सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

Group content visibility: 
Use group defaults

किती टक्के पैसे बुडाले तर बुडवणारा दोषी ठरतो ?

राणे म्हणतात नाईकांचे 400 कोटीपैकी 10 च कोटी बुडाले आणि त्यांनी अरणवचे नाव लिहून आत्महत्या केली तर ती जस्टीफएड नाही

राणेंचा पॉईंट टेक्निकली करेक्त वाटत आहे , त्यावर पोलिसांचे स्ट्रॉंग अर्ग्युमेंट लागेल , ते कसे होईल ?

राणे ना कोकणात कोणी विचारत नाही.
महाराष्ट्रात त्यांना काही किँमत नाही.
BJP पण त्यांना फेकून च देणार आहे.
त्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही.

Lol.
{बरं त्या नाईक ची बिचारी बायको अर्णव ला उचलण्य अगोदर काकांना भेटून आली म्हणे !
त्यामुळे या केस मधील काल च्या घटना क्रम साठी काका ना जबाबदार बिलकुल धरायचे नाही , बर का !}
आधीच्या प्रतिसादातलं फोटोबद्दलचं वाक्य तेवढं उडवलं.
त्यावरून एकंदर प्रतिसादाची लायकी कळली.

त्या ह्याचं नाव घ्या म्हणत अर्णवला वाचवायची धडपड अगदी केविलवाणी आहे.

भरत, त्या फोटो खाली असलेली तारीख मे १९ ची मला नंतर दिसली , त्यामुळे माझी कॉमेंट सायुंक्तिक न वाटल्या मुळे मी एडिट केली .
राहिला प्रश्न लायकीचा !
बऱ्याच वेळा मी तुम्हाला लाईटली प्रतिसाद दिलेला असतो , पण तुम्ही मात्र नळावर भांडण्याची तुमची लायकी वारंवार सिद्ध करताय !
बर ते पाच कोटी बु डवणाऱ्या तुमच्या आवडत्या शेख बद्दल अजुन काही माहिती घेतली का ?
का अजुन ही ८० लाखा साठी अर्णव चा जप चालू आहे !

वटवृक्ष
अर्णव सारख्या सुपारी baj , भडवे गिरी करणाऱ्या एका फालतू व्यक्ती बद्दल bjp आणि अंध फक्त एवढे बैचेन का झाले आहेत.

किती टक्के पैसे बुडाले तर बुडवणारा दोषी ठरतो ?

राणे म्हणतात नाईकांचे 400 कोटीपैकी 10 च कोटी बुडाले आणि त्यांनी अरणवचे नाव लिहून आत्महत्या केली तर ती जस्टीफएड नाही

राणेंचा पॉईंट टेक्निकली करेक्त वाटत आहे , त्यावर पोलिसांचे स्ट्रॉंग अर्ग्युमेंट लागेल , ते कसे होईल ? >>>>>
बरोब्बर !
मुळात ती केस सुरवाती पासूनच संशयास्पद आहे !
इतकी मोठी प्रॉपर्टी असताना सहा कोटी बुडाले म्हणून आत्महत्या करावी ? ते ही आई सहित ?
स्पष्टपणे बोलायचं झालं तर आईच का ?
बायको आणि मुलगी का नाही ?
हे फक्त त्या नाईक ला माहीत आहे .
पण पोलिसांनी त्या केस च्या निमित्ताने अर्णव ला गुंतवला !

वटवृक्ष
अर्णव सारख्या सुपारी baj , भडवे गिरी करणाऱ्या एका फालतू व्यक्ती बद्दल bjp आणि अंध फक्त एवढे बैचेन का झाले आहेत. >>>>>>
इथे अर्णव ची बाजू कोणीही मांडत नाही पण,
त्या शेख च्या गुन्हा बद्दल न बोलण्या इतके काँगेस चे गुलाम मुके झाले आहेत का ?

" सरकारचं अन्वय नाईक प्रकरण, तेल नसलेला दिवा आहे"

◾सर्वप्रथम कोणत्याही फर्मची कामाच्या मोबदल्यातील आर्थिक देवाण घेवाणीची केस ही फौजदारी होत नाही.

◾एखाद्या क्लाइन्ट फर्म ने काम केलेल्या फर्म चे पैसे देत नसेल, तर काम केलेला फर्म चा सर्वेसर्वा ( उदा. इंटिरियर डिझायनर नाईक) क्लाइन्ट ला नोटीस पाठवतो.

◾नोटीस पाठवण्या अगोदर काम करणारा आणि करून घेणारा यात कॉन्ट्रॅक्ट साइन झालेला असतो. त्यात पेमेंट टर्म्स अँड कँडीशन्स देखील असतात.

◾ टर्म्स अँड कंडिशन नुसार आणि अप्रूव्ह केलेल्या डिजाईन नुसार काम झालं असेल तर, क्लाइन्ट ला पेमेंट देणे बंधनकारक असते. पण, बिजनेस म्हटल्यावर पेमेंट देवाण घेवाण मध्ये विलंब होऊ शकतो.

