भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना प्रतिसादांसाठी धन्यवाद, एकंदरीत पेशन्स हाच उपाय दिसतोय.
कालही रात्री व्यवस्थित झोपला. शीशूसाठी आता स्वतःहून गॅलरीच्या दाराकडे जातो. तो तिकडे गेला की आम्ही दारउघडतो.
काल पासून लिश ट्रेनिंग सुरू केलय. सध्या लिश तोंडात घालणं सुरू आहे. 'ड्रॉप' म्हटलयावर कधीकधी सोडतो . शिकेल आता.
सकाळी अंगात येणं आज पण झालच.
अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आम्ही आमचं पूर्ण रूटीन सोडून फक्त त्याच्याभोवती करत होतो. ते जरा कमी करून काल मी संध्याकाळी व्यायाम केला, वाचन केलं. दहा पंधरा मिनीटें टिव्हीपण बघितला. तो आसपास त्याचा त्याचा खेळत होता. आज थोडं बरं वाटतय. Happy

अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आम्ही आमचं पूर्ण रूटीन सोडून फक्त त्याच्याभोवती करत होतो. ते जरा कमी करून काल मी संध्याकाळी व्यायाम केला, वाचन केलं. दहा पंधरा मिनीटें टिव्हीपण बघितला. तो आसपास त्याचा त्याचा खेळत होता.>>>
एकदम व्यवस्थित
त्यानाही 24 तास सतत घेऊन बसणे अपेक्षित नसतं, त्यांच्या सकख्या आया पण नाही करत
त्या दूध पाजयाच्या वेळी फक्त जवळ घेऊन लाड करतात, चाटतात
एरवी त्यांचं लाईफ जगत असतात, पिल्लं पण एकटे राहून खेळायला शिकतात
त्याला हळूहळू अगदी थोडा काळ एकटा राहण्याचाही सवय लावा
सुरुवातीला दहा मिनिटे अगदी
युट्युब ला Crate training वर भरपूर व्हीडिओ आहेत
त्याचा फायदा होईल तुम्हाला

चला बरं झालं. गुड बॉय आहे की जोई, इतके फिगर आउट केले हेही खूप आहे. हुषार असतात तसेही ते. पॅटर्न रेक्ग्नाइज करून पटापट शिकतात काय एक्सपेक्टेड आहे ते! माउई च्या पॅटर्न रेकग्निशन च्या काही गमती:
बाहेर ओले असेल तर घरात येताना व्हराम्ड्यात एका खुर्ची वर त्याला ठेवून त्याचे पाय पुसुन मग आत घ्यायचे हे अगदी सुरुवातीपासून करतो आम्ही. त्यामुळे ते नीट समजले आहे. आता पाय ओले असतील तर स्वतःच उडी मारून आधी खुर्ची वर चढून टॉवेल ची वाट बघतो Happy
पोळ्यांच लिहिलंच होतं मागे. पोळीचा तवा गॅस वर ठेवला रे ठेवला की पायाजवळ येऊन बसतो. त्यात पण शेवटची पोळी मिळणार हेही माहित असल्यामुळे तोवर शांत बसतो अगदी!
दाराला टांगलेली घंटी वाजवली की बाहेर जाता येते हे आम्हीच शिकवलंय. ते चटकन शिकला. पण हे त्याने स्वतःच फिगर आउट केले की घंटी वाजवली की त्वरित अटेन्शन मिळते. त्यामुळे कधी मधी आमचं इतर गोष्टींसाठी लक्ष वेधून घ्यायला पण घंटी चा बरोब्बर वापर करतो! Happy
घरात जिन्याला आम्ही पपी गेट बसवले आहे. वरच्या मजल्यावर आम्ही जाऊ दिले तरच अ‍ॅक्सेस असतो त्याला. इतर वेळी खालच्या मजल्यावर त्याला फिरता येते कोणत्याही खोलीत. एकूणच सारखे वर जाता येत नाही म्हणून वरच्या मजल्यावर जाण्याचे अजूनच अ‍ॅट्रॅक्शन! त्याचा बेड वर आमच्याच खोलीत आहे. मुलीची खोलीही अर्थात वरच्या मजल्यावर! तिच्याकडे त्याला सारखेच जायचे असते. त्यामुळे वर केव्हा कसे जायला मिळते त्याचेही त्याने बरोबर पॅटर्न लक्षात ठेवलेत Happy सकाळी साडेसात-आठ च्या सुमाराला नवरा वर आंघोळ इ. आवरायला जातो काम सुरु करण्याधी, तेव्हा माउईला मुलीच्या खोलीत जाऊ देतो. हे माहित असल्यामुळे नवर्‍याने चहाचा कप खाली ठेवल्याचा आवाज आला की माउईबुवा ताबडतोब असेल तसा उठून उड्या मारत जिन्याकडे पळतो Happy तसंच रात्री जेवणे झाली, किचन आवरले की त्याला एकदा बाहेर सोडायचे अन जाऊन आला की मग वर जायचे असा ठरलेला पॅटर्न! तर जेवण झाले की किचन च्या दारात बसून आमचं काय चाललंय याकडे लक्ष असते! डिशवॉशर ऑन झाला की माउई लगेच घंटी वाजवतो बाहेर जाण्यासाठी! Happy मग बाहेर जाऊन आला की लगेच जिन्याकडे पळतच सुटतो! आता प्लान चेन्ज करून मी टिव्ही वगैरे बघायचा म्हटला तर नो चान्स! Lol
अशी अजून खूप उदाहरणं आहेत, ही चटकन आठवली.

