माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users


हा फोटो मागच्या आठवड्यातील असून घराजवळच्या तलावाचा आहे.मोबाईल क्लिक आहे.
हा फोटो सूर्योदयाच्या वेळचाच आहे,पण ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शन झालेच नाही.

अवल : केरळचा सूर्यास्त, आणि तुम्ही लिंक दिलेला ब्लाॅगही छानच आहे. ह्या साध्या सोप्या नियमांमुळे नवीन फोटोग्राफरना मदतच होईल.
हीच लिंक आपल्या निसर्गदृश्य फोटोग्राफीच्या धाग्यावरही देणार का..?

स्वरुप : शिकागो टाॅवरचा उंचावरुन काढलेला फोटो उंचीमुळे एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह देतोय.

हर्पेन : तोरण्याचा सूर्योदय मस्तच.. गडकिल्ल्यावरचे सूर्योदय विशेषतः ट्रेकिंगच्या वेळचे, नेहमीच एक वेगळी आणि मस्त भावना मनात निर्माण करतात.. आणि व्यक्तीशः मला खूप जुन्या काळात घेऊन जातात..

आणि हर्पेन, मेळघाटचे सूर्यास्त मस्तच.. सफरचंद खायला उडालेला बालमारुती आठवला.. Happy

रायगड : सगळेच प्रचि मस्त.. एकदमच वेगवेगळी ठिकाणं..

विनिता.झक्कास : हिवाळी सकाळ छान. आता येतील अशा धुक्यातल्या सकाळी. यावेळचा हिवाळा खूप कडक असणार आहे म्हणे..

Sariva, सुंदर प्रचि.. हा फोटो आपल्या निसर्गदृश्याच्या धाग्यामने ही एकदम चपखल बसतोय..

कंसराज : अप्रतिम, अप्रतिम फोटो..

कंसराज सुरेख फोटो
निरु थांकु Happy हो देते की। पुढच्या भागात तळटिप म्हणून टाकलीत तरी चालेल ; )

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1 आता हेडर मधे समाविष्ट केली आहे..

फोटो ग्लेशियर नॅशनल पार्क मध्ये काढलाय. मला फोटोग्राफी ची आवड आहे म्हणून मी अश्या नॅशनल पार्क मध्ये माझ्या फॅमिली ला घेवुन जातो. सगळ्यांना घेवुन सकाळी ७ वाजता पार्क मध्ये पोहचलो. तेव्हा बघितलेला हा सूर्योदय. त्यांनतर आम्ही ८ मैल ट्रैक वर गेलो होतो.

धन्यवाद कंसराज,
तापहीन पण लखलखणारा तेजस्वी मार्तंड, नितळ पाणी, त्यातील सुरेख प्रतिबिंब मी पुन्हा पुन्हा डोकावणार ह्या फोटोचा आस्वाद घ्यायला

एकदा कार प्रवासात दिसलेला हा सुर्यास्त। खरं तर सुर्यास्ताच्या जरा आधीचा। पण मला आवडणारा एक फोटो। निसर्गातले असे चमत्कार भावतातच। जटायु पक्षी जणु काही सुर्याला गिळंकृत करु पहातोय
IMG_20201022_223433.jpg

कुमार१, समुद्रावरचा सूर्यास्त मस्त.. कुठली जागा आहे ही ?

अवल, जटायू मस्त... हॅरी पाॅटर मधले डिमेंटर्स झेपावताना आठवले.

आज कोजागरी Happy
मला मोबाईलने चंद्राचा फोटो काढायचा आहे. कृपया कोणी सेटींग सांगेल काय?
मोबाईल - विवो २०

निरु
अरबी समुद्र खुद्द अरबस्तान मधून !

सनसेट बीच, बेतिलबेतिम..


एकच सूर्यास्त,
कधी वाळूत बसलेल्या जोडप्यांना रोमँटीक फील देणारा..
कधी दोस्तांना किणकिणणाऱ्या चषकांची आठवण करुन देणारा..
कधी पार्टी गाईजना मदिर रात्र पुढे असल्याची जाणिव करुन देणारा..
कधी नवविवाहितांना मधाळ रजनीची चाहूल दाखवणारा..
कधी एकट्या जीवाला सकाळ पर्यंतची वेळ कशी काढू, याच दडपण देणारा..
कधी रात्रपाळीवाल्यांना, रात्रशाळावाल्यांना चला, उठा, तयारीला लागा सांगणारा..
कधी उतारवयीननांना आयुष्याच्या सांजवेळेची आठवण करुन देणारा..

