चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

काही ही असू पण टाटा ह्यांचे अनेक उद्योग आहेत .
सुई पासून सर्व उत्पादन दे करतात.
अंबानी गॅस , खनिज तेलसोडला तर (सरकारी मेहरबानी म्हणून कृष्णा गोदावरी खोरे दान केले आहे)
एक पण क्षेत्रात ह्यांचे नाव नाही तरी श्रीमंत आहेत.
आणि टाटा सर्व क्षेत्रात आहेत पण श्रीमंत लोकांच्या यादीत नाहीत.
ह्या वरून समजून जा ते सामाजिक बांधिलकी देशांशी बांधिलकी असणारे उद्योगपती आहेत

काही ही असू पण टाटा ह्यांचे अनेक उद्योग आहेत .
सुई पासून सर्व उत्पादन दे करतात.
अंबानी गॅस , खनिज तेलसोडला तर (सरकारी मेहरबानी म्हणून कृष्णा गोदावरी खोरे दान केले आहे)
एक पण क्षेत्रात ह्यांचे नाव नाही तरी श्रीमंत आहेत.
आणि टाटा सर्व क्षेत्रात आहेत पण श्रीमंत लोकांच्या यादीत नाहीत.
ह्या वरून समजून जा ते सामाजिक बांधिलकी देशांशी बांधिलकी असणारे उद्योगपती आहेत