माउईच्या गमती फारच भारी.
या रेटने मी हा बाफ फॉलो करत राहिले तर २-३ वर्शात आमच्याकडेच भुभु येइल smiley36.gif

विनोदी म्हणजे परवा माउई ने बहुधा मुलीला बराच त्रास दिला असावा तिच्या रूम मधे. तिचा क्लास सुरू होणार होता , मग तिने वैतागून माव्याला खाली आणुन सोडले आणि जिन्याचे गेट बंद करून ती वर निघून गेली. याच्या चेहर्‍यावर अत्यन्त व्रात्य भाव होते. दंगा करून आला पण नो रीग्रेट्स ! तर हिने खाली सोडल्या सोडल्या याने पळत जाऊन घंटी वाजवली. मी बाहेर जाऊ दिले, तर पटकन सू करून आत आला आणि धावत पुन्हा जिन्यासमोर उभा राहिला जिभ बाहेर काढून हॅ हॅ हसत! चेहर्‍यावर रोलर कोस्टर वरून नुकताच येऊन पुन्हा त्या राइड साठी लायनीत उभा राहिलेल्यासारखे एक्सायटेड भाव!! Lol (कारण त्याच्या डोक्यात बहुधा असे होते की सू करून आले की पुन्हा तिच्याकडे जाता येईल!) आमची हहपुवा अक्षरशः!

खूप छान गप्पा आहेत
अर्थात मी या वाट्याला कधीच जाणार नाही पण धाग्याचा एक फायदा झालाय तो म्हणजे मालकांच्या ताब्यात असलेल्या पेट्स ना घाबरून इकडे तिकडे पळण कमी झालंय माझं Lol
दुसरं म्हणजे मुलगी मागे खूप हट्ट करत होती तेव्हा मी ठरवत होते एप्रिल मे मध्ये म्हणजे तिच्या सुट्ट्या मध्ये आणू एखादं गावठी पिल्लू आणि मग देऊ सोडून, पण हा किती अघोरी उपाय झाला असता हे आत्ता लक्षात येतंय,त्यांना ही खूप भावना असतात, सोडून देऊन त्यांनाही त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे निदान ते पाप तरी होणार नाही आता माझ्याकडून.
धागा काढल्याबद्दल दहादा धन्यवाद आशुचाम्प

Ashu champ regarding the abused dog please approach animal.welfare organization in your area they can take the dog and put her with better parents. Or counsel them. But that will be of little help.
Today while coming to work I saw two new kittens. And promptly gave them food. It was great to see kitties eating up.

