माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा मणिमहेश पर्वतावरचा.
हिमालयात अतिउंचावर (४००० मी टरच्या वर) असलेल्या मणिमहेश पर्वतावर सुर्य नेमका शिखरा मागून उगवतो आणि मण्यासारखा दिसतो म्हणून हा मणिमहेश. त्यावर्षी खरेतर आम्ही जाण्याचे योजले होते किन्नौर कैलासला पण अतिवृष्टी मुळे रस्ते वाहून गेल्याने अत्यंत आयत्यावेळी मणिमहेशला जाण्याचे ठरवले आणि त्यामुळे त्याच्या पायथ्याशी पोचून चढायला सुरुवात करायलाच दुपार झाली. आजवर कधीही पर्वतारोहण दुपारी सुरु केले नव्हते पण परत येण्याचा दिवस नक्की असल्याने आणि हवामान खराब होण्याअगोदर इथे जितक्या लवकर वर पोहोचता येईल तितके बरे अशा पावित्र्यात आम्ही होतो. एकाच दिवसात वर चढून जाणे शक्य नव्हतेच पण दुसर्‍याच दिवशी उतरून खाली यायचे होते त्यामुळे आमचा प्रयत्न होता गौरीकुंडापर्यंत तरी वर जायचे. प्रचंड चढण असलेल्या मार्गावर आम्ही जात राहिलो. मी सगळ्यात पुढे होतो; जात असताना एक वेळ अशी आली की सुर्य ढगाआड नाहीसा झाला, आणी मी चढ संपून लागणार्‍या छोट्या पठारा पाशी जिथे एकदम गार वारा लागत होता अशा ठिकाणी पोचलो. मित्र मागे होते त्यामुळे त्यांच्याकरता थांबणे गरजेचे होते, वर चढत असताना झालेल्या श्रमामुळे आणि उन्हामुळे भरपूर घाम आला होता आणि अचानक थांबल्यानंतर त्यावर गार वारा लागून मला हुडहुडीच भरली. मग माझे मित्र आल्यावर मी म्हटले मला काही अजून वर जावेसे वाटत नाहीये. त्यांचीही अवस्था चढ चढून आल्यामुळे वाईटच होती. मग आम्ही यात्रेकरूंच्या मुक्कामाकरता जे तंबू असतात त्यातल्या पहिल्यांदा जो तंबू मिळाला त्यात रहायचा निर्णय घेतला. तंबूत गेल्यावर पांघरुणात गुरफटून गरमागरम चहा प्यायला तरी थंडी कायम होती. पांघरुणातून कसेबसे बाहेर पडून जेवलो. मग तो पर्यंत मात्र अंगात ऊब आली होती. लवकर झोपलो आणि दुसर्‍या दिवशी पहाटेच उठून चालू पडलो होतो. अशा पार्श्वभुमीवर ही अशी सुर्याची पहिली किरणे बघताना काय वाटले ते सांगणे शब्दातीत आहे.

तिथेही अनेकदा ढग धुके पाऊस ह्यामुळे ह्या शिखराचे दर्शन होत नाही. पण देव आमच्यावर प्रसन्न होता त्यामुळेच हा फोटो घेता आला.

Manimahesh.jpg

सुरेख प्रचि Happy

हा खास एस आर डीं साठी Happy

001.jpg

००२

71679938_2582927841763588_6066340924177252352_o.jpg

हर्पेन, आधीचे फोटोही मस्त.. मणिमहेशचा खासच..
अशी एखादी विशेष घटना/आठवण असली की तोच फोटो डोळ्यांना प्रत्यक्ष जे दिसतंय त्यापेक्षा नक्कीच अधिक काही सांगतो. In much more Depth. आणि पहाणारेही त्यात अधिकच Involve होतात..

विनिता.झक्कास, मस्त किरणं.

धन्स निरु Happy

मला डिएसारएल घ्यायचा आहे.

सूर्यास्त........

25358251_1652864688103246_3831888557104579956_o.jpg

धन्यवाद निरु,

अशी एखादी विशेष घटना/आठवण असली की तोच फोटो डोळ्यांना प्रत्यक्ष जे दिसतंय त्यापेक्षा नक्कीच अधिक काही सांगतो. In much more Depth. आणि पहाणारेही त्यात अधिकच Involve होतात.. >>> खरंय म्हणूनच मला नुसते फोटो न टाकता त्याबरोबर निगडीत आठवणी लिहिण्याची ही कल्पना खूप आवडली.

