भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
अरे हां
(No subject)
चुकीच्या नावाने दिलेली ओवाळणी
चुकीच्या नावाने दिलेली ओवाळणी असा नवीन धागा काढता येईल मग
स प्रज्ञावान भवती. स मेधावान
स प्रज्ञावान भवती. स मेधावान भवती. ..काय उगाच म्हटलंय.
स बंदीवान ( मी या संसारी) भवती.
क्या बात है!!!! आवडलं आहे
"म्हणूनच प्रज्ञाने चतुरपणे
"म्हणूनच प्रज्ञाने चतुरपणे भाऊबीज घुसवून मूळातच काटा काढला आहे" - "नाही म्हणजे बायकांची जात मोठी चतुर हो" (हे ह्या असामी करता नसून, असा मी, असामी मधून उचललंय... उगाच जातीय-'वाद' नको)
"स प्रज्ञावान भवती. स मेधावान भवती." -
हाहाहा, फॉरवर्ड मी वाचलंच
हाहाहा, फॉरवर्ड मी वाचलंच नाहीये पण त्यावरची चर्चा वाचून अंदाज आला. अमितव यांनी सिक्सर मारलीय त्यावर.
स प्रज्ञावान भवती. स मेधावान
स प्रज्ञावान भवती. स मेधावान भवती. ..काय उगाच म्हटलंय.
स बंदीवान ( मी या संसारी) भवती.
>>>
स बंदीवान ( मी या संसारी)
स बंदीवान ( मी या संसारी) भवती. >>>
एखाद्या लार्ज लँग्वेज मॉडेल
एखाद्या लार्ज लँग्वेज मॉडेल ला दवणे व वपू यांचे साहित्य फीड करून ट्रेन केले तर तो असे काहिसे लिहील. वरील फॉ मध्ये दवणीय शब्दबंबाळत्व आणी वपू टच असलेली कॉलेज मधली मैत्रीण अचानक प्रकट व्हायची फँटसी दोन्हीही आहेत. पुरेसे गणित फीड न केल्याने पन्नाशीत पस्तीस वर्षे मागे वगैरे घोळ आहेत.
अस्मिता..
अस्मिता..

सगळेच!
प्रज्ञा आणि मेधा झाल्या. आता प्रतिभा राहिली. की हे फॉरवर्ड हाच प्रतिभेचा आविष्कार?
विकु, तुम्हाला असं म्हणायचं
विकु, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे "कृत्रिम प्रज्ञा" वापरून लिहिलं आहे
खूप दिवसांनी अश्रूंना
खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्यातरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दांतून दीपज्योतीची पालवी धुमारत होती!>>>>> लिहायच्या आधी अश्रूंची झाली फुले वाचलेलं दिसतंय.

जिद्दबीज>>> अभिजात भाषेला मिळालेला अभिजात शब्द.
अस्मिता
"स प्रज्ञावान भवती. स मेधावान भवती." >>>> अमित
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मत आ
अरे धमाल चालली आहे इथे
अरे धमाल चालली आहे इथे
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मत आ >> मता ऐवजी मत आ इथे चपखल

सगळेच
सगळेच


संस्कृत येत नाही तरी पण ते प्रतिसाद भारीच!!
हे लिखाण दवणेंचं नाही याचा निर्वाळा दिला सर्वांनी.
गणित कसं लक्षात आलं नाही
ठाण्याचा उल्लेख आहे. दवणे सर ठाण्यात राहतात हे माहीत आहे. त्यामुळे सुरुवातीला खरं वाटलं.
शंका दुसऱ्या कारणाने आली.
नवऱ्याच्या अचानक उपटलेल्या मैत्रिणीला पाच हजार रूपये द्या असं सांगणार्या फिफ्टी प्लस काकू झेपल्या नाहीत.
दवणीय शब्दबंबाळत्व >>
आमची आई त्यांचं सदर आवडीने वाचायची. (आता चालू आहे का सदर ते माहिती नाही)
नका हो असे कठोर होऊ विकू
ती नयनतारा आहे हे लक्षात आणून
ती नयनतारा आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल आभार अस्मिता.
किती वेगळा लूक आहे!!
एकतर पस्तीस म्हणा किंवा
एकतर पस्तीस म्हणा किंवा पन्नास म्हणा. 'गोडा चतुर गोडा चतुर' चाललं आहे. पस्तिशीच्या स्त्रीला बघून मन झरकन पंचवीस वर्षे मागे गेले तर पाचवीच्या वर्गात जाऊन बसेल>>> अस्मिता कहर आहेस
वरच्या दवणीय फॉरवर्ड मधे एक
वरच्या दवणीय फॉरवर्ड मधे एक वाक्य आहे, ... दोन तीन महिने असेच गेले. मेधाची आठवण येण्याचे तसे कारण नव्हते...
तरीही येत होती असेच ना?