IMG-20230222-WA0005.jpg

शिवलिंग किरणोत्सर्गी आहेत का?
हो १००% खरे आहे!!
भारताचा रेडिओ क्रियाकलाप नकाशा उचला, तुम्हाला आश्चर्य वाटेल! भारत सरकारच्या अणुभट्टीशिवाय सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सर्वाधिक किरणोत्सर्ग आढळतो.
शिवलिंग हे दुसरे काही नसून अणुभट्ट्या आहेत, म्हणूनच त्यांना जल अर्पण केले जाते, जेणेकरून ते शांत राहतील.
महादेवाचे सर्व आवडते पदार्थ जसे की बिल्वपत्र, आकमाड, धतुरा, गुळधाळ इत्यादी सर्व अणुऊर्जा भिजवणारे आहेत.
कारण शिवलिंगावरील पाणीही रिअॅक्टिव्ह होते, त्यामुळे ड्रेनेज ट्यूब ओलांडली जात नाही.
भाभा अणुभट्टीची रचनाही शिवलिंगासारखी आहे.
नदीच्या वाहत्या पाण्यासोबत शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी औषधाचे रूप घेते.
म्हणूनच आमचे पूर्वज आम्हाला म्हणायचे की महादेव शिवशंकर रागावले तर प्रलय येईल.
आपल्या परंपरांच्या मागे किती खोल विज्ञान दडलेले आहे ते पहा.
ज्या संस्कृतीच्या पोटातून आपण जन्म घेतला, ती शाश्वत आहे.
विज्ञानाला परंपरेचा गाभा म्हणून परिधान केले आहे जेणेकरून ते एक प्रवृत्ती बनले पाहिजे आणि आपण भारतीयांनी नेहमीच वैज्ञानिक जीवन जगले पाहिजे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात अशी महत्त्वाची शिव मंदिरे आहेत जी केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत एकाच सरळ रेषेत बांधलेली आहेत. आश्चर्य वाटते की आपल्या पूर्वजांकडे असे कोणते विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आजपर्यंत आपल्याला समजले नाही? उत्तराखंडचे केदारनाथ, तेलंगणाचे कलेश्वरम, आंध्र प्रदेशचे कलहस्ती, तामिळनाडूचे एकंबरेश्वर, चिदंबरम आणि शेवटी रामेश्वरम मंदिरे 79°E 41'54′′ रेखांशाच्या भौगोलिक सरळ रेषेत बांधलेली आहेत.
ही सर्व मंदिरे निसर्गाच्या 5 घटकांमध्ये लिंग अभिव्यक्ती दर्शवतात, ज्याला आपण सामान्य भाषेत पंचभूत म्हणतो. पंचभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि अवकाश. या पाच तत्वांवर आधारित या पाच शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे.
तिरुवनाइकवाल मंदिरात पाण्याचे प्रतिनिधित्व केले जाते,
तिरुवन्नमलाईमध्ये आगीचे प्रतिनिधित्व केले जाते,
कलहस्तीमध्ये वारा दर्शविला जातो,
कांचीपुरम आणि शेवटी पृथ्वीचे प्रतिनिधित्व केले जाते
चिदंबरम मंदिरात अवकाश की आकाशाचं प्रतिनिधित्व!
ही पाच मंदिरे वास्तू-विज्ञान-वेदांचा अद्भुत मेळा दर्शवितात.
ही मंदिरे भौगोलिकदृष्ट्याही विशेष आहेत. ही पाच मंदिरे योग शास्त्रानुसार बांधली गेली आहेत आणि एकमेकांशी एका विशिष्ट भौगोलिक संरेखनात ठेवली आहेत. यामागे काही तरी शास्त्र असावे ज्याचा परिणाम मानवी शरीरावर होईल.
ही मंदिरे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आली, जेव्हा त्या ठिकाणांचे अक्षांश-रेखांश मोजण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मग इतक्या अचूकपणे पाच मंदिरे कशी बसवली गेली? याचे उत्तर फक्त देवालाच माहीत आहे.
केदारनाथ आणि रामेश्वरममधील अंतर 2383 किमी आहे. पण ही सर्व मंदिरे जवळपास एकाच समांतर रेषेत आहेत. अखेर, हजारो वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राचा वापर करून ही मंदिरे समांतर रेषेत बांधली गेली, हे अजूनही गूढच आहे.
श्रीकालहस्ती मंदिरातील लुकलुकणारा दिवा हा हवेतील घटक असल्याचे दर्शवतो. थिरुवनिक्का मंदिराच्या आतील पठारावरील पाण्याचे झरे हे पाण्याचे घटक असल्याचे दर्शवतात. अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा तो अग्नि तत्व असल्याचे दर्शवितो. कांचीपुरमच्या वाळूचे स्व-तत्व हे पृथ्वी तत्व असल्याचे दर्शवते आणि चिदंबरमची निराकार अवस्था ईश्वराचे निराकार म्हणजेच आकाश तत्व दर्शवते.
आता हे आश्चर्यकारक नाही की विश्वाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारे पाच लिंग एकाच ओळीत शतकांपूर्वी स्थापित केले गेले आहेत.
आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा की त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आधुनिक विज्ञान देखील ओळखू शकत नाही.
असे मानले जाते की केवळ ही पाच मंदिरेच नाही तर या रेषेत अनेक मंदिरे असतील जी केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत एका सरळ रेषेत येतात. या ओळीला 'शिवशक्ती अक्षरेखा' म्हणूनही ओळखले जाते, कदाचित ही सर्व मंदिरे 81.3119° E मध्ये येणार्‍या कैलासला लक्षात घेऊन बांधली गेली आहेत!?
याचे उत्तर फक्त
भगवान शिवालाच माहीत आहे.
आश्चर्यकारक गोष्ट 'महाकाल' उज्जैनमधील उर्वरित ज्योतिर्लिंगांमधील संबंध (अंतर) पहा.
उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी
उज्जैन ते ओंकारेश्वर - 111 किमी
उज्जैनपासून भीमाशंकर- 666 किमी
उज्जैन ते काशी विश्वनाथ- 999 किमी
उज्जैन ते मल्लिकार्जुन - 999 किमी
उज्जैन ते केदारनाथ - 888 किमी
उज्जैन ते त्र्यंबकेश्वर- 555 किमी
उज्जैन ते बैजनाथ- 999 किमी
उज्जैन ते रामेश्वरम - 1999 किमी
उज्जैन ते घृष्णेश्वर - 555 किमी
ऋषीमुनी - भारतात विनाकारण काहीही केले जात नाही.
सुमारे २०५० वर्षांपूर्वी उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित उपकरणे तयार करण्यात आली आहेत.
आणि जेव्हा
100 वर्षांपूर्वी इंग्रज शास्त्रज्ञाने पृथ्वीवरील काल्पनिक रेषा (कर्क) तयार केली तेव्हा त्यातील मधला भाग उज्जैनचा निघाला. आजही सूर्य आणि अवकाशाविषयी माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक उज्जैनमध्ये येतात.
*ज्ञानवर्धक वाचा*
नव्या पिढीला ही सांगा

भ्रमर, भारीच आहे ही पोस्ट. पण ही भोंदू फॉरवर्ड किंवा काहीच्या काही फॉरवर्ड धाग्यावर जास्त योग्य होईल.

