, स्वत:चे शीर कापले तरी १००० शत्रु मारुन मरणे वगैरे.

फालतू inspirational quotes साठी नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील ही नावे फेवरेट Happy

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.>>>>

हा ड्रायव्हर आहे का डॉ वॉटसन, सगळीकडे नुसता बघतोय आणि तरीही शेवटी उद्योगपतीला सगळं त्याला समजावून सांगायला लागतंय

ड्रायव्हर .
एक असा व्यक्ती असतो त्याला त्याच्या मालका बाबत सर्व काही माहीत असते .
जे मालकाच्या बायकोला पण माहीत नसते.
कोणत्या दरवाजातून आत जातो कोणत्या दरवाजाने बाहेर येतो सर्व काही.
कुठे जाणार आहे,किती वेळ थांबणार आहे सर्व सर्व
इति.
अजित पवार

टाटांच्या नावावर खपवलेले अजून एक फॉरवर्ड.......

------------------------------------------------------
*“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*
जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का"?
रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."
पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.
मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.
त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.
चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.
पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”
मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.
मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."
वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?
*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

Pages