◾ जर जास्तच विलंब झाला असेल पेमेंट साठी तर काम करणारा त्याची केस ( तक्रार ) अरबीट्रेटर कडे करू शकतो. ही एक प्रायव्हेट तक्रार प्रोसेस असते. याच माध्यमातून पैसे न देणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवून देऊ शकतो.

◾केस अरबीट्रेशन मध्ये गेल्यावर काम करून घेणारा आणि देणारा दोघांनीही आपापली बाजू मांडता येते, इथे सर्वबाजू पडताळून अर्बीटेटर निर्णय देतो.

◾ इथे कॉन्ट्रॅक्ट साइन झाल्यामुळे वैयक्तीक कुणाचाही एकमेकांचा संबध नसतो, एक व्यावसायिक म्हणूनच याठिकाणी खटला चालवला जातो.

◾जर व्यवसायात पेमेंट नाही आलं म्हणून कोणी आत्महत्या केली असेल तर , त्या आत्महत्येशी त्या पार्टीचा कोणताही संबंध नसतो. ज्या फर्म ची वार्षिक उलाढाल १० - १५ करोड ची असेल, ज्यांच आऊटस्टँडिंग एका पार्टीकडे ४ करोड असेल, तर तो ८० लाखसाठी आत्महत्या करू शकत नाही.

◾ महत्वाचा मुद्दा, अर्णव चे नाव घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने अर्णव च्या कंपनी विरोधात अर्बीटेशन तक्रार दाखल केली होती का.?

◾ आता काही शिवसैनिकांठी सांगत आहे, सुसाईड नोट मध्ये नाव आहे. सुसाईड नोट मध्ये कुणाचं नाव आलं असेल तर तो, आत्महत्या करण्यास परावृत्त केलं, किंव्हा मर्डर केलं असं होत नाही.

◾चिठ्ठीवर जर अर्णव मुळे आत्महत्या केली अस लिहल असेल तर, अर्णव हा गुन्हेगारच आहे हे सिद्ध होत नाही. गुन्हेगार ठरवायला सुसाईड नोट चालत नाही. कारण ; प्रत्यक्ष किंव्हा अप्रत्यक्ष सहभागी असलेला पुरावा लागतो.

◾जर पुरावा मिळत नसेल तर त्या सुसाईड नोटला कोणताही अर्थ कायद्याच्या भाषेत उरत नाही. कारण कोर्टात पुरावे लागतात. आणि ते पुरावे आज पोलिसांना कोर्टात देता आलेले नाहीत.

◾पुरावे देता ना आल्याने, बंद झालेली केस कोर्टाच्या परवानगीशिवाय खुली केली असल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने अर्णव गोस्वामीला पोलीस कस्टडी देण्यास मनाई केली.

◾ काही शिवसैनिकांचे म्हणणं आहे, सुशांतसिंग ची सुसाईड नोट नव्हती तरी, एका मंत्र्याला बदनाम करत होता अर्णव गोस्वामी. खर कोणत्याही मंत्र्यांचे नाव त्याने घेतला नाही. शिवसैनिकच त्या मंत्र्याच नाव घेऊन सांगत आहेत.

◾कायदा काय सांगतो, जोपर्यन्त कोणतेही पुरावे समोर येत नाहीत तो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही. जरी सुसाईड नोट मध्ये त्याच नाव असलं तरीही. तसेच जिथे सुसाईड नोट नाही, तिथे कदाचित मर्डर देखील असू शकतो. त्यासाठी तुमच्या जवळ असलेली बुद्धीला थोडस ताण द्या अनिल अभ्यास करा.

◾आणि, हो काही शिवसैनिकांना, न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कस्टडी यातील फरक माहिती नाही. न्यायालयीन कोठडी का देतात.? आणि पोलीस कोठडी का घेतात यातील फरक त्यांनी आधी समजून घ्यावा.
—- adbocate sanjay gaikwad .

राणे वगैरेंचं मी वाचत नाही, मला पर्सनली अर्णव आवडत नाही पण खरंच दोन वर्षापुर्वी या प्रकरणात सेनेने प्रेशर टाकायला हवं होतं, तेव्हा गप्प का बसले असं नक्कीच वाटतं.

तिघे दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हायला हवी ह्याच मताची मी आहे. फक्त सुडबुद्धीचं राजकारण कोणीच करु नये.

राजकारण आहे हे सगळ्यांनी ठरवून टाकलं, कस काय ?

तुलनात्मक माहिती कोणाकडे आहे, इतर वेळेस किती दिवसांत अटक होते याची ? 2019 म्हणजे काय लै पुरातन केस उचकटून काढलीये असे तर दिसत नाही.
आधी केस क्लोज होती हे विधान कशावरून आहे ?