>> उत्तराखंडचे केदारनाथ, तेलंगणाचे कलेश्वरम, आंध्र प्रदेशचे कलहस्ती, तामिळनाडूचे एकंबरेश्वर, चिदंबरम आणि शेवटी रामेश्वरम मंदिरे 79°E 41'54′′ रेखांशाच्या भौगोलिक सरळ रेषेत बांधलेली आहेत.

हे मात्र खरे आहे. गुगल मॅप वर बघितले.

सातबारा उताऱ्या बाबत अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा मेसेज फिरतोय सोमि वर:

पण सातबारा हा शब्दप्रयोग महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात त्याच्याशी संबंधित आहे असे विकिपीडियावर आहे.

Proud
पूर्वी जमीनीच्या नोंदी नीट होत नसत आणि त्यातून खूप वाद निर्माण होत असत.
त्यावेळी आश्विनराव आणि फाल्गुनराव या दोन शेतकरी बधुंनी नोंदी कशा कराव्यात याबाबत संशोधन करून अचूक नोंदीचा प्रस्ताव मांडला आणि तो लगेच संमत झाला आणि लोकप्रिय झाला.
त्याला आश्विन फाल्गुनचा उतारा असे नाव पडले.
पुढे जाऊन बहुतेक कायद्यांना क्रमांकाने संबोधल्या जाऊ लागले तेव्हा या उताऱ्याला पण क्रमांक देण्याचा प्रस्ताव आला.
काय बरं द्यावा क्रमांक? तर आश्विन हा सातवा मराठी महिना आणि फाल्गुन हा बारावा. तेव्हा सात बारा हा क्रमांक देण्यात आला आणि सात बाराचा उतारा हे नाव वापरायला लागले. Wink

अगदी हेच माझ्या मनात आलं होतं. स्वच्छ सुंदर वळणदार टपोऱ्या मोत्यासारख्या अक्षरात धादांत खोटे लिहितात Lol (निदान स्वच्छ अक्षराचे तरी मार्क मिळतील असा विचार करत असतील काय)

@मानव Lol

मानव Lol
काही दिवसांनी हे पण व्हॉट्सॲप वर फिरायला लागेल बरं का! Wink

खूप वर्षांपूर्वी वल्कले गुरूजी नावाचे एक देवर्षी होते. त्यांचा वास (वावर) दख्खन आणि निजामाच्या राज्यात होता. कोकणातही ते जात असत. खानदेशात सुद्धा त्यांना बोलावल्याचे उल्लेख कावळे बखरीत सापडतात.

कोणतीही समस्या आली कि वल्कले गुरूजींना पाचारण केले जायचे. वल्कले गुर्जी त्या व्यक्तीला / गावाला / राज्याला त्यांच्या जमिनीत लागवड केलेली लिंबे मागत. लिंब हे ज्यांची समस्या आहे त्यांच्याच जमिनीतले असावे ही प्रमुख अट होती. बाकि काही नाही. कधीही वल्कले गुर्जींना बोलवावे लागेल यासाठी दुष्काळ असो कि सुकाळ, पीक पाणी असो कि नसो, जमिनीच्या एका तुकड्यात प्रत्येक जण लिंबू लावत असे.

गुरूजी सात वर्तुळे काढत. त्यात बारा लिंबे ठेवत. जेव्हढ्या व्यक्ती तेव्हढी गुणिले सात वर्तुळे आणि गुणिले बारा लिंबं ठेवावी लागत. यालाच उतारा म्हणत. मग गुरूजी मंत्र पुटपुटत. आणि समस्या दूर होत असे. यामुळे गुर्जींची लोकप्रियता वाढली होती.