आणि कधी उदास मनःस्थितीत असलेल्यांची उदासी, मनावरची काजळमाया हलके हलके वाढवणारा..

हा सूर्यास्त थोडासा उदासच वाटला मला.. निदान ही फ्रेम तरी.. (किणकिणणाऱ्या चषकांची मित्रांसोबतची रात्र पुढे असूनही, अर्थात माझ्यासाठी मात्र फक्त मार्टिन्स काॅर्नर मधले मासे..)
केशरी लाल रंगांची उधळण करणारे आकाश, खरं तर साराच आसमंत आता सुकलेल्या रक्ताच्या लाल काळ्या वर्णाकडे झुकणारा..
शक्तीचं प्रतिक असलेला सूर्य आता निःसत्व आणि तो ही बुडायला टेकलेला.. तमाम दुनियेला ज्याच्यामुळे दुनिया दिसते तो आता दिसेनासा होत अंधारात गडप होणारा..
किनाऱ्यावरची सर्व माणसे अंतर्धान पावून ही कोणती तरी एकटी व्यक्ती चालतेय ते ही पाठीमागे हात बांधून..
काय माहिती, असा सूर्यास्त एखाद्या उदास, दुःखी, एकट्या माणसावर काय असर करतो ते..

<<आज कोजागरी आहे. मला चंद्राचा फोटो मोबाईलने काढायचा आहे. कृपया सेटींग सांगाल का?>>

मोबाईल मधे एवढी सेटींग्ज नसावीत.
माझ्या Note 08 मधे ज्यांनी मी हल्ली बऱ्याचदा फोटो काढतो त्यात एक Pro Mode आहे. पण तोही चंद्राचे (अंधारातले/रात्रीचे आणि ते ही Close Up) काढताना पुरेसे नाही होत. कारण एकच : लांबचे फोटो काढण्याची फोन कॅमेऱ्याची मर्यादा.. (हे सूर्यास्ताच्या लाँगशाॅट फोटोज् ना अर्थातच लागू नाही. ते झकासच येतात..)
अर्थात माझा फोन तीन वर्षापूर्वी घेतलाय..सो आता नवीन फोनमधे काही सुधारणा असेल तर माहिती नाही..

छान.... प्रकाश चित्रे आवडलीत.

<< खरं तर प्रत्येकाने आपापल्या फोटोची पार्श्वभूमी, खासियत, आठवण सांगितली तर नुसत्या फोटोंच्या संमेलनाऐवजी आठवणींचंही संमेलन भरेल.. आणि ती आठवण दुसऱ्या एखाद्याला त्याची आठवण इथे टाकायला प्रवृत्त करेल.. >.
------- सहमत
स्थळ, वेळ ( काही effect तयार करत असेल तर) आणि कॅमेरा प्रकार कळाल्यास आवडेल.

मेघात अडकली किरणे हा चंद्र सोडवित होता

IMG_20201030_212159 (1).jpg

वातावरण काल जरा ढगाळच होते. पण काही वेळाकरता ढगांचा पडदा हटला आणि मंगळ देखिल दिसला.

सुरेख अफाट अप्रतिम, काय फोटो आहेत एकेक!! सूर्यबिंब इतक ं छान स्पष्ट कसं काय दिसतं ?स्पेशल वेगळा कॅमेरा आहे का? मी वाचीनच दिलेली माहिती. अत्ता पटापट फोटो बघितले. बरेच दिवसांनी मायबोलीवर आले

<<ढगांचा पडदा हटला आणि मंगळ देखिल दिसला.>>

सुंदर फोटो हर्पेन.. सध्या WFH. येतोच दुपारी झब्बू घेउन..

धनुडी : ओ, चंद्र आहे तो. शरदनिलचंद्र..

हर्पेन मस्त फोटो.
इकडे ही ढगाळ वातावरण होते. पण थोड्या वेळासाठी चांदोमामा डोकावले परत ढगाआड लपले.
IMG-20201030-WA0088.jpg

Pages