मीरा - माउई चे किस्से एक नंबर
डोळ्यासमोर आला त्याचा असा मिश्कील खोडकर चेहरा
नो वंडर तुमचा इतका लाडोबा झालाय ते Happy

आदू + १

मी कुत्रांच्या विरोधात नव्हते. कुत्रे मालकांच्या attitude डोक्यात जायचा आणि त्यामुळे भीती असायची .
इंफॅक्ट कुत्रे प्राण्यांच्या तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या या अप्रोचमध्ये होते. पण एक प्रकारची भीती असायचीच.

पणमनुष्यप्राणांचे आता इतके वाईट अनुभव आलेत की हा मुका जीव फारतर चावेल पण जीवही तेवढाच लावेल इतपत कळलं आहे.
मागच्या आठवड्यात एका परिचित घरी गेले होते. त्यांच्याकडे लॅब आहे. तर तो आम्हाला बघून जवळ आला. पण मला इतकी भीती वाटली नाही. त्याला पाय घासू दिले आणि वास घेऊ दिला . नंतर त्याच्या बाजूला बसून गप्पा मारल्या. अर्थातच डॉग ऑनरहोताच बाजूला.
आता भीती आहेतच पण २५ टक्के कमी झालेय

Happy छान आहेत बाळं सार्‍यांची आणि उचापती पण मस्त !!
पण (माझ्यासाठी) वाचायला आणि दुरूनच छान....
@ आशुचँप --- शक्य असेल तर या सगळ्या रत्नावळीचा एक कोलाज देता येईल का मूळ धाग्यात? किंवा २-३ जण एकत्र आणि नावे असे लिखाणाच्य मधेमधे पेरून;
म्हणजे कधी आठवण येईल तेव्हा बघता येतील पिल्लं न शोधता. किंवा खाली करामती वाचल्यावर हा कोण आयटेम ते बघता येईल वर जाऊन.

माऊईच्या गंमती मजेशीर की! ते खुर्चीत बसून पाय पुसून घेणे तर आवडले.
आशुचँप, व्हिडिओ मस्तय! खरंच गुणी बाळ आहे.

धनवन्ती, माऊ गोड आहे.

या रेटने मी हा बाफ फॉलो करत राहिले तर २-३ वर्शात आमच्याकडेच भुभु येइल>>>>> मला केव्हाच आणावेसे वाटले होते.
बरं या धाग्यावर सर्व बाळे गोडगोड आहेत.कोणालाच काही सरफिरे कुत्रे मिळाले नाहीत का? मग अशांच्या गोष्टी सांगू का?निबंध होईल.

आज एंजल आली होती, मुलगा आणि बहुदा त्याचा एक मित्र असे दोघेच आलेले. आम्हला बघितल्यावर त्यांनी साखळी काढून मोकळी सोडली पण तिला सवयच नसावी त्यामुळे ओडीन जसा मोकळा सोडताच कानात वारं शिरल्यागत पळतो तसं काही केलं नाही
मी मग जाऊन तिला कुरवाळले, खाजवलं तेवढं घेतलं करून आणि तिथेच निवांत मातीत बसून राहिली
तिला बॉल खेळायचं अमिश दाखवलं पण ढिम्म हलली नाही, ओडी आला खेळायला तर त्यावर गुरगुरली मग तो तिचा नाद सोडून गेला दुसरीकडे
मी पण मग थोडा वेळ चुचकरून पाहिलं पण तिला सगळ्याचा कंटाळा आल्यासारखा दुर्लक्ष करत होती
आम्ही निघून येईपर्यंत ती तशीच होती बसलेली
पण आज बाकीचा त्रास नव्हता, त्या मुलांनी तिला खेळायचं तर खेळ नैतर नको असं करत सोडून दिलं होतं आणि ते गप्पा मारत बसले

