चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतय की बोकलत हा एक अर्थपूर्ण शब्द झालाय आता. काल नीलम गेम च्या धाग्यावर भूत, पिशाच्च असे शब्द येत होते तर पुढचा शब्द बोकलत आला आणि नन्तर अमानवीय वगैरे. घ्या आता माझा इंडिक किबोर्ड पण बोक लिहिल्यावर बोकलत सजेस्ट करतोय.

ऑफिसात पण बोकलत नावाने प्रसिद्ध आहात का हो???>>>>नाही. मी कंपनीत तात्या नावाने प्रसिद्ध आहे. शाळेत असताना एका फोटोत मी तात्या विंचूसारखा दिसत होतो तेव्हापासून तात्या माझं टोपणनाव पडलं. चेपूच्या माध्यमातून ते नाव सगळीकडे पसरलं त्यामुळे कंपनीतपण मला तात्याचं बोलतात.

>> हे खरोखरच काही दिवसांपूर्वी माझ्या नावाने कंपनीत फॉरवर्ड झालं होतं. Hr ची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले होते.
>> Submitted by बोकलत on 8 December, 2020 - 23:32

आता आलं ध्यानात. चुकीच्या नावानं फॉरवर्ड झालं. तात्या नावानं व्हायला हवं होतं.

बोकलत हे तात्या असतील, तर त्यांचे मायबोलीय सर्वच लेखन आणि प्रतिसाद हे 'चुकीच्या नावाने...'च्या अंतर्गत घेता येईल.

थर्ड ईयर ला असताना शेजारच्या वर्गातल्या एका अतिसुंदरी ला (जी आऊट ऑफ माय लीग होती) माझ्या नावाने प्रेमपत्र पाठवण्यात आले होते.
>>> हे सुद्धा "चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स" यात येईल का? Proud Biggrin

अभिनंदन संशोधक. तुम्ही अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लता मंगेशकर, बिल गेट्स इत्यादी लोकांच्या यादीत जाऊन बसलात Wink

*मिसेस कोणाला म्हणतात?*
*माहित आहे ?*

*युरोपीय देशात पती पत्नी आयुष्यभर कधीच एकत्र राहू शकत नाही, ही ब्रिटीशांची हजारो वर्षांची परंपरा आहे. घटस्फोट जणुकाही करायचेच असतात.*

*धर्मपत्नीला सोडून ज्या स्त्रियांशी संबंध येतात, तिला मिसेस म्हणतात.*

*आणि*

*आपला नवरा सोडून ज्याच्याशी संबंध येतात, त्याला मिस्टर म्हणतात.*

*आपल्या संस्कृतीमधे किती सुंदर शब्द वापरलाय, श्रीमती.!*

*श्रीमती*-

*श्री म्हणजे लक्ष्मी,*
*मती म्हणजे बुद्धी.*

*म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिच्यामधे एकत्र असतात, ती श्रीमती.*

*आमची संस्कृती सोडून आम्ही आपल्या धर्मपत्नीची ओळख माझी मिसेस म्हणून करून द्यायला सुरवात केली.*

*मानसिक गुलामी एवढी जास्त की, शब्दापेक्षा, अर्थापेक्षा इंग्रजीत ओळख करून द्यायची हौस जास्ती.*

*अर्थ माहित नाही, म्हणून लाजही वाटत नाही.*

*पण ज्याला अर्थ माहित आहेत, त्या विद्वानाने काय अर्थ काढायचे ?*

*युरोपमधे मॅडम कोणाला म्हणतात ?*

*वेश्यागृहाना संचालीत करणारी जी मुख्य बाई असते, तिला मॅडम म्हणण्याची पद्धत आहे.*

*भारतात कोणाला मॅडम म्हणतात ?*

*आम्ही आमच्या शिक्षिकांना मॅडम म्हणतो,* *अनोळखी स्रियांना हाक मारताना मॅडम म्हणतो.*

*एवढेच नाहीतर कधीतरी आपल्या बहिणीला, आत्तेला, मावशीला पण आदराने मॅडम म्हणतो.*

*शिवीसारखा असलेला शब्द या गुलामगिरी मुळे आदरामधे बदलला गेला.*

*किती अर्थाचे अनर्थ होतात,पण लक्षात घेत कोण ?*

*आम्ही दूरध्वनी वरील संभाषणाची सुरुवात *हॅलो* *या शब्दाने करतो.*

*शब्दांचा अर्थ माहित नसतानाही केवळ इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या गुलामगिरीचे हे आणखी एक उदाहरण..!!*

*दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला त्या ग्राहम बेलने हे यंत्र सुरु होताच पहिला फोन आपल्या प्रेयसीला लावला.*

*तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली .."हॅलो !!"*

*हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव होते. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव घेवून करतो.*

*आहे की नाही अज्ञानातील गुलामगिरी....!!*

*अॅकॅडमीचे आकादमी हे रुपांतरही असाच आमचा मूर्खपणा आहे.*

*अॅकॅडमस नावाच्या व्यक्तीच्या अंगणात प्लुटोची व्याख्याने होत होती.*

*हे ज्ञानसत्र अॅकॅडमसच्या अंगणात चालते म्हणून ती अॅकॅडमी....!!*

*आम्ही त्याचे रुपांतर केले अकादमी ...!!*

*खर तर आपण प्रबोधिनी किंवा प्रबोधिका म्हणणे अधिक अर्थपूर्ण आहे.*

*पण आम्हाला लाज वाटते अशी नावे द्यायची.*

*विकृत चालेल पण संस्कृत नको, ही आणखी एक मानसिक गुलामगिरी ....!!*

*पाश्चिमात्य देशात घटस्फोट झाले की मुलांना कुणी सांभाळायचे असा प्रश्न आहे. तिथं अशा मुलांसाठी ज्या संस्था आहेत त्यांना कॉन्व्हेंट म्हणतात.*

*आम्ही इंग्रजी शाळात मुलांना घातलय हे अभिमानाने सांगण्यासाठी माझ मूल कॉन्व्हेंट मध्ये आहे हे कॉलर ताठ करुन सांगतो....!!*

*लाजीरवाण्या गुलामगिरीचे हे उदाहरण ....!!!*

*असे खूप शब्द आहेत. ज्यांचे अर्थ माहित नाहीत पण आपण ते वापरतो.*

*कारण काय तर मातृभाषेची लाज वाटते आणि इंग्रजीत प्रगती वाटते.*

*मराठी_बोला*
*संस्कृती_टिकवा.*

Husband वरचा मला फॉरवर्ड झालेला जोक म्हणजे लग्नानंतर त्याचे हसणे बंद होते म्हणून Husband

*हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव होते. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव घेवून करतो.* >> Biggrin
आमचंच नशीब थोर की तो वेंकटपावनीभानूचंद्रिकेच्या प्रेमात नव्हता. नाहीतर रोज "वेंकटपावनीभानूचंद्रिका, काकू, मी सीमंतिनी बोलत्ये" अशी सुरूवात...

दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला त्या ग्राहम बेलने हे यंत्र सुरु होताच पहिला फोन आपल्या प्रेयसीला लावला.*

*तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली .."हॅलो >>> प्रेयसीकडे आधीच फोन होता तर याने कसला शोध लावला? Lol

पिनी, हे भोंदू फॉरवर्ड्स ह्या धाग्यात जायला हवं आहे.

>> तो धागा आरोग्याविषयी भोंदू फॉरवर्ड्सबद्दल आहे असे वाचल्याचे आठवते.
इथे ग्रॅहम बेल आहेच की तुमची कंडिशन भरायला. Happy

बाकी लोक म्हणत असतील हॅलो वगैरे आमच्या इथे मात्र दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला जो नैसर्गिक तुसडेपणा येतो तो आवाजात आणून "कोणे" असे विचारतात Wink

>>>>प्रेयसीकडे आधीच फोन होता तर याने कसला शोध लावला? Lol<<
सही पकडे है Wink<<
कुठ्लाहि नविन प्रॉडक्ट रिलीज करण्याआधी त्याचं टेस्टिंग करताना टेस्टबेड्स उभारावे लागतात हि ट्रिव्यल बाब इथे सखेद नमूद करतो... Proud

हो, पण टेस्ट सेट अप असेल आणि प्रयोगशाळेत पहिल्या चाचणीच्यावेळी दुसऱ्या एन्ड ला प्रेयसीला जरी उभं केलं असेल तरी "पहिला फोन प्रेयसीला लावला" हे विधान भारीच आहे.

Pages