माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरू मस्त धागा , आणि तुम्ही काढणं अगदीच पर्फेक्ट Happy
एकापेक्षा एक फोटो आहेत सगळे !!
हे माझे....

घरापासून थोडा दूर असलेला Joshua Springs preserve/park
IMG-20201011-WA0029.jpg
*
IMG-20201011-WA0028.jpg
*
IMG-20201011-WA0027.jpg

*
IMG-20201011-WA0026.jpg

हे सिबोलो पार्क ... यावर मी लेखही लिहिला होता छोटासा... तिथे सगळेच फोटो आहेत इथे सूर्यास्ताचे ...

IMG-20201011-WA0022.jpg
*
IMG-20201011-WA0021.jpg
*
IMG-20201011-WA0023.jpg

हे घराजवळ walk घेताना...

IMG-20201011-WA0025.jpg

*

IMG-20201011-WA0024.jpg

सगळे सूर्यास्ताचेच आहेत , सूर्योदयासाठी उठावं कोण आणि बाहेर जावं कोण Proud

स्वरुप : अंधारबन सूर्यास्त आणि प्रतिबिंब सुंदर.. लवकरच एक झब्बू देतो.. पण माझा सूर्योदयाचा..
आणि कवडीपाटच्या प्रचिचा पोत विलक्षण आवडला... तरल आणि धूसर.

साधना : बेलापूर, उरणचे छान फोटोज्..

गजानन : ढग आणि पक्षी जबरदस्त..

मी_अस्मिता : छान प्रचि..

कालंच मी एक विधान करणार होतो किंवा प्रश्न की आपण पाहिलं तर प्रत्येकाचे (किंवा बहुतेकांचे) सूर्योदयापेक्षा सूर्यास्ताचे फोटो जास्त का असतात..? आणि मी_अस्मिता यांनी न विचारताच उत्तर देऊन पण टाकलं.. Wink

निरु, तुम्ही काढलेले सगळेच Photos अप्रतिम असतात... बाकी धाग्यावर पण पाहिलेले photos छान आहेत... कोणता कॅमेरा वापरता तुम्ही?
स्वरुप तुम्ही काढलेले Photos पण नेहमीच छान असतात...
या धाग्यावर तर सगळ्यांचेच Photos मस्त आहेत...

लेकाने ऑफबिट वाटांवर फिरवले तेव्हाचा हा एक सुर्यास्त। चालत्या कार मधला अन मोबाईलवरचा फोटो आहे सो फोटोग्राफिच्या दृष्टीने कमी असेल पण लेकाबरोबरच्या गप्पा, त्याचं गाडी चालवणं, आमची आवडती गाणी आणि हा असा सुंदर निसर्ग Happy म्हणून फार आवडत्या फोटोतला एक।

IMG_20201011_202319.jpg

खूप सुंदर फोटो आहेत सर्वांचे.
हा फोटो आम्ही महाबळेश्वर च्या शिवमंदिराजवळ सूर्यास्तसमयी काढलेला होता.

sunset2 (1).jpg

हा प्रतापगडला सूर्यास्तसमयी काढलेला होता.

sunset2 (2).jpg

तिमिरचित्र : पट्टडकल मंदिर परिसर- सूर्यास्त..

पट्टडकलची मंदिरे कलत्या दुपारच्या सोनसळी उतरत्या उन्हात बघणं हाच एक अविस्मरणीय अनुभव..
पण जसजशी संध्याकाळ होते तसतशा कमी होणाऱ्या उजेडात, संध्याछायेच्या प्रकाशात, वाढत जाणाऱ्या अंधारात आणि मुख्यत्वे करुन नव्या कृत्रिम उजेडाच्या अभावात ती पुरातन दगडी मंदिरं अजूनच प्राचीन भासू लागतात..
हा अनुभव अजूनच हाँटिंग आणि मेस्मेरायझिंग असतो.. त्या आदिम वारशाशी कुठेतरी नाळ जोडणारा..


सहीच निरू...
फोटो विथ आठवणी...पाहायला खरच छान वाटतं Happy

<<लेकाने ऑफबिट वाटांवर फिरवले तेव्हाचा हा एक सुर्यास्त। चालत्या कार मधला अन मोबाईलवरचा फोटो आहे सो फोटोग्राफिच्या दृष्टीने कमी असेल पण लेकाबरोबरच्या गप्पा, त्याचं गाडी चालवणं, आमची आवडती गाणी आणि हा असा सुंदर निसर्ग Happy म्हणून फार आवडत्या फोटोतला एक।>>>

@अवल : अहो खर तर हेच अभिप्रेत आहे.. कधी फोटो सुंदर तर कधी आठवणी सुंदर...
तेव्हा कधी फोटोज् नी संवाद साधावा कधी आठवणींनी..

कंसराज, अप्रतिम प्रचि..
नादिशा, छान फोटोज्..

<<निरु, कोणता कॅमेरा वापरता तुम्ही?>>

@ मोक्षू, माझे जुने मोबाईलचे फोटो सॅमसंग नोट ३ चे आहेत तर नवीन संमसंग नोट ८ चे.
आणि कॅमेऱ्याचे जुने Nikon P 100 आणि नवीन Fujifilm EXR 50.

कंसराज, नॅशनल जिओग्राफीच्या कव्हर पेजवर शोभेल असा फोटो आहे तो. अप्रतिम!

निरू तुमचे फोटो देखिल फार मस्त असतात.

छान धागा, सुंदर कल्पना.
छान छान फोटो बघायला मिळताहेत.

हा तळजाई कडे जाताना काढलेला फोटो. पळता पळता थांबून मोबाईल मधून काढला आहे. मी सकाळीच पळत असल्याने अर्थात सुर्योदयाचा आहे. उदय होऊन बराच वेळ झाला होता पण उगवत्या वेळेसारखा हा मार्तण्ड तापहीन असल्यामुळे चालून जावा.
Taljai Sunrise.jpg

माझ्याकडे अजूनही सुर्योदयाचे फोटो सापडतील. शोधून टाकतो आता.

धन्यवाद मृणाली.

हा तळजाई वरचाच अजून एक
इतक्यातच काढलेला
त्यामुळे आता बरीच फुले दिसताहेत. जरी ही फुले दिसायला सुरेख असली तरी परकीय वाण आहे आणि आपल्या परिसंस्थेकरता तणच.

IMG_20201007_073954.jpg

देखणे आहेत फोटो सार्‍यांचेच. रोज एकएक घेऊन वॉलपेपर म्हणून लावायला हवेत. दिवसभर बघता येतील.
निरु, छानच आहे कल्पना.

हा ही सकाळी धावताना मधेच थांबून काढलेला.
होय ही मुठा नदीच आहे. माझ्या लहानपणी मी ह्या नदीत रंगीत मासे बघितलेले आहेत. माझ्या मुलांना ते परत बघता येतील?

IMG_20200802_060750.jpg

शिरवळचे वीर धरणाचे बॅकवाॅटर..
नुकताच झालेला सूर्यास्त..
आकाशात उगवलेला चंद्र..
आणि किंचित खाली डोळे ताणून दिसणारी "उगवली शुक्राची चांदणी"

काठावर एक छोटसं मळ्यातलं घर..
आणि चिकन पोपटीचा बेत..


Pages