मलाही हा धागा फार आवडला.. पण निरु यांनी मांडलेला "इथे थोडी विषयांची सरमिसळ झाली तर ती वेगवेगळ्या विषयांवरच्या प्रचिंची भेळ कदाचित जास्त चटकदार बनेल.
त्यात वैविध्य आल्याने एकसुरीपणा येणार नाही. बघणाऱ्यांनाही कदाचित आवडेल.."हा विचार मला जास्त आवडला पण नंतर बर्‍याच जणांचे विरुद्ध मत जाणवले आणि म्हणून लिहिण्याचे टाळले... पण तरीही मनातून काही जाईना.. म्हणून आत्ता लिहूनच टाकले... खरंतर सगळेच फोटो अप्रतिम आहेत पण त्यामधे वैविध्य असेल तर ते पहायला जास्त मजा येईल नाहीतर काही दिवसांनी सूर्योदय, सूर्यास्ताचे Photos पाहणे कंटाळवाणे वाटू लागेल.. असे मला वाटते..शिवाय जर वेगवेगळे Photos जर एकाच धाग्यात गुंफले गेले तर तो खरंच stressbuster ठरेल आणि जर असे जास्तीत जास्त लोकांना वाटत असेल तर दुसरा धागा काढून निरु यांनी सुचवल्याप्रमाणे चटकदार भेळीचा आस्वाद घ्यायला हरकत नाही... Happy

IMG_20201012_175707.jpgसूर्यास्ताचा बसमधून काढलेला फोटो

चटकदार भेळीचा आस्वाद घ्यायला हरकत नाही... + 11
हा फोटो मल्लिकार्जुन डोंगर उतरून खाली आल्यावर काढलेला आहे. दमलेलो म्हणून थोडा वेळ टेकलो आणि सूर्यास्त होत होता. खरं तर मी सगळं डोळ्यात साठवून घेते. कधी फोटो काढत नाही. हल्ली मुलगा काढतो . पण ही फोटोमागची आठवण कल्पना आवडली.
IMG_20200927_182726_compress74.jpg

वर्णिता कसला गहजब फोटो आहे... मस्तच... का कुणास ठावूक पण या फोटो मध्ये निसर्ग आपलं वर्चस्व दाखवतोय असं वाटतंय..

सकाळी सकाळी सायकलिंग करताना ब्रेक घेतल्यावर अंकली पुलावरून समोरून सूर्योदय होताना . रेल्वेचा पूल आणि संथ वाहणारी कृष्णामाई.

20201013_095417.jpg

विनिता. झक्कास : मस्त लाल, केशरी आकाश..

वर्णिता : सुंदर फोटो... थोडं उदासवाण वातावरण..

पण संध्याकाळचे काही काही फोटो असेच येतात.. कधी गूढ, कधी उदास तर कधी दोन्हीही..

धन्यवाद निरु Happy

हा फोटो एडीट केलेला नाहीये.

वर्णिता, मस्त फोटो! शांत बसून रहावे वाटले पुलावर Happy

काही सुट्या अशा मस्त असतात न! निवांत, कसली धावपळ नसलेल्या, समाधान देणाऱ्या, अन मग तेव्हाचा निसर्गही हळू हळू झिरपत जातो त्या निवांतपणाबरोबर। मग सुर्यही असा टांगून रहातो झावळीच्या टोकावर, मस्त झुलत अन स्वत:चच प्रतिबिंब - वाळूतलं न्याहाळत Happy
IMG_20201011_191604.jpg

वर्णिता छान फोटो
सुर्योदयापेक्षा नदीचा फोटो म्हणून जास्त भावला.
'संथ वाहते कृष्णामाई' हे गाणे आठवले

अवल, भारी काढलाय फोटो
उंचावरून काढलाय ना

खूपच मनमोहक आणि सुंदर फोटो आहेत सर्वांचे...
सुंदर फोटो पाहून खरचं डोळ्यांचे पारणे फिटले...

निरूजी, मसाईमारातील सूर्यास्ताचा फोटो खरचं अप्रतिम.

केदारकंठ ट्रेक मध्ये पतींनी काढलेला सूर्योदयाचा फोटो...
केदारकंठ( उत्तराखंड) पर्वतरांगामधला सूर्योदय...

kkk.jpeg

केदारकंठ
kk.jpeg

sunrise2.jpeg

केदारकंठ पर्वतरांगातील सूर्योदय

घराच्या गॅलरीतून सूर्योदयाचा एक फोटो...

sunrise4.jpeg

फोटो २
sunrise5.jpeg

कोकणातील सुंदर समुद्रकिनारा तारकर्ली... आणि समुद्रात पॅराग्ला यडींग करायला जाताना घेतलेला दुसऱ्या बोटीचा व सूर्यास्ताचा फोटो..

sunset.jpeg

येऊरला मी जातो ते माॅर्निंग वाॅक साठी.
पण मोबाईल सोबत असतोच..
एका हिवाळ्यात चालता चालता मागे पाहिलं तर झाडामधून सूर्यनारायण डोकवत होते..
मग चालणं जरा वेळ बाजूला ठेवून मोबाईलला खिशातून बाहेर यायलाच लागलं.. Happy


अवल, मस्त फोटो.. वर्णनही बहारदार..
झावळ्यांवरुन पाण्याचे थेंब ('पानीकी बूंदे' म्हटलं तर अजूनच भारी वाटत बघा..) तोलले गेलेले पाहिले होते.
आज सूर्यही तोललेला ही पाहिला.

रुपाली विशे-पाटील, तारकर्लीचा फोटो सुंदर.. आणि केदारकंठचे तर अप्रतिम..

Pages