पण गुरूजी आठवड्याचे पाच दिवस आणि फक्त चार तास (हाफ डे) काम करत. शनिवार रविवार ते कोकणात समुद्रावर जात असत. ते जिथे ध्यानस्थ बसत तिथे आजचे बीचेस तयार झाले. पण त्यांच्या या सुट्टीमुळे अनेक समस्याग्रस्त मेटाकुटीला येत. पण गुरूजी काही ऐकायचे नाहीत.

यावर उपाय म्हणून नागरिकांनी ब्रिटीश सरकारला साकडे घातले. ही तक्रार व्हाईसराय क्लाईव्ह लॉईड यांच्याकडे गेली. त्यांनी ती राणिला पाठवली. त्यावर ब्रिटीश संसदेत घमासान चर्चा झाली. ब्रिटीश संसदेने हा आळशी माणूस असा कसा लोकांचे काम करत नाही म्हणून उलट व्हाईसराय ला जबाबदार धरले. एका सदस्याने तर थेट पत्रच लिहीले कि " तुम्हाला काय तिकडे शेंगा खायला ठेवले आहे का ?" यावर व्हाईसराय यांनी "मी शेंगा खाल्लेल्या नाहीत " असे बाणेदार उत्तर दिले.

यावरून संसद सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी वल्कले गुरूजींना वठणीवर आणा नाहीतर कैदेत टाका असा हुकूम काढला. बिचार्‍या व्हाईसरायने मुंबई इलाख्याच्या अधिकार्‍यास आदेश दिला. त्यानुसार त्याने वल्कले गुरुजींना आठवड्याचे सातही दिवस आणि प्रतिदिनी बारा तास काम करायचा आदेश दिला. अन्यथा शिरच्छेद केला जाईल ही धमकी दिली.

मरता गर नही करता या म्हणीनुसार मग गुरूजींनी आठवड्याचे सातही दिवस काम करायला सुरूवात केली. तसेच दिवसाचे बारा तास ते उपलब्ध राहू लागले. सात वर्तुळे, बारा लिंबे आणि सात बाय बारा काम यामुळे मग या उतार्‍यास सात बाराचा उतारा असे लोक म्हणू लागले. तर वल्कले गुरूजींना कामाला लावणार्‍या तक्रारदाराला लोक सातबाराचा म्हणू लागले. पुढे त्यातला सात हा आकडा गळून पडला पण त्यातला भावार्थ पुढे चालू राहून बाराचा या शब्दास वेगळी अर्थछटा प्राप्त झाली.

त्या काळी निजाम आणि सरदारराजे प्रत्येकाच्या शेतातली लिंबं मोजायला जात. ही लिंबं सातबाराच्या उतार्‍यासाठी लागत असल्याने लिंबाच्या जमीनीच्या नोंदीसही सातबाराचा उतारा असेच नाव पडले. त्या आधी वल्कले गुरूजींचा उतारा असे म्हणत ते नाव मागे पडले.

अशा रितीने सात बाराचा उतारा अस्तित्वात आला.

>>>>>>>>तुम्हाला काय तिकडे शेंगा खायला ठेवले आहे का ?" यावर व्हाईसराय यांनी "मी शेंगा खाल्लेल्या नाहीत " असे बाणेदार उत्तर दिले.
Lol Lol Lol

कोकणाल्या बौद्धकालीन विहार आता पांडवांनी बांधल्या असा मेसेज गावागावातून फारवर्ड होत असतो. 'तिकडे वर तोंड करून ' हे कसं'? विचारलं तर कानफटात बसते.

आचार्य Lol जबरदस्त!!

सात बारा सोबत ८अ सुद्धा असतो पीकपाणी दाखवणारा. लगेहात त्यावर पण कुणीतरी लिहा Lol

आचार्य भारीच....
मला वाटतं पुढे वल्कले हे जोडाष्करी नाव लोकांना उच्चारता येईना...मग लोक त्यांनाही सात बाराचा असे म्हणू लागले असावेत... कालांतराने सात लयास गेले आणि फक्त बाराचा उरले. Happy
आचार्य चरणी अर्पण Happy

Pages