संजय गायकवाड यांनी ही फॉरवर्ड अर्णवला पाठवायला पाहिजे, त्याने रिया चक्रवर्तीबद्दल काय बोललाय हे या फॉरवर्ड मधल्या मुद्द्यांशी सुसंगत आहे का बघायला. (तिथे तर सुसाईड नोट पण नव्हती. पैश्यांची अफरातफर वैगेरे साफ खोटे मुद्दे अर्णब आणि मंडळींनी उचलून धरले होते. )

शावक, अगदी. अर्णवला इतक्या लवकर आरसा दाखवता आला याचंच बरं वाटतंय. पण त्याला आणि त्याच्या समर्थकांना त्यात काही दिसणार नाही.
रियाने एवढा महागडा वकील केला म्हणजे तिने सुशांतचे पैसे लुबाडले होते स्कूल ऑफ लॉजिक मधून - अर्णव टीव्हीवर जसं बोलतो ते बघून नाईकांना त्याने किती धमकावलं असेल त्याची कल्पना येते.

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे चेले अर्णव साठी का गळा काढत आहे ह्याचे कारण काय.
हिंदू धर्मावर अन्याय झाला अर्णव la अटक करून ही फालतुगिरी का चालू आहे.

नाईक यांच्या पत्नी आणि घरच्यांचे म्हणणे असे की ही केस क्लोज केल्याचे पोलिसांनी सांगितलेच नाही. फेसबुक वर कुणीतरी यासंबंधी व्हिडिओ पोस्ट केला त्यावर रिपब्लिकचे उत्तर होते की केस क्लोज केली आहे. तेव्हा नाईक यांच्या घरच्यांनी पुन्हा चौकशी करून केस नव्याने चालू करायचे प्रयत्न केले. यामुळे फडणवीस यांची देखील चौकशी व्हावी की नाही? Wink

केस क्लोज का केली हे पुढे कोर्टात प्रकरण सुरु झालं की येईलंच, यायला हवंच आणि दोन वर्षापूर्वी ह्या बाबत काय केलं हे त्यावेळेच्या सरकारला पण उत्तर द्यायला लागेलच.

मागच्या पानावर पोस्ट झालेला नाईक यांच्या पत्नी मुलीचा पवार यांच्यासोबतचा फोटो खरा होता आणि भरत. यांनी फोटोशॉप केलेला एडिटेड फोटो टाकून ओरिजिनल फोटोलाच खोटं ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
(असं मी अजिबात म्हणत नाहीये! पण या साईटवर दिलंय. https://bolbhidu.com/sharad-pawar-and-akshata-naik-adnya-naikl/ )

नोटेड. मी टाकलेला फोटो ट्विटरवर मिळाला होता.
मे २०१९ चार फोटो आहे.
तेव्हा आपल्या मागणीसाठी दोघी अनेक नेत्यांना भेटत होत्या असेही म्हटले आहे.

दोन वर्षं त्या गप्प का होत्या या प्रश्नाचे उत्तरही मिळाले की त्या गप्प नव्हत्या.

बिहारच्या निकालानंतर सुशांत नावाचा कोणी माणूस होता हे ही काहींना आठवणार नाही . त्याच्या कुटुंबातील लोकांना राजकारणी लोकांच्या नादाला लागू नये हा धडा मिळाला तरी पुष्कळ आहे

images.jpeg

बिहारच्या निकालानंतर सुशांत नावाचा कोणी माणूस होता हे ही काहींना आठवणार नाही . त्याच्या कुटुंबातील लोकांना राजकारणी लोकांच्या नादाला लागू नये हा धडा मिळाला तरी पुष्कळ आहे

BJP नी नको तेवढा इंटरेस्ट ह्या प्रकरणात घेतला नसता आणि BJP चे वाचाळवीर सहभागी झाले नसते तसे सुशांत केस मध्ये काही तरी प्रगती झाली असती.
अन्वय Nike च्या केस च तपास तेव्हाच फडणवीस सरकार नीट केला असता तर nike कुटुंबाला तेव्हाच न्याय मिळाला असता .

मी टाकलेला फोटो मॉर्फ्ड होता सांगितल्याबद्दल सनव यांचे आभार , माझाही पाय फेक ट्वीटच्या शेणात पडला. यापुढे आणखी खबरदारी घेईन.

सनव यांच्या पोस्टमुळे शोधाशोध केली तेव्हा महाराष्ट्र भाजप आय टी सेलचा कन्व्हेनर सतीश निकम या इसमाने अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीबद्दल लिहिलेलं वाचायला मिळालं. हे लोक कधीच अपेक्षाभंग करत नाहीत.

नो वरीज भरत.
फेसबुकवर माझ्या लिस्टितल्या एका काकूंनी तोच तुम्ही टाकलेला फेक फोटो टाकला. त्यावर लोकांनी त्यांना 'अहो तुम्ही खोटा फोटो टाकलाय' हे सांगितल्यावरही त्या आपली चूक मान्य न करता पिरपीर करत राहिल्यात. तुम्ही मात्र खिलाडूपणे पोस्ट acknowledge केली यासाठी थम्सअप.

(त्या काकू राजकारणी व्हायला योग्य आहेत. होऊ देत म्हणा, आमची दुसऱ्या बाजूलाही ओळख असलेली बरी!)

बाकी मग त्या निकमला नाही का झाली अजून अटक?

Pages