म्हणजे,
अस्मिता, अमितव, रमड, हर्पा
अस्मिता, अमितव, रमड, हर्पा सगळेच सुटला आहात.
बाकी प्रज्ञाने भाऊबीज घालून a stich in time चा चांगला प्रत्यय दिला.
भाऊबीज, जिद्दबीज, चैत्र पाडवा - तेवढी एक अमावास्या नी पौर्णिमा राहीली बघा. नाहीतर कालनिर्णयच्या पाठच्या पानावर प्रसिद्ध करता आली असती कथा.
या वरच्या पोस्टशी माझा काहीही
या वरच्या पोस्टशी माझा काहीही संबंध नाही. आणि मी पस्तिशीचीही नाही. सांगून ठेवतेय!
तू २५ ची आहेस ठाऊक आहे
तू २५ ची आहेस ठाऊक आहे
आजार पण अभिनव आहे "व्हाइट
आजार पण अभिनव आहे "व्हाइट फिव्हर"
भारतात प्रथमच ऐकला.
HPMV च्या आधीचा असावा.
एवढे सर्व प्रतिसाद वाचून
एवढे सर्व प्रतिसाद वाचून पुन्हा पुन्हा स्वतःला बजावत होतो की नको वाचूस ती गोष्ट, नको वाचूस...पण म्हणतात ना curiosity kills the cat! वाचलीच शेवटी.....इतकं मळमळतयं आता, लिहिणारा हाती सापडायला हवा होता...
वाफेचं मशीन नाही का वापरून
वाफेचं मशीन नाही का वापरून झाल्यावर वायरची गुंडाळी करून आपण नीट अडगळीत ठेवत ? पण मोबाईलचा चार्जर मोबाईल चार्ज करून झाल्यावरही वायरींसहीत अस्ताव्यस्त पडलेला असतो. जेवणाचं टेबल आवरलेलं नसतं. वास्तविक वाफेचं मशीन आपल्या आरोग्याच्या समस्या दूर करतं तर मोबाईल आरोग्याच्या समस्या निर्माण करत असतो. कशाला प्राधान्य द्यायचं याचंच भान राहीलेलं नाही.
आयुष्यात देखील काही गोष्टी कशा असतात माहितीये का ?
पोस्टाच्या तिकीटासारख्या !
पोस्टाचं तिकीट नाही का आपण कुठला स्टॅंप मारलाय हे बघून नंतर ते पाकिटासकट फाडून कचर्यात फेकून देतो तसंच.
काही काही लोक या तिकीटांचं कलेक्शन करतात. या लोकांची खरं तर मला कीव येते.
जर आपल्याकडे येणार्या सगळ्याच गोष्टी आपण जपून ठेवू लागलो तर आपल्याला घराच्या बाहेर झोपडी बांधून रहावं लागेल.
म्हणजे कुणी पाहुणे आले कि लागलीच घरात घुसून अंघोळी पांघोळी करून, स्स्नो पावडर लावून आपलं खटलं आणि आपण तयार व्हायचं आणि पाहुण्यांना मोठ्या कौतुकाने घर दाखवायचं. घरातल्या सगळ्या जपून ठेवलेल्या गोष्टी दाखवायच्या.
"आमच्या सुमीनं पळून जाऊन लग्न केलं तेव्हां शेटफळ इथून पत्र पाठवलं होतं ना त्याचं हे तिकीट" असं म्हणत सुमी पळून गेल्याची आठवण काढून "नाव घालवलं पोरीनं" हा आवडता मोनोलॉग सुरू करावा. मग आपलं खटलं मध्येच म्हणणार " किती सुंदर लिहीलं होतं पोरीनं. बाबा माझी आठवण काढू नका, मी मजेत आहे पण तुमची आठवण येते" असं म्हणत ती डोळ्याला पदर लावणार मग पाहुण्यांना काय करावं ते न समजल्याने ते आपल्या पायाची आठ बोटं वर खाली हलवत बसतात.