काल संध्याकाळनंतर इकडे स्नो सुरु झाला. माउई चा पहिलाच स्नो! पहिल्यांदा सगळे लॉन, रस्ते पांढरे शुभ्र कव्हर झाल्यवर त्याला बाहेर सोडले तेव्हा भयंकरच खूष झाला.
VID-20201216-WA0032_3_exported_4571_1608219797376.jpgस्नो मधे खेळायला फार आवडलं! फ्रेश स्नो अगदी फ्लफी असल्यामुळे इकडे तिकडे उडवत होता, खात होता, लोळत काय होता. थंडी खूप होती त्यमुळे लगेच आत आणलं. पण लगेच लक्षात आलं की अगदी ५-१० मिनिटच बाहेर गेला असला तरी तेवढ्यात खूप स्नो त्याच्या केसात अडकून रीफ्रीज झाला होता! चालताना त्याला विचित्र वाटले असावे. एकाच जागी बसून चाटायला लागला स्वतःचे पाय. मग टॉवेल गरम करून आणि थोडा ब्रश, थोडा हेअर ड्रायर वापरून तो स्नो काढला. त्यानेही सर्व नीट करू दिलं!
पण खरी मजा सकाळी झाली! तोवर सगळे जग अर्धा फूट स्नो मधे बुडाले होते! सकाळी माउईचे पॉटीचे वांधे झाले ! Happy करता काय, सक्काळी सक्काळी बॅकयार्ड मधला गवताचा एक पॅच आणि तिथपर्यन्त जायचा रस्ता शॉवेल ने क्लीन केला. ३-४ वेळा लीश ने बांधून तिथे ये-जा केली तेव्हा जमले कसे तरी Happy आता त्याला एक्ट्याला मोकळे सोडले अन जाऊन ये म्हटले तर तो स्नो मधे पुन्हा खेळायला उधळायची शक्यता ! आम्ही त्याला न्यायचे म्हणजे आम्हाला ही जॅकेट, स्नो बूट वगैरे जामानिमा करावा लागतोय! अशी सगळी मजा आहे आता २ दिवस तरी.
भारतात आणि वॉर्म ठिकाणी रहाणार्‍यांना हे वाचून आपण किती लकी आहोत हे फीलिंग येईल! Happy

हो ना, एवढे व्याप असू शकतील याची कल्पनाच करता येत नाही

व्हीडिओ शेअर करा एकदा माऊई चा बर्फात खेळतानाचा

फुंतरू चा पॅटर्न  तो, मी आणि भाऊ एका खोलीत झोपतो, हा जो पर्यंत आम्ही उठत नाही हा सुद्धा झोपलेला असतो. मग आपण उठलो कि महाराज उठणार हळू हळू चालत बाबांच्या जवळ जाऊन पायावर झोपणार, मग एक डुलकी त्यानंतर मग हळूच भुलाबाई सारखा शु शु करायला मागच्या अंगणात. बरं याच्या वेळा ठरलेल्या म्हणजे आमच्या सारख्याच. आपण जेवायला बसलो कि हा तयार,सगळं खातो. काळ मन्चुरिअन चोराला प्लेट मधून आणि नूडल्स पण खाल्ले मग रागावलो सगळे तर बेड च्या खाली एकदम कोपऱ्यात, मग बाहेर येत येईना धोब्या झालाय नं. बरं याला फिरायला नेणं म्हणजे टास्क आहे. कोणी बाजूनी गेलं कि हा २ पायावर उभा, बिचारे लोकं इतके घाबरतात याला, वरून आम्ही बजरंग दल चे , इतका सुंदर स्थळ आलं होतं, याला जन्मात अशी मिळाली नसती पण हे महाराज, गेले नं चावायला, सावरलं पटकन मग आम्ही नाद सोडला. त्याला आमच्या शिवाय कोणीच नको असतं. किती प्रेम करतो त्याची लिमिट नाही. फूंत्र्या लेकाचा लाडोबा 

हो अनु,
इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं

Pages