शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मानव : ५ शर्करामापक ---- मग र्क वरून ६ काय येईल? रूप जसेच्य तसे हवे ना

कोडे ---
१. कच्चा ( 2) --- काचा
२. खरंच (3) -- साचार
३. तजेला (4) --- चाकचक्य
४. प्रतिभा (5) --- कविताशक्ती
५. मोजण्याचे साधन (6)
६. पसंतीनुसार (7)

अटी :
अपेक्षित उत्तरांची खालील अक्षरे समान आहेत. (समान अक्षर याचा अर्थ अक्षराचे पूर्ण रूप जसेच्या तसे. दा = दा ).

उत्तर क्र १ चे दुसरे अक्षर = २ चे दुसरे अक्षर.
२ चे दुसरे = ३ चे पहिले
३ चे दुसरे = ४ चे पहिले
४ चे चौथे = ५ चे पहिले
५ चे दुसरे = ६ चे पहिले

Submitted by कुमार१ on 8 October, 2020 - 09:23

नाही
अर्थ काय त्याचा ?
पहिले अक्षर ?

श्यानता म्हणजे काय स्वरूप?
आपल्याला "श" च पाहिजे ना.....
शतपावली ६ अक्षरी नाही

शत ???? आहे का?
काय मोजायचे --- वजन / लांबी / क्षेत्रफळ / घनफळ / अंतर / काळ / वस्तुसंख्या.....

ते कळले .....पण येत नाहीये..... फूट मीटर एकर हेक्टर खंड बिघा ही उपकरणे नाहीत.
शत क्षेत्र मापी असे काही आहे का? ---- एकावेळेला १०० च्या पटीत मोजू शकणारे साधन ( स्वरचित नाव)

६ वरून उलटे गेले तर चालेल का?

उपकरण जुन्या काळचे --- जमिनीसाठी काठी, दोरी (कासराभर), पुरूषभर (पण हे उंचीला), दगडाची फेक, शक्य तितक्या लांब पाऊल टाकून पावले मोजणे....
२.५ फूट = ?? बघायला पाहिजे

शंकू>>>
श च पाहिजे अनुस्वार नको

मानव नाही
70 च्या दशकातील एका हिंदी भयपटाचे नाव
त्यात ते 'माप' आहे

होय
गज आहे !
थोडा वेळ उरलेली ३ अक्षरे प्र करा
मग सांगतो

सापडला ३३ इंची --- इलाहीगज / शाहीगज
श नाही

शरायणीगज ---- नव्हते माहीत

70 च्या दशकातील एका हिंदी भयपटाचे नाव --- हे विथ गज?
नाही आठवत. कोहरा / गुमनाम / बीस साल बाद / महल / मधुमती / इत्तेफाक / तीसरी मंझिल .... संपले.

आता रा वरून ७ अक्षरी पसंतीनुसार.....
राजमान्यतेनुरूप ? ८ अक्षरी
राजमान्यताप्राप्त ?

कारवी
दो गज जमीनके नीचे : रामसे बंधू
६ पसंती/ खुशी / ..नुसार

खरंय देवकी..... चाकचक्य तर जन्मात आला नसता.......स्वरूपनी लिहीलाय

६ पसंती/ खुशी / ..नुसार
ओके म्हणजे राजाची पसंती नकोय?
राजीखुषीमामला?

Pages