"हा टी सेट माझ्या बाबांनी आवडीनं दिला होता. पण यांचा स्वभाव तापट. चहात साखर घातली नाही या कारणावरून डोक्यात राख घालून फोडून टाकला. फेव्हिकॉलनं चिकटवून त्याच्यासाठी हे कपाट बनवून घेतलंय "
असं करत करत वस्तुसंग्रहालय दाखवावं तसं सगळं घर त्यातल्या जपून ठेवलेल्या वस्तू आणि आठवणींसकट दाखवावं. एखादा पाहुणा तरी विचारतोच " घरात अगदी पाय ठेवायलाही जागा नाही, मग तुम्ही घरात कसे राहता ?"
यावर मग लगेच हसून उत्तर द्यावं " अहो आयुष्य म्हणजे काय ? आठवणींचा पसारा. मन जेव्हढं मोठं करावं तितक्या आठवणी मावतात. घराचंही तस्संच आहे" पाहुणे मग मान डोलावून गेले कि लगेच गरजेच्या वस्तू घेऊन आपल्या झोपडीत पुन्हा परतावं.
खरं तर आयुष्याचं असंच आहे,
नको त्या गोष्टींचा संग्रह करत बसलं कि चांगल्या क्षणांना बाहेर रहावं लागतं. सुख हात जोडून दारावर उभं असतं पण आधीच घडून गेलेल्या आणि अप्रिवर्तनीय अशा घटनांच्या आठवणींनी आपल्या मनाला वस्तुसंग्रहालय बनवलेलं असतं. तिथे भविष्याला आणि वर्तमानाला जागाच नसते. ते मग झोपडं बांधून आपल्या मनाच्या बाहेर वाट बघत राहतात.
आपला नंबर कधी येतो याची प्रतिक्षा करत.
फ्लॉपीत नाही का नको असलेल्या फायली आपण एक कमांड देऊन डिलीट करत ? म्हणजे मग नवीन फाईल साठवता येते.
एव्हढंच तर करायला जमत नाही आपल्याला.
- संदीप खरे
ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक व नाटककार.
सेम फॉर्वर्ड थोडासा बदलून माझ्या मित्राला पुल देशपांडे यांच्या नावाने आला आहे.
कैच्या काय लिहिलंय.
कैच्या काय लिहिलंय.
म्हणजे कुणी पाहुणे आले कि लागलीच घरात घुसून अंघोळी पांघोळी करून, स्स्नो पावडर लावून आपलं खटलं आणि आपण तयार व्हायचं >>>>>> असं कोण करत?
ह्यांच्यावर आणि ह्यांच्या खटलं वर असला फॉरवर्ड लिहिला म्हणून खटला भरला पाहिजे.
(No subject)
पाहुणे आल्यावर आंघोळी कशाला
पाहुणे आल्यावर आंघोळी कशाला करायच्या
ते पत्र फेकून दिलं पण स्टॅम्प ठेवला. बाकी पोर पण शौकीन. नेहमीची गांधी, पटेल, बोस तिकिटं न लावता अनवट तिकिटं लावून पळून गेली.
बाकी मुंबईत लोकल भरली असेल की मुंगी शिरायला जागा नाही आता बदलून स्टॅम्प ठेवायला जागा नाही केलं पाहिजे.
स्टॅम्प जमवून जमवून अशी किती जागा घेणार.. दीड सेमी बाय दीड सेमी असतात ते. जाडी नगण्य. आणि हा स्टॅम्प पोरीच्या पळून जाण्याच्या पत्राचा.
(No